क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला निर्णय. पण केवळ कप्तान म्हणून निवृत्त होऊन नुसता विकेटकीपर-बॅट्समन म्हणून काही दिवस खेळला असता तरी चालले असते. बर्‍याच कप्तानांच्या फलंदाजीवर कप्तानपदाचा परिणाम होतो. त्यातून मोकळे झाले की मूळ खेळ पुन्हा बाहेर येतो.

येथे आणखी एक योगायोग म्हणजे २००८ च्या घरच्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे धोनीने कसोटीत कॅप्टनशिप चांगली दाखवली त्यामुळे कुंबळेने लगेच निवृत्ती घोषित केली होती - ४ टेस्टच्या सिरीज मधे तिसरी झाल्यावर. तसेच आता सहा वर्षांनी धोनीने स्वतःच केले आहे.
http://www.espncricinfo.com/india/content/story/376672.html

ज्युनिअर कप्तानच्या खाली खेळायचे दुख: धोनीला चांगलेच माहित आहे म्हणून त्याने टेस्ट खेळणेच सोडले. खूप चांगला क्रिकेटर होता. अलविदा!

व्हू नेक्स्ट आफ्टर धोनी टू रिप्लेस हिम इन टेस्ट्स?

कॅप्टन म्हणून कोहली आहे, वेळ आलीच तर पुढे मागे रहाणे, विजय हे ऑप्शन्स आहेत.
पण विकेटकिपर कोण?

काही ऑप्शन्स

वृद्धीमान सहा - वय ३० - बॅटींगच्या नावाने चांगभलं
दिनेश कार्तिक - वय २९ - किपींगची काही गॅरेंटी नाही.
पार्थिव पटेल - वय २९ - काही दिवस ट्राय करण्यास हरकत नाही.
संजू सॅमसन - वय २० - एकदम रॉ, बॅटींग चांगली. विकेटकिपींग सुधारण्यास वाव. हाताशी भरपूर वेळ.

आपलं टीम सिलेक्शन आणि कोटा सिस्टीम पाहता सहाची वर्णी लागेल, पण पुढे सॅमसनचा विचार करणं आवश्यक!

बर्‍याच कप्तानांच्या फलंदाजीवर कप्तानपदाचा परिणाम होतो. त्यातून मोकळे झाले की मूळ खेळ पुन्हा बाहेर येतो. >> +१.

धोनी चा निर्णय थोडा उशिरा आला असे वाटते. पण एकंदर नुसत्या हार जीतीच्या पलीकडे जाऊन बघायचे तर धोनी as a captain म्हणून किती प्रभावी होता ह्याचे मूल्यमापन करणे अतिशय कठीण आहे. एकि़कडे सर्वात जास्त विजय आहेत, भारतात पहिल्यांदाच जिंकलेले ४-० आहे तर दुसर्‍या बाजूला दोन दोन ०-४ नि not so impressive overseas record आहे. धोनीचे सर्वात मह्त्वाचे contributions मला अशी वाटतात.
a) He took game as a game, We indians are borderline fanatics when it comes to cricket. we could never accept 'it is just a game'. धोनी हा पहिला कप्तान ज्याने निसते हे बोलून दाखवले नाही तर त्या प्रमाणे वागूनही दाखवले.
b) आज भारतीय संघ ज्या aggressive mode मधे असतो ते एकंदर सध्याच्या भारतीय वातावरणाशी सुसंगत आहे. धोनी never backed off from confrontation. Sure Ganguly was confrontational but players around him weren't. Their way was always to let bat (or ball) do the talk. Dhoni managed to get one step beyond that. He was staunch advocate of aggressive demeanor. One only wish for him to follow the same in last couple of years in decisions he took.

