क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतां, 'डीआरएस' स्विकारायलाच हवं अशी हाकाटी म्हणे सुरूं झालीय कारण गेल्या दोन कसोटीत किमान ५ संशयास्पद निर्णय भारताच्या विरोधात होते व त्यांचा 'रिव्ह्यू' शक्य झाला असता [ आजचा 'लोकसत्ता' - क्रिडा विभाग ]. 'डीआरएस' स्विकारावा कीं नाहीं हा मुद्दा स्वतंत्रपणे मांडणं वेगळं आणि आता हरल्याबरोबरच तो मुद्दा काढणं वेगळं; जोपर्यंत चूकीचे निर्णय मुद्दाम दिले होते असं म्हणतां येत नाहीं, तोपर्यंत प्रचलीत नियमांनुसार आपण हरलों आहोत व तें खिलाडूवृत्तीने स्विकारावं; नेमक्या अशावेळींच 'डीआरएस'चा मुद्दा उकरून काढून त्या हरण्याला सबबी सांगणं मला तरी रडेगिरी वाटते !

नेमक्या अशावेळींच 'डीआरएस'चा मुद्दा उकरून काढून त्या हरण्याला सबबी सांगणं मला तरी रडेगिरी वाटते !

अनुमोदन.
खिलाडू वृत्तीच नाही तर जरा उत्तम खेळून त्या डीआरेस शिवाय उरलेले सगळे सामने जिंकून दाखवा, मग जिंकल्यावर म्हणा, आम्ही परत एकदा विचार करू डी आर एस चा.

डिआरएस भारत स्विकारत का नाहीये पण? ते योग्य प्रकारे वापरण्याच्या कौशल्याच्या आणि आत्मविश्वासाचा अभाव का? नाहीतर तो धोनी वेश बदलो देश बदलो बोलत असतो, मग इथे का नाही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत?

भारतीय फलंदाजीमध्ये द्रविडच्या निवृत्तीनंतर एक पोकळी निर्माण झाली आहे. कोहली वैगरे फारतर सचिनची जागा भरून काढू शकतात. मात्र द्रविडच्या योग्यतेचा फलंदाज पुंन्हा मिळाला तर भारतीय फलंदाजी पुन्हा बहरेल .

मला वाटते डिआरएस भारताने स्विकारावा म्हणुन तर चुकिचे निर्णय दिले जात असावे >>> मलाही तीच शंका येत होती दिदे. मात्र काही रेप्युटेड अम्पायर्स असे करतील (म्हणजे यात सामील होतील) असे वाटले नव्हते. दुसरी बाजू म्हणजे बीसीसीआय एवढी पॉवरफुल आहे आता की असले काही निष्पन्न झाले तर अनेकांचे आर्थिक नुकसान करण्याची ताकद आहे त्यांच्यात.

<< डिआरएस भारत स्विकारत का नाहीये पण? >> डीआरएसला विरोध हा बीसीसीआयने इतक्या टोंकाला जावून प्रतिष्ठेचा प्रश्न कां बनवला आहे, हें खरंच मलाही कळत नाहीं !

भारताच्या फेव्हरमध्येही कित्येक चुकीचे निर्णय जातच असतात, फक्त आपल्या ते उठून लक्षात राहत नाही ईतकेच .. आपण ते विस्मरणात टाकून पुढे जातो.. पण आपल्याविरुद्ध निर्णय नसेल तर मग त्याचा किती फटका पडला याची मोजदाद सुरू होते, चीडचीड होते, पराभवाचे कारण त्यात शोधणे वगैरे प्रकारांमुळे त्यांची संख्या जास्त आहे असा फक्त आभास निर्माण होतो.

जसे की बस स्टॊपवर बसची वाट बघत असताना नेहमी किंवा बरेचदा समोरची विरुद्ध दिशेला जाणारी बसच पहिला येते असे वाटणे..

तोपर्यंत प्रचलीत नियमांनुसार आपण हरलों आहोत व तें खिलाडूवृत्तीने स्विकारावं; नेमक्या अशावेळींच 'डीआरएस'चा मुद्दा उकरून काढून त्या हरण्याला सबबी सांगणं मला तरी रडेगिरी वाटते >> ह्याचीच दुसरी बाजू अशी होउ शकते. काहि कारणांंमूळे BCCI DRS ला विरोध करते आहे. हाबद्दल ते एकदम ठाम आहेत. (हे चूक कि बरोबर ते सध्या बाजूला ठेवूया ) BCCI ने एकदा काही ठरवले कि त्यात बदल होणे फार कठीण आहे. पण सध्या त्या विरोधामूळे होणारे नुकसान दिसत असल्यामूळे खेळाडूंचे मत त्यासाठी बदलता येणे शक्य आहे. 'लोहा गरम है तब तक हाथोडा मार लो' Wink

