क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपशब्द वापरल्यावर काय त्या प्रेक्षकाची पुजा करावी असे म्हणने आहे ? प्रेक्षकाला समजायला नको का काय बोलावे आणि किती प्रमाणात बोलावे.? सहन करण्याच्या देखील मर्यादा असतात

पठाणने चांगलाच बुकलुन काढायला हवा होता

पठाणचे चूकलय इथे. जर कोणी प्रेक्षक असे करत असेल तर व्यत्यय आणण्याबद्दल त्याला तिथून वेळीच बाहेर हाकलता आले असते किंवा समज देता आली असती. ड्रेसिंगरूममध्ये बोलावून मारणे वगैरे जरा जास्तच झाले.

@ पठाण,
माणूस हा स्वभावानुसार व्यक्त होतो. त्या प्रेक्षकाची चूक कबूल आहे ना, मग बस्स, पठाण त्याच्या स्वभानुसार रिअ‍ॅक्ट झाला. अर्थात थोडा वेळ मिळाला असता त्याला आपला राग शांत करायला वा स्वताहून त्याने तो वेळ घेतला असता तर कदाचित वेगळे चित्र असते. पण सो, घडले. चूक झाली पठाणकडून पण माफ करण्याजोगी आहेच.
बाकी त्या माणसाबद्दल फारशी सहानुभुती नाही कारण त्याची चूक परिस्थितीजन्य नव्हती. आपल्याला पडलेला मार त्याने स्वताहून निवडला होता.

त्या मुलाच्या बापाने जे करायला पाहिजे ते पठाणने केले.
काय वय होते त्या मुलाचे? ५, ७, १२, १४, १७? सगळीच मुले सगळ्याच वयात अजाण, निष्पाप असतीलच नि नीट समजावून सांगितले तर ऐकतीलच असे नसते.

भारतीय क्रिकेटचा ब्रँड अँबॅसडर राहूल गांधीला करावे. एक तर त्याला वेळहि भरपूर आहे आणि वक्तृत्वात त्याच्या तोडीचे कुणी नाही. क्रिकेट हे भारतीयांच्या शर्टमधे आहे, पँटीत आहे, पँटीच्या खिशातहि आहे असे महान सत्य तो जगाला सांगेल.

तुम्ही मलाच ११००० धांवा करायला सांगताय असं
अहो असे घाबरता काय? तुमचे एक व्यंगचित्र हजार धावांबरोबर. आता आणखी ११ टाका की झाले, Happy

मला वाटते एकदा लवकरात लवकर सचिन, द्रवीड नि गांगुली यांना एकत्र बसवून स्पष्ट प्रश्न विचारावा, की तुमच्यातला सर्वश्रेष्ठ फलंदाज कोण?
मग तरी हा वाद संपेल?
इतर कुणाहि पेक्षा ह्या तिघांनी एकमेकांबरोबर अधिक काळ घालवला आहे, त्यामुळे ब्रॅडमन, बॉयकॉट पेक्षा त्याम्चेच मत मी खरे मानीन.
मुळात असे काही असतेच का? सर्वश्रेष्ठ नसले तरी त्यांचे महत्व कमी होते का?

मैदानावरच्या कामगिरीइतकीच मैदानाबाहेरच्या वर्तनाचीही या नव्या खेळाडूंनी काळजी घेतली पाहिजेल तरच कदाचित ते प्रेक्षकांच्या मनातील "सचिन, द्र्वीड, कुंबळे वगैरेंच्या" आसपास तरी जाऊ शकतील!

मैदानाबाहेरचा विराट कोहली पाहिला की कांबळीची कारकिर्द मैदानाबाहेरील वर्तणूकीमुळे फुकट गेली याचे वाईट वाटते.

कांबळीची मैदानातील कारकिर्दही फारकाही थोर नव्हती. Happy त्याला अनेक संधी दिल्या गेल्या पण त्याच्या खेळात सातत्य नव्हते.

सेनापती.. सातत्याबाबत आकडे चेक करून बघावे लागेल, कारण माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत त्या..
पण त्याच कालात नशीबाच्या जीवावर इतके सुमार खेळाडू खेळले आहेत त्यात त्याच्या दर्जाचा प्लेअर आपण गमावलाच.

सेनापती,

कांबळी फक्त १७ टेस्ट खेळला,
त्यात ४ शतके
सर्वोत्तम २२७ (बहुधा दोन द्विशतके आहेत त्याची इंग्लंडविरुद्ध)
आणि हो, सरासरी - ५४.२० (५०+ सरासरी असलेला फ्लॉप प्लेअर? नाही म्हणू शकत)

असो,
आता एकदिवसीय बघूया
ईथे एवरेज ३३ चा आहे, अगदीच काही वाईट नाही, पण तो मागच्या नंबरवर यायचा ना बहुधा. सचिन ओपनिंगला यायच्या आधी त्याचीही ३५-३६ च्या आसपासच सरासरी होती, आणि शतकेही अशी नव्हतीच. तसेच कांबळी फटकेबाज शैलीचा आक्रमक खेळाडू होता.
काही जण तेव्हा कांबळी सचिनच्या तोडीचा आहे अशी चर्चा करायचे. भले तो नसेलही, पण अशी चर्चा व्हायची म्हणजे लंगूरसंगूरही नसणार.

