विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रमसिंह.. आपण सरस होतो अस तुम्हाला खरच वाटतय? >> होय. अगदी खात्री आहे माझी. त्यांची फास्ट बॉलिंग नक्कीच आपल्यापेक्षा सरस होती, पण एकंदरीत आपली टीम त्यांना भारी होती.

पाकिस्तानातल्या मॅचेस आपण केवळ त्यांच्या अंपायर्समुळे व बॉल टँपरींग मुळे हरायचो.
तिकडे एकतर जावेद , जहीर औट वगैरे बात नस्से.
दुसर म्हणजे इम्रान आणि सर्फराज टी नंतर अचानक बॉल आडवा स्विंग करायला लागायचे. जिथे जावेद वगैरे लोक २००-२०० कुटायचे तिथे आपला अचानक कोलॅप्स व्हायचा. तुमच्या सारखच तेंव्हा आम्हालाही दु:ख व्हायच. पण नंतर बॉल टेंपरींगच रहस्य कळल. तेंव्हाच्या फॉल ऑफ विकेट्सच रेकॉर्ड शोधून बघायला पाहीजे एकदा. हे अस दोन सिरीज मध्ये झाल होत.

त्याच इम्रान , जहीर जावेद च्या टीम ला आपण भारतात सॉलीड धूळ चारली होती.

कोणी विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ, पण आपण त्यांच्याशी शुक्रवारी हमखास हरायचो. सगळा शारजाह असाच फ्लॉप गेला.

शारजा वॉज ऑलवेज फिक्स्ड. नॉट बाय आवर प्लेअर्स, बट विथ अंपायर्स हेल्प बाय बेटींग सिंडिकेट्स. एका मॅचमधे आपल्याला जवळ्पास अंधारात बॅटींग करायला लावली होती.

कोणी विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ, पण आपण त्यांच्याशी शुक्रवारी हमखास हरायचो. >>> :D. ऋन्मेष, फॅक्ट असेल तर विश्वास ठेवण्या न ठेवण्याने काय फरक पडणार आहे Happy

विक्रम शी मी पूर्ण सहमत नाही, तरी थोडा नक्कीच आहे. जावेद, झहीर भारतात फारसे चालले नाहीत. याउलट गावसकर, मोहिंदर वगैरे तिकडे भरपूर चालले. कपिलही.

भारत-पाक "4K" मधे बहुधा दिसेल स्टार च्या एका चॅनेल वर. तशी जाहिरात येत आहे.

फारएण्ड, अरे तसे नाही, फॅक्ट असले तरी त्या हरण्यामागचे कारण शुक्रवार जुम्मा हे असणे यावर विश्वास ठेवा अगर नका ठेऊ.

तरी त्या हरण्यामागचे कारण शुक्रवार जुम्मा हे असणे यावर विश्वास ठेवा अगर नका ठेऊ. >>>

त्याचं काय आहे की बालाजी देवाला तेंव्हा क्रिकेट मध्ये तितके महत्त्व प्राप्त झाले नव्हते. चेन्नई अन हैद्राबाद आयपील टीम झाली आणि मग बालाजीच्या शुक्रवारी धोणी तिकडे जायला लागला. म्हणूनच आता शुक्रवार असला तरी आपण जिंकतो. इनफॅक्ट ते केस त्यामुळेच काढले होते धोणीने. शुक्रवारचे व्रतच घेतले म्हणाना !

Light 1

इथे विषयाशी संबंधित चर्चा करा >> ओ म्यॅडम, आम्ही रविवारच्या मॅच्चचीच चर्चा करतोय. तुम्हाला यायच असल तर या. Happy

हरलेल्या मॅचची पारायणं कशाला मग? ती सुद्धा कै च्या कै कारणं देत?

मस्तपैकी वर्ल्डकपमध्ये पाकला हरवलेल्या मॅचबद्दल बोला की.

माझा अंदाज:
A1 Australia
A2 NZ
A3 Shri Lanka
A4 England

B1 SA
B2 India
B3 Pak
B4 WI

सेमी फायनलिस्ट:
Australia
NZ
SA
India

फायनल:
Australia Vs NZ

Winner:
NZ

Happy

भारत - पाकिस्तान सामन्यात गेल्या पाचही वेळा, पाक च्या तुफान गोलंदाजी आणी राऊडी क्राऊड च्या आणी सामन्याच्या निकालाच्या मधे भारताकडून एक ५ फूट ५ ईंचाचा जबरदस्त रॉक ऑफ जिब्राल्टर ऊभा होता - सचिन रमेश तेंडुलकर!! ५ पैकी, ३ सामन्यात तो मॅन ऑफ द मॅच होता आणी १९९६ च्या सामन्यात एका बाजुने ऊभा राहून पाक वर दडपण आणण्याच्या डावपेचातला की प्लेयर!

