Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्पेशल टॅलेंट आणि क्वालिटी
स्पेशल टॅलेंट आणि क्वालिटी ह्याचा तुमच्या लेखी अर्थ काय आहे हे मला माहीत नाही. माझ्या मते उपजत असते ते स्पेशल टॅलेंट. क्वालिटी म्हणजे एखादा चांगला गुण. क्वालिटी ही खूप जनरल टर्म आहे.
< सचिन, कोहली, लक्ष्मण, सेहवाग, दादा वगैरे हे सारे अंगी एक उपजत टॅलेंट घेऊन जन्माला आले होते.
द्रविड हा मेहनत आणि सरावाच्या मुशीतून तंत्र घोटून तयार झालेला अभ्यासू खेळाडू होता. > ह्या तुमच्याच वाक्याच्या अनुषंगाने माझे म्हणणे आहे. मेहनत आणि सरावाच्या मुशीतून तंत्र घोटून तयार होणे काय कुणालाही शक्य आहे अशा थाटात फेकलेले हे वाक्य द्रविडच्या अंगी असलेल्या स्पेशल टॅलेंटला कमीपणा देणारे आहे. तसे 'अभ्यासू' असणेदेखील सबके बसकी बात नही.
<< भाऊकाका, ११,००० करा हो!
<< भाऊकाका, ११,००० करा हो! कारण,इथे अनेकजण असे आहेत ज्यांना ११०० खरं वाटेल!>> केलं ११,000 ! पण इथं कुणाला तुम्ही मलाच ११००० धांवा करायला सांगताय असं तर नाहीं ना वाटणार ?
इथे अनेकजण असे आहेत ज्यांना
इथे अनेकजण असे आहेत ज्यांना ११०० खरं वाटेल! >>.
खरंय. इथे येणार्या प्रत्येकालाच सिरियसली घ्यायचे काही कारण नाही. असूदेत बापडे इथे, बोलूदेत ( की बरळूदेत) काहीही.
अँडी फ्लॉवर... भारताविरुद्ध
अँडी फ्लॉवर... भारताविरुद्ध तर कित्येकदा त्याने भन्नाट खेळ्या केल्या आहेत.. फार जबरी खेळायचा तो.. इंग्लंडचा प्रशिक्षक म्हणूनही चांगली कामगिरी केली त्याने..
स्पार्टाकस, अँडी फ्लावरबद्दल
स्पार्टाकस, अँडी फ्लावरबद्दल म्हणताय ना?
२००० साली वात आणला होता त्याने आपल्याविरुद्ध. हरभजनला कसे खेळायचे ते हेडन त्याच्याकडे बघून शिकला असे मला उगाच वाटते. 
केलं ११,000 ! पण इथं कुणाला
केलं ११,000 ! पण इथं कुणाला तुम्ही मलाच ११००० धांवा करायला सांगताय असं तर नाहीं ना वाटणार ? >>>
भाऊकाका
माझ्या डोळ्यासमोर तुम्ही पॅड बांधून बॅटींगला नंबर लागण्याची वाट पाहताय असं दृष्यं आलं खरंच!
यावर एक व्यंगचित्रं होऊन जाऊ द्या.
ऑफकोर्स भास्कराचार्य, अँडी
ऑफकोर्स भास्कराचार्य, अँडी फ्लॉवरच!
जावेद मियांदादनंतर हुकूमी रिव्हर्स स्वीप मारताना मी जर कोणाला पाहीलं असेल, तर ते फ्लॉवरलाच!
मेहनत आणि सरावाच्या मुशीतून
मेहनत आणि सरावाच्या मुशीतून तंत्र घोटून तयार होणे काय कुणालाही शक्य आहे अशा थाटात फेकलेले हे वाक्य
>>>>>>
हे आपणच ठरवलेत की माझ्या वाक्याचा रोख खरेच तसा वाटण्याजोगा होता.
किंबहुना द्रविडबद्दल मला ईतर कोणापेक्षाही कमालीचा आदर आहे.
