क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जॉनसन ८८ वर बाद झाला पण त्याचं शतक हुकलं म्हणून प्रेक्षकाना हळहळायला लावूनच ! ऑसीजकडून शिकण्यासारखं - जीव ओतून संघातला प्रत्येक जण, प्रत्येक क्षण जिंकण्यासाठी खेळतो !! जॉनसन, मानलं !

तरी मी बोल्लेलो काल, हे ऑस्ट्रेलियाचे शेपूट वळवळणार.. त्यांच्या देशात ते वळवळतेच.. आणि आपल्या विरुद्ध तर कित्येकांचे वळवळते..

असो, जॉनसनचे शतक हुकले.. पाठोपाठ स्मिथही गेला.. आता फक्त दोन विकेट दोन चेंडू समजून घ्या रे लगेच..

<< आता फक्त दोन विकेट दोन चेंडू समजून घ्या रे लगेच.. >> दोन चेंडू ? तिसरा नविन चेंडू घ्यायची पाळी आलीय आतां ! Wink
४८०-९. स्टार्क -४४, हॅझलवूड- २२ !

<< मालिकेचा निकाल आत्ताच सांगतो.>> वैतागणं स्वाभाविक असलं तरी नका अशी घाई करूं - Unpredictability, thy name is India xI ! Sad Wink

बरोबर आहे भाऊ तुमचं. पण उसळून उठण्याची काहीही लक्षणं या गोलंदाजात दिसत नाहीत. अनेक मालिका झाल्या अशा. आहे तेच. भयानक निराशा दाटून राहिलेली आहे. Sad

<< भयानक निराशा दाटून राहिलेली आहे.>> खरंय. मला तरी डेअरींग करून दोन नियमित स्पीनर्स व दोनच मध्यमगती गोलंदाज वापरावे असंच वाटतंय आतां; त्यामुळे याहून वाईट कांहीं होणार नाही, उलट निदान चौथ्या-पांचव्या दिवशीं तरी फायदाच होईल !!

अतिशय वाईट वाटले. एखादा हट्टी लहान मुलगा काही केल्या झोपतच नाही, तसे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज काही केल्या बादच होत नव्हते. कुणाहि फलंदाजानी यावे नि चोपून काढावे एव्हढी आपली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण वाईट आहे का? जलद गोलंदाजांनी मिळून शेवटी ८ विकेट्स काढल्या, पण फलंदाज त्यांना जसे तुच्छ मानून झोडपून काढत होते, ते बघवले नाही.
भाऊंचे म्हणणे बरोबर वाटते. आपली फिरकी गोलंदाजी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे, जलद गोलंदाजी नाही, आपण आपले आपल्याला जमते ते नीट करावे.
नि कर्मफळाची आशा न ठेवता कर्तव्य करावे!!!

काय करणार? असले बघून शेवटी पुनः पुनः पटते - हा संसार म्हणजे माया आहे, काही खरे नाही.

विलो क्रिकेटवरचे ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटर भारतीय गोलंदाजी चा वारंवार उद्धार करत होते, कसे डोके न वापरता गोलंदाजी करताहेत, एव्हाना काहीतरी शिकायला पाहिजे होते त्या गोलंदाजांनी नि त्याप्रमाणे काहीतरी वेगळी गोलंदाजी करायला हवी होती वगैरे. त्यांचे म्हणणे अधून मधून एखादा चेंडू बरा टाकतात पण एकूण खराबच!

मिचेल मार्श ची विकेट - इशांत शर्माचा नॉन-बाऊन्सर मुद्दाम तसा टाकला होता की पिचवरच्या कुठल्यातरी स्पॉटवर पडून तो चेंडू बाऊन्सच झाला नाही?
:दु:खी:

इशांत शर्माचा नॉन-बाऊन्सर मुद्दाम तसा टाकला होता की पिचवरच्या कुठल्यातरी स्पॉटवर पडून तो चेंडू बाऊन्सच झाला नाही? >> पहिला असते तर नंतर पूर्ण वेळ तेच केले असते ना त्याने ? Wink

चिरंजीव उमेश यादव ह्याने भारतीय प्लॅन बद्दल लिहिलेले वाचा.
http://www.rediff.com/cricket/report/india-aus-tour-umesh-yadav-explains...
आपला प्लॅन चालत नाहि हे कळायला नेमका किती वेळ लागतो हा कुतूहलाचा मुद्दा आहे Wink

भारतीत गोलंदाज कोच आणूनही प्लॅनिंग गंडण्याचे काहि संपत नाही. पुढच्या वेळी जो काही प्लॅन ठरवला असेल त्याच्या बरोबर विरुद्ध करून बघण्याबाबत काय मत आहे ? Wink

