Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यावरचे प्रतिसाद
आधीच्या धाग्यावरचे प्रतिसाद -
-----------------------------------------------------------------------------
मनीष | 13 December, 2014 - 09:10
मस्त पोस्ट केदार आणि भाऊ...
ऋन्मेऽऽष | 13 December, 2014 - 15:28
मी शंका लक्ष्मणच्या एकदिवसीय खेळावर व्यक्त केल्यावर त्याच्या कसोटीतील महानतेचे दाखले प्रत्युत्तर म्हणून देण्यात काही अर्थ नाही. कसोटीत क्लास असेल तेच टिकतात, त्यामुळे जो दिर्घकाळ भारतासारख्या संघात टिकला नव्हे फॅब फोर म्हणून ओळखला गेला त्याच्याबद्दल वेगळे असे बोलायलाच् नको. किंबहुना वर मी माझ्या पोस्टमध्ये आजच्या परिस्थितीत शेवटी लक्ष्मणच हवा होता असेच म्हटलेय.. कोणी शेन वार्नने स्तुती केली किंवा अमुकतमुक कॉमेंटेटर काय म्हणाला यातून मी माझे मत बनवत नाही..
बाकी एकदिवसीय मध्ये तो तितका माहीर नव्हता, त्याची संघात जागा बनत नव्हती, हे सत्य आहे आणि राहणारच.. त्याला पुरेशी संधीही देउन आजमाऊन झालेय, पुजारासारखे फारशी संधीच न् देता कसोटी खेळाडूचा शिक्का मारलाय् असेही नाही.. 20-20 च्या फॉर्मेटमध्ये तर मर्यादित षटकांतील त्याचे लॅक ऑफ स्किल आणखी उघड पडले..
एकेकाळी मोहम्मद कैफ सारखे सुमार दर्जाचे प्लेअर आपण एकदिवसीय संघात खेळवत असल्याने त्यापेक्षा लक्ष्मनच्या क्लासचे कसोटी प्लेअर खेळवा वगैरे वाटू शकते, अध्येमध्ये मलाही वाटलेले, पण ते वाटणे तात्कालिक होते.. आजच्या तारखेला जिथे सेहवाग आणि युवराजसारख्यांना सहज बाहेरचा रस्ता दाखवला जातो तिथे रैना, रहाणे, शर्मा पैकी कोणी फ्लॉप गेल्यास त्याला बसवून पुजाराला चान्स द्या असा कोणी विचारही करत नाही.. लक्ष्मण आजच्या काळात असता तर एवढेही एकदिवसीय सामने खेळला नसता.. कटू वाटले तरी सत्य हेच आहे !
अवांतर - इथे कुठेही दिग्गजावर टिका करायचा हेतू नाही. पण जे आहे ते आहे. जसे बेवन हा एकदिवसीय मधील दिग्गज होता पण तेच कसोटीमध्ये मार खायचा तर उगाच त्या बाबतीतही त्याच्या आदराप्रीत्यर्थ गोडवे गाण्यात अर्थ नाही.. बरेचदा कसोटी खेळाडूंना आदर देण्यासाठी कॉमेंटेटेर एक वाक्य वापरत असतात की जो कसोटी चांगला खेळू शकतो तो कोणत्याही फॉर्मेटमध्ये चांगला खेळू शकतो, जे धादांत खोटे आहे..
फारएण्ड | 13 December, 2014 - 16:06
WHOA! आता कैफ सुमार? हॉलीवूड मधल्या चित्रपटांत नेहमी म्हणतात तसे This just keeps getting better and better स्मित
बाय द वे - लक्ष्मण बद्दल मी जी पोस्ट लिहीली आहे वरती ती वाचली का? त्यात कोठेही कसोटीबद्दल लिहीलेले नाही.
(केदार, भाऊ, असामी - तुमच्या पोस्ट आवडल्या हे वेगळे सांगायला नको स्मित )
पराग | 13 December, 2014 - 16:19
फा... अगदी !!
कैफ, सुमार आणि वन डे हे शब्द एकत्र वाचून फार आश्चर्य वाटलं...
ऋन्मेष, नाटवेस्टची फायनला पाहिली होती का किंवा आठवते आहे का? स्मित
केदार, भाऊ, पोस्ट आवडल्या..
काल मॅच हरलो पण खूप वाईट वाटलं नाही.. ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिकेच्या मॅचेस होतात तशी मॅच आपली झाली हे पाहून भारी वाटलं !
ऋन्मेऽऽष | 13 December, 2014 - 16:20
कैफ सुमार नव्हता का? सोबतीला तो एक रॉबिन सिंग.. हे वशिल्याचे टट्टू नव्हते पण नशीबाचे नक्की होते.. अन्यथा विनोद कांबळी सारखे टॅलेंट सडलेले या खेळाने बघितले आहे..
फारएण्ड, नक्कीच तुझ्या पोस्टमध्ये एकदिवसीयचा उल्लेख होता पण मोबाईलवर असल्याने आणि आधीची पोस्ट मोठी झाल्याने आणि ईथे भारतात तीन वाजत आल्याने जास्त लिहायचे टाळले.. क्षमस्व.. पण तरीही त्यात काहीही विशेष असा उल्लेख नाही.. आता गूगाळत बसत नाही मी पण त्याची असतील 5-6 शतके, आणि असेल 30-35 च्या दरम्यान एवरेज आणि ठिकठाक स्ट्राईकरेट.. ओवरऑल एवरेज रेकॉर्ड.. पण खेळताना पाहिलेय त्याला, कधीच त्यात ते पोटेंशिअल जाणवलेच नाही.. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत चमकल्यावर फॉर्म बघून एकदिवसीय मध्ये घेतला, जे बहुधा आधी नव्हता माझ्या आठवणीप्रमाणे आणि मग खेळत त्याने एक शतकही झळकावले.. पण तेव्हाही त्या फॉर्मच्या आत्मविश्वासावरची ती खेळी होती.. एकदिवसीयमधील टॅलेंट असे नाही कधी जाणवले.. असते तर नक्की त्याची कारकिर्द बहरलीच असती.. त्याचा कोणीही गेम केला नाहीये.. वा फिल्डींग सुमार असणे हे ही कारण नाहीये..
ऋन्मेऽऽष | 13 December, 2014 - 16:24
पराग,
आठवतेय ना ती फायनल, एकदाच खेळलेला तो ते कसे विसरणार.. नशीबाने लागलेला त्याचा हाच मोठा तुक्का होता.. ज्यावर त्याची कारकिर्द घडली.. आणि हो, वासरात. लंगडी गाय शहाणी तसे तेव्हा फिल्डींगचे कौतुक व्हायहे हि आणखी जमेची बाजू..
