क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< आय एम् बिग fan ऑफ़ द ग्रेट सचिन तेंडुलकर >> Fans v/s Fanatics सामना कितीही दिवसांचा ठेवला तरीही अनिर्णितच रहाणार !! Wink

<<< Fans v/s Fanatics>>> सचिनचे Fan Fanatics व्ह्यायची शक्यता कमीच . बाकीच काही सांगता येत नाही

सचिनपेक्षा वुकेरी रामन, सुजीत सोमसुंदर, श्रीधरन श्रीराम, देवांग गांधी, विक्रम राठोड, अजय शर्मा हे भारतीय बॅट्समन महान होते असं मत असण्याचीही शक्यता आहे! असो!

<< सचिनचे Fan Fanatics व्ह्यायची शक्यता कमीच >> म्हणूनच << Fans v/s Fanatics >> म्हटलंय मीं !
[ आणि माझ्यापुरतंच बोलायचं तर मीं सचिनचा फॅन वगैरे अजिबात नाहीं; मीं सचिनचा एक साधा, निस्सीम पण डोळस भक्त आहे व माझी ही श्रद्धा त्याच्याबद्दल कोण काय म्हणतं याने डळमळणारी नाहीं ! Wink ]

<<< माझी ही श्रद्धा त्याच्याबद्दल कोण काय म्हणतं याने डळमळणारी नाही >>>>माझीही नाही. निस्सीम भक्त नसून सुद्धा आणि माझी पोस्ट पगारेंसाठी होती मुख्यत. असो .

वाह मस्त चर्चा चालू आहे.
आता मैदानाबाहेरील वा ईतर मुद्द्यांचीही चर्चा होऊ द्या.. आणखी काही मुद्दे मी पुरवतो..

जसे की त्याला दिलेले भारतरत्न योग्य की अयोग्य?..
पर्सनल जिमसाठी जागा मागणे वा फेरारी प्रकरण??
निवृत्त व्हायला उशीर केला का?
कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात विश्रांती घेत निवडक सामने खेळायचा मात्र आयपीएल खेळायचे काही सोडले नाही ते पैसा आणि प्रसिद्धीसाठी का??
सचिन हा विक्रमासाठी खेळायचा का?
आणि त्याचे दडपण घेत शतकाजवळ संथ व्हायचा का?
१०० शतके करण्यासाठी कारकिर्द खेचली का?
हल्लीच त्याने कुठल्या तरी परराज्यातील गाव दत्तक घेतले, तर त्याला महाराष्ट्रातील गाव नाही मिळाले का?
मागे परप्रांतीयांच्या वादात त्याने मुंबई सर्वांचीच असे विधान केल्याने शिवसेनेने इशारा दिला होता या राजकीय प्रकरणालाही घ्या जमल्यास..

होऊ दे चर्चा..
पण सचिन हा सचिनच राहणार!

आणि हो, एक आपला सौरव गांगुली.. त्याच्यावर चर्चा / वाद करायला घेता तर खोर्‍याने नकारात्मक वा वादग्रस्त मुद्दे सापडतील.... तरीही .... दादा तर दादाच राहणार !! !!

बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट कॅप्टन किंवा बेस्ट बॉलर या संकल्पनाच मुळात मला पटत नाहीत.
वेगवेगळ्या परीस्थितीमध्ये आणि वेगवेगळी निकष लावल्यास याची उत्तरे वेगवेगळी निघतील.

फलंदाजाबात याचे उदाहरण द्यायचे झाल्यास,
कसोटी सामने वा एकदिवसीय सामने, पहिली फलंदाजी वा चेस करताना, प्रेशर खाली खेळणे, वेगवान फलंदाजी करायची गरज असणे, विकेट सांभाळण्याची गरज असणे, नवीन बोलवर ओपनिंगला येणे, मिडल ओर्डरला खेळणे, फिनिशरचा रोल निभावणे, मायदेशात खेळणे, परदेशात खेळणे, वेगवान खेळपट्ट्यांवर वा फिरकी आखाड्यांवर खेळणे... वगैरे वगैरे..

या सर्वात नंबर वन एकच फलंदाज असेल असे नसते, आपण बस्स ज्याला सर्वच गोष्टी कमीजास्त प्रमाणात जमतात व आपल्याला ज्या महत्वाच्या वाटतात त्याला अनुसरून त्याला सर्वोत्तम फलंदाज म्हणतो, पण प्रत्येकाचे यांना द्यायचे वेटेज वेगवेगळे असू शकते त्यामुळे कोण नंबर वन हे व्यक्तीसापेक्ष असू शकते, क्रिकेटमध्ये तरी.

