विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकिस्तान टीममधल्या बॉलर्सविषयी कोणाला काही माहीती आहे का? मला तर सगळेच नवे वाटताहेत.

विश्या तु पाप केलं आहेस. ऋन्म्याचा एक धागा विणण्याचा अधिकार तु हिसकावून घेतलास. आता धागे विणण्याचं त्याचं टार्गेट पुर्ण कसं होणार? Proud

ऽऽऽऽऽऽऽऽ कसलं सिक्रेट ऋन्मेऽऽष... बहुतेकांना माहिती आहे ते कसे करायचे ते.. मुकुंद अ लिहा आणि त्याच्यापुढे टिल्डा लिहा..
>>>>>>
धन्यवाद, मलाच माहीत नव्हते Proud
शप्पथ, आधी मी त्या जागी ईंग्रजी आद्याक्षर एस लिहिले होते. कोणीतरी इथल्याने मग कुठेतरी लिहिलेले हे सूर सुचवलेले, ते कॉपीपेस्ट करून घेतलेले Wink

सचिन ची कमतरता तर भासतच आहे शिवाय त्याच्या तोडीचे खेळाडू जे टीमचा टिकाव लाऊ शकतील (विरु , युवी , झहीर हे तिघे तरी किमान ) त्यांचा समावेश करणे गरजेच आहे अन्यता खूप खराब अवस्ता होईल या विश्व कप स्पर्धेत .

असल्या अंधश्रद्धा नका बाळगू
मागच्या वेळचा धोनी आहे ना मैदानात ..... तेव्हढा पुरेसा आहे

पाकिस्तान टीममधल्या बॉलर्सविषयी कोणाला काही माहीती आहे का? मला तर सगळेच नवे वाटताहेत >> आज खेळलेल्यांमधे यासीर शाह नि सोहेल खान नवीन आहेत, बाकीचे काही वर्षे खेळताहेत रे. It's a good attack but short on experience about playing down under.

चॅपल चे बिन्नी ला सलामीला पाठवण्याचा सल्ला ( धवन ऐवजी) चांगला आहे. Anyways, Indian ballers will struggle unless pitches are helpful (and in that case batsman will find it going tough on current form). त्यामूळे पेसरपेक्षा स्पिनर्स वरच मदार ठेवावी लागणार आहे. अर्थात हे जरी down under मधल्या पिचेस ला सूट होणारे नसले तरी मोठ्या grounds मूळे spinners ना उचलून मारता येताना कॅचेस जाऊ शकतील. नुसत्या rudderless fast बोलिंगने विकेट्स मिळणे कठीण आहे. At the end of the day Patel,Jadeja and Ashwin will certainly find it hard to perform worse (read concede more runs and not tak wickets) than Yadav, Shami and Sharma can do in slog overs. बॉल नवा असताना वापरण्यापुरते भुवी नि बिन्नी आहेतच. Wink

पाकिस्तान चा बॉलींग अ‍ॅटॅकच चांगला असतो पण सध्या युनुस खान, स्सोहेब मकसुद आणि अहमद शह्जाद हे बॅट्समन सुध्दा चांगलेच फोर्म मधे आहेत. त्यामुळे आपले घोडे कितपत धावतात त्यावर अवलंबुन आहे सगळ.

वर्ल्ड कप ची एका पाकी फॅन ची जाहिरात ध-मा-ल आहे - तो फटाके आणतो भारताविरूद्धच्या मॅच ला प्रत्येक वेळेस आणि हरल्यावर पुन्हा नेउन ठेवतो. "कब बजाउंगा यार?" कोट जबरी आहे Happy

शास्त्री बुवा काही तरी राजकारण करतायत असा वाटत आहे . दोन सामन्यामध्ये एक शतक झळकावणारा विराट गेले ७ ते ८ सामन्यामध्ये साधे ५० धावा पण करू शकला नाही , कसोटी मध्ये त्याला कर्णधार पद मिळाल तर त्याने एकाच कसोटीत दोन शतके ठोकली होती , पण एकदिवसीय मालिकेमध्ये त्याला काय झाले एकदमच ,,,,,,,,,,,,,,,,,,,, आता इथे पण धोनी विरुद्ध राजकारण दिसू लागले आहे .

"कब बजाउंगा यार?" >>> कब फोडेंगे यार आहे.. व्हॉटसपवर विडीओ शेअर करताना मी तसे टायटल दिलेले.. धमाल आहे विडीओ, मी ५-६ वेळा सलग पाहिला..

२०११ च्या वर्ल्ड कपच्या वेळी मी सुरूवातीपासून शेवट पर्यंत आपणच जिंकणार अस ठाम पणे सांगत होतो. इतकच काय पण फायनल आणि सेमी फायनल कश्या होतील व आपण कसे जिंकू हे ही अगदी अचूक लिहिल होत. Happy

यावेळेस मात्र अस काही लिहू नये अस वाटत.
Instead, it is better to rely on glorious uncertainties of cricket. Happy

काहीही असो. आम्ही पंखे रहाणारच. तसाही आम्ही कप ५ वेळेस जिंकलाय. Happy

विक्रमसिंह सहमती १००० % , मागील वेळेस टीम बद्दल एक दृढ विश्वास आणि खेळाडूमध्ये पण मोठा आत्मविश्वास होता या टीम मधील बरेचसे खेळाडू नवोदित व आत्मविश्वासाने खेळणारे वाटत नाहीत .