असो, तुर्तास शुभरात्री.. स्मित
असामी | 13 December, 2014 - 19:02
अमोल, पराग एखाद्याने "कोणी शेन वार्नने स्तुती केली किंवा अमुकतमुक कॉमेंटेटर काय म्हणाला यातून मी माझे मत बनवत नाही.. " असे म्हटल्यावर त्यापुढे बोलण्यात काय अर्थ आहे ?
झक्की | 13 December, 2014 - 18:57
लायन ने चांगली गोलंदाजी केली पण भारतीय फलंदाज फिरकीच्या पुढे चाचपडत आहेत हे दुखद दृष्य होते. एक वेळ जॉन्सन ने विकेट्स घेतल्या तर काहीच वाटले नसते. पण लायन काय शेनवॉर्न नाही आहे.
पण त्याची गोलंदाजी भेदक होती यात संशय नाही. शेन वार्नच असायला पाहिजे असे काही नाही त्याच्यासारख्या विकेट्स काढल्या, फलंदाजांना अडचणीत आणले की झाले. रोहित शर्मा नि रहाणे यांच्या बाबतीत निराशा झाली. चूक कुणाचीहि असो, जे झाले त्याने फारच निराशा माझी व अनेकांची झाली असेल.
साहा अननुभवी आहे हे दिसून पडले. त्याला अजून टेस्ट खेळण्याची संधि मिळाली तर कदाचित दुसरा धोनी तयार होऊ शकेल. कोहली बाद झाल्यावर रडू आले नाही असे कितीसे भारतीय क्रिकेटचे प्रेमी असतील?
पण कोहली. विजय, साहा यांना सलाम, तडफदार खेळले. आता धावा जरा कमी पडल्या, पण एरवी जसे बचावात्मकखेळून , किंवा आधीच हरल्यासारखे खेळले नाहीत. या संघाची भीति ऑस्ट्रेलियाला बाळगावीच लागेल. निदान फलंदाजांची तरी. गोलंदाजांना मात्र कस्पटासारखे मानून खेळले ऑस्ट्रेलियन्स.
गोलंदाजीचे तेव्हढे बघा. भाऊ, असामी, केदार, दि.दे. तुम्ही जरा पत्रे लिहून आपल्या गोलंदाजांना शिकवा.
आपण एक तरी सामना जिंकणार असे वाटू लागले आहे.
असामी | 13 December, 2014 - 19:07
झक्की अहो आम्हाला असे शिकवता येत असते तर आम्ही इथे नि ते तिथे कशाला असते ? डोळा मारा
आत्ता कोहलीच्या इनिंगची नशा उतरली तेंव्हा हे जाणवतेय कि तिसरा हायेस्ट स्कोर २१ होता. कोहली कितीही म्हणाला कि "I'm really proud of the way the boys played," तरी barring him and Vijay, rest batted in pretty pathetic manner in second inning.
भास्कराचार्य | 13 December, 2014 - 19:23
< या संघाची भीति ऑस्ट्रेलियाला बाळगावीच लागेल> ऑस्ट्रेलियाने दोनदा डाव घोषित केला हे विसरू नका. आपल्या सर्व गोलंदाजांनी मिळून सामन्यात १२ विकेट्स काढल्या आणि एकट्या लायनने १२ काढल्या. २० विकेट काढता येत नाहीत त्या संघाची भीती कुणीही बाळगेल असे वाटत नाही. २०१० मध्ये बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेत सेहवाग कप्तान होता, त्यानेही मालिकेच्या सुरवातीला अशा अर्थाचे विधान केले होते. बांगलादेशी पत्रकारांनी आणि चाहत्यांनी गदारोळ केला होता, परंतु शेवटी सेहवाग बरोबर ठरला (बांगलादेशी गोलंदाज २० विकेट्स काढू शकले नाहीत, आणि आपण २-० जिंकलो) हेही खरे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे कौतुक हे, की दिवसभर ते जवळपास एकाच तीव्रतेने मारा करत होते. चहापानाच्या आधी एकाग्रता थोडी भंगल्यासारखी वाटली, पण त्यांनी चहापानानंतर ती कसर भरून काढली. फलंदाजीमध्ये कोहली किंवा इतर एक-दोन जणांकडून अशा जोरदार खेळाची अपेक्षा करता येईल, परंतु गोलंदाजांकडून तितका जोरदार प्रयत्न होईपर्यंत we'll be mostly chasing the game, not controlling it. तसेच नजीकच्या इतिहासात, आपण पहिल्या १-२ सामन्यांमध्ये खूप जोरात खेळलो (द. आफ्रिका, इंग्लंड) आणि पुढच्या मालिकेत पार ढेपाळलो, हे झालेले आहे.
भास्कराचार्य | 13 December, 2014 - 19:41
आणि पुढच्या तिन्ही सामन्यांची ठिकाणे ऑस्ट्रेलियन खेळाला जास्त सूट करतात हेही ...
भाऊ नमसकर | 13 December, 2014 - 22:00
कालच्या कसोटीबद्दल मनात आलं तें लिहीतों; विचारपूर्वक काढलेले निष्कर्ष नव्हेत व त्यामुळें चूकीचे असण्याचीच शक्यता जास्त -
१] अॅडेलेडची खेळपट्टी मुख्यतः फलंदाजीलाच पोषक होती व केवळ गोलंदाजांनी केलेल्या 'रफ'मुळेच लायान हातभर चेंडू वळवून इतका प्रभावी व 'अनप्लेयेबल' ठरला असावा. कदाचित अश्विन संघात असता तर तोही बराच परिणामकारक ठरला असता; [ आपल्या फलंदाजानी लायानच्या उजव्या यष्टीबाहेरच्या वळणार्या चेंडूंवर मारलेले 'स्वीप शॉट'स तर अप्रतिमच होते !]
२] स्मिथ ऑफ-स्टंप क्रीझच्या इतक्या बाहेरून उजव्या फलंदाजांच्या लेग-स्टंपवर लेग-स्पीन कां बरं टाकत होता ?