जाता जाता : DRS ला hot spot, snickmeter वगैरे च्या limitations मुळे BCCI चा असलेला विरोध तात्पुरता मान्य करूनही, ICC ज्या उत्साहाने विकेट टेकिंग बॉल नोबॉल होता का हे चेक करते तोच उत्साह
१. पकडलेला कॅच हा बॅटला लागून गेला होता का नि कॅच क्लीन घेतला गेला होता का
२. run out clean होता का
अशा बारक्या सारक्या गोष्टी का review करायला लावत नाही अंपायर्स ना ? लोक खेळ बघायला येतात कि 'How umpires are human too?' हे बघायला येतात ?

86 ला 4. धवन retired hurt म्हणजे 5 out . धोनी आणि कंपनी कडून काही अपेक्षा नाहीत. आजच संपणार मॅच. Sad

काल बायको बहिणीकडे गेली होती व मीं मॅचसाठीं नेमका गजर लावायला विसरलो; बहुतेक उपरवाल्यालाही मला असह्य वेदनांपासून जरा दूर ठेवायचं होतं ! Sad
<< विलो क्रिकेटवरचे ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटर भारतीय गोलंदाजी चा वारंवार उद्धार करत होते,>> झक्कीसाहेब, बहुतेक समालोचनाचं काँट्रॅक्ट जपायला आमचे कॉमेंटेटर्स याबाबत साखरपेरणीच करत असावेत !

फायनली आज जरा वाटले की ऑस्ट्रेलियात खेळत आहोत..
गंमत म्हणजे कधी नव्हे ते धवन खेळला, आणि ईतर गळपटले..

इंडीअन बॅटींग इस बॅक.

अभिनंदन पहिल्या कसोटीपासुन आपली फलंदाजी कुठे तरी गायबली होती. Happy

अतिशय सुंदर फलंदाजी. गर्व वाटतो मला. खेळपट्टीवर काय उभे राहायचे असते का? एक खेळतोय ना खेळुद्या त्याला. इतरांनी मस्त बघायचे असते. कधी विराट खेळतो तर कधी मुरली तर कधी शिखर असे एक एकच खेळायचे. त्यांना साथ द्यायची भारतीय पध्दत नाही.

<< पहिल्या कसोटीपासुन आपली फलंदाजी कुठे तरी गायबली होती.>> देव करो आणि आतां आपली नेहमींची गोलंदाजी एकदां तरी गायबली जावो व ऑसीज १००च्या आंत गुंडाळले जावोत !! Wink

इशांत ने दोन विकेट काढल्या.. काहीही बोला अश्या बाऊंसी कंडीशनमध्ये तोच आपला भारी बॉलर वाटतो.. आपल्यावर लीड नसता आणि 225 चे टारगेट असते तर धमाल आली असती.. इथूनही जिंकलो तर काय धमाल येईल.. हरलो पण 5-6 विकेट त्यांच्या काढल्या तर पहिल्या इनिंगचा लीड आठवून आठवून छळणार आपल्याला..

<< इथूनही जिंकलो तर काय धमाल येईल.. >> तुमच्या तोंडात साखर पडो !!!!
[ << तर पहिल्या इनिंगचा लीड आठवून आठवून छळणार आपल्याला..>> आमच्या लहानपणीं आपल्या क्रिकेटवर प्रेम करणं म्हणजे निखळ आनंदच असायचा . जिंकण्याची अपेक्षाच नसायची, क्वचित पहिल्या इनींग्जमधे आघाडी मिळाली, मॅच ड्रॉ झाली तरीही फटाके लावावे असा आनंद; हजारे, मांकड, मर्चंट यांचीं शतकं म्हणजे तर मानाचे तुरेच !! मग कधींतरी, कुणींतरी ही जिंकण्याची नसती चटक लावली आणि हरणं जिव्हारीं लागूं लागलं !! आनंदापेक्षां टोंचण्यांचं असं छळणंच आधिक होवूं लागलंय !! Wink ]

ती आघाडी मारक ठरली. स्मिथ आणि जॉन्सनची भागिदारी आणि शेवटच्या ३ फलंदाजांनी काढलेले रन्स सामन्याचा नुर पलटवुन गेली

हरलो, अखेर ..
दुसर्‍या दिवशी अखेर मी म्हणालेलोच की ऑस्ट्रेलियाचे शेपूट वळवळण्याची शक्यता आहे, त्यांच्या देशात हा त्यांचा एक प्लस पॉईंटच असतो नेहमी आणि यामुळे त्यांना विजयाची संधी ५५-४५ दिली होती.. तेच तसेच भारताने होऊ दिले आणि त्याचाच फटका बसला.
पुढच्या वेळी खास त्यांच्यासाठी डावपेच आखायची गरज आहे..
बाकी फार फरक नाहीये दोन्ही संघात.. १२५ धावा चेस त्यांनी काही विजेत्याच्या थाटात नही केलेत, ते देखील आपली गोलंदाजी फार काही खास न होता ६ विकेट टाकल्या..