तसाही आम्ही कप ५ वेळेस जिंकलाय >>> सही :). कालच रमीज राजाची मुलाखत पाहात होतो १९९६ बद्दलची. वकार ला जडेजाने धुतल्यावर त्यांना जबरी शॉक बसला हे त्याने उघड सांगितले. वकारचा चेहराही दाखवत होते तेव्हाचा Happy

वकार ला १९९६ मधे व शोएब ला २००३ मधे न्यूट्रलाइज केला आपण. त्यानंतर ते भारताविरूद्ध फारसे यशस्वी झाले नाहीत, निदान त्यांचे दडपण कधीच आले नाही. अक्रम मात्र शेवटपर्यत जबरी होता. अर्थात त्यालाही १९९२, १९९९ व २००३ मे अजिबात न भिता खेळले होतेच, स्विंग, बाउन्स वगैरे असलेल्या पिचेस वर.

मात्र याच लोकांशी एरव्ही खेळताना तेव्हा (२००३ च्या आधी) काय व्हायचे ते कळत नाही.

मात्र याच लोकांशी एरव्ही खेळताना तेव्हा (२००३ च्या आधी) काय व्हायचे ते कळत नाही.>> काही नाही.

पूर्वी पाकिस्तानात त्यांचे अंपायर व शिवाय बॉल कुरडतडणे. टी पर्यंत आपण मस्त खेळत असू. टी नंतर एकदम ७ -८ विकेटस जायच्या. बाकी आपण सरसच होतो.

15 Feb 2015 Pakistan Adelaide 8:50 AM
22 Feb 2015 South Africa Melbourne 8:50 AM
28 Feb 2015 UAE Perth 8:50 AM
06 March 2015 West Indies Perth 8:50 AM
10 March 2015 Ireland Hamilton 7:00 AM
14 March 2015 Zimbabwe Auckland 6:30 AM

मंजु खास तुझ्यासाठी.. बालमोहनची म्हणुन..:)

सर्व वेळा भारतीय स्टॅ. टा.

तसेही बॉलिंगच्या नावाने बोंब आहे, ती राहणार. ह्यावेळी बॅटिंगही नाही त्यामुळे आपण चाचपडत आहोत.

मोठे बॅटसमन जसे सचिन, युवी, गंभीर आणि सेहवाग नाहीत. (रिटायर वा फॉर्म मध्ये नाहीत वा घेतले नाही) गेल्यावेळी ह्यांनीच सर्व धावा काढल्या.

धोणी गेल्यावेळी फक्त एकदाच खेळला होता ते पण सर्व आटोक्यात आल्यावर. त्यामुळे तो ह्यावेळी खेळेल असे वाटत नाही. अफगाणविरुद्धही चाचपडत होता.

अजिंक्य, रोहित आणि रायडू हे नेहमी खेळतील असे वाटतेय. ते पण रोहितने लॉलिपॉप सोडले तरच !

इथ कुणीतरी लावा वेळापत्रक.
आपल्या पहिल्या दोन मॅचेस रविवारी (१५/२, २२/२) सकाळी नऊ वाजता आहेत.
पुढच्या २८/२, ६/३, १०/३ व १४/३, मग १८/१९/२०/२१, २४/२६ व शेवटची२९/३. हे आपल्या मॅचेसच वेळापत्रक Happy
आत्ताच बुक करा. वेळ सांगून येत नाही. Happy

विक्रमसिंह.. आपण सरस होतो अस तुम्हाला खरच वाटतय? माझ्या आठवणींनुसार त्यावेळेला त्यांच्याकडे ऐन उमेदीतले इम्रान खान व वासिम अक्रम होते व जरी आपण त्यांचे सुरुवातीचे बॅट्समन आउट केले तरी कधी इझाज अहमद नाहीतर कधी सलिम मलिक नाहीतर तो पनवती जावेद मिआंदाद हमखास आपल्या हातात आलेल्या विजयात तंगडी घालायचेच घालायचे.. खुप खुप हार्ट ब्रेक्स सहन केलेत ८०-९० च्या दशकात त्या जावेद मियांदाद मुळे.. Sad

मंजु खास तुझ्यासाठी.. बालमोहनची म्हणुन..>> है शाब्बास!!

तुम्हाला खास धन्यवाद! Wink

आता लगेहाथ भारतात कुठल्या वाहिनीवर 'स्पष्ट' दिसणार हेही सांगून टाका, म्हणजे थेट स्बस्क्रिप्शन मेसेज पाठवायला बरं Wink आणि १४ मार्चच्या पुढचंही वेळापत्रक द्या.

Pages