२] <<ऑस्ट्रेलियाने दोनदा डाव घोषित केला हे विसरू नका.>> मला वाटतं फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर टॉस जिंकून पहिल्या डांवात चांगली धांवसंख्या उभी केली कीं डाव दोनदां घोषित करणं हें विरुद्ध संघासाठी खास लांच्छनास्पद समजण्याचं कारण नसावं; [किंबहुना, भारताने 'फॉलो-ऑन' सहज टाळला ,म्हणून दोनदां डाव घोषित करावा लागला, हें महत्वाचं.] भारताची गोलंदाजी हा कच्चा दुवा आहे , हें मात्र निर्विवाद . पण ऑसीजचा वेगवान मारा आपल्यापेक्षां बराच सरस व भेदक असूनही, २० पैकीं १२ बळी फिरकीला मिळतात, यावरून आपल्या तथाकथित वेगवान गोलंदाजाना अॅडेलेडच्या खेळपट्टीवर न मिळालेलं यश फारच निराशाजनक किंवा हताश होण्यासारखं मानण्याचं निदान आत्तांच तरी कारण नसावं; [ झक्कीजी, पुढची कसोटी होईपर्यंत गोलंदाजांसाठीं तुम्ही पत्राचा एक झणझणीत मसुदा तयार करूनच ठेवा; गोलंदाजीत तोंवर कांहीं सुधारणा नाही दिसली, तर सगळेच त्यावर सही करून देवूं पाठवून : डोमा:]
३] << तुम्ही जरा पत्रे लिहून आपल्या गोलंदाजांना शिकवा.>> गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट आहेत पण आहे तें कसबही पूर्ण ताकदीने न वापरणे अक्षम्य; व त्याहूनही अक्षम्य
आहे, गोलंदाजी झाली कीं आपली सामन्यातील जबाबदारीच संपली समजणं. काल कोहलीचा झेल पकडल्यावर तीन विकेटस शिल्लक असूनही ऑसीज फक्त विजय मिळाला म्हणून तंबूत परत जायचं शिल्लक होतं ! 'शेपूट' इतकं गॄहीत धरण्याइतपत निर्जीव असणं, कोणत्याही संघासाठीं मोठ्ठाच 'मायनस पाँईंट' !! [झक्कीजी, यावर एक परिच्छेद त्या गोलंदाजांसाठीच्या पत्रांत जरूर टाका, अगदीं सढळ हाताने तिखट टाकून !];
४] काल साहाने सुंदर फटकेबाजी सुरूं केल्यावर कोहलीने जावून त्याला फटकेबाजीचा अतिरेक होण्यापासून रोखणं अत्यावश्यक होतं; अप्रतिम खेळाइतकीच अशी दक्षता हरणं व जिंकणं यामधें निर्णायक ठरते, याचं भान खेळाडू व कर्णधार म्हणून 'अंडर १९'पासून आंतराष्ट्रीय सामने खेळणार्या कोहलीकडून अपेक्षित होतं.
भास्कराचार्य | 13 December, 2014 - 22:33
भाऊ, दोनदा डाव घोषित करणे हे त्यांच्यासाठी लांच्छनास्पद म्हणून म्हणत नाही. उलट त्यांच्यासाठी ती गौरवाची गोष्ट आहे. त्यांच्या गोलंदाजांनी त्यांच्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत एका दिवसात दहा बळी मिळवले, कोहलीच्या खेळीसारख्या मास्टरपिस समोर.
माझा रोख आहे तो आपल्या terms dictate करायच्या incapability वर. त्यांनी त्या केल्या. त्यांना सुरक्षित वाटेल अशा धावसंख्येवर त्यांनी दुसरा डाव घोषित केला. त्यांना जर ती तशी वाटली नसती, तर त्यांनी तो नसता केला. त्यांनी ८० षटकांत ४०० चे आव्हान ठेवले असते, तर सामना जिंकण्याचा विचार कुणी केला असता का? त्यांच्या डाव घोषित करण्यामुळे अप्रत्यक्षपणे ही संधी आपल्याला मिळाली.
बाकी डाव घोषित करण्याचा पर्याय त्यांच्याकडे होता, कारण आपली निष्प्रभ ठरणारी गोलंदाजी. आपण जर त्यांना २०० च्या आत बाद केले असते, तर त्यांना कठीण होती मॅच. २००३ ची अॅडलेड टेस्ट आपण अशीच जिंकलो होतो. पण परवा आपली गोलंदाजी बघून कोणी विकेट घेईल असेच कधी वाटले नाही. त्यांच्याकडे पहिल्या डावातली आघाडी होती. तीसुद्धा त्यांना आपली वाईट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ह्यामुळे मिळाली. ही अशा प्रकारची लक्झरी परदेशात गेलेल्या भारतीय संघाकडे फार कमी वेळा असते, आणि जेव्हा जेव्हा ती मिळाली, तेव्हा आपण बर्याच वेळेला त्याचे सोने केलेले आहे. स्मित
भास्कराचार्य | 13 December, 2014 - 22:36
गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट आहेत पण आहे तें कसबही पूर्ण ताकदीने न वापरणे अक्षम्य; व त्याहूनही अक्षम्य
आहे, गोलंदाजी झाली कीं आपली सामन्यातील जबाबदारीच संपली समजणं. > +१
हिम्सकूल | 13 December, 2014 - 22:37
भाऊ शेवटचा मुद्दा तर अगदी अगदी... साहानी तो बॉल शांतपणे खेळून काढला असता तर मॅच नक्कीच वेगळ्या दिशेने गेली असती.... तो फटका अगदीच अपरिपक्व होता... थोडा थांबला असता तर... पण शेवटी हे सगळं आत्त्याबाईला मिश्या असत्या तर च्या धर्ती वरच चालणार.. मॅच हारली आहेच..
पुढच्या मॅच मध्ये धोनी खेळणार असेल तर साहाची वर्णी लागणे मुश्किल.. आणि धोनी आला की पर्यायाने जडेजा आणि अश्विन पण येणार.. म्हणजे कर्ण आणि अजून कोणी तरी बाहेर बसणार...
ह्या मॅच मध्य कुठेतरी एक बॉलर नक्कीच कमी पडला.. स्पिन मध्ये ऑप्शन्सच नव्हते आणि फास्ट बॉलर्सची वाट लागली होती.. इशांत सोडल्यास बाकी दोघांना धू धू धुतलाय.. पुढच्या मॅच मध्ये कोण खेळणार तेच बघायचे.. त्यात भुवी बहुतेक परत येणार आणि धवल कुलकर्णी जाणार अशी बातमी आहे..
भाऊ नमसकर | 13 December, 2014 - 23:39
भास्कराचार्यजी, कसोटीच्या पांचव्या दिवशीं सकाळीं माझी इथं पहिली पोस्ट होती- << ऑसीजचं अभिनंदन, 'स्पोर्टींग डिक्लेरेशन' साठीं ! >> ! इथं आपलं एकमत आहेच. आपल्या गोलंदाजीविषयींच्या तुमच्या मताशींसुद्धां मीं असहमत असण्याचा प्रश्नच नाहीं. पण ती या संघाची कमजोर बाजू आहे हें स्विकारण्याशिवाय गत्यंतर नसल्यानेच केवळ फलंदाजीला पोषक असलेल्या अॅडॅलेडच्या खेळपट्टीवरील कामगिरीवरून अगदींच हताश होण्याचं कारण नसावं, इतकाच आशावाद मीं व्यक्त केला आहे.