जाता जाता : DRS ला hot spot, snickmeter वगैरे च्या limitations मुळे BCCI चा असलेला विरोध तात्पुरता मान्य करूनही, ICC ज्या उत्साहाने विकेट टेकिंग बॉल नोबॉल होता का हे चेक करते तोच उत्साह
१. पकडलेला कॅच हा बॅटला लागून गेला होता का नि कॅच क्लीन घेतला गेला होता का
२. run out clean होता का
अशा बारक्या सारक्या गोष्टी का review करायला लावत नाही अंपायर्स ना ? लोक खेळ बघायला येतात कि 'How umpires are human too?' हे बघायला येतात ?

एक वै.म. -- सगळेच डिसीजन फूलप्रूफ कर्रेकट ऎक्युरेट मिळायला लागले तर ओह्ह लाटला त्याच्या एक्सव्हायझेड करत त्रागा मनस्ताप करत अंपायरला आणि समोरच्या टीमला सुद्धा शिव्या घालण्याची मजा येणार्‍या पिढीतले प्रेक्षक गमावून बसतील.. Sad

शेवटी काय नाचता येइना अंगन वाकडे...
पण जरा आता पहिल्या पेक्षा थोड्या स्टेपस चांगल्या करतायत त्यात समाधान..

असामीजी, आत्तांच ओरड करणारे सर्वच रडेगिरी करत नाही आहेत व त्यांचा उद्देश << 'लोहा गरम है तब तक हाथोडा मार लो' >> हाच आहे हें मान्य. पण आत्तांच हा विषय काढणं औचित्यभंग करतं, हेंही तितकंच खरं. अंपायरींगच्या सर्व चूका नोंद करून ठेवून [ दोन्ही संघाना लाभदायक ठरलेल्या] दौरा संपल्यावर त्या दाखवून 'डिआरएस'चं समर्थन करणंच योग्य नसतं का ठरलं ?

अंपायरींगच्या चूका होणं अपरिहार्य आहे पण जर त्याचे दुष्परिणाम किमान ठेवणं तंत्रज्ञान वापरून सहज शक्य असेल तर तसं करायला काय हरकत असावी ? अंपायर्सना अशा चूकीच्या निर्णयांतील संभ्रमामुळे होणारा मनस्तापही त्यामुळे वांचेलच ना !

ऑस्ट्रेलियामध्ये अंपायरिंगची ओरड पूर्वीपासून आहे. २००३-०४ मध्ये बकनर आणि २००७-०८ मध्ये बकनर, रौफ आणि बेन्सन ह्यांनी काही अत्यंत चुकीचे निर्णय दिलेले आहेत. न्यूट्रल अंपायर्सची ही कथा आहे. Sad

औचित्यभंग मान्य आहे. पण दौरा संपल्यावर परत तसेच म्हणता येउ शकतेच. मला वाटते मुख्य मुद्दा हा आहे कि भारताविरुद्ध गेलेले निर्णय हे शुद्ध blunders आहेत ह्या विरुद्ध australia विरुद्ध फारसे नाहियेत त्यामूळे जास्त आरडाओरड आहे. "बारक्या सारक्या गोष्टी का review करायला लावत नाही अंपायर्स ना ? लोक खेळ बघायला येतात कि 'How umpires are human too?' हे बघायला येतात ?" ह्याचे उत्तर मिळालेले मलाही आवडेल.

"बारक्या सारक्या गोष्टी का review करायला लावत नाही अंपायर्स ना ?
>>>>>>>
नो बॉल बघणे, किंवा जमिनीलगतची कॅच बरोबर घेतलीय की नाही वा बाऊंडरीची कॅच घेताना पाय तर नाही ना दोरीला लागला वगैरे बघतातच की..

आता कट आहे की नाही किंवा एलबीडब्ल्यू बघणे हे करत राहिले तर मग रिव्यू सिस्टम आणि यात फरक तो कितीसा उरला..