सचिनमध्ये निव्वळ स्पेशल टॅलेंट नव्हते तर त्याची मेहनतही वादातीत आहे. म्हणून तो लीजेंड आहे.
दादाची मेहनत गरजेपुरताच अन्यथा तो महाराजा होता. पण त्याचा अॅटीट्यूड कमाल की चीज होता, निव्वळ त्यासाठी मी सर्वात जास्त दादाचा फॅन आहे. माझ्यासाठी भारतीय क्रिकेट या तिघांनंतर संपते.
हे आपणच ठरवलेत की माझ्या
हे आपणच ठरवलेत की माझ्या वाक्याचा रोख खरेच तसा वाटण्याजोगा होता. >
मला त्या वाक्यावरून तसे वाटले, म्हणून तो रोख तसा वाटण्याजोगा आहे असे माझे मत झाले.
माझ्यासाठी भारतीय क्रिकेट या
माझ्यासाठी भारतीय क्रिकेट या तिघांनंतर संपते >>>
हे तुमचं मत ऑस्ट्रेलियन टीममधील मार्क टेलर, स्टीव वॉ पासून अगदी सायमन कॅटीच, शेन वॉटसन पर्यंत कोणालाही सांगू नका. विनाचौकशी येरवड्याला पाठवतील.
स्पार्टाकस
स्पार्टाकस
स्पार्टाकस, हा विनोद नाही
स्पार्टाकस,
हा विनोद नाही समजला, (कोकणस्थ हसले म्हणून विनोद म्हणतोय)
ऑस्ट्रेलियन खेळाडूंची नावे का घेतली?
स्पार्टाकस, हा विनोद नाही
स्पार्टाकस,
हा विनोद नाही समजला, (कोकणस्थ हसले म्हणून विनोद म्हणतोय)
ऑस्ट्रेलियन खेळाडूंची नावे का घेतली >>>>
काही नाही! मला कपालबडवत्ती योग आहे याची खात्री पटली !
कपाळ बडवताना बहुधा ते हे
कपाळ बडवताना बहुधा ते हे रामा, हे 'लक्ष्मणा' असे म्हणत असावेत.
कपाळ बडवताना बहुधा ते हे
कपाळ बडवताना बहुधा ते हे रामा, हे 'लक्ष्मणा' असे म्हणत असावेत >>> भास्कराचार्य
<< माझ्या डोळ्यासमोर तुम्ही
<< माझ्या डोळ्यासमोर तुम्ही पॅड बांधून बॅटींगला नंबर लागण्याची वाट पाहताय असं दृष्यं आलं खरंच! यावर एक व्यंगचित्रं होऊन जाऊ द्या. >>
पॅड बांधून बॅटींगला जायचे दिवस संपले माझे, असं उगीचच वाटत होतं -

व्यंगचि
व्यंगचि
भाऊकाका एक नंबर!
भाऊकाका
एक नंबर!
भाऊ
भाऊ
भाऊ चंदरपॉल गेली ४०-५०
भाऊ
चंदरपॉल गेली ४०-५० वर्षे खेळत >>फारेण्ड
ही बातमी वाचनात आली. धोनी
ही बातमी वाचनात आली. धोनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हेतूतः बोलला की काय ?
हरले तर रडताहेत,.. धवनच्या
हरले तर रडताहेत,.. धवनच्या स्वभावाची फारशी कल्पना नाही पण कोहलीचा स्वभाव थोडाफार (किंबहुना बराच) आहे तसा.. दिसतो त्याच्या बॉडीलँगवेजवरून.. त्याच्या स्वभावासाठी नाही आवडत तो मला.