दिवाकर देशमुख | 13 December, 2014 - 23:47
भाऊ नविन धागा तुम्हीच काढा
भाऊ नमसकर | 14 December, 2014 - 01:01
<< भाऊ नविन धागा तुम्हीच काढा >> इथं सरळ चेंडू खेळताना माझी त्रेधातिरपीट उडतेय; कां मारताय असे गुगली मलाच ! डोळा मारा
पण नविन धागा कुणीही काढला तरीही तो जिंकण्याचा मुहूर्त साधूनच काढावा; फार वेळ नाही थांबावं लागणार त्यासाठी, खात्री आहे माझी !
क्लार्कच्या कारकिर्दीपुढेच आतां दुखापतींमुळें मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय ! अरेरे
दिवाकर देशमुख | 14 December, 2014 - 01:04
काढा तुम्ही .
प्रत्येक क्रिकेटप्रेमीला मान मिळायला हवे. मास्तुरेंनी काढला आता तुम्ही काढा नंतर अजुन कोणी. स्मित
ऋन्मेऽऽष | 14 December, 2014 - 03:45
एखाद्याने "कोणी शेन वार्नने स्तुती केली किंवा अमुकतमुक कॉमेंटेटर काय म्हणाला यातून मी माझे मत बनवत नाही.. " असे म्हटल्यावर त्यापुढे बोलण्यात काय अर्थ आहे ?
>>>>
येस्स, मला हे वाक्य लिहितानाच असे वाटलेले की हे समोरच्याला उपरोधाने मारलेला टोमणाटाईप वाटू शकेल, म्हणून डिलीटायच्या विचारातही होतो.. पण असो, तसे वाटले असल्यास क्षमस्व! मुद्दा हा की कॉमेंटेटर बोलतात म्हणून खेळाडू मोठा की छोटा हे ठरत नाही तर तो तसा असतो म्हणून कॉमेंटेटर तसे बोलतात, मात्र याच बरोबर त्यांचे काम बोलायचे असते, त्याचाच पगार त्यांना मिळतो. आपला सिद्धू सुद्धा बरेच काही बोलत असतो म्हणून त्याचे रीफरन्स परदेशातील क्रिकेटप्रेमी चर्चेत द्यायला लागले तर विचारायला नको. खुद्द आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया वगैरेंनीही लक्ष्मणला आपल्या एकदिवसीय संघात स्थान दिले असते का तर याचे उत्तर नाहीच असते. शेन वार्नचे बोलाल तर त्याचे ते मत कसोटीतल्या लक्ष्मणबद्दल होते. एकदिवसीयमधील लक्ष्मनबद्दल नाही. हाच शेन वोर्न तेव्हा म्हणालेला की सचिन मला स्वप्नात दिसतो आणि हल्लीच त्याने आपल्या विधानाशी पलटी खात मी असे काही म्हणालोच नव्हतो तर प्रसारमाध्यमांनी हे पसरवले असे विधान केले. तर त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मणबद्दल जे बोल्ला त्याचेही पुन्हा कन्फर्मेशन घ्यावे लागेल मग.
इम्प्रोव्हायझेशन हा मी शब्द वापरला तो फक्त मोठ्या फटक्यांनाच लागू होत नाही तर येणारा प्रत्येक चेंडू मोकळ्या जागेत ढकलत स्कोअरबोर्ड कसा हलता ठेवायचा यासाठी एकदिवसीयमध्ये इम्प्रोवायझेशन लागते, जे लक्ष्मणला नाही जमत.
ऋन्मेऽऽष | 14 December, 2014 - 03:47
ऑस्ट्रेलियाने दोनदा डाव घोषित केला हे विसरू नका. आपल्या सर्व गोलंदाजांनी मिळून सामन्यात १२ विकेट्स काढल्या आणि एकट्या लायनने १२ काढल्या. २० विकेट काढता येत नाहीत त्या संघाची भीती कुणीही बाळगेल असे वाटत नाही.
>>>>>>>>
सहमत आहे. हा विचार माझ्याही मनात डोकावतोच अश्या सामन्यांच्यावेळी. जो संघ डिक्लेअर करून स्वताच्या विजयाची संधी साधायला तो समोरच्यालाही संधी देतो, तर त्याच्यापेक्षा समोरच्या संघाला कसे सरस ठरवावे. जर पावसाने काही षटके फुकट गेली नसती वा सामना सहा दिवसांचा असता तर हेच टार्गेट आणखी दोनशे धावांचे नसते..
पण एक वेळ अशीही होती की विजयने शतकाचे टेंशन घेतले नसते आणि चाचपडून बाद झाला नसता तर कदाचित आपण ८ विकेटनेही जिंकलो असतो.. ऑस्ट्रेलियाने तो काळ अनुभवला असल्याने ते धसका घेणारच.. अर्थात हे क्रिकेट आहे, याचा परीणाम असाही होईल की आता ते आपल्या जास्त ढिल देणार नाहीत आणि कदाचित पुढचे सामने दणकून हरू.. एण्ड ऒफ द डे कोण याला कसे घेतो आणि कसे परफॉर्म करतो हेच मॆटर करते..
भाऊ नमसकर | 14 December, 2014 - 09:21
<< जो संघ डिक्लेअर करून स्वताच्या विजयाची संधी साधायला तो समोरच्यालाही संधी देतो, तर त्याच्यापेक्षा समोरच्या संघाला कसे सरस ठरवावे. >> मला वाटतं या कसोटीवरच्या चर्चेत कुणीही भारताचा संघ ऑसीजपेक्षां सरस होता असा दावा केलेला नाही. पण 'ऑसीजनी दोनदां डाव घोषित केला' केवळ यामुळेच भारत जणूं अगदींच कमकुवत ठरतो असं मानण्याची अजिबात गरज नाही, एवढाच मुद्दा निदान मीं तरी मांडलाय.माझीं कारणं - १] टॉस जिंकल्याने चांगल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करायची संधी ऑसीजना मिळाली व त्यानी त्याचा लाभही उठवला. पण ५१७- ७ या स्कोअरवर डाव घोषित न करतां तिसर्या दिवशीही फलंदाजी करून अशी काय मोठी भर ते यांत घालणार होते कीं त्यामुळें पुन्हा त्याना दुसर्या डावांत फलंदाजीला उतरावंच लागलं नसतं ? उलट, जिंकण्यासाठी अधिक वेळेची तरतूद म्हणून डाव घोषित करण्याला त्याना पर्यायच नव्हता; २] दुसर्या डांवातल्या 'स्पोर्टींग डिक्लेरेशन'चं श्रेय त्याना देतानाही 'रफ पॅचेस'वर लायानचे भयानक वळणारे व 'अन इव्हन बाऊंन्स' असलेले चेंडू हे त्या निर्णयामागचा मुख्य आधार होता, हें तर ऑसीजही मान्य करतील. त्यामुळें सरस संघ म्हणून ऑसीज जिंकले, यांत वाद नसला तरी ' दोनदां डाव घोषित केला' म्हणून त्या विजयांत अधिक तुरे खोंवले जात नाहीत कीं त्यामुळें भारताच्या पराजयाला मोठा कलंकही लागत नाहीं; त्या त्या परिस्थितींत हीं दोन्ही 'डिक्लेरेशन्स' ऑसीजच काय पण कोणत्याही संघाने केलीं नसतीं तरच तें हास्यास्पद ठरलं असतं, असं मला ठामपणे वाटतं.