एक गोष्ट जी धोनी ला जमली नाही (कदाचित हा चुकीचा उपयोग आहे) ती म्हणजे बॉलर्स कडून inspired spell करून घेणे. द्रविड-गांगूलीच्या कारकिर्दीमधे आगरकर, इरफान, स्रिसंथ वगैरेचे जे असे काही spells दिसतात तसे धोनीकडून जमलेले आठवत नाहीत. (इशांतचा लॉर्ड्स चा एकमेव आठवतो नि it is kind of ironic that Dhoni punted on जोगिंदर शर्मा to bowl last over as a T-20 captain). पण धोनीची एकंदर मनोव्रुत्ती हि नेहमीच सामन्याचा वेग control करून मनाजोगा निकाल मिळवण्याकडे आहे. आपल्य बॉलर्सची एकंदर limited range बघता मर्यादित षटकांच्या सामन्यांमधे हे चपखल पणे बसते पण टेस्ट्स मधे नीट्से चालणे अशक्य आहे जिथे session by session खेळणे जरुरी आहे.

anyways, वर लिहिलेल्या "game as a game" ही व्रुत्ती भारतीय फॅन्स समोर ठेवण्याबद्दल धोनीचे शतशः आभार. I think it will be apt to quote Dhoni about comparing the two whitewashes in 2011 and 2011-12: you die, you die; you don't see which is a better way to die.

२००८ च्या घरच्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे धोनीने कसोटीत कॅप्टनशिप चांगली दाखवली त्यामुळे कुंबळेने लगेच निवृत्ती घोषित केली होती - ४ टेस्टच्या सिरीज मधे तिसरी झाल्यावर. तसेच आता सहा वर्षांनी धोनीने स्वतःच केले आहे. >>> अगदी पहिला हाच विचार आला बातमी वाचल्यावर.
कूलहेडेड होता मैदानावर आणि निवृत्ती जाहिर करताना तसाच कूलहेडेड वागला …. सलाम आणि विल बी मिस्ड फॉर शूवर !

पण विकेटकिपर कोण? >> I am staunch believer of the tactic that for a wicket keeper, keeping sklls are foremost important factor. batting ability is bonus. (otherwise you end up with Kamran akamal :D). त्यामूळे माझे मत साहाला. कमीत कमी टेस्ट्स मधे साहा असावा. त्याच्या वयानुरुप अजून ३-४ वर्षे तो सहज किपिंग करू शकतो. ODI नि t-20 मधे नमन ओझा, सॅमसंग वापरून पुढचा अंदाज घेता येईल.

धोनी चा निर्णय थोडा उशिरा आला असे वाटते. >>> अनुमोदन ! आधीच सोडायला हवं होतं असं वाटलं. अर्थात वगळेपर्यंत ताणलं नाही हे बरं केलं.

असामी>> +१

साहा टेस्ट मध्ये चांगला असेल असे वाटते. मूळ उद्देश किपिंग हाच असावा.

मला वाटते धोनी अजून एक दिवसिय मध्ये खेळेल त्यामुळे त्या चर्चेची आता वेळ नाही.

तो लोकेश राहुल पण यष्टीरक्षकच आहे ना.. आणि तो चांगला फलंदाज पण आहे. त्याने तसे काही दीवे लावले नाहीत तीसर्‍या कसोटीत पण तो पण ऑप्शन आहे... आणि थोडा वेळ मिळाला तर सुधारेल..

बायदवे, हा धोनी खरेच निवृत्त झाला आहे ना...
नाहीतर पुन्हा भारतात जाऊन विश्वचषकानंतर पुन्हा गणिते समीकरणे बदलायची आणि हा कंटीन्यू व्हायचा..

बाकी व्हॉट्सपवर जोक्स फिरायला लागलेत, त्यापैकी एक म्हणजे, अशी खबर आलीय की धोनीच्या निवृत्तीची बातमी येताच अश्विन, रैना आणि जडेजा नौकरी डॉट कॉम वर JoB Ruseme बनवताना पकडले गेलेयत.. Wink

otherwise you end up with Kamran akamal
>>>
Rofl Rofl Rofl

त्याच्यापेक्षा अंबाटी रायडूपण चालेल Happy

मी पाहतोय न्यूझीलंड - श्रीलंका.

आता लंका १५३/५ आहेत.

आणखीन एक बातमी -

मिचेल जॉन्सन सिडनी टेस्टमधून बाहेर!

बहुतेक युवराज सींग वीश्वचषकाच्या संघात.. रवीन्द्र जडेजा जायबंदी..

हो संगाकाराच्या १२००० धावा पुर्ण झाल्या काल.. जवळपास ५८-५९ च्या सरासरीने .. काल त्या धोनीच्या धाग्यावर टाकलेले मी हे..
आणि आज तर त्याने डबल सेंच्युरी ठोकली.. ७८-५ या स्थितीतून ३५६ ला एकहाती घेऊन गेला.. ग्रेट प्लेअर !
पण त्याच्यानंतर कठीण आहे लंकेचे.. त्यांची नवी पिढी फार दमदार दिसत नाहीये..