स्पार्टाकस वरती एका
स्पार्टाकस वरती एका प्रतिक्रियेत तुम्ही मला क्रिकेट बद्दल समजावले आहे. तुम्ही ह्या खेळाच्या बाबतीत तज्ञ आहात परंतु इतरानाही थोडीफार माहिती असू शकते. सचिन हा चांगला खेळाडू होता ह्यात वाद नाही पण त्याला तणावमुक्त परिस्तिथित खेळायला आवडायचे दबावात तो हमखास गांगरून जायचा. अनेक कठीण प्रसंगी तर तो मला तम्बुतच परतलेला आढळला. त्याची जी काही शतके झाली आहेत ती जास्तकरून कसोटीच्या पहिल्या डावातच झाली आहेत दुसर्या डावात त्याचा खेळ हा सर्व साधारणच असायचा.तो भारतातला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे कि नाही ह्याबाबतच वाद असताना त्याला उगाचच जगातला सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणणे पटत नाही.
सचिन बद्दल डॉन ब्रॅडमनने काय बोलले ते वाचलेय ह्या बद्दल एका पत्रकाराने जेफ बॉयकोटला प्रतिक्रिया विचारली होती तेव्हा त्याने गमतीशीर उत्तर दिले होते 'डॉन आता म्हातारा झालाय'. आणि ते खरेच होते कुठे दिवसात त्रिशतक करणारे डॉन नि कुठे शतक आल्यावर संथ होणारा सचिन.
तो भारतातला सर्वोत्कृष्ट
तो भारतातला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे कि नाही ह्याबाबतच वाद असताना त्याला उगाचच जगातला सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणणे पटत नाही. >>>>
आता आवरा!
सचिन हा चांगला खेळाडू होता ह्यात वाद नाही पण त्याला तणावमुक्त परिस्तिथित खेळायला आवडायचे दबावात तो हमखास गांगरून जायचा. अनेक कठीण प्रसंगी तर तो मला तम्बुतच परतलेला आढळला. त्याची जी काही शतके झाली आहेत ती जास्तकरून कसोटीच्या पहिल्या डावातच झाली आहेत >>>
सचिनचा रेकॉर्ड चुकून तरी पाहीलात का हो कधी?
सचिन दबावात खेळत नाही ??
पहिल्या इंग्लंड दौर्यातली पहिलीच सेंच्युरी पाहीली होतीत का हो? टेस्ट मॅच वाचवायची होती तेव्हा.
पहिल्या ऑस्ट्रेलियन दौर्यातली पर्थ टेस्ट?
द. आफ्रिकेतली सचिन-अझर यांची २००+ पार्टनरशिप? ५० ला ५ असतानाची ज्यात सचिनने १६९ ठोकल्या होत्या.
बँगलोर टेस्ट पाहीली होतीत का हो तुम्ही?
गेला बाजार गेल्या द.आफ्रीका दौर्यातली जोबर्ग टेस्ट?
ही केवळ काही थोडकी उदाहरणं.
We did not loose to team India, we lost to Sachin Tendulkar हे म्हणायची वेळ कोणावर आली होती हे माहीत आहे का?
केवळ सचिन द्वेशाने पछाडलेल्या अगाध कॉमेंट्स करु नका.
कुठे दिवसात त्रिशतक करणारे
कुठे दिवसात त्रिशतक करणारे डॉन नि कुठे शतक आल्यावर संथ होणारा सचिन. >>>
डॉन ब्रॅडमनच्या जन्मापूर्वी आणि नंतर गेल्या कित्येक वर्षात बाकी कुठल्या बॅट्समनला दिवसात ३०० रन्स काढता आल्यात हो?
पगारे तुमचा मुख्य आक्षेप
पगारे तुमचा मुख्य आक्षेप सचिन च्या clutch moments वर आहे असे धरून असे सहज म्हणता येईल कि त्याच्या आधी अशा clutch moments क्वचितच आल्या होत्या. सचिन आल्यावर आपण भारताने जिंकायलाच हवे अशा अपेक्षा धरू लागलो. हे लक्षात घेऊन ह्या अपेक्षा ठेवणे कधीपासून सुरू झाले (मधे मधे असे वाटणे ह्याबद्दल आपण बोलत नसून नेहमी असे वाटणे ह्याबद्दल बोलत आहोत हे लक्षात घ्या) हे लक्षात घेतल्यावर अशा अपेक्षा निर्माण करणारा खेळाडू भारतातला सर्वोत्कृष्ट खेळाडू नव्हता असे म्हणणे प्रचंड धाडसी विधान आहे.