ऋन्मेऽऽष | 14 December, 2014 - 11:30
भाऊ ते या कसोटीबद्दल नसून जनरल विधान होते, जरा आकडे आणखी बदलून सांगतो.
एका बलाढ्य संघाने दिड दिवस खेळून ५५० धावा फक्त ३-४ विकेटच्या मोबदल्यात मारल्या (४ च्या धावगतीने)
दुसर्या संघाला त्यांनी ३५० पर्यंत सर्वबाद करत २०० चा लीड मिळवला
दुसर्या इनिंगमध्ये चौथ्या दिवशी पुन्हा सरस फलंदाजी करत १७५ धावा वेगात (४.५ च्या धावगतीने) आणि २-३ विकेट गमावत जमवल्या.
त्यानंतर मग डिक्लेअर करत १०० ओवरमध्ये ३७५ धावा मारायचे टारगेट दिले ते ३.५ - ४ च्या धावगतीने..
हे ठरवताना त्यांनी आपन समोरच्या संघापेक्षा सरस आहोत, तर आता जिंकायला हवे, अनिर्णित म्हणजे आपलेच नुकसान याच बेसिसवर हे टारगेट दिले.
पण आता समोरच्या संघाने त्यांच्या अपेक्षेपेक्षा खेळ उंचावत ३२५-३५० धावा मारल्या आणि सर्वबाद झाले.
शेवटच्या दिवशी आपण काय बोलणार की वाह मॅच टफ झाली. थोडक्यासाठी हरले. याचाच अर्थ समोरच्या संघानेही त्याच तोडीचा खेळ केला.
पण प्रत्यक्षात काय असते तर पहिल्या संघाने जे समोरच्याची पात्रता जोखली त्यापेक्षा त्यांनी जास्त चांगला खेळ केला ईतकेच.
हेच जर उलट असते तर काय सामना असता ते बघा, त्या कमजोर संघाने प्रथम फलंदाजी करत ३५० धावा मारल्या असत्या, मग बलाढ्य संघाने ६०० धावा ठोकत २५०-३०० चा लीड दिला असता, मग कमजोर संघ सामना अनिर्णित राखायला झगडला असता वा जवळपास त्यांचा डावाने पराभव झाला असता.
परफॉर्मन्स त्याच तोडीचा मात्र चित्र कसे वेगळे दिसते बघा.
ईथेही पाचव्या दिवशी हे दोन संघ जेवढे जवळ दिसले अगदी तेवढेच जवळ नव्हते.
फारएण्ड | 14 December, 2014 - 13:27
ऋन्मेष, लक्ष्मण बद्दल बोलताना आणखी कोणाचा कचरा केला नाही याबद्दल धन्यवाद देणार होतो, पण तेवढ्यात हे पाहिले:
कैफ सुमार नव्हता का? सोबतीला तो एक रॉबिन सिंग.. हे वशिल्याचे टट्टू नव्हते पण नशीबाचे नक्की होते.. अन्यथा विनोद कांबळी सारखे टॅलेंट सडलेले या खेळाने बघितले आहे.. >>>
आता रॉबिन सिंग व कांबळी बद्दल दोन पाने लिहावी लागतील. रॉबिन सिंग नशीबाचा तट्टू? तरीही ते नंतर बघू. कारण अजून लक्ष्मणबद्दलच बोलून झाले नाही. तोपर्यंत तू आणखी चार लोकांना मोडीत काढलेस स्मित
पण खेळताना पाहिलेय त्याला, कधीच त्यात ते पोटेंशिअल जाणवलेच नाही.. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत चमकल्यावर फॉर्म बघून एकदिवसीय मध्ये घेतला, जे बहुधा आधी नव्हता माझ्या आठवणीप्रमाणे आणि मग खेळत त्याने एक शतकही झळकावले >>> हे लक्ष्मण बद्दल लिहीलेले आहेस. प्रत्येकाचे मतभेद असू शकतात आणि त्याचे अनेक डाव पाहून तू जर हे मत दिले असतेस तर त्याचा आदरही केला असता, पण लक्ष्मण बद्दल बोलताना तू जर त्याची शतके, अॅव्हरेज बद्दल लिहीत असशील तर तू पूर्ण लक्ष्मण पाहिला नाहीस असेच मला वाटेल.
असामी | 14 December, 2014 - 14:02
पण ती या संघाची कमजोर बाजू आहे हें स्विकारण्याशिवाय गत्यंतर नसल्यानेच केवळ फलंदाजीला पोषक असलेल्या अॅडॅलेडच्या खेळपट्टीवरील कामगिरीवरून अगदींच हताश होण्याचं कारण नसावं, इतकाच आशावाद मीं व्यक्त केला आहे >> भाऊ मला वाटते अगदी हताश होण्याचे कारण नसले तरी तुम्ही वर म्हटलय तसे "आहे तें कसबही पूर्ण ताकदीने न वापरणे अक्षम्य; व त्याहूनही अक्षम्य" आणि हे फक्त ह्याच सामन्याबद्दल नसून वरचेवर दिसणारा पॅटर्न आहे नि तो नजिकच्या भविष्यात बदलेल असेही चित्र पटकन दिसत नाही. आणी सगळ्यांच्या पोस्टमधून वाटणारी हतबलता त्यातून आलेली असावी.
अर्थात असेही असू शकते कि आपल्या आपेक्षा अवास्तव असतील. maybe these are not as talented bunch as we think they are (they maybe best available but certainly that does not make them best amongst world)
मुद्दा हा की कॉमेंटेटर बोलतात म्हणून खेळाडू मोठा की छोटा हे ठरत नाही तर तो तसा असतो म्हणून कॉमेंटेटर तसे बोलतात, मात्र याच बरोबर त्यांचे काम बोलायचे असते, त्याचाच पगार त्यांना मिळतो >> बघ मी असा विचार करतो. क्रिकेट हा खेळ खुब्यांचा आहे. There are mind games and tactics involved in every aspect of the game. No matter what one thinks of himself, there will always be something new unexplored way of thinking to wrap around. No one is absolutely perfect. Aussies are particularly trend setter in such aspects. शेन वॉर्न ची मुलाखत (परत एकदा तो कॉमेंटेटर नसून तेंव्हा ती मॅच खेळला होता नि ह्या सर्वांमधे त्याचा अॅक्टीव सहभाग होता म्हणून तो काय म्हणतो हे मह्त्वाचे) ऐक हे त्यासाठी सांगितले होते. वॉ नि वॉर्न ह्यांनी लक्ष्मण ला आवरण्यासाठी बरेच प्लॅन वापरले होते. using long strides he will either reach up to the pitch and negate spin or; with subtle wrist movements he will flick it in midwicket region or; he will rock back and play same ball in cover region. He kept on toying with the fielding placement and the way he improvised against anything thrown at him was simply superb. Warne who will probably go down in annals of cricket as one of the best tactician. Hence when he acknowledges Laxman, it is freaking mind blowing to read about it. ( ह्या वेळच्या क्रिकईंफो मॅगझीनमधे कलकत्त्याच्या इनिंगबद्दल लक्षमण नि द्रविडची मुलाखत आली आहे ती ही वाच नि त्यात द्रविड चा लक्ष्मण्बद्दल दिलेला भाग वाच ) Improvisation is not about just placing ball in gaps with soft hand (BTW Laxman was never bad at that as well - You can point certainly finger at his fitness level or running between the wicket though), it is about countering opponents strategy by coming up with something unanticipated.
