मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिजलि बचाओ , देश बनाओ जामच आवडली ...>> ही पाहीली नव्हती. खरंच लहान मुलांचा प्रभावी वापर केला आहे सोशल मेसेजिंग साठी. मस्त!!
अमुल ची नविन जाहीरात पण मस्त.. जुनच गाण कायम ठेवुन वेगळ्या चाली मधे दाखवतात.पदार्थ अर्थातच तोपांसु. >> ह्म्म हीसुद्धा छानेय.

धनुष ची से.न्टर फ्रेश ची 'हे स्वीटी' जाहीरात आवडली.>> Happy
प्लॅटीनम इवारा ची अ‍ॅड >> मस्तंय ब्लॅक अँड व्हाईट मुळे परीणामकारक... विहीणींनी मूक संवाद साधण्याची थीम आवडली!

सेट मॅक्स च्या 'दिवाना बना दे' थीम वाल्या जाहिराती >> हल्ली सेट मॅक्स (एकंदरीत टिव्ही पाहणेच) कमी झाल्याने नाही पाहील्या. धुंडाळून पाहाव्या लागतील.

बिजलि बचाओ , देश बनाओ जामच आवडली ...>> ही पाहीली नव्हती. खरंच लहान मुलांचा प्रभावी वापर केला आहे सोशल मेसेजिंग साठी. मस्त!! >> हो ना! .

लेकाला पण जाम आवडली . सध्याच आमच फेव. गाण आहे .
आणि घरी कधी कधी चिरंजीव इतरांना उपदेश ही देतात , " तुम्हाला माहित नाही..?? बिजली बचाओ , देश बनाओ " Sad

सध्या मराठी चित्रपटातल्या "सो कॉलड" सुपरस्टार कपलचा कुठल्यासा सिनेमा टीवीवर येणार आहे त्याची जाहिरात येत असते. शेवटी इतक्या भयकारक आवाजात ती सुपरस्टार हिरवीण "अरे आओ न यार" असं काहीतरी म्हणते आणि हिरो "स्टुपिड" म्हणतो. आई ग्ग!! दुर्दैवाने चित्रपट अजून २ आठवड्यानंतर आहे म्हणजे अजून २ आठवडे हा त्रास सहन करावा लागणार!! Sad

हि बहुतेक जॉर्जिया देशाच्या पर्यटन खात्याची जाहीरात आहे, तसा स्पष्ट उल्लेख नाही.. पण जे काय आहे ते अतीव देखणे आहे.. अवश्य बघा..

https://www.youtube.com/watch?v=ujo65bBRQ4I

सेट मॅक्स च्या 'दिवाना बना दे' थीम वाल्या जाहिराती>> मस्त आहेत दोन्ही मी कालच पाहील्या . धनुषची पण आवडली.

दा ,सुंदरच आहे ही अ‍ॅड अगदि देखणी .आणि टॅपडान्स पण मस्त. Happy

The Raga Woman Of Today मस्तच आणि त्यामागचा थॉट तर अप्रतीम त्यांना दंडवत आणि तुम्हालाही. >>>>>>>>हि जाहिरात आधी कळली न्हवती पण आजकाल माबोवर राहून राहून डोक चालायला लागलंय ......माबो factor वापरला आणि मग कळली. :):) Happy छान आहे घड्याळ आणि जाहिरात. Happy

क्लासमेट स्टेशनरीची अ‍ॅड मस्तयं !

आणि वहीवर अ‍ॅनिमेशन दाखवणार्या मुलाचे एक्सप्रेशन भारीच .

आहे की नाही गंमत टाईप्स Happy

राजस्थानातल्या वाळवंटात खचाखच भरलेली सायकलरिक्शा (बहुतेक). चालक हळूहळू त्याचा गाडा ओढतोय. सगळेजण एकापाठोपाठ एक 'धूम' ची ट्यून गायला लागतात आणि तो चालक जोशात पळवायला लागतो >>>>>>>>>>>>छान आहे हि जाहिरात बिन ओळखीचे चेहरे (विदाऊट प्रसिद्ध मोडेल) गावातील लोक (लग्नाल जात असतात) काय धमाल करतात .......धूम धूम धूम Happy

राजस्थानातल्या वाळवंटात खचाखच भरलेली सायकलरिक्शा (बहुतेक). चालक हळूहळू त्याचा गाडा ओढतोय. सगळेजण एकापाठोपाठ एक 'धूम' ची ट्यून गायला लागतात आणि तो चालक जोशात पळवायला लागतो >>>>>>>>>>>>छान आहे हि जाहिरात बिन ओळखीचे चेहरे (विदाऊट प्रसिद्ध मोडेल) गावातील लोक (लग्नाल जात असतात) काय धमाल करतात .......धूम धूम धूम >>> + १००००

कल्याण ज्वेलर्सची नवीन जाहिरात पाह्यली का?
घरात मुलीच्या लग्नाची धामधूम आहे. बहुतेक नवर्‍यामुलाला सोन्याची चेन देण्याचे चालले आहे आणि अचानक श्रीयुत बच्चन अवतरतात आणि म्हणतात काळ बदललाय आता हिर्‍याची चेन द्या. वधूपिता म्हणतो मी सामान्य शिक्षक आहे, इतका पैसा कुठून आणू? तर श्री बच्चन त्याच्याकडे किती पैसे उरलेत विचारतात. तो सांगतो २००००. तर श्री बच्चन सांगतात की यामधे हिर्‍याची चेन येईलच कल्याण ज्वेलर्सकडे. तर तुम्ही तीच द्या

म्हणजे मध्यमवर्गीय शिक्षकाच्या बँकेत अडीनडीला २०००० रूपये असणे याचं महत्व नाहीच.
लग्नातले देणेघेणे हा सर्वस्वी आपखुशीचा मामला असला पाहिजे. वधूपित्यावर हे देण्याघेण्याचे दडपण असणे हेच चुकीचे आहे. हुंडा हे प्रकरण नुसतं चूकच नाही तर कायद्याने गुन्हाही आहे. या सगळ्याचा काही पत्ताच नाही....