मस्त चर्चा चालू आहे.

मला आठवतय द्रविड आणि विक्रम राठोड यांचे एकदिवसीय पदार्पण एकत्र झाले होते. राठोड सलामीला यायचा. तेंव्हा द्रविडकडे बघून ह्याला कुठुण आणलाय असे वाटायचे. मग साहेबांनी रंग दाखवायला सूरूवात केली.

<< त्यामुळे कोण नंबर वन हे व्यक्तीसापेक्ष असू शकते, क्रिकेटमध्ये तरी. >> १००% सहमत. 'सर्व देवाना केलेला नमस्कार केशवालाच पोचतो', तसं क्रिकेटमधले सगळे नमस्कार क्रिकेटला पोचल्याशीं कारण !! फक्त माझाच देव मोठा किंवा, त्याहीपेक्षां, तुमचा देव कसा खोटा, अशामुळें उगीचच वाद निर्माण होतात. माझा स्वतःचा निकष अगदीं साधा, सरळ आहे - मला ज्याच्या ज्याच्या खेळामुळें आत्यंतिक आनंद व समाधान मिळतं तो तो माझ्यासाठी देवच; सचिनने असा आनंद व समाधान जास्तीत जास्त दिलं , म्हणून त्याची आरति म्हणताना आवाज जरा उंचावतो एवढंच !! Wink

गांगुली वॉज बेस्ट कॅप्टन अ‍ॅन्ड सचिन द बेस्ट बॅट्समन! >>> हे मात्र खर आहे . आमच्या ग्रुपमध्ये दादाची खुन्नस हा विशेष कौतुकाचा भाग होता. नेटवेस्ट सीरिजमध्ये त्याने फ़्लिंटॉफ़ला शर्ट काढून दाखवला होता तेव्हा. व्यक्तिश: ते पटल नव्ह्त पण कृती मात्र भारी होती .

जाई. ते करण्याचे कारण म्हणजे फ्लिंटॉफ ने आधी भारतात जेव्हा सिरीज जिंकली तेव्हा मुंबईत तसे केले होते.

आम्ही लॉर्डस ची टूर घेतली तेव्हा तिथल्या गाइडला व्हिजिटर्स गॅलरीत "दादा ने येथे शर्ट फिरवला होता का" विचारले तेव्हा तो म्हंटला - "हो, आणि येथे येणारा प्रत्येक भारतीय हे विचारतो" Happy

सेनापती, द्रविड व राठोड दोघांचेही रेप्युटेशन रणजी व इतर डोमेस्टिक मधे बरेच झालेले होते तेव्हा. त्यामुळे ते इंग्लंड दौर्‍यावर निवडले गेले तेव्हा चांगले माहिती होते.

नोएल डेव्हिड मात्र जेव्हा निवडला गेला तेव्हाचा कप्तान सचिनला ही तो माहीत नव्हता Happy

दादाच्या शैलीदार फलंदाजीला सलाम. खरंच ऑफ-साईडचा बादशाहाच होता तो ! पण त्याच्या 'खुन्नस'ला मात्र तुसडेपणाची किनार असायची व त्यांत दिखाऊपणाच अधिक होता असं मला नेहमींच वाटत राहिलं. तो कप्तान असताना एखाद्या क्षेत्ररक्षकाकडून चेंडू सुटलाच तर हातपाय आपटून चेहर्‍यावर जे तुसडेपणाचे भाव तो आणायचा ते तर खूपच खटकायचं. अर्थात, हा माझा चूकीचा ग्रहही असूं शकतो व यामुळे फलंदाज म्हणून तर त्याचं महात्म्य तसूभरही कमी होत नाहींच पण कप्तान म्हणूनही त्याच्या इतर गुणवत्तेला बाधा पोचत नाहीं .

सौरभ गांगुली हा खरच दादा खेळाडू होता. द्रविड,गांगुली नि अझर हे माझे आवडते खेळाडू. सध्या विराट कोहलीचा खेळ आवडतो. बोर्डर हा ऑसी संघाचा कप्तान असतान त्यांचा संघ भारत दौर्यावर आला होता तेव्हा एका पत्रकाराने त्याला विचारले कि 'तुम्ही सचिनला रोखण्यासाठी काय रणनीती आखणार?' तेव्हा तो म्हणाला होता सचिन बद्दल काही काळजी नाही परंतु जर अझरला सूर गवसला तर मात्र आम्ही हरू शकतो. अझर हा झोपलेला वाघ आहे तो उठला तर जगातल्या कुठल्याही आक्रमणाला आव्हान देवू शकतो.

