विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्ल्ड कप जिंकला तर आमच्या टीमला लंचला घेऊन जाईन अशी घोषणा केली नुकतीच हापिसात.
लोक भारावले वगैरे. विशेषतः क्रिकेट फारसे न कळणारे लोक्स.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
या टीमला घेऊन आपन सेमीफायनल पण गाठत नाही याची खात्री आहे मला म्हणूनच अशी ऑफर दिली Wink

आणि हि टीम जिंकली तर कुठेतरी कोणीतरी नक्कीच फुकटात जेवण वाटेल, तिथे घेऊन जाता येईल तुमच्याही टिमला Happy

केदार.....आधीच एक लीग उघडलीय बघ मायबोलीची....लोक जॉइन पण झालेत तिकडे.....तू पण तिकडेच ये
वरती आहेत बघ डिटेल्स

केदार.....आधीच एक लीग उघडलीय बघ मायबोलीची....लोक जॉइन पण झालेत तिकडे.....तू पण तिकडेच ये
वरती आहेत बघ डिटेल्स
>>
डन स्वरूप Happy

मित्रहो इतक्या लगेच आशा सोडू नका ........... अंतिम चार मध्ये नक्की जाईल टीम इंडिया .
>> +१०००
कमर्शियल इंटरेस्ट लक्षात घेऊन असा फॉर्मॅट बनवलाय की भारत ७ मॅच तरी नक्की खेळेल Wink

त्यानंतर काय?
पहिली मॅच जिंकली तरी लोक विश्वचषक जिंकल्यासारखा आनंद आणि समाधान व्यक्त करतील
२००७ चा विश्वचषक कुणाला आठवत देखील नसेल. या त्याची बोच इतकी नसेल.

यंदा खरच काही दम नाही वाटत आहे. आधीच्या भारत-पाक मॅच मधे खुन्नस असायची तशी यंदा दिसत नाही आहे. युवराजसिंग, हरभजन सिंग, गौतम गंभीर, सेहवाग, झहीर खान आणि कायम चवताळलेला सचिन तेंडुलकर असे ढाण्यावाघांसारखे खे़ळाडु जेव्हा पाकिस्तान बरोबर भिडतात तेव्हा ती लढत कायमच सर्वोकृष्ट असते.
जेव्हा अब्दुल रज्जाक ने सचिनचा कॅच सोडला तेव्हा वसिम अक्रम बोललेला "@#$% जानता है तुने किसका कॅच छोडा" पाकिस्तान आणि भारत मॅच मधे सचिन कायमच शड्डु ठोकुन उभा होता. युवी, गौती भज्जी यांची भांडणे तर जगजाहीर आहे. कमरान खटमल बरोबर झालेली भिडंत असो या आफ्रीदीला भर मैदानात घातलेल्या शिव्या असो. गौती आणि भज्जी कायम आलेख उभा ठेवलेला. समोरच्या पाकीला अगदीच कस्पटासमान लेखण्याचा जो डोळ्यात त्यांच्या भाव असायचा तो बघुनच मॅच बघण्याची मज्जा वाढत असे. यांच्याविरुध्द खेळताना १००% चे ५००% उर्जा अंगात येते. यंदा असे खेळाडु दिसतच नाही आहे. फार फार तर कोहली कडुन अशी खुन्नस पहायला मिळेल. ( तसाही तो कुणाबरोबरही खुन्नस काढुन असतोच ) रोहित शर्मा, रैना बस हे दोन तीन खेळाडु आहेत. बाकी अक्षर पटेल , भुवी काही असला प्रकार करणार नाहीत, शोएब अख्तर समोर अक्षर पटेल उभा रहिला तर कसा वाटेल ? Happy अख्तर समोर सचिन या झहिरच हवेत. तर एक ठस्सण येते. वरील लोक इराला पेटलेली असायचीत पण डोके शांत ठेवुन. आपले काम चोख बजावत होतीत. सचीन तर बर्फामधली आग होती.

यंदा नविन लोकांकडुन बघुया काय करतात हे.

यंदा कप आपलाच.

ऋग्वेद छान पोस्ट, युवी आणि भज्जी, यार हे दोघे धमाल होते, सध्याच्या टीममध्ये तर हवेही होते..
पण आता जे आहे ते हेच आहे..
मी विचार करतोय दुसर्‍या इनिंगची सुरुवात झाली की आमच्या इथे सलूनमध्ये दाढी-केस करायला जावे, तिथे ईंडिया-पाक सामना फुल्ल ठस्सण मध्ये बघितला जातो..

या सामन्याच्या वेळात जो सिनेमा बघायचा असेल तो बघून घ्या थेटरात. ऐन वेळी हमखास तिकीटे मिळतील Wink

ज्या कपलला क्रिकेटमध्ये रस नाही त्यांनी वॅलेंटाईन डे चा नेक्स्ट डे अश्या रिकाम्या थिएटरात चित्रपट बघत (!) प्लान करायला हरकत नाही Wink

श्रीलंका देखील न्युझिलंडकडुन विश्वकप मधे कधीच हारली नाही आहे
>>>>>>>

९२ ला मार्टीन क्रोच्या झंजावातात न्यूझीलंड (बहुतेक पाकिस्तानचा अपवाद वगळता) सर्वच सामने जिंकलेले ना.. आणि तेव्हा सर्वांचे सामने आपापसात होते ना..