कोकण्या, जडेजा-युवीची न्यूज कुठेय? युवराज तर संभाव्य ३० मध्येही नाही ना.. आणि जडेजा ट्राय सिरीस मधून बाहेर गेला असेल विश्वचषक त्याच्या नंतर.. इथला परफॉर्मन्स बघूनच समजेल कोण किती पाण्यात आहे..

बाकी युवराज आला जडेजा गेला असा काही चमत्कार घडला तर मला आनंदच होईल.

युवराजने नुकतेच रणजीत लागोपाठ ३ शतके ठोकली आहेत, त्याला तर ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेसाठीच उचलायला हवे. तो जेव्हा भरात असतो तेव्हा त्याच्यासारखा स्ट्रोक प्लेअर नाही जगात. मजा येईल जर त्याच्यासारखा मॆचविनर जर या विश्वचषकात चमकला तर..

ऑसीज अझरला का घाबरत असत याचा शोध फायनली लागलेला आहे. जो घरच्या मैदानावर बाउन्सर्स इतके चांगले हॅण्डल करेल तो बाहेर काय करेल?
https://www.youtube.com/watch?v=CrXTkg94jPI&t=4m13s

Happy

केवळ कप्तान म्हणून निवृत्त होऊन नुसता विकेटकीपर-बॅट्समन म्हणून काही दिवस खेळला असता तरी चालले असते. बर्‍याच कप्तानांच्या फलंदाजीवर कप्तानपदाचा परिणाम होतो. त्यातून मोकळे झाले की मूळ खेळ पुन्हा बाहेर येतो.

>> असेही चालू शकले असते. Happy

मनीष, हो ते आहेच. फिक्सिंगपूर्व अझर आपलाही फेवरिट होता. फिक्सिंग मुळे सगळी वाट लावली त्याने. नाहीतर त्याच्या आर्टिस्ट्रीला तोड नव्हती. त्याला बघावा तो १९९० ला लॉर्ड्स वर, १९९२ मधे अ‍ॅडलेड वर, १९९६ मधे कानपूर ला द आफ्रिके विरूद्ध, किंवा त्याच सिरीज मधे कलकत्त्याला (ते पाच सलग फोर), १९९७ ला आफ्रिके मधे, १९९८ मधे कलकत्त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्ध, नाहीतर या वरच्या मॅच मधे, ते ही कलकत्त्याला.

लक्ष्मण च्या आधी इडन गार्डन्स वर मालकी अझरचीच होती.

विश्वचषकाचा संघ निवडला गेला.

युवराजला डच्चू मिळाला. Sad

धोनीचा लाडका रवींद्र जडेजाला दुखापतग्रस्त असून सध्यातरी निवडण्यात आलाय.

अक्षर पटेलला फार मोठी संधी मिळाली आहे, चांगली निवड. तो आपले ट्रंपकार्डही ठरू शकतो.

बिन्नीला तर लॉटरी लागलीय, पण कित्येकांवर हा अन्याय आहे. आतापावेतो त्याने कुठेच काहीही झंडे गाढले नसूनही वर्ल्डकपसारख्या स्पर्धेला नेताहेत त्याला.

रायडू पण एकाअर्थी लकीच ठरलाय, त्याचीही संघातली जागा फिक्स नाहीयेच, मात्र ऐन वर्ल्डकपच्या आधीच्या सीजनमध्ये त्याला संधी मिळाली आणि त्यात फारसा चमकला नसला तरी फ्लॉप नाही झाला यावरच पुढे रेटून नेताहेत.

तरीही बिन्नी, रायडूच्या जागी युवी असता तर मजा आली असती.. जडेजा दुखापतग्रस्तच राहून त्याजागी आला तरी चालेल.. नाहीतर माझा शाप लागेल !!!!!

All-India Senior Selection Committee
Sandeep Patil (West/Chairman), Rajinder Singh Hans (Central), Roger Binny (South), Vikram Rathour (North), Syed Saba Karim (East), Sanjay Patel (convenor).

Pages