ह्म्म

बोर्डर हा ऑसी संघाचा कप्तान असतान त्यांचा संघ भारत दौर्यावर आला होता तेव्हा एका पत्रकाराने त्याला विचारले कि 'तुम्ही सचिनला रोखण्यासाठी काय रणनीती आखणार?' तेव्हा तो म्हणाला होता सचिन बद्दल काही काळजी नाही परंतु जर अझरला सूर गवसला तर मात्र आम्ही हरू शकतो.>>>

मस्त माहिती आहे. खरी असती तर आवडली असती. बॉर्डर कप्तान असताना जेव्हा ऑस्ट्रेलिया भारत दौर्‍यावर आली तेव्हा सचिन कधीच संघात नव्हता.

ते करण्याचे कारण म्हणजे फ्लिंटॉफ ने आधी भारतात जेव्हा सिरीज जिंकली तेव्हा मुंबईत तसे केले होते.>> फारएण्ड ,हे नव्हतं माहीत मला. मी फक्त दादा ची मॅच पाहिली होती ती पण शेवटचा भाग .मला तर ती कृती मात्र भारी वाट्ली होती तेव्हाही आणि आताही. :स्मित

फलंदाज म्हणून तर त्याचं महात्म्य तसूभरही कमी होत नाहींच पण कप्तान म्हणूनही त्याच्या इतर गुणवत्तेला बाधा पोचत नाहीं .>> :स्मित
भाउ तुमच्या या वाक्यासाठी साठी हा विडिओ https://www.youtube.com/watch?v=fe7uaXzQ1Dc

पगारेजी तुम्हाला सचिन आवडत नाही याबद्दल काही वाद नाही. आवडनिवड स्वाभाविक/नॅचरल असते त्यामुळे जे आहे ते आहे. मात्र तो का आवडत नाही हे समजावयाला तुम्ही जी क्रिकेटविषयक उदाहरणे देत आहात ती अगदी सहज खोडून काढण्यासारखी असतात. त्यापेक्षा "आवडत नाही" हे ठीक आहे आणि मला तरी त्यात काही वाद नाही.

तुसडेपणा हा शब्द जरा चुकीचा वाटतो त्याच्या एटीट्यूडला.. कारण त्या परीस्थितीत चाहतावर्ग फारसा तयार होत नाही. किंबहुना त्याच्या फलंदाजीपेक्षा जास्त त्याच्या एटीट्यूडने तो बरेच लोकांना आवडू लागला.
स्वताची फिल्डींग जेमतेम म्हणत जर त्याने इतरांना ढिल दिली असती वा यांना कोणत्या तोंडाने बोलायचा असा विचार केला असता तर तो कर्णधार म्हणून घातक असता. बाकी त्याची ग्राऊंड फिल्डींग बकवास असली तरी उंच झेल घेण्यात सेफ हॅण्ड होता.

आपण तर त्या फलंदाजीच्या शैलीच्याही प्रेमात होतो. डोळे मिचकावत स्टान्स घेणे, गिरकी घेत पुलशॉट खेळणे, स्पिनरला पुढे येत आणि फास्टरला कवर सोडून भिरकावून देणे, कव्हरमधून मारलेले ते लाजवाब टायमिंग फटके, आणि शेवटाला सुटायचा तेव्हा उत्तुंग भिरकावून द्यायचा ते.. सारेच नेत्रसुखद होते !!

त्याचे ओपनिंगला येणे हा एक भारतीय क्रिकेटचा टर्निंग पॉईंट होता. पहिल्या पंधरा षटकांना त्याने पुन्हा नव्याने महत्व प्राप्त करून दिले अन्यथा आपले त्या आधी मोंगिया श्रीनाथ वगैरे पिंचहिटर पाठवायचे प्रयोग चालायचे. खुद्द सचिनलाही त्याचा फायदा झाला नाहीतर त्याची भुमिकाही वेगळी असती आणि चार शतके कमीच असती.

कपिलने लॉर्डसवर उंचावलेला विश्वचषक हा भारतीय क्रिकेटमधील पहिला ऐतिहासिक क्षण आणि त्यानंतर दादाने फिरवलेले शर्ट हा दुसरा.... एटीट्यूड मॅटरस... Happy

भाऊ, गांगुलीबाबत सहमत!
संघातील असामान्य आणि प्रतिभावान खेळाडूंमुळे तो यशस्वी झाला आणि त्यावेळच्या संघाच्या यशात जॉन राइटचाही तितकाच वाटा होता
कर्णधार आक्रमक असेल तरच तो चांगला असे गृहितक असणार्‍यांची मला कीव करावीशी वाटते, आणि गांगुलीच्या बाबतीत तो आक्र्मकपेक्षा आक्रस्थाळा जास्त वाटायचा!
धोनी हा आत्तापर्यंतचा सर्वार्थाने बेस्ट कॅप्टन आहे

मस्त माहिती आहे. खरी असती तर आवडली असती. बॉर्डर कप्तान असताना जेव्हा ऑस्ट्रेलिया भारत दौर्‍यावर आली तेव्हा सचिन कधीच संघात नव्हता. >>>

मजबूत अमोल!
खळ्ळं खटॅक!

