मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नविन वाचक सहमत.
पंजाबी बायका खेडवळ मराठीत बोलतात हेच पटत नाही Angry
कानाला जोरदार खटकतं

IIN - त्यातल्या-त्यात तो राजस्थानी/जयपुरी व्यक्तीची बरी वाटते. पण ते मोबाईल डोक्याला लावायचे / आपटायचे प्रकार त्या पहिल्या पाववाल्या/बेकरीवल्या पासून डोक्यात जाते. Sad Sad Sad

ती नविन आदित्य कपूरचि बघितली ?
नक्की कसली आहे आठवत नाही बहुतेक हेअर जेल .

तो जे प्रकार करतो , दिसतो , जिंगल सगळच आवडलं

शाहरुखच्या नवीन शो च्या जाहिराती बघून तो शो पूर्वीसारखाच फ्लॉप होणार हे सांगायला कोण ज्योतिषाची गरज नाही !

हिंदुस्तान युनिलिव्हर स्पीचेस टू इनस्पायर वर्ल्ड या मला कॉल सेंटर इंग्लिश अ‍ॅसेंट ट्रेनिंग च्या जाहिराती वाटतात.
या विभागात "सो सॉरी" बद्दल बोलू शकतो का? सर्व भाग जबरदस्त आहेत. काल केजरी "आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर" सारख्या गाण्यावर नाचत होते. सो सॉरी ची सीडी विकत मिळायला हवी किंवा युट्यूब वर संयम ठेवून सर्व भाग उतरवून पाहिले पाहिजेत.

मला अजिबात न आवडलेली सध्याची जाहिरात म्हणजे भारती एक्सा लाईफ इन्शुरन्सची - ज्यात डॉक्टर पेशंटला सांगतो तुला कॅन्सर झाला आहे आणि कॉमेडी म्युझिक सुरु होते, डोक्यात जाते ही जाहिरात. एखादा गंभार विषय किती चीप दाखवता येतो याचे उदाहरण आहे ही जाहिरात, वर आणि जाहिरातीच्या शेवटी तात्पर्य काय तर तुम्ही आजारी आहात म्हणून घरच्यांनी का भोगायचं अशा अर्थाचा....

माधुरी जेव्हा पहिल्यांदा सासरहून रिटर्न आली होती तेव्हा तिने एका भांडी घासण्याच्या साबणाची जाहिरात केल्याची आठवते तशी ती प्रियांका चोप्रा ने पण केली होती पण फरक एवढाच होता कि प्रियांकाने गृहिणी साकारली होती आणि आपल्या माधुरी म्याडम ने गंगुबाई .............. Sad Sad Sad

माझी लेक तिला याच नावाने ओळखायची मग जेव्हा झलक दिखलाजा सुरु झाले तेव्हा तिला त्या गंगुबाईचे नाव 'माधुरी' आहे हे कळले (मी तिचे (अ) ज्ञान दूर केल न्हवत). खर तर मलाही ती जाहिरात अजूनही आवडत नाही. Angry

मला अजिबात न आवडलेली सध्याची जाहिरात म्हणजे भारती एक्सा लाईफ इन्शुरन्सची - ज्यात डॉक्टर पेशंटला सांगतो तुला कॅन्सर झाला आहे आणि कॉमेडी म्युझिक सुरु होते, डोक्यात जाते ही जाहिरात. >>> + १००००

आणि त्यात अस काहीतरी आहे .. आपके घर् वालोन्की जरुरत की चीजे ...
टीवी , हार ही जरूरती की चीजे ???

पेपर फ्राय जाहिरातीत फर्निचर जोडून झाल्यावर कामगाराला बक्षिस देण्यासाठी नवर्‍याला कोपराने ढोसणारी मुलगी (आणि दुसर्‍या पेपर्फ्राय जाहिरातीत कापड रंगवताना पाहताना,रंधा मारताना पाहताना,ट्रक मधून जाताना) मला खूप आवडते. तिच्या चेहर्‍यावर हसली नाही तरी हसरे भाव आहेत.

आधी कोणी पोस्ट केल्या आहेत की नाहीत आठवत नाहीये, काही बँका इन्शुअरन्सच्या जाहीराती मस्त बनवताहेत त्यापैकी आवडलेल्या

सन बिर्ला लाईफ (ऑटीझम अवेअरनेस) : www.youtube.com/watch?v=tzbo5YpJDvQ
HDFC : https://www.youtube.com/watch?v=rg8mH2I4VBM

फेवी क्युइक>>> मॅच मधली का?>>> वाघा बॉर्डर (काल्पनिक) वरची. निखिल रत्नपारखीची. मस्त आहे जाहिरात.