कधींतरी, कुणींतरी ही जिंकण्याची नसती चटक लावली आणि हरणं जिव्हारीं लागूं लागलं !

अगदी खरे!
त्यामुळे खालील विचार मनात येतातः
या सामन्यात आपल्याला सरावाची धावपट्टी अगदी बेक्कार दिली होती, त्यामुळे धवनचा हात मोडला, त्याचा इतका राग मनात होता खेळाडूंच्या, कसे लक्ष लागावे सामन्याच्या धावपट्टीवर खेळताना? अगदी कूल धोनीचे सुद्धा लक्ष उडाले. हीच ती ऑस्ट्रेलियाची मानसिक आघात करण्याची युक्ति.
शिवाय जॉन्सनच्या ज्या चेंडूंनी कोहली, शर्मा बाद झाले ते संशयास्पद नो बॉल होते.
असे करून काय आपल्यालाहि खेळता येईल. पण आपली संस्कृतीच फार फार उच्च पडली ना!
बरे धवनने सूड उगवला नि चांगल्या ८१ धावा काढल्या. त्याचेच समाधान.

नाहीतर पूर्वी कसे होते - मांकड, हजारे, मर्चंट, इतकेच काय, विजय मांजरेकर, उम्रिगर, बोर्डे, नाडकर्णी, अगदी नवाब ऑफ पतौडी येइस्तवर भारत परदेशात कधी जिंकेल याची स्वप्नेहि पडली नव्हती. कुणितरी एक फलंदाज ७०-८०, जमल्यास १०० धावा करेल, १५० ऑल आउट हे सवयीचे होते. एखादाच मांकड किंवा गुप्ते इनींगमधे ४ विकेट्स काढायचा. बाकीचे ४०० धावा द्यायचे, ते चालत होते. कुणितरी एकजण काय पण बेफाम खेळले, याचाच आनंद होता.
मला वाटते आता भारतीय क्रिकेट बघणे सोडून द्यावे, नाहीतरी विलो वर सतत इतर संघांचे सामने दाखवत असतात ते बघावे - फक्त क्रिकेट, कुणि का जिंकेना!

आपल्याला जॉन्सन च्या ८८ धावा महागात पडल्या बहुतेक.. अजुन १००/१५० रन्स असत्या तर निकाल कदाचित वेगळा असता..

जॉन्सन बरोबर शेवटाचे ३ लोकांनी देखील रन्स केलेत. ६ विकेट गेल्यानंतर शेवटच्या ४ जणांनी २८२ रन्स जोडलेत

<< मला वाटते आता भारतीय क्रिकेट बघणे सोडून द्यावे.... - फक्त क्रिकेट, कुणि का जिंकेना! >> झक्कीजी, कळतंय, पटतंय पण वळत नाही ना ! इथल्या राजकारण्यांचा इतका नादानपणा सहन केला व करतोयच ना; हीं तर पोरंच आणि त्यानी कधींही आनंद दिलाच नाहीं असंही नाही ना !!! Wink

पटतंय पण वळत नाही ना !
ते तर नेहेमीचेच दु:ख आहे.
नाही नाही म्हणता एक दिवस तरी मी तिसरी टेस्ट थोडा वेळ बघीनच. पण हरले तरी पहिल्या टेस्ट सारखे खेळावेत ही अपेक्षा. आशा म्हणा! आशा अमर असते. अपेक्षाभंगाचे दु:ख आयुष्यभर सोसले, आता फक्त आशा, की काही थोडे क्षण तरी मनाला आनंद देतील.

भारतीयांचे सगळे काही, लोकांचे लक्ष अध्यात्माकडे लागावे, या साठी असते. राजकारण काय, खेळ काय, भ्रष्टाचार काय, त्यातून अध्यात्माखेरीज मनाला शांति समाधान नाही हे परत परत जाणवते.

<< अध्यात्माखेरीज मनाला शांति समाधान नाही हे परत परत जाणवते >> नाही हो, झक्कीजी ! तिथंही आतां कसोटी क्रिकेट गायब झालंय आणि झटपट क्रिकेट आलंय !!! Wink Sad

भाऊ Lol

Pages