विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक वेगळा मुद्दा:

विंडीजच्या खेळाडूंचा बोर्डाशी वाद असल्यामुळे ते उदासीन असले तरीसुद्धा मिळत असलेले यश एक नवीन जादू करून जाते असे दिसते आहे. अचानक सांघिक भावना, अधिक चांगला परफॉर्मन्स देण्याची देहबोली दिसून येत आहे. यशासारखे यश नाही की काहीतरी म्हणतात ते खरे असावे.

बेफिकीर कम ऑन नाउ.. आपल्या विराट कोहलीची बॉडी लँग्वेज सॉल्लिड इंटिमेडिटिंग आहे असे मला वाटत.. तसेच रैना, धवन व धोनीची देहबोली सुद्धा तशी प्रतिस्पर्ध्याला इंटिमेडिटिंगच वाटत असेल.. (ऑन द साईड नोट.. पुढे मागे उन्मुख्त चांद जर आपल्या टिम मधे आला तर तोही एक जबरी कॉन्फिडंट प्लेयर आहे.. इन द सेम मोल्ड अ‍ॅज कोहली..)

कोहली ज्या पद्धतीने ऑसिज बुलींना उखडवतो.... बघण्यासारखे असतात ऑसिज चे चेहरे.. त्यांचाच डोस त्यांना तो मस्त पाजतो...( डिस्क्लेमर.. आय अ‍ॅम नॉट प्रोपोजिंग बुलिंग हिअर!)

स्पार्टाकस.. यु आर राइट!

कोहली व रैनाच्या देहबोलीबाबत सहमत!

धोनीबाबत असहमत!

धवनची देहबोली ही मला 'शायनिंग मारण्याचा' प्रकार अधिक वाटतो, वैयक्तीक मत!

पाकिस्तान तर आज गेल्यात जमा आहे...

उद्याच बोला.उद्याच्या मैच ला जाणार आहे. Every Indian except few honourable exceptions* is going to MCG tomorrow.
*honourable exceptions = या लोकांनी match follow करायचे ठरवले तरी भारत हारतो म्हणे. मग ते आपणहुनच baby sitting करतात मैच पहाण्या ऐवजी Lol

वत्सला.. लकी यु.. वुइ विल बी देअर इन स्पिरिट्स विथ यु..एडलेडपेक्षा जबरी इंडियन मॉहोल करुन टाका..:)

माझी पुतणी गेली दहा वर्षे सिडनी मधे आहे.. खुप बोलवत होती.. पण जाणे शक्य नव्हते..:(

येस्स माहोलसाठीच जाणार.
उद्या पण ऑस्ट्रेलियाभरातून भारतीय येणारेत पण भारत पाक सामन्याचा माहोल औरच....!!!
मुकुंद, यायला हवे होते तुम्ही. बघा अजूनही फायनल ला वेळ आहे! आग्रहाचे आंमत्रण! आपण किंवा ऑस्ट्रेलिया फाइनल ला असलो तर मी mcg ला जा णार!

पाकिस्तान सर्व बाद १६०. पाकिस्तानसाठी विश्वचषकाची सुरवात एकदम वाईट झाली आहे. प्रथम परंपरागत प्रतिस्पर्धी भारताकडून पराभव आणि आता वेस्ट इंडिजकडून मानहारीकारक पराभव.

वत्सला.. आमंत्रणाबद्दल आभार.. पण मनात खुप असुनही नाही जमणार.. Sad

पण नजिकच्या काळात मेलबोर्नला आता नाही तरी एक तरी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस फायनल बघायचे स्वप्न पुर्ण करायला नक्कीच येणार..:)

उद्याची मॅच बघायला मजा येइल.. आपली टिम दडपण येउन खेळली नाही तर सामना अटितटीचा होउ शकतो.. आज तक वर सचिन चे उद्याच्या मॅचचे विचार यु ट्युबवर पाहीले.. मजा आली त्याला ऐकताना. आय होप ही इज स्टिल इन काँटॅक्ट विथ द टिम.. गिव्हिंग देम व्हॅल्युएबल टिप्स..

कराचीत आज अजुन टिव्ही फुटले असतील..

आज पाकिस्तानची दया आली. कधी नव्हे ते. वाईट झालं.

बरं ते फिक्सिंगप्रमानेच रीझल्ट आलाय का? की नाही.

अख्खी टूर्नामेंट तीपण वीसदिवसाहून जास्त दिवसांची फिक्स करणे शक्य नाऽऽऽऽही. आणि तशी फिक्स केली तर सर्वात जास्त नुकसान सट्टेवाल्यांचे होईल.

आजचा वे.इं.चा खेळ पाहिल्यावर माझ्याही मनात बेफिंसारखाच वेगळा मुद्दा आला; या विश्वचषकाच्या खेळपट्ट्या व हवामान ह्या वे.इं.संघासाठीं पोषक आहेत व हा संघ नि:संशय अतिशय संतुलीत व प्रतिभावान आहे. थोड डोकं ठीकाणावर ठेवून खेळले तर हा विश्व चषक ते गाजवूं शकतात .

आजच्या सामन्यात पाकिस्तान फारच अनुनभवी आणि नवखा संघ असल्यासारखे खेळली, खास करून नुकतेच आयर्लंडने जसे चेस केले त्या पार्श्वभूमीवर ते जास्त उठून दिसले.

