क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आऊट ऑफ फॉर्म बॅट्समन ला परत फॉर्म मिळवून देण्याची जबाबदारी भारतीय संघावरच असते.. ती आपण व्यवस्थित पार पाडतोय. शॉन मार्श अणि हॅडिन दोघेही आता झकास खेळतील आणि आपली वाट लावतील... पहिल्या टेस्ट सारखे नाही झाले म्हणजे मिळवली...

<< म्हणजे पीच बॅटसमनला साथ देत आहे तर त्या जोरावर तरी जास्त धावा काढल्या तर आपण जिंकू शकू.>> 'ड्रॉ' करूं शकूं; २० विकेटस घेतल्याशिवाय कसोटी नाहीं जिंकू शकत ना ! Wink
<< ५ आउट झालेत म्हणजे आत्ता कुठे खरी बॅटिंग चालू झाली त्यांची. >> Wink

सहा विकेट्स गेल्या आणि २९० ची आघाडी बहुदा शेवटच्या दिवशी आपल्याला ३५० चे टार्गेट ६० ओवर्स मधे देतील.

मारायला सुरवात केली या दोघांनी. ये रे माझ्या मागल्या. भाऊ, मागे बोललो होतो तेच खरे ठरणार की काय? ४-०/३-० ?

एण्ड ऑफ द डे कोणी सरस शिवी घातली वा कोणी बेक्कार खुन्नस दिली हे नाही तर सामना कोण जिंकला हे मॅटर करते.
ते खरे आहे हो. पण सामना कधी जिंकणार? तोपर्यंत रडका चेहेरा घेऊन बसण्यापेक्षा Live in the moment नि समाधान मानायचे. उद्या जॉन्सन काही बोलला नि कोहली गप झाला तर हेहि नाही नि तेहि नाही.

विराट कोहली झिंदाबाद. नाहीतरी आपले बरेचसे फलंदाज टी-२० सारखेच खेळतात.
कुणास ठाऊक, करूनहि जायचे चारशे धावा! आज दुपारी झोपलो तर निदान स्वप्नात तरी नक्की होतील!

Loksatta;:-
१५ वर्षांपूर्वी सचिनने २८ डिसेंबर १९९९ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न स्टेडियमवर आपले ऑस्ट्रेलियाविरुद्धचे ५ वे शतक ठोकले होते, आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १००० धावा पूर्ण केल्या होत्या. सचिनचे वय तेव्हा २६ वर्षांचे होते आणि बॅट देखील 'एमआरएफ'ची होती. सचिनची ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही १९ वी इनिंग होती. आणि काय योगायोग बघा, आज फक्त फलंदाज बदलला तर बाकी सगळ्या गोष्टी अगदी जशाच्या तशा आहेत. विराट कोहलीनेही मेलबर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध २८ डिसेंबर रोजी ५ वे शतक ठोकले. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध १००० धावांचा पल्लाही गाठला. बॅट सुद्धा 'एमआरएफची'च आणि वय देखील २६ वर्षे. इतकेच नव्हे तर विराटची ही ऑस्ट्रेलियाविरुद्धची १९ वी इनिंग! काय मग, आहे ना लक्ष वेधून घेणारा दुर्मिळ योगायोग

मला वाटते.. स्पीनर चा झोल आहे सगळा.. फास्टर चांगले आहेत.. तो अश्वीन बॉल स्पीन होउ शकतो ह्या गोस्टीवर वीश्वासच ठेवायला तयार नाही बहुतेक.. लायनने चौथ्या डावात माया जाल निर्मान केलन नाही म्हनजे झाल..

कोकण्या सहमत आहे. आपल्याकडे एकही चांगला फिरकी गोलंदाज नाही ह्या सारखे दुर्दैव कुठले? तो स्टिव्ह स्मिथ अश्विनला समोर येऊन इतका खतरनाक मारत होता की बास. मे बी मिश्रा असायला हवा होता. अगदी भज्जीने पण जान आणली असती. एवीतेवी तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध मस्त खेळायचा.

केदार cricinfo वरचे सगळे बरोबर उलट म्हणत आहेत. अश्विन ने गेल्या दोन्ही टेस्ट मधे नीट कंट्रोल ठेवला होता. स्मिथ अतिशय चांगला खेळला त्यामूळे अश्विन चा कंट्रोल स्मिथच्या विरुद्ध गेला होता शेवटी शेवटी. ह्याउलट इशांत वगळता उरलेल्या तिन्ही फास्ट बॉलर्स चा अजिबात कंट्रोल नाहिये आणि त्यामूळे दबाव निर्माण करता येत नाहिये हवा तसा. (मिश्रा injured होता संघ निवडला तेंव्हा बहुधा)

