विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुकुंद Happy

कबीर + १.
द.आ. ने वर्ल्डकप जिंकण्याच्या शक्यता कमी आहेत... मायभूमीत आणि फॉर्मात असल्याने ऑस्ट्रेलिया नं. १ दावेदार आणि त्याखालोखाल न्यूझीलंड... आपण डार्कहॉर्स!

एकदा तरी विश्वचषक दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व न्यूझीलंडला मिळावा अशी इच्छा आहे. ह्याचा अर्थ आपल्याला मिळू नये असा नाही. चांगला संघ जिंको!

4/3: Pak vs Uae (Uae)
14/3: Ind vs Zim (Zim)
15/3:Ire vs Pak (Ire)
वरिल ग्रुप मॅच मधले तीन उप्सेट वगळता बाकीचे निकाल कोणीही सांगू शकेल.

QF 1: Nz vs Ind (Ind) आपले स्पिनर्स चालले तर शक्य आहे.

बाकी सगळ ठिक आहे. Happy

वरिल ग्रुप मॅच मधले तीन उप्सेट वगळता बाकीचे निकाल कोणीही सांगू शकेल.
>>>>
एकापेक्षा जास्त अपसेट ठामपणे सांगणे खूप कठीण आहे,
तसेच इतर जे कोणीही सांगू शकेल अश्या सामन्यातही अपसेट होतातच,
त्याचबरोबर जवळपास तुल्यबळ म्हणजे ईंग्लंड न्यूझीलंड पाक भारत श्रीलंका वेस्टईंडीज यांचे आपापसातले सामने, त्याचबरोबर झिम्बाब्वे युएई आयर्लड स्कॉटलंड यांचे आपापसातले सामने हे सातत्याने बरोबर सांगणे कठीणच.

अर्थात ते वरचे फेक आहे यावर माझा ९९.९९९९इन्फिनिटी...टक्के विश्वास आहेच,
पण ते तसेच घडले तर खरोखरच फिक्सिंग झालीय यावरही ९९.९९९९इन्फिनिटी...टक्के विश्वास ठेवणे भागच आहे Happy

QF 1: Nz vs Ind (Ind) आपले स्पिनर्स चालले तर शक्य आहे. >> हेच लिहायला आलो होतो रे इंद्रा. परत ही मॅच असणार New Zealand मधे. म्हणजे पिच पण फिक्स करावे लागणार आधी. Happy

मी डबल चेक केलेले नाही, पण एकाकडून ऐकले त्याप्रमाणे क्वार्टर फायनल चे लाईनअप्स मॅच होत नाहीत -

The QF line up as per this message does not match with the final standings of the Groups. Let me explain as follows. If all of the results were to be true, the final Group standings would look like as follows.

Group A Results

1. NZ 12 points
2. Aus 10 points
3. Eng 8 points
4. Sri Lanka 4 points
5. Bang 4 points
6. Afghan 2 points
7. Scotland 0 points
(Assuming Sri Lanka qualifies ahead of Bangladesh due to higher NRR - since according to this whatsapp QF Line up SL makes it to QF)

Group B Results

1. RSA 12 points
2. India 8 points
3 or 4 Zimbabwe 6 points
4 or 3 Pakistan* 6 points
5 or 6 West Indies 4 points
6 or 5 Ireland 4 points
7. UAE 2 points

* Since result of Pak vs Ire is not provided - assume Pakistan beats Ireland since Pakistan is making QF as per this message

According to this the QF line up should be

(A1 vs B4) NZ vs Pak or Zim
(A2 vs B3) Aus vs Zim or Pak
(A3 vs B2) Eng vs India
(A4 vs B1) RSA vs Sri Lanka

परंतु मेसेज बनवणार्‍या माणसाने झकासपैकी भारत आणि न्यूझीलंड ची QF लावली आहे. तिथे तो गंडला.

भास्कराचार्य सही .. माझ्याही डोक्यातही एकदा या प्रकारे क्रॉसचेक करायचे आले होते.. पण हे फेक आहे हे स्वताला विश्वास असल्याने का टाईम वेस्ट करा असा विचार केला.. आणि बनवणार्याने एवढी काळजी तर घेतली असेल असेही वाटलेले..
असो, आज तर ग्रूपवर एकाने न्यूजपेपरची लिंक देऊन हि बातमी शेअर केली होती.. न्यूज पेपर वालेही काहीही छापतात टीआरपीसाठी..

न्यूझीलंडमध्ये स्पिनर नाही जिंकवून देऊ शकत, फास्टरच जिंकवून देऊ शकतात.. आणि जिंकवून देतीलही, भरवसा नाही.. कारण तेथील खेळपट्ट्याच नाही तर वातावरणही बेभरवश्याचे असते.. न्यूझीलंडची स्वताचीही लाईन सहज लागते.. जर आपल्या गोलंदाजीच्या वेळी तशीच मदत मिळाली आणि योग्य लेंथ पकडली तर आपणही त्यांच्या धडाधड विकेट काढू .. पण हे काम स्पिनर नाही तर फास्टरच करू शकतात.. तिथे जडेजा आणि आश्विन दोघांना खेळवण्यात पॉईंट नाही, बिन्नी परवडेल.. वेगवान गोलंदाजांमध्ये ऑलाराऊंडर नसणे वा शमी, यादव, शर्मा, भुवी यांना फलंदाजी जराही न जमणे हे नडतेय आपल्याला..

बटरफिंगर्स! किती ते कॅच सोडायचे? आणी त्या आंड्रे रसेलने धुणी धुपाटल्यासारखे धुतले पाकिस्तानला शेवटच्या ५ ओव्हर्समधे..:)

वेस्ट इंडिज ३१०.. पाकिस्तानची परिस्थिती परत नाजुक आहे आज. कांदापोहे .. जरा जपुन लाव रे बाबा पैसे आजच्या रिझल्टवर्..(बेस्ड ऑन युअर रिझल्ट्स यस्टरडे..):)

दीपांजली.. तु आलीस की १० ओव्हर्स मधे मॅच संपते...:)

रार.. एंजॉय!

बेफिकीर.. यु बेटर बिलिव्ह इट!:)

Mukund :d

बेफिकीर.. म्हणुन तर कांदापोहेला म्हटले की आज जरा जपुन लाव रे बाबा पैसे..:)

आज परत मिसबाह वर दारोमदार.. (अनलेस यु आर शोएब अख्तर.. त्या दिवशी द्रविड म्हणाला तस.. शोएब भाइ.. कुछ भी हो.. आपको आफ्रिदीपर बहोत हॉसला है..:) )

पण मिसबाहच्या कप्तानकी मधे काहीच कल्पकता नाही हे मात्र निश्चित... माझ्या मते त्याने नंबर ३ वर आले पाहीजे.. आणि बोलिंग चेंजेस पण खुपच प्रेडिक्टेबल..

मुकुंद,

तुम्ही एक पाहिले असेलच पण!

ह्या अवस्थेतही शॉट्स मारताना पाकिस्तान जी जिगर आणि देहबोली दाखवत आहे ती एन्व्हिएबल आहे. आपल्याकडचे दोघे-तिघे जरी ती देहबोली शिकले तरी आपण खूप काही करू शकू.

ह्या अवस्थेतही शॉट्स मारताना पाकिस्तान जी जिगर आणि देहबोली दाखवत आहे ती एन्व्हिएबल आहे.
>>>>>

बेफिकीर,

ही जिगर नाही बेफिकीरपणा आहे टॉप ऑर्डरचा Happy

Pages