वयानुसार स्लो होणार्या reflex प्रमाणे आपला adjust करणे हे greatness चे उदाहरण आहे तुम्हाला वाटते तसे कमकुवतपणाचे नाही. भल्या भल्यांना हे करणे जमले नाहीये.
बॉयकॉट बद्दल तुम्ही जे वर म्हटलाय त्याचा context नक्की काय होता हे सांगू शकाल का ? त्याच्या आधीचे प्रश्न वगैरे. मला आठवते त्याप्रमाणे त्याच्या एव्हढा सचिनचा फॅन पटकन आठवत नाही (कदाचित गावसकर नि बेनॉ असतील) पण जेंव्हा जेंव्हा त्याला सचिनबद्दल बोलताना ऐकलय तेंव्हा तो वाहवतच गेलेला आठवतोय. लाराच्या ५०० नंतर त्याबद्दल सोबर्स ला बोलताना मधेच सचिन घुसडू जाण्याचे धाडसही बॉयकॉटचेच होते. सचिनच्या निव्रुत्तीनंतर सचिन हा सर्वात complete cricketer होता असे म्हणणारा बॉयकॉट तुम्ही म्हणता ते वरचे उपहासाने म्हणाला असल्याची शक्यता अजिबातच वाटत नाही. त्यामागे actually सचिनला undermine केले गेलेय असे सुचवण्याचा हेतू असू शकेल. हि लिंक पाहा जी बॉयकॉटचे सचिनला लिहिलेले पत्र दाखवतेय
http://www.mid-day.com/articles/sir-geoffrey-boycott-pens-letter-to-sach...
स्वतः बॉयकॉट च्या मते ब्रॅडमन हा dry pitches वर best batsman होता तर पिच कठीण होउ लागल्यावर तो मान जॅक हॉब्स चा होता नि सचिन हा हॉब्जच्या जवळ आलेला पन्नस वर्षांमधला एकमेव फलंदाज होता (इती बॉयकॉट).
स्पार्टाकस.. जाऊ द्या हो ! ते
स्पार्टाकस.. जाऊ द्या हो ! ते त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने खेचत रहाणार.. गप्प बसलं तर ते त्यांची मते आपल्याला पटली असे मानून समाधान मानून घेतात.. घेऊ द्या बापडे..
<< जेफ बॉयकोटला प्रतिक्रिया
<< जेफ बॉयकोटला प्रतिक्रिया विचारली होती तेव्हा त्याने गमतीशीर उत्तर दिले होते 'डॉन आता म्हातारा झालाय'.>> पगारेसाहेब, डॉन ब्रॅडमनचं सचिनविषयीचं मत खोडून काढायला मला तुमचं स्वतःच याबाबतींतलं विश्लेषण बॉयकॉटच्या उत्तरापेक्षां अधिक स्विकारार्ह वाटतं; कारण, जेफ बॉयकॉटच्या प्रतिक्रियेवरही नेमकं ' जेफ आतां म्हातारा झालाय', हेंच चपखलपणें लागू होतं, असं नाही वाटत?
पराग +1 स्पार्टाकस , जाऊ दे
पराग +1
स्पार्टाकस , जाऊ दे ना . बाकी पगारे तुम्ही सचिनविषयीचा अभ्यास वाढवा ही विनंती .
पगारे आणि त्यांची राजकीय मत याविषयी मला देण घेण नाही. पण सचिनविषयी बोलताना पाहून राहावल नाही म्हणून ही पोस्ट . आय एम् बिग fan ऑफ़ द ग्रेट सचिन तेंडुलकर
भाऊकाका
भाऊकाका
Pages