आता राहिला एक दिवसीय सामन्यांचा मुद्दा नि लक्षम्ण त्यात फिट झाला असता कि नाही हा प्रश्न. लक्ष्मण जेंव्हा संघात आला तेंव्हाचा काळ ३००+ चा नव्हता. ते अपवादानेच होत असत. २७०-२८० हा विनिंग स्कोर धरला जाई. ५ च्या आसपास average ठेवून चेस करता येत असत. समोर सचिन असताना एक बाजू लावून धरणे हि गरज होती नि लक्ष्मण त्या रोलमधे नीट बसू शकला असता. तो aggressive रोल करू शकला नसता हे बरोबर आहे पण प्रत्येकाने ते करण्याची गरजच नसते. त्या वेळच्या स्कोर्स ना साजेसा असा strike rotate करण्याचे काम त्याला सहज जमले असते. तू रणतुंगा ला खेळताना पाहिले आहेस का ? लक्ष्मणला ते काम करणे सहज जमले होते. तो तेव्हधा हुशार नक्कीच होता. तू शारजाह च्या dessert storm च्या वेळच्या त्याच्या सचिनला साथ देणार्या खेळ्या पहिल्यास तर नं ३ वरच्या फलंदाजाचे काम तो चोख करत असे हे लक्षात येईल. There is always need for different types of players for successful teams and Laxman would have earned his place in it like Rantunga, Gurusinghe type role surrounded by more aggressive players around him . He was not athletic player but he was not slouch either. Plus in his era, barring handfuls like Jadeja, Robin Sing, Agarkar, Yuvraj, Kaif India always had slow moving team. (In fact we were still World Cup finalist without being particularly impressive athletic side) So there is no need to use that factor as a main factor against him. Things changed a lot around 2006 and of course, Laxman would not have been fit after that point in any kind of short version (and that is the reason he was failure in T-20) T-20 is different ballgame altogether and do not forget that even player of caliber of Pointing who was one of the best fielder and arguably one of best ODI batsman could not cope up with fast paced T-20 dynamics.
भाऊ नमसकर | 14 December, 2014 - 13:47
ॠन्मेष यानी दिलेल्या वरच्या उदाहरणात , बलाढ्य कोण व कमजोर संघ कोण हें आधींच ठरवून गणित मांडणंच मूळात चूकीचं वाटतं. कोण बलाढ्य व कोण कमजोर हें ठरवण्यासाठीच तर ५ दिवसांचा सामना ठेवला जातो व म्हणूनच त्याला 'कसोटी' सामना म्हणतात; नुसती फलंदाजी , गोलंदाजी नाहीं तर एकमेकांच्या ताकदीचा अचूक अंदाज घेणं यावरही संघ जिकणं/हरणं अवलंबून असतं व म्हणून बलाढ्य/कमजोर ठरण्याचाच तोही एक महत्वाचा निकष असतोच. कालच्या कसोटीत ऑसीजनी भारताची फलंदाजी मजबूत असूनही ५व्या दिवशीं लायानच्या फिरकीला १००%अनुकूल असलेल्या विकेटवर भारत ३६०चा पल्ला गांठूं शकणार नाहीं, हा अंदाज बांधला, तो खरा ठरला, ते जिंकले व त्याबद्दल ते अभिनंदनास पात्रच ठरतात. त्या कसोटीपुरते ऑसीज सरस ठरले, यापलिकडे दोन्ही संघांचं बलाढ्य/ कमजोर असं निर्णयात्मक मूल्यमापन मात्र आत्तांच करणं अनुचित.
भास्कराचार्य | 14 December, 2014 - 13:49
भाऊ, हताश होण्याचे कारण आहे असे नाही, तरी इथे काही पोस्टींमध्ये 'ऑसीज घाबरून असतील' अशा स्वरूपाची विधाने होती. तसे वाटण्याचे काही खास कारण आहे असे मला तरी वाटत नाही. स्मित तसेच आपल्या गोलंदाजीविषयी धास्ती वाटायला फक्त हा कसोटी सामना कारणीभूत नसून गेल्या वर्षभरातला आपली कामगिरी हासुद्धा एक कळीचा मुद्दा आहे.
फारएण्ड | 14 December, 2014 - 14:10
भास्कराचार्य - मी ही ते टरकून असतील लिहीले होते - पण त्याचे कारण फक्त बॅटिंग मुळे. पुढच्या वेळेस ४०० च्या खालचा चेस आपल्याला देण्याआधी ते नक्कीच विचार करतील, या अर्थाने. गोलंदाजीच्या कमकुवत पणा बद्दल सहमत आहे.
भास्कराचार्य | 14 December, 2014 - 19:24
ह्म्म्म, सहमत आहे, फारएण्ड. ब्रिस्बेनच्या बाउन्सशी पहिल्या डावात आपले फलंदाज कसे जुळवून घेतात, ह्यावर बरेच काही अवलंबून असावे असे वाटते. (आणि क्लार्कच्या गैरहजेरीत ऑसीज काय करतात ह्यावरही.) गांगुलीच्या १४४ धावांच्या खेळीने १० वर्षांपूर्वी मजा आणली होती. स्मित
मी आलो.. आणि येस्स, त्यावेळी
मी आलो.. आणि येस्स, त्यावेळी त्या कंडीशनमध्ये जेव्हा नुकतेच आपणही ऑसीज ना गुंडाळले होते आणि आपलीही पडझड सुरू झाली होती त्यात दादाची इनिंग खासच होती.. आणि दादा माझा फुल्ल् फेवरेट असला तरी त्यावेळी मला ती किंचित अनपेक्षित होती.. म्हणून जास्त मजा आलेली.. बाकी खेळला दादा सारखाच होता.. डॉमिनेटींग. ! त्यापुढच्या सामन्यात इतर चमकले, नव्हे बरसले, पण त्याच्या त्या इनिंगने मालिकेला गरजेचा असा सुरूवातीचा आत्मविश्वास मिळवून दिलेला..