भारत पाक वर्ल्ड कप मॅचेस मधे सचिन चा मिनिमम स्कोअर ३० असावा, १९९६ मधे - पण तेथेही सिद्धू बरोबर ९० ची भागीदारी होतीच. त्यानंतर १९९९ मधे ४५ का काहीतरी. बाकी तिन्हीत तो मॅन ऑफ द मॅच होताच.

बाकीचे "वीर" म्हणजे १९९२ ला कपिल - त्यावेळच्या परिस्थितीत २६ बॉल्स मधे ३५. १९९२, १९९६ व १९९९ ला अझर - थोडेफार फटकेबाजी चांगली केली, १९९९ आणि २००३ मधे द्रविड - त्यातही २००३ मधली कामगिरी अत्यंत मह्त्त्वाची, कारण सचिन आउट झाल्यावरही १०० हवे होते. ते त्याने व युवराजने सहज केले. अजय जडेजा १९९६ मधे वकार ला तुडवण्याबद्दल, तसेच १९९६ मधे सिद्धूही - ९४ मारले होते सर्वांना भरपूर धुवून.

बोलर्स मधे १९९२ मधे सचिन - महत्त्वाची पार्टनरशिप तोडली, तसेच श्रीनाथ. १९९६ मधे प्रसाद त्या सोहेल च्या एका विकेटसाठी सुद्धा बास होईल. पण १९९९ मधे तो मॅन ऑफ द मॅच होताच. २०११ मधे युवी व भज्जी, महत्त्वाच्या वेळेस विकेट्स उडवण्याकरिता.

आणखी कोणी राहिले का? जुने हायलाईट्स पाहताना एक जाणवले १९९२ मधेही पाक विरूद्ध मांजरेकर संघात होता व १९९६ मधेही. तेवढे जरा अनाकलनीय आहे Happy

परवा रोहीत शर्मा या लिस्टमध्ये येणार .. सेंच्युरी ठोकेल तो असे वाटतेय .. आणि आपली पहिली बॅटींग आली तर अर्थातच याचे चान्सेस वाढणार ..

बघत आहे का कोणी. पहिली मॅच? मलिंगाला धुतला मॅकॉलम ने.. मलिंगाच्या बोलिंगमधे मागच्या २ वर्ल्ड कप मधल्यासारखा स्पिड व यॉर्करची अ‍ॅक्युरसी (निदान पहिल्या ४ ओव्हर्अ मधे तरी) दिसत नाही.. टु मेनी स्लोअर बॉल्स अँड दोज टु स्लो फुलटॉसेस!

श्रिलंका टिम नेहमीच खुपच लेड बॅक अ‍ॅटिट्युड ने खेळते.. आजही अपवाद नाही.. थोडीशी जिंकायची अर्जन्सी दाखवली त्यांनी तर दोन वेळा ते वर्ल्ड कप फायनल हरले नसते. असो.. टु अर्ली टु राइट देम ऑफ..

डेंजर मॅन व इन फॉर्म केन विलिअम्सनचा कॅच संगाकाराने तो शुन्यावर असताना सोडला..

चांगली तोडातोडी बघायला मिळेल ४० ओवरांनंतर असं वाटत होतं पण नेमक्या दोन विकेट खटाखट गेल्या. जरा हवा फुस्स झालीये. तरी ४ म्हणजे नॉट बॅड. अजूनही चान्स आहे. मक्कलम, गुप्तील आणि वेट्टोरी सोडून एक सुद्धा पिलेयर ओळखीचा नाय च्यामारी! Lol

क्रिकटाईम Proud पौष्टिक आहे.

हे मग्रा, अक्रम वगैरे ह्यांचा अक्षरशः तिळपापड होत असेल नै ह्या मलिंगाची अ‍ॅक्शन बघून? बॉलिंगच्या नावाला कलंक आहे त्याची अ‍ॅक्शन अगदी! Angry फेकूनच मारायचाय बॉल तर मग हात मधून दुमडू पण द्या मग! किंवा ह्या चिमणीच्या घरट्याला बेसबॉल खेळायला पाठवा! :लटपटीसहसात्विक्संताप:

लंका न्यूझीलंड आटोपलाय सामना, आता फक्त सराव सामना आणि धावगती सुधारणे आणि वैयक्तिक विक्रम यांसाठी खेळत आहेत.
फार तर मॅथ्यूजने काही फटकेबाजी केली तर तेवढेच मनोरंजन.. श्रीलंकेच्या पब्लिकला..

असो, अपेक्षित निकाल

आणि हो,
श्रीलंकेला एक फुकटचा सल्ला.
मॅथ्यूजचा गेल्या वर्षभरातील फॉर्म पाहता त्याच्यासाठी ६ वा नंबर खूप मागे आहे.. त्याला ४-५ वर आणायला बघा..

ईंग्लंड मधल्या काळात तीन क्विक विकेट घेतल्याचा अ‍ॅडवांटेज गमावत चाललीय.. जर मॅक्सवेल मार्शला पोषक स्थिती तयार झाली आणि मॅक्सवेल सुटला तर सामना ईंग्लंडसाठी तिथेच संपला.

Pages