गेले दोनचार दिवस नेमके जेवताना काला हिट कॉक्रोचची कसलीशी अ‍ॅड लागतेय आणि तो जगातला सर्वात किळसवाणा किटक झुरळ जेवता जेवताच पटकन बघितला जातोय राग>>
तर मग जेवताना काला हीट जवळ ठेवा... झुरळ आला की टीव्हीवर फवारा.
>>>>>>>>>>>>>>>:हहगलो:
Biggrin Biggrin Biggrin
Rofl
Biggrin Biggrin Biggrin
Rofl
Biggrin Biggrin Biggrin

अटक मटक ज्याची जीभेला लागेल चटक ते सारे खातो.>>>>>>>>
ऋन्मेऽऽष,
तुझे हे वाक्य फार आवडले. ('तुझे' बद्दल राग न मानावे तुझ्या लेखातून तू लहान आहेस असेच वाटते (लहान म्हणजे अगदी लहान नसून निदान 'लग्नाळू' Wink Wink Wink ).

बाकी माझे हि एक : अटक मटक ज्याची जीभेला लागेल चटक ते सारे गटक !!!!!!! Happy

airtel family plan च्या (फूलोंका तारोंका वाल्या) जहिराती इरिटेटिंग आहेत. अजिबात आवडल्या नाहीत.

मला पण नाही आवडल्या त्या एयर्टेलच्या. कसली डोक्यात जाणारी आगाऊ स्वार्थी कार्टी आहेत ती. अन त्यांच्या माताही तसल्याच

कुठल्याश्या मोबाईल अ‍ॅपची जाहिरात लागते आजकाल. तो दुधाची पिशवी घेऊन येतो, फोनवर स्कोर बघत बघत आणि बॉलिंगची अ‍ॅक्शन करत नकळत पिशवी तिच्या कडे फेकतो.
तो: बाऊंसर था बेबी, डक करना था. (जीभ चावत)
ती: (खाऊ की गिळू लूक)
जबरी अ‍ॅड आहे.

कुठल्याश्या मोबाईल अ‍ॅपची जाहिरात लागते आजकाल. तो दुधाची पिशवी घेऊन येतो, फोनवर स्कोर बघत बघत आणि बॉलिंगची अ‍ॅक्शन करत नकळत पिशवी तिच्या कडे फेकतो.
तो: बाऊंसर था बेबी, डक करना था. (जीभ चावत)
ती: (खाऊ की गिळू लूक)
जबरी अ‍ॅड आहे.>>>>>>>>>>>>>>>>>>:) Happy Happy

कारण ती दुधाची पिशवी तिच्या डोक्यावर जावून फुटते..........फार मजेशीर आहे जाहिरात ती.
Happy Happy Happy

एक कुठलीशी जेली (स्वीट क्यांडी) ची जाहिरात दाखवली जाते animated आहे, एका बाकावर पेहेलवान टाईप दोन जेल्या(तरुण) बसले असतात आणि एक म्हातारी जेली (बाबा) येतात तेव्हा त्या पेहेलवान जेल्या त्यांना बसायला नाही देत आणि मग एक सुंदरशी कमनीय जेली(मुलगी) येते आणि तिला पाहून त्या तरुण जेल्या आपले एक्स्ट्रा भाग काढून तिला बसायला जागा देतात तेव्हा ती त्या म्हातार्या जेलीला (बाबांना) बोलावते. (बघितली आहे का हि जाहिरात कोणी Uhoh
???) माझ्या मुलीना खूप आवडते.:) Happy Happy

नवा , मी बघितली आहे , पण मला नाही आवडत Happy

नविन जोन्सन अ‍ॅण्ड जोन्सनची बघितली?
अरे कित्त्त्ती गोड बाळ आहे ते , काय भाव बदलतात त्याच्या चेहर्यावरचे .

अजून एक भन्नाट जाहिरात. डॉक्टर फिक्सिट ची एलडब्ल्यू प्लस ची.
कनपट्टी पें पिस्तौल धरणारा डाकू (गंगाजल मधला बच्चा यादव म्हणजे मुकेश तिवारी) एका गावकर्‍याला धमकावतोय आणि अचानक भोजपुरी लहेज्यात दुसरा एक गावकरी गाणं सुरु करतोय "फुलवा, सुखिया, भिलेज के मुखिया....."
भाषा, गाणं, सगळ्या कलाकारांचे हावभाव सगळं सगळं लई भारी.

नविन जोन्सन अ‍ॅण्ड जोन्सनची बघितली?
अरे कित्त्त्ती गोड बाळ आहे ते , काय भाव बदलतात त्याच्या चेहर्यावरचे>>>>> माझ्या मामेदिरांची मुलगी Happy

अरे वा ! मस्त प्रीति विराज

लड़के रोते नही ही माधुरी दीक्षितची जाहिरात पाहिली आहे का . वुमन एब्यूज वर आहे . योग्य संदेश दिलाय

Pages