आता यात फलंदाजाच्या बॅटला बॉल न लागताच झेल दिला तर तो ठामपणे सांगू शकतो की असा युक्तीवाद होऊ शकतो, पण मग हाच नियम गोलंदाजांनाही लागू व्हावा मग, त्यांनाही खात्री वाटली की कट लागून गेलाय पण नाबाद देत आहेत तर त्यांचेही ऐकायला हवेच.. थोडक्यात फिरून डीआरएसवरच आलो.. मूळ प्रश्न हाच आहे की आपणच हे मान्य करत नाही आहोत आणि आपणच रडत आहोत, हा दुटप्पीपणा आहे Happy

(आपण म्हणजे माबोकर नाही, भाक्रिचा संघ Wink )

आता कट आहे की नाही किंवा एलबीडब्ल्यू बघणे हे करत राहिले तर मग रिव्यू सिस्टम आणि यात फरक तो कितीसा उरला.. >> बराच फरक आहे. कट लागला कि नाही, कॅच clean होता कि नाही ह्या गोष्टि आजही बघितल्या जात नाहीत. mandetory तरी नक्की नाहि आहेत. (पहिल्या दोन टेस्ट्समधला वाद त्याबद्दलच तर आहे).
DRS बद्दल main objection त्यातल्या predictive analysis बद्दल होते (म्हणजे ball path, snik-o-meter, hot spot ) ह्याबद्दल. त्या कितपत accurate आहेत ह्यावर BCCI नि इतरांचे एकमत नाहीये. hot spot बद्दल बनवणार्‍यांचे पण एकमत नाहिये. ह्याउलट कॅच किंवा कट बद्दल तसे नाहिये. एकापेक्षा जास्त कॅमेरे आधीच हे बघत असतात तर त्याचा फायदा अंपायर्सना असू दे कि. विकेट टेकिंग delivery ना noball चेक करतात तसेच अशा विकेट्स legal आहेत कि नाही हे बघणे mandetory हवे. त्यासाठी batsman ला review मागण्याची गरज नसावी. अधिक कॅमरा angles बघून घेतलेल्या निर्णयांचा फायदाच होईल. (अगदी एखाद्या case मधे conclusive evidence नसेल तर on field decision ठेवता येतोच कि - NFL system मधे असे करतात.) उगाच वादग्रस्त निर्णयांचे प्रमाण वाढवण्यापेक्षा अंपायर्स ना मदत होऊ शकेल अशी system असणे चांगलेच नाही का ?
घेतले तर पूर्ण DRS नाहितर काहीच नाहि हा आडमुठेपणा नको.

भारतीय फलंदाजीमध्ये द्रविडच्या निवृत्तीनंतर एक पोकळी निर्माण झाली आहे. कोहली वैगरे फारतर सचिनची जागा भरून काढू शकतात. >>>

पगारे, तुम्ही राजकीय विनोद करता त्याचप्रमाणे क्रिकेटमधेही लिलया विनोदफिरी (मुशाफिरीचं व्हर्जन) करत असाल याची कल्पना नव्हती. टेस्ट क्रिकेटमध्ये कोहली अद्याप सचिनच्या जवळपासही आलेला नाही.

स्पार्टाकस, कोहलीची निदान वाटचाल त्या दिशेने आहे. पण "फारतर सचिन" वाक्प्रचार जो आहे त्याला तोड नाही Happy

असामीजी, संबंधित तंत्रज्ञानाबद्दलच शंका असेल तर विरोध समजण्यासारखा आहे.[ पूर्वीं सचिनने असा विरोध केलेला आठवतो व तोही या कारणानेच असावा]. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद व घेतलेल्या भूमिकेशीं सहमत.
<< पण "फारतर सचिन" वाक्प्रचार जो आहे त्याला तोड नाही >> द्रविड व कोहलीसुद्धां हा वाक्प्रचार वाचून छानच लाजतील ! पण चालायचंच , Some people are more loyal than the king himself ! Wink

मग इथे का नाही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत?
तंत्रज्ञान आधुनिक असले तरी ते पर्फेक्ट आहेच असे नाही. असे निदान बीसीसीआय चे म्हणणे आहे असे मी ऐकले आहे.
आता भारतीयांपेक्षा जास्त हुषार क्रिकेट खेळणार्‍या जगात कोण आहे? कुणीच नाही. बीसीसी आय जवळ कित्ती तरी पैसे आहेत, तेव्हढे इतरांकडे नाहीत. त्यावरून बी सी सी आय च सर्वात हुषार हे आपोआपच सिद्ध होते ना?

<आता भारतीयांपेक्षा जास्त हुषार क्रिकेट खेळणार्‍या जगात कोण आहे?> ह्यात 'क्रिकेट खेळणार्‍या' ह्या शब्दांची तरी काय आवश्यकता? Happy

कोहलीला जर सचिन इतके सामने खेळायला मिळाले तर सचिनचा विक्रम हा इतिहासजमा होईल.तो सचिनपेक्षा सरस खेळाडू वाटतोय वन डे मध्ये तर आहेच नि कसोटी मधेही होईल.