<<<कांबळीची मैदानातील कारकिर्दही फारकाही थोर नव्हती>>> असे मी वर म्हणालोय. त्यावरून मी त्याला फ्लॉप समजतो असे अनूमान काढलेत. धन्य आहात.

कांबळीची कसोटी कारकिर्द अवघी ३ वर्षांची. ९३-९५. त्याने केलेल्या दोन्ही डबल सेंच्यूरीज ह्या पदार्पणातल्या वर्षात म्हणजे १९९३ मध्ये केलेल्या आहेत. लालोलाग २ शतके ही हाणली आणि मग ढेपाळला. बर यायचा तो वन डाउन. सचिनच्या आधी. Happy

एकदिवसीय सामन्यांमध्ये देखील सुरुवातीला तो वन डाऊन यायचा. मग मांजरेकरला ती जागा दिली गेली आणि मांजरेकरच्या जागी ६ नंबरवर कांबळी ढकलला गेला तो कायमचा. क्वचित ५ नंबरला आला तर, जसा १९९६च्या उपांत्य सामन्यात आला. कांबळी सचिनच्या तोडीचा किंबहूना वरचा आहे ही चर्चा ९३ नंतर सुरु झाली. एकदिवसीय सामन्यांमधली त्याची ९ वर्षातली कामगिरी काढून बघा. मग कळेल सातत्य. Happy

अपार यश मिळूनही सचिनचे पाय जमिनीवर राहीले आणि थोड्याशा यशानंतर लगेच कांबळीच्या डोक्यात हवा गेली हेच खरं!

कांबळी संपला तो स्वकर्तृत्वाने असंच खेदाने म्हणावं लागेल!

आज वॉटसनला लवकर काढले पाहिजे. त्याची मेलबर्नला सरासरी नव्वदीमध्ये आहे. वॉर्नरला काढून सुरवात चांगली केली होती, पण हळूहळू सगळा मोमेंटम निघून गेला.

१०६-१ ! पहिल्या डांवात ऑसीजनी मोठी धांवसंख्या उभी केली कीं भारत पुम्हा बचावात्मक पवित्र्यात ! रोहितऐवजीं राहुल हा दोघांवरही अन्याय ठरण्याची शक्यता अधिक.

मॅकुलम धमाल करतोय.. मॅच मी बघत नाहीये.. पण त्यांची काही ग्राऊंड छोटी असतात आणि विकेटवर बाऊंस.. छकडे मारायला घेतले की बरसतात..

भाऊ एवढ्यातच मोठ्या स्कोअरचे टेंशन घेऊ नका.. आत तर सुरुवात झालीय. ऑस्ट्रेलियामध्ये 200-1 वरून 350 मध्ये गुंडाळले जातात.. आणि 200-8 वरून 400 पण होतात.. फक्त खांदे नाही पाडायचे इथे..

ग्रेट 118-3
स्मिथ गेला तर ऑस्ट्रेलिया दबावाखाली येईल.. पण शेपूट यावेळी तरी सांभळा रे बाबा..

आज अधून मधूनच सामना पहातां आला. पण भारताची गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यांत लक्षणीय सुधारणा झाल्याचं जाणवलं. या मालिकेत बहुतेक प्रथमच अख्ख्या दिवसांत २६४ एवढी कमी धांवसंख्या झाली असावी.
स्मिथ खरंच ग्रेट आहे. भारतीय फलंदाजानी खूप शिकण्यासारखं आहे त्याच्याकडून !

बिचार्‍या इशानला एकहि विकेट नाही! वाईट वाटले. ऑस्ट्रेलियाचे कॉमेंटेटर सांगत होते काहीतरी की ऑफ स्टंपच्या फारच बाहेर टाकत होता म्हणून धावा नाही दिल्या तरी विकेट पण मिळत नाही.
कदाचित धोणीचा तोच प्लान असेल, धावा रोकणे, नाहीतर ऑस्ट्रेलियन्स जबरदस्त मारत होते, अगदी आत्मविश्वासपूर्वक, बॅटीच्या मध्यातून.
आकड्यांवरून तरी आश्विन चांगला वाटतो, एरवी स्पिनला मारतात.

खांदे पाडायचे नाही हे धोनी आणि कंपनीलाच सांगत होतो भाऊ, "ईथे" म्हणजे धाग्यावर नाही तर ऑस्ट्रेलियामध्ये Happy

उद्या समजेलच.

आजच्या दिवसअखेर, दादा गांगुलीशी सहमत ऑस्ट्रेलियाच्या फेवरमध्ये ६०-४०

काल हॅगली ओव्ह्ल, ख्राइस्टचर्च ची मॅच पाहून आम्ही तेथे एक महिन्यापूर्वीच होतो याची आठवण झाली. तेव्हा तेथील चर्चा तेथे वर्ल्ड कप ची ओपनिंग गेम असण्याबद्दल होती पण या मॅच बद्दल कोणी बोलले नाही. मॅकॉलम ने इतक्या फोर्स व सिक्सेस मारल्या त्यात काही आश्चर्य नाही, कारण ते मैदान फार मोठे नाही.

हे ते मैदानः
DSC_0598.JPG

शेपुट पुन्हा महागात पडनार असे दिसतय.. इशांत शर्मा ट्रीप साठी आलाय बहुतेक. अश्वीन हा स्पीनर म्हणुन कुठ्ल्या अ‍ॅंगल ने टीम मधे घेतलाय काही कळत नाही.. चेंडु वळवता पण येतो हे त्याला माहीती आहे की नाही..

Pages