मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाटिका ची एक अ‍ॅड पाहिली काल... त्याची टॅगलाईन काहीशी होती की केस असणंच सौंदर्य नाही वगैरे.
एक कॅन्सर झालेली आणि डोक्याला केस नसलेली स्त्री घरात आणि ऑफिसत जे जे काही करते त्यामुळे ती खुप सुंदर ठरते वगैरे वगैरे.
ऑसम आहे ती अ‍ॅड. मला टडोपाचं झालं एकदम

हिच ती अ‍ॅड - https://www.youtube.com/watch?v=QomoNyfkqvg

वृध्दांची काळजी घ्या. या अर्थाची अक्षय कुमारच्या आवाजात जाहीरात आहे.
छान आहे. तो प्रसंग आणि त्यावरचे शब्द तर अंगावर शहारे आणतात. >>>>>फोटोमधून स्टोरी सांगितली जाते कि त्या व्यक्तीची मुले परदेशात शिकून सवरून कसे स्थाईक झाले आहेत, पण मग ती वृद्ध व्यक्ती खुर्चीत सकाळीच कार्डियाक अटेक येवून मरून पडलेली असते आणि लहान मुले चेंडू साठी रस्त्यावर कल्ला करत असतात. खरच अश्या एकाकी पडलेल्या वृद्धांची काळजी वाटते.

सेट मॅक्सची आणखी एक अॅड भारी आहे
एक जोडपं फर्निचर घ्यायला फर्निचरच्या शो रूममध्ये जातं. त्यावेळी तो ग्राहक त्या स्टुलावर बसतानाच सेल्समन स्टूलाला लाथ मारतो आणि म्हणतो, ‘जब तक कहा न जाय, बैठनेका नही. यह शो रूम है, तुम्हारे बाप का घर नही...’ सगळेच गोंधळतात. आता पुढे काय? बायको म्हणते, उठा, उठा. पण तेवढ्यात ग्राहक महाशय प्राणच्या आवाजात म्हणतात, ‘आज तक गणतंत्र पांडे से किसी ने ऐसी बात नही की. ये तुम नही, तुम्हारी वर्दी बोल रही है, बर्खुरदार..’ आणि लगेच टाळ्यांचा कडकडाट... मस्त जाहिरात आहे.

ओलएक्सची एक जाहिरात मस्त आहे. लहान मुलगा खूप त्रास देणारा असतो. घरातल्या सगळ्या गोष्टींवर प्रयोग करत असतो. जसे सिडी प्लेअर मधे पापड टाकणे, वॉशिंग मशिन मधे भांडी धुवायला टाकणे ई. ई. Proud
आई वडिलांचे मुलांचे सगळ्यांचेच एक्सप्रेशन्स मस्त ! शेवटी तर मुलगा काहीतरी किचन मधे करतो आणि भस्सकन पाणी येतं बाहेर. आई बाबा बोलता बोलता पाय वर घेऊन बसतात. म्हणतात आम्हाला विका तुमच्या वस्तू Proud

ओलएक्सची एक जाहिरात मस्त आहे>>>> अजून एक अमृता सुभाषची... घोरणार्‍या नवर्‍यावर उपाय म्हणून सोफा घेण्याबद्दलची... एकदम भन्नाट..
रच्याकने...इन जनरल जाहिरातीतली अमृता सुभाष आणि सिनेमा-नाटकांतली अमृता सुभाष फार फरक जाणवतो. जाहिरातीमधला तिचा वावर भन्नाट सुंदर वाटतो. तोच सिनेमामधे जरा ओव्हर वाटतो.
आठवा ती मोबाईलवरुन यूट्यूब वरुन विडिओ पाहून मुलाला स्ट्रेट ड्राईव्ह शिकवते ती जाहिरात.. किंवा जुनी विम बारची निखिल रत्नपारखीबरोबरची जाहिरात (तल्लीन होऊन भांडी घासता घासता निखिलला "आज जल्दी"विचारते..एकदम क्लास)... इतक्या पटकन अपील होतात तिच्या जाहिराती.

ओएलएक्स ची जाहिरात बघुन मुलांनी तसले उपद्व्याप घरात करायला सुरुवात केले की झाले मग Happy

जाहिरातीतली अमृता सुभाष आणि सिनेमा-नाटकांतली अमृता सुभाष फार फरक जाणवतो. जाहिरातीमधला तिचा वावर भन्नाट सुंदर वाटतो. >> मित अगदी सहमत! ओएलएक्स च्या जाहीराती भन्नाट! काय आचरट पोरगं आहे!!

रियाने दिलेली ’बंदे अच्छे है’ ची ऍड खूप गोड- आधीही बघितलेली होती. पण आताही मस्त वाटली.
युट्युबवर लगेच शेजारी वेगवेगळ्या ऍड्स आल्या- २०१४ची बेस्ट- थाई जाहिरात आहे. गोड आहे खूप. नंतर एक कलेक्शन ऑफ ओल्ड ऍड्ज असेही काहीतरी आहे. त्याही मस्त आहेत- सगळ्या जुन्या जाहिराती- सलमान खानची लिम्काची जाहिरात, कॅडबरीची ’कुछ खास है’ वगैरे. मस्त वाटलं Happy अजूनही दिसत राहतात- जुन्या पेप्सीचा जाहिराती- आमीर, शारूक, ऐश्वर्या, महिमा चौधरीही!! एकदम नोस्टालजिक!

अमृताची ओएलएक्सची पाहिली. मुलाची नाही पाहिली. पण अमृताची सही आहे.

हो २-३ महिन्यापासुन घरी मृतावस्थेत होते असे काहीतरी सांगितले होते >>>>>>नाहि सकाळीच कार्डियाक अटेक येवून मरून पडलेले असतात.

Lol म्हापणकरांच्या लेखातली वादग्रस्त 'प्रॉपर्टी' मला 'बंदे अच्छे है' मध्ये दिसली. तिकडे लिहायला हवं. सही जाहिरात आहे.

सनफिस्ट यिप्पी नूडल ची छोटा भीम स्केट स्कूटर ची जाहिरात प्रचंड इरिटेटिंग आहे. मुलगा यिप्पी नूडल्स खात नसल्यास त्याने चुल्लूभर पाण्यात डूब मरावे असा सूर आहे.

O L X ची ती लहान मुलाची ad मला तरी चीड आणणारी वाटते. लहान मुलगा घरातल्या महागड्या वस्तू इतक्या सहजतेने नष्ट करतो आणि आई वडील कौतुक करतात ???? Angry

'इतनी जल्दी कैसे बढ गया' वाल्या दुधात टाकण्याच्या सर्व पदार्थांच्या जाहीराती जरा संशयास्पद वाटतात. आपल्या ड्रिंकाने इतर ड्रींकांपेक्षा लवकर लवकर पोरे उंच करावी म्हणून हार्मोन्स वगैरे टाकत नसतील ना अशी उगीच शंका येत राहते.

अमेरिकेत दाखवल्या जाणार्‍या इंडियन चॅनेलवरच्या जाहिराती म हा न आहेत.
शादी.कॉम व भारतमॅट्रिमोनीच्या चांगल्या आहेत. पण बाकी ती एक आयुष्मान खुरानाची जाहिरात फार डेंजर आहे. एकूणच सोसायटीच्या गणेशोत्सवात बालनाटय बसवतात त्या लेव्हलच्या अ‍ॅड्स आहेत.
"तुम्हारी बहन की शादी तैर हुई है?" "हे राज? हाउ इज युवर डॅड" - एकसे एक डेंजर.

Pages