सचिन हा चांगला खेळाडू असला तरी कधीही बेडर नव्हता संघ विजयाच्या समीप आला कि तो हमखास तंबूत परतलेला दिसायचा. शेवट पर्यंत क्रीजवर थांबून त्याने जिंकून दिलेल्या सामन्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असेल. कसोटीत त्याला सर्वोत्तम समजत असले तरी तो भ्रम आहे. इतक्या मोठ्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे २५६. मोठी प्रदीर्घ खेळी करणे त्याला जमले नाही जेव्हा त्याचे समकालीन हे कसोटीत ४००,३८५,३७५ अशा धावसंख्या, विरुसारखा खेळाडू दोनदा त्रिशतक करत होता तेव्हाही त्याला त्रिशतकाच्या आसपास जाणेही जमले नाही. तसेच शतक जवळपास आले तर तो कूर्मगतीने फलंदाजी करायचा.
ह्याउलट सध्या भारताचे जे खेळाडू आहेत त्यातील कोहली हा त्याच्या पेक्षा सरस आहे शतक जवळ आले तरी तो विचलित होत नाही. सचिन इतके सामने नाही तरी त्याच्याहून जवळपास पन्नास एक सामने कमी खेळला तरी कोहली हा त्याचा विक्रम सहज मोडू शकतो.

तेच ते पुन्हा सुरू करू नका हो !! ह्या विषयवर 'n' वेळा तेच बोललं गेलेलं आहे.. ! निदान हा बाफतरी जुन्या दळणांपासून दुर ठेवा..

statistics are like mini skirts, what they show are appealing but what they hide is more revealing एव्हढे बोलून पगारेंच्या पोस्टवरची प्रतिक्रिया आवरती घेउया Wink

Some people are more loyal than the king himself ! >> Happy

पुढच्या टेस्ट्चा मेकप बहुधा आधीचाच असेल असे वाटतेय.
* धोनीने आधीच रोहितला अजून संधी द्यायला हवी असे म्हटलय. ह्यावेळी तो जॉन्सन पेक्षा अधिक धावा काढेल का ? (जॉन्सन च्या धावांपेक्षा, विकेट्सपेक्षा नाही) Wink
* धवन दुसर्‍या इनिंगवरून पुढे सुरू करेल कि आधीच्या तीन इनिंगचाच कित्ता गिरवणार ?
* विजय पहिल्या दोन टेस्ट्स नंतर वेगळ्या मोड मधे जातो, ह्यावेळी काय होईल ?
* round the wicktes किंवा short ball strategy does not help you if you offer width in spite of whatever speed you can bowl at हे उमगलेले भारतीय बॉलर ह्यावेळी काय नवीन strategy घेऊन येतील ? For a change fuller length on the stumps ?
* हाडीन ने आधीच भारतीय संघ aggressively खेळेल असे सांगून ठेवलय. एकंदर नव्या संघाचा मेक बघता त्यांनी तसेच खेळावे. They are better players when they are aggressive. परत हरल्यावर प्रयत्न केला असे तरी समाधान मिळते Wink

सचिनच्या जवळपास सर्व खेळ्या मी बघितलेल्या आहेत त्यावरून मी माझे मत मांडले आहे.

सचिन हा त्याच्या कालखंडातील उत्तम खेळाडू होता पण सर्वोत्तम नव्हे.भारतातलाच द्रविड हा त्याच्यापेक्षा सरस होता. संघ संकटात असताना त्याचा खेळ अजून जिगरबाज व्हायचा.

द्रविडने केलेले त्रिशतक आठवायचा प्रयत्न करतोय बराच वेळ मघापासून ;).
पगारे तुम्ही वर दिलेले अमक्याने त्रिशतके केली किंवा तमक्याने २६५ पेक्षा अधिक कसे केले वगैरे आकडेवारी दिली आहे त्याबद्दल एव्हढेच म्हणता येईल कि अशाच प्रकारे एखाद्या stat वरून अनुक्रमे रवि शास्त्री, हर्शेल गिब्ज नि पोलार्ड हे रिचर्ड्स पेक्षा सरस फलंदाज होते असे म्हणावे लागेल. प्रदीर्घ खेळ्या करण्यापेक्षा उत्क्रुष्ट खेळ्या प्रदीर्घ काळ केल्या त्याकडेही बघूया.

असो we agree to disagree असे म्हणून पराग म्हणतो तसे चावून चोथा झालेल्या ह्या विषयावरून हलतो.

Pages