नविन धाग्याला मनःपूर्वक
नविन धाग्याला मनःपूर्वक शुभेच्छा !
पूर्वींच्या चमकदार खेळींच्या, अटीतटीच्या लढतींच्या सुखद आठवणींबरोबरच या दौर्याच्याही संस्मरणीय आठवणी निर्माण होवून या नविन धाग्यावर कोरल्या जावोत, ही सदिच्छा व प्रार्थना !
आणि, हो, या नविन धाग्यावर लिहीताना पहिल्या कसोटीत शेवटच्या दिवशीं साहाने केलेली चूक माझ्या हातून इथं न घडो !
भाऊ, एक व्यंगचित्र येऊन जाऊ
भाऊ, एक व्यंगचित्र येऊन जाऊ दे की पहिल्या कसोटीबद्दल काही सुचत असेल सहज तर.
स्टीव्ह स्मिथ कॅप्टन बाकीच्या
स्टीव्ह स्मिथ कॅप्टन बाकीच्या टेस्ट्स साठी.
रच्याकने, ऋन्मेऽऽष, त्याच
रच्याकने, ऋन्मेऽऽष, त्याच मॅचमध्ये 'लक्ष्मणने' ७५ धावांची सुंदर खेळी केली होती बरं का ...
स्टीव्ह स्मिथची निवड अगदी
स्टीव्ह स्मिथची निवड अगदी योग्य वाटते. डेव्हिड वॉर्नर खूप अॅग्रेसिव्ह आहे. मैदानाच्या बाहेर सुद्धा. शेन वॉर्नला कधी कप्तानपद मिळाले नाही त्याची आठवण झाली. तसे ऑस्ट्रेलियन ह्या बाबतीत बरेच कंझर्व्हेटिव्ह वाटतात.
थोडी घाई झाली असं माझं
थोडी घाई झाली असं माझं वैयक्तीक मत.
या सिरीजला हॅडीन कॅप्टन आणि स्मिथ व्हाईसकॅप्टन असं ठेवून मग त्याला कॅप्टन करायला हवं होतं.
रच्याकने, ऋन्मेऽऽष, त्याच
रच्याकने, ऋन्मेऽऽष, त्याच मॅचमध्ये 'लक्ष्मणने' ७५ धावांची सुंदर खेळी केली होती बरं का ...
>>>>>>>
ती कसोटी होती ना.......... माझ्या माहितीप्रमाणे
आभार नवीन धागा काढल्याबद्दल
आभार नवीन धागा काढल्याबद्दल भास्कराचार्य!
बरं आता मॅच ला एक दोन दिवस असल्याने मधे काही चांगल्या कॉमेण्टेटर्स चे रिमार्क्स टाकतो.
"He is the one man you'd expect to pick a wrong 'un" - Ian Chappell
२००१ ऑस्ट्रेलिया विरूद्धची कोलकाता कसोटी. सचिन ने गुगली वर शेन वॉर्न ला काढल्यावर इयान चॅपेल ची चपखल कॉमेण्ट. लोकांना कायम गुगलीवर काढणार्या वॉर्न ला गुगली कळाला नाही
https://www.youtube.com/watch?v=8qnwkR1hohU&t=1m23s
असेच कोणाकडे असतील तर टाका. शक्यतो क्लिप शोधून.
कुमार ऋन्मेष, व्हीव्हीएस
कुमार ऋन्मेष,
व्हीव्हीएस लक्ष्मणचा वन डे स्ट्राईकरेट हा ७१ होता. वनडेत त्याला जेमतेम ८६ मॅचेस मिळाल्या, त्यातल्या ८३ इनिंग्जमध्ये त्याने ६ शतकं आणि १० अर्धशतकं काढली. त्या ६ पैकी ४ शतकं अर्थात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होती. वन डे मध्ये लक्ष्मण टाकाऊ कधीच नव्हता. दुर्दैवाने त्याची आऊटफिल्डींग फारशी प्रभावी नसल्याने स्लिपची गरज संपल्यावर त्याला लपवणं कठीण जात होतं. दुसरं म्हणजे लक्ष्मणची वन डे कारकीर्द लवकर संपुष्टात येण्याचं कारण वन डे स्पेशालिस्ट म्हणता येईल अशा युवराज सिंग, कैफ. रैना यांचा झालेला उदय. यांच्या तुलनेत लक्ष्मण मागे पडला. पण टेस्ट लेव्हलला हे सगळे लक्ष्मणच्या जवळपासही फिरकू शकत नाहीत. खरंतर गांगुलीदेखिल टेस्ट लेव्हलला लक्ष्मणपेक्षा उणाच म्हणावा लागेल.
ही दुसरी क्लिप. १९८५ ची
ही दुसरी क्लिप. १९८५ ची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील न्यू झीलंड वि. ची मॅच (ही स्पर्धा भारताने जिंकली होती). २०८ की काहीतरी चेस करत असताना व आस्किंग रेट वाढलेला असताना कपिल आला व आल्या आल्या धुलाई सुरू केली. मग साधारण ७-८० रन्स हव्या असताना जॉन रीड ने त्याचा कॅच सोडला.
"Oh no! That could be the match" - Ritchie Benaud, नेहमीप्रमाणे अचूक.
https://www.youtube.com/watch?v=M73QJVEcpZY&t=1m50
फारएण्ड, हीच मॅच जिंकल्यावरची
फारएण्ड,
हीच मॅच जिंकल्यावरची टोनी ग्रेगची कॉमेंट -
"India have won in dramatic style! The whole of Bengal are on their feet!"
आणि टोनीच्याच काही अजरामर कॉमेंट्स -
They are dancing in the aisles in Sharjah.
The little man has hit the big fella for six! He's half his size!
This little man is nearest ever to Bradman.
When its tough, the tough gets going, and it looks as if Tendulkar has set himself to get a hundred.
Straight down the ground, wonderful shot, all the way for six....What a player! what a wonderful player!!!
Kumble's playing a blinder!
Waqar Younus is being slottered!
That roof will be called Ganguly's roof!
Two thirds of the world is covered with water and the rest by Jonty Rhodes.
Going.. Going.. and Gone !!
Gurusinghe has had his porridge!!
Thats absolutely smashed! Take that Glen McGrath!
३७ वर्षीय हॅडिन ऑगस्टमध्ये
३७ वर्षीय हॅडिन ऑगस्टमध्ये होणार्या पुढच्या अॅशेस मध्ये खेळायचे असे म्हणत असला, तरी काही दुखापत वगैरे भानगड झाल्यास नवख्या माणसावर सर्व भार इतक्या महत्त्वाच्या सीरीजमध्ये नको, असे म्हणून त्यांनी थोडी आधीच स्मिथच्या हातात सूत्रे दिली असावी असा माझा कयास आहे. मला वाटते, स्मिथ ऑस्ट्रेलिया 'अ' संघाचा आणि न्यू साउथ वेल्स चा कप्तान होता आधी. त्यामुळेही जास्त विश्वास टाकला असावा.