असो, हे झालं स्मरणरंजन. यंदा बघू काय होतं. भारत पाकिस्तान सामना कुठलाही जाज्वल्य अभिमान (!) न बाळगता तर बघता नाही येणार. so, here goes, "जीतेगा भाई जीतेगा, हिंदुस्तान जितेगा"!!!!

हरलेल्या मॅचची पारायणं कशाला मग? ती सुद्धा कै च्या कै कारणं देत?
मस्तपैकी वर्ल्डकपमध्ये पाकला हरवलेल्या मॅचबद्दल बोला की.

>>>>>

पराभवातूनच धडा घ्यायचा असतो Happy

कै च्या काय कारण हे आपापल्या श्रद्धेचा भाग असतो,
देवावर विश्वास आहे का तुमचा? Happy

पराभव झालाय कोणाचा? धडा घ्यायचाच असेल तर पाकड्यांना घेऊ देत...आहे का त्यांच्यात हिंमत सामना शुक्रवारी ठेवायला सांगण्याची? Biggrin

यंदा आपली पहिलीच मॅच पाकबरोबर आहे, त्यामुळे 'जिंकायलाच्च हवं' असं साखळीच्या शेवटांच्या मॅचेसना असणारं दडपण नसावं अशी अपेक्षा.. शिवाय आपण विश्वविजेते Happy ह्या दोन्हींचा फायदा भारताने उठवायला हवा.

आपण विश्वविजेते असणे हे आपल्याला घातक आहे.
कारण ते भारतात होतो, आता ऑस्ट्रेलियात, हा सरळ फरक असूनही आपल्याला या विश्वविजेते टॅगला घेऊन खेळावे लागणार. अंडरडॉग्ज म्हणून खेळणे कामात आले असते.

न्यूझीलंड हा संघ तिकडच्या कंडीशनमध्ये आपल्यापेक्षा बरेच ताकदीचा असूनही ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेला फेव्हरेट म्हणून सर्वप्रथम पसंती दिली जात आहे. पण ते यंदा वर्ल्डकप मारून जातील असे मला वाटतेय. सिक्थ सेन्स !

तुझा sixth sense एवढा चालत असेल तर फॅंटसी लीग खेळायला ये ना...... वरती दिलेत बघ डिटेल्स
मजा येईल

अंडरडॉग्ज म्हणून खेळणे कामात आले असते.>> अंडरडॉग्ज नाही , फेवरीटही नाही पण आपण डार्कहॉर्स नक्की. (मी आधी चुकून ब्लॅक हॉर्स लिहील होत Happy )

डार्कहॉर्स - माझ्या माहितीप्रमाणे त्याला म्हणतात जो पहिला-दुसरा येत नाही पण नेहमी पहिल्या पाचात वगैरे असतो. पण तो कोणाच्या डोळ्यात उठून दिसत नाही. (यावरून डार्क हा शब्द). तो मग कधीतरी अचानक तो जिंकतो आणि प्रकाशझोतात येतो. पण याचा अर्थ तो तळाचा नसतो, वा त्याचे जिंकणे चमत्कार नसते, फक्त लोक त्याला हिशोबात घ्यायला विसरले असतात.

म्हणून डार्क होर्सही न्यूझीलंडच आहे यंदा माझियामते.

@ स्वरूप, फँटसी लीग, अरे त्याला पण रोजच्या रोज वेळ द्यावा लागेल ना? Sad

अरे आणि तू पण वर न्यूझीलंड विनर दिले आहेस Happy

उप्सम, आताच पाहिले ते.. ऑफिसमध्ये ब्लॉक !

उद्घाटन समारंभ कोणाला काही खास वाटला का? नुसतीच गाणी दिसत होती. एक डुलकी लागली मधेच. क्रिकेट आवडणार्‍यांना रॅण्डम गाण्यांमधे फारसा इंटरेस्ट नसेल तर काय याचा आयोजकांनी विचार केलेला दिसत नाही.

मात्र त्यानंतर ख्राइस्टचर्च मधल्या भूकंपानंतर क्रिकेट पुन्हा कसे सुरू केले याची डॉक्युमेण्टरी छान होती.

न्यूझीलंड वर्सेस श्रीलंका मध्ये कोण बाजी मारेल काही अंदाज????
>>>>>>
फार कठीण नाहीये हा अंदाज.
एक संगकाराच वन मॅन शो घडवू शकतो. अन्यथा न्यूझीलंड ७०-३० ने कागदावर सरस वाटतेय.

Pages