पगारेंचे म्हणने सत्यही असेल, फक्त त्यात एखादी चूक असेल, जसेकी बॉर्डर कर्णधार नसला तरी त्याचे हे विधान असेल, किंवा बॉर्डर नसून दुसर्‍या एखाद्या कर्णधाराचे विधान असेल. पण असे विधान असू शकेल, ऑस्ट्रेलिया अशी विधाने नेहमीच करते, हा त्यांचा नेहमीचा माइंडगेम आहे, समोरच्या संघातील फलंदाजांची तुलना करणे, कोणाला रोखायचेय वा नाही वगैरे..

भाऊ,
हाच तो, वेस्टईंडिज विरुद्धचा सोडून दिलेला सामना.

http://www.espncricinfo.com/west-indies-v-india-2011/engine/match/489228...

कातडी वाचवून खेळणारा सो कॉलड कूल कर्णधार महेंद्रसिंग धोनी. विजयाची संधी न साधता सामना अनिर्णित घोषित केला. कारण काय तर हा अंतिम सामना असून आपण मालिकेत १-० ने आघाडी घेतलेली आणि दुसरे म्हणजे आपण हा अनिर्णित राखूनही रॅंकिंगमध्ये नंबर वन राहणार होतो. अर्थात ते कसोटी नंबर वन फसवेच होते. कारण सिनिअर गेल्यानंतर हे परदेशात कसोटी न जिंकता कसे नंबर वर राहणार होते त्याचे त्यालाच माहीत. असो. पण बघा स्कोअरबोर्ड, आणि फायनल स्कोअरबोर्ड न बघता कॉमेंटरी मध्ये आधीच्या षटकांपासूनच चांगल्या स्थितीत असतानाही कशी बचावात्मक नांगी टाकायला सुरुवात केली हे ही बघा. किंबहुना त्यापेक्षाही सामना लाईव्ह बघतानाच यांची बॉडी लॅंगवेज समजत होती. विकेट हातात असून रिक्वायर्ड रनरेट वाढवत नेत होते वा प्रयत्न न करता जाऊ देत होते.

४७ षटकांत १८० बनवायचे होते. ४ पेक्षा कमी धावगती आणि मॉडरेट टारगेट. त्याआधी त्या दिवशी सकाळी विंडीजच्या नवव्या विकेटने ३७ ओवर खेळून काढल्या होत्या. खेळपट्टी अनप्लेयेबल नव्हती. आपली सुरुवात जरा संथच पण किमान विकेट राखून झाली होती. तरीही सेट झालेला द्रविड आणि लक्ष्मण खेळपट्टीवर होते, खुद्द तथाकथित फटकेबाज फिनिशर म्हणून प्रसिद्ध असलेला धोनीही शिल्लक होता. (खरे तर फक्त पाटा खेळपट्ट्यांवरचा कलाकार आहे तो, पण ते तरी कुठे कबूल करतोय), एवढेच नव्हे तर चेस करताना सचिन तेंडुलकरपेक्षाही जिगरबाज समजला जाणारा विराट कोहलीसुद्धा शिल्लक होता.. १५-१६ षटकांत ८८ धावा हव्या होत्या. ७ गडी हातात.. वगैरे वगैरे.. डिक्लेअर केले तसे डोक्याला शॉटच लागला होता. स्साला फुकट झोपेचे खोबरे यांच्या नादात. या अश्या निरर्थक जागरणी देणार असाल तर जाऊ नका मग पुन्हा वेस्टईंडिजला खेळायला.. लढून हरला असता तरी गम नव्हते मग.. विजयाची जास्त संधी असताना हरायची थोडीशी भिती आणि वेळ पडल्यास सामना अनिर्णित राखायचीच जास्त शक्यता असूनही ती थोडी भिती डोक्यात घुसवून घेणारा असा हा कर्णधार.. जर माझ्या हातात असते तर मी धोनीला कसोटी कर्णधार म्हणून कधीच ठेवला नसता. दुर्दैव बीसीसीआय क्रिकेट संघाचे.!

Pages