बाकी पाकिस्तान म्हटले कि फिक्सिंगचा संशय पटक डोक्यात येतो, खास करून त्यांनी झेलही असे सोडलेयत की तो संशय बळावतो..

असो, तसेही पाकिस्तानचा हा तुलनेत कमजोर संघ आहे, त्यामुळे फारश्या अपेक्षाही नाहीत, आयर्लंड त्याना मागे टाकत क्वार्टरमध्ये गेली तर फारसे आश्चर्य वाटणार नाही.

अवांतर - वेलकम भाऊ Happy

अरे हो, आज एक ईंटरेस्टींग गोष्ट अजून घडली.
ऑसी-बांग्ला सामना १-१ पॉईंट.
बांग्लाच्या कामात येऊ शकतो हा पॉईंट, याच्या जीवावर कदाचित ईंग्लंड वा श्रीलंकेला मागे टाकू शकतात..
तसेच ऑस्ट्रेलियाच्या ग्रूपमध्ये प्रथम क्रमंक मिळवण्यामध्ये अडचण उभी करू शकतो. शेवटी या नंबरींगवरच क्वार्टरचे साम्ने ठरणार आहेत.,

पाकिस्तान हरले ह्याचा अर्थ व्हॉट्स अ‍ॅप वर फिरत असलेला मेसेज खरा नाही Wink

त्यामुळे (तरी :डोमा:) आज आपण जिंकलेच पाहिजे Happy

आफ्रिका चोकर्स आहेत ते नॉक ऑट मध्ये.. उद्याच्या साखळी सामन्यात नाही.. त्यामुळे तो फॅक्टर बाद झालाय.. या कंडीशनमध्ये आपल्यापेक्षा ते सरसच असल्याने कमीतकमी अपेक्षा ठेऊन सामना बघा, एंजॉय करा.. Happy

पाकीस्तानची खरोखरच दया आली.
त्यापेक्षाही मॅचनंतर इंटरव्ह्यू घेणारा रमीझ राजा आणि देणारा मिसबाह यांची!

एक कळत नाही, युनुस खान हा कधीही फार चांगला वन-डे प्लेयर नसताना त्याला खेळवण्याचा अट्टाहास कशासाठी? त्यामुळेच स्टंपमागे अकमलच दिसतो, जो बॉल अडवण्यापुरताच ठीक आहे! वास्तविक पाकीस्तानकडे सर्फराज अहमदसारखा चांगला विकेट्कीपर - बॅट्समन आहे, पण युनुस खानला खेळवण्याच्या अट्टाहासापायी त्याला बाहेर बसवलं आहे. आणि १/४?

आता अफगाणिस्तान आणि लंकेची मॅच सुरू आहे. अफगाण ७३/२ आहेत १८ व्या ओव्हरमध्ये! फार ग्रेट नसले तरी ४ च्या रनरेटने खेळत आहेत!

भाउ.. डाउन अंडर मधे गेल्या २० वर्षात तरी वेस्ट इंडिजचा पर्फॉर्मन्स एकदमच निराशाजनक आहे व सध्याचा त्यांचा अ‍ॅटिट्युड बघुन तुम्ही म्हणता तस झाल तर १९८३ मधे आपण वर्ल्ड कप जिंकला तसाच काहीसा धक्का जगाला बसेल.

वत्सला .. अजुन घरीच?लवकर निघ बघु... मॅचला प्रचंड गर्दी असेल.. आत जायला वेळ लागेल व सुरूवात मिस करशील..:) आम्ही आहोतच तुझ्याबरोबर अस समज..:)

आणी इथे एक आवाहन.. गेल्या वर्ल्ड कप ला जे जे मायबोलिचे पॉझिटिव्ह थिंकर्स होते त्यांनी इथे परत हजेरी लावावी.... वैद्यबुवा, अंजली व पन्ना यांना खास आवाहन... मागच्या वेळेचा वर्ल्ड कप मेमोरबल करण्यात हे आणि बरेच सगळे मायबोलिकर यांचा मोठा हातभार होता...:)

बाय दे वे.. फारेंडा? कुठे दडुन बसला आहेस? क्रिकेट बीबी वर तु नाहीस ये बात कुछ हजम नही होती..

रार्,दिपांजली,केदार,मैत्रेयि(विथ नख कुरतडणारी बाहुली) चला रे... तयार व्हा आजच्या इंपॉर्टंट मॅचला.. बोलो... दे घुमाके...:)

र म ड.. तुझ्यासारखी पॉझिटिव्ह माणस तर हवीच हवी.. पन्ना व अंजलीची जागा तु यशस्वीपणे सांभाळत आहेस..

स्पार्टाकस्...इट्स अ प्लेजर टु सी यु ऑन धिस बीबी.. म्हणजे.. तुझ्या शैलीत या वर्ल्ड कपच्या मॅचेस बद्दल् पुढे कधीतरी वाचायला मिळेल..:).

Mukund, half way through MCG!!!
Cricket is in the air...
I live in regional Victoria (Boarder of Melbourne). The train I am on comes from far more regional part. But still there are few Indians on the train. I am sure they are going to MCG.

Pages