हो स्पार्टाकस - ती लिटल मॅन
हो स्पार्टाकस - ती लिटल मॅन बिग फेला वाली कॉमेण्ट लाइव्ह अजून आठवते. शारजाच्या त्या लागोपाठच्या दोन शतकांपैकी एका च्या वेळेस मारली होती त्याने
फायनलला होती ती कॉमेंट
फायनलला होती ती कॉमेंट :).
Kumble's playing a blinder हे तर कधी जन्मात ऐकायला मिळेल असं वाटलं नव्हतं. (१९९६ वर्ल्ड कप क्वार्टर फायनल - बँगलोर!)
Waqar Younus is being slottered! हे पण त्याच मॅचमध्ये पाठोपाठ २ मिनीटांत!
आणि ही सुद्धा त्यातलीच, टोनी
आणि ही सुद्धा त्यातलीच, टोनी ग्रेग चीच
"Sachin Tendulkar, you are going to need someone at the other end"
https://www.youtube.com/watch?v=2kiurgNgh94
सचिन ने स्ट्रेट मारताना खाली असलेल्या गांगुलीच्या डोक्याजवळून मारला व त्याला पटकन खाली पडावे लागले, तेव्हा. गांगुली म्हंटला असेल आधीच मला बाउन्सर्स खेळता येत नाहीत...
सचिन ने २००३ च्या वर्ल्ड कप मधे असाच एक ड्राइव्ह अंपायरला आडवा करून मारला होता
The little man has hit the
The little man has hit the big fella for six! He's half his size! >
येस! शारजातल्या त्या मॅचच्या
येस!
शारजातल्या त्या मॅचच्या वेळी ग्रेगबरोबर कॉमेंट्रीला ग्रेग चॅपल होता. चॅपलची कॉमेंटही भारी आहे -
Now you know why Sourav Ganguly wears all the protective gear he wears. Its not only for the bowling but his partner down the other end. That came back like a rocket.
फारेण्ड, काँमेंटससाठी वेगळा
फारेण्ड,
काँमेंटससाठी वेगळा धागा काढ ना..
खरे तर माझ्याही डोक्यात मागे असा धागा आलेला, खास करून त्या क्रिकैन्फोवरच्या कॉमेंटस बघून, त्याही मस्त असतात, वाचायला मजा येते..
फारएण्ड, धाग्याबद्दल कसचं
फारएण्ड, धाग्याबद्दल कसचं कसचं निदान या निमित्ताने तरी शतकी काय, हजारी धागा पदरात पडेल, ह्या विचाराने धागा काढला.
<< स्टीव्ह स्मिथची निवड अगदी
<< स्टीव्ह स्मिथची निवड अगदी योग्य वाटते. डेव्हिड वॉर्नर खूप अॅग्रेसिव्ह आहे..... तसे ऑस्ट्रेलियन ह्या बाबतीत बरेच कंझर्व्हेटिव्ह वाटतात.>> अहो, सगळेच अॅग्रेसीव्ह असताना निदान कर्णधार तरी जरा संयमी असावा, एवढं शहणपण असणारच ना ऑसीजमधल्या कुणाकडे तरी !
[वे.इंडीजच्या क्रिकेटचा सुवर्णकाळ म्हणूनच सर वॉरेल व लॉईड हे संयमी कर्णधार असतानाच झाला; या उलट, भारतीय संघात सगळेच मवाळ म्हणण्याइतपत शांत असताना, आक्रमक वृत्तीचे वाडेकर, सौरव हे म्हणूनच यशस्वी कर्णधार ठरले असावेत ! :डोमा:]
फार गंभीरपणे न घेण्याच्या सिद्धूच्या कॉमेंटसपैकीं एक मात्र मला खूप भावली होती; 'तुमच्या क्रिकेट करीअरबद्दल तुम्ही समाधानी आहात का ?' या एका प्रश्नाला मुलाखतीत त्याचं उत्तर होतं - ' इतने नजदीकसे सचिनको बॅटींग करते देखनेका सौभाग्य मेरे क्रिकेटनेही तो दिया मुझे !'
<< एक व्यंगचित्र येऊन जाऊ दे की पहिल्या कसोटीबद्दल >> भास्कराचार्यजी, या धाग्यावर आपली फर्माईश म्हणजे हुकूमच -
व्यंगचि बाकी कोहली ने पण
व्यंगचि
बाकी कोहली ने पण अनुष्काके खातिर तीन तीन शर्मा एकसाथ घेतले होतेच..
<< बाकी कोहली ने पण अनुष्काके
<< बाकी कोहली ने पण अनुष्काके खातिर तीन तीन शर्मा एकसाथ घेतले होतेच >> तसं रविंद्रबरोबर महेन्द्रसुद्धां येणारच आहेत !!!
http://aajtak.intoday.in/stor
http://aajtak.intoday.in/story/ind-vs-aus-when-ajinkya-rahane-helped-fan...
काँमेंटससाठी वेगळा धागा हवा
काँमेंटससाठी वेगळा धागा हवा राव.
भास्कराचार्य नवा बाफ उघडताना आधीच्या काही कॉमेट्स इथे कॉपी करायला हव्या होत्या. हे एकदम शेंडा ना बुडखा असल्यासारखे झालय.
वाह भाऊ! ह्याच न्यायाने
वाह भाऊ! ह्याच न्यायाने जोगींद्र (जोगिंदर) शर्माला नाही खेळवले म्हणजे मिळवली. व्यंगचित्राबद्दल आभार.
असामी, तो विचार आला होता, पण
असामी, तो विचार आला होता, पण नक्की कुठून व किती कराव्या हे काही समजले नाही. शेवटच्या पानावरच्या सर्व प्रतिक्रिया पहिल्या प्रतिसादात सम्मीलित केल्या आहेत.
ह्या निमित्ताने भाऊंच्या
ह्या निमित्ताने भाऊंच्या व्यंगचित्रातल्या पात्रांसारखा मनात आलेला एक विचार - 'होणार सून मी ह्या घरची' मध्ये 'एक नवीन सुरवात' वगैरे ठीक आहे, पण क्रिकेटच्या धाग्यावर असले काही कराल तर खबरदार!
जोगिंद्र ऑसीजचा आदर्श समोर
जोगिंद्र
ऑसीजचा आदर्श समोर ठेवून आपण पण कोहलीला टेस्ट कर्णधार म्हणून घोषित करू का ?
भास्कराचार्य, क्रुपया हे मागच्या बाफावरचे तुझ्या पहिल्या पोस्ट मधे टाक म्हणजे आपोआप संगती लागेल.
Pages