भाऊ रोहित- राहुल चा काहितरी झोल आहे. मॅच च्या आधी धोनी च्या मुलाखतीमधे रोहितला अजून कसा वेळ द्यायला हवा असे म्हणत होता नि एकदम मॅचमधे त्याच्या जागी राहुल आला. नक्की काय झाले ते माहित नाही. कदाचित धवनला नोटिस देत असावेत (एक इनिंग वगळता त्याने सगळ्या starts waste केल्या आहेत) Wink

२० विकेटस घेतल्याशिवाय कसोटी नाहीं जिंकू शकत ना ! >> ह्यावर विश्वास ठेवून ३-४ किंवा ४-० वर साईन करून टाका. कमीत कमी बॅटींग चा approach positive (अजून पर्यंत तरी) होता ह्यावर आनंद मानूया.

ऊद्या पाऊस नाही पडला, ऑस्ट्रेलिया पटकन ७-८ षटकात बाद झाली तर जवळपास ८५-९० षटके आणि ३५० धावा.. आपले तीन एक्के विजय, विराट आणि अजिंक्य.. वाह काय नावे आहेत.. बस्स पुढे काय बोलायलाच नको..

योगायोगाचे आश्चर्य आहेच पण आणखी एक आश्चर्य म्हणजे कोहली टेस्ट खेळायला लागल्यापासून साडेतीन वर्षांत ऑस्ट्रेलियाविरूद्ध १९ वा डाव खेळतोय. सचिन ला हे करायला दहा वर्षे लागली. याचे कारण म्हणजे भारताची पत ऑस्ट्रेलियामधे इतकी बेकार होती की भारताचा दौरा करण्यात कोणालाच इंटरेस्ट नव्हता. मग १९९६ पासून परिस्थिती बदलली. मग १९९८ (सचिन वि वॉर्न), १९९९-०० (व्हाइटवॉश, बॉम्बे डक), २०००-०१ ("कलकत्ता"), २००३-०४ (वॉ ची निवृत्ती, दादा चे शतक, अ‍ॅडलेड-द्रविड-आगरकर) , २००४ ("फायनल फ्रंटियर"), २००७-०८ (मंकीगेट), २००८ (कुंबळे, दादा ची निवृत्ती), २०१० (कांगारू धुलाई), २०११-१२ (०-४) आणि २०१२-१३ (४-०) असे अनेक दौरे झाले.

त्याआधी १९८७ साली भारतात व १९९१-९२ साली ऑस्ट्रेलियात एवढेच दोन दौरे झाले होते सुमारे दहा वर्षात.

(याच कारणामुळे वरचा बॉर्डर-सचिन-अझर किस्सा अगदी सहज 'कॅच' होतो Happy )

नाही रे १९९९-०० च. १९९९, २००३, २००७ व २०११ - प्रत्येक वर्षी आपण वर्ल्ड कप नंतर पुढच्या विंटरला तिकडे गेलो होतो (या वेळेस बर्‍याच काळाने आधी चाललोय). अनलेस मी काहीतरी मिस करतोय :).

ओह तू फक्त down under series म्हणतोयस. मी भारत-ऑस्ट्रेलिया एकूण समजत होतो.

केला एकदाचा डाव घोषित. आता ७० ओवर्स मधे ३८४, म्हणजे ५.५ रन रेट हवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत!

दुपारची झोप झाली नाही, पण आता झोपायला योग्य वेळ आहे. ठरवलेले स्वप्न असे - धोणीने शेवटच्या ओवर मधे ५ व्या बॉल ला हेलिकॉप्टर शॉट मारून सिक्स रन्स - भारत ३८५/६ बाद! ४ विकेट्स ने जिंकले!

सगळे जण असेच पॉझिटिव्ह विचार डोक्यात ठेवा. निदान ५०० - ६०० लाख लोकांनी एकदम एकच विचार केला तर त्याचा नक्कीच प्रभाव पडतो म्हणे!!

हटकेश्वर, हटकेश्वर!

भरवश्याचा विजय अनलकी ..
धवनला कश्याला खेळवत आहेत ..
लोकेश राहुलला घ्यायची गरज वाटलीच तर धवनलाच बसवून पुजाराने ओपनिंग करवायची होती..
कोहली, रहाणे जोडी चुक्कून फुटली, तर गेम ऑन

कोहली-रहाणेला खेळताना बघुन ते.न्डूलकर-द्र्वीड जोडीची आठवण होतीय!
रैना असताना लोकेश राहुलला खेळवायची चाल खरच अनाकलनीय Sad

धोणी - निवृत्तीनंतर सुखात रहा.
एकूण बरा होता कॅप्टन म्हणून. शेवटची दोन वर्षे जरा ढेपाळला होता पण ते ओळखून स्वतःहून निवृत्त झाला हे शहाणपण.
आता कोहलीच ना कॅप्टन?

Pages