वा शाब्बास...

घरात मुलीच्या लग्नाची धामधूम आहे. बहुतेक नवर्‍यामुलाला सोन्याची चेन देण्याचे चालले आहे आणि अचानक श्रीयुत बच्चन अवतरतात आणि म्हणतात काळ बदललाय आता हिर्‍याची चेन द्या >>> नाही नीधप . मुलीच्या चेनबद्द्दल बोलतायेत ते .

रच्याकने , ज्यु. आरकेची ओरियो ची अ‍ॅड बघितली ?? चबडचबड , कसली क्युट आहे . आणि त्याची बहिण पण मस्त . आवाजात काय एक्प्रेशन आहेत तीच्या Happy

त्याची बहिण पण मस्त . आवाजात काय एक्प्रेशन आहेत तीच्या << अ‍ॅड छान आहे पण ती पहिली अ‍ॅड मधली मुलगीच ठेवायला पाहिजे होती. तर जास्त चांगले होते

एका फर्निचरची जाहिरात आहे ज्यात मेल मॉडेलच्या आईला दुसर्‍या कोणी वापरलें फर्निचर चालत नाही म्हणून ती त्याच्या घरी राहायला येत नाही. यात वापरलेल्या फर्निचरसाठी तो झूठा फर्निचर म्हणतो.
ते जूठा हवं ना?

अवांतर : गुलजार -आर डी- आशाचं एक गाणं आहे : जूठे तेरे नैन सौतन की छब छूके आए
आशाचंच लेकिनमधलं गाणं : झुठे नैना बोले साची बतियां

बंगाली अन ओरीयांच्यात मुलीला देतात चेन!

संदर्भ- सासुबाई आणि
"एटा आमार बियेर चेन"- रिया सेन, हनीमून ट्रॅवल्स प्रा. ली. (पिक्चर)

मी जाहिरात पाहिलेली नही. रिवाज मुलिला चेन देणे असो किंवा (नवर्‍या) मुलाला. जर बापाकडे पैसेच कमी असतील तरी बच्चन सारखा जरी कुणी आला तरी उपटसुंभासारखं तुम्ही हिर्‍याचीच चेन द्या असं कसं सांगू शकतात? यातून मेसेज नक्कीच नीट जात नाहिये. मला तर जितकी इथे कळली त्यावरून जाहिरात पटली नाही.

नवीन वाचक, मस्त आहे ती अ‍ॅड ,अ‍ॅड्खालचं हे वाक्य The Raga Woman Of Today # "HerLife HerChoices " हे पाहीलं असतं तर माबो फॅक्टरचीही गरज लागली नसती समजायला . Happy

'कितनी 'सेल्फि'श है आप' वाली टाटा डोकोमो ची जाहीरात पण मस्त . >>:हाहा: धमाल आहे ती अ‍ॅड.

मी जाहिरात ऐकली नाही नीट , पण एकंदरीत अस वाटतं की मुलगी कोणत्यातरी समारंभासाठी ( लग्न किन्वा साखरपूडा ) , त्यासाडीवर कोणतातरी सेट चांगला दिसला असता अस तिच्या घरच्याना वाटतं . पण तिचे वडील सांगतात की आपण हिरे वगरे घेउ शकत नाही म्हणून सोन्याची आहे तीच घालावी लागेल . ( अधिकाराने नाही नाईलाजाने )
आणि मग बच्चन साहेब येउन त्याना घेउन जातात हिरेखरेदीसाठी .

जर बापाकडे पैसेच कमी असतील तरी बच्चन सारखा जरी कुणी आला तरी उपटसुंभासारखं तुम्ही हिर्‍याचीच चेन द्या असं कसं सांगू शकतात? >>>>

खरतर मला कोणाचच अस उपट्सुम्भासारख येण आवडत नाही .
ते निदान दूकानात घेउन तरी जातात , तो राम कपूर दूसर्याकडे जेवायला येताना कोटाच्या खिशात विम लिक्विड्ची बाटली बाळगतो
आणि विशालच तर कामच आहे दूसर्यान्चे टोयलेट चेक करण

डिस्ने वर एक डोरेमॉन फ्लिपकार्ट ची जाहीरात लागते . अतिशय वाईट वाटली .

एक तरूण भाजीवाला दिवसभर हातगाडीवर भाज्या विकतो आणि रात्री अभ्यास करून वकिल बनतो .

कोर्टात येउन पहिल्या दिवशी " गवाह , सबूत . बयान सब है , ये मर्डर है " हे " आलू है , गोभी है , प्याज है , मटर है " च्या चालीवर बोलतो .

ये नही बदलेंगे , पर ये जरूर बदलेगा , नया डोरेमॉन का फ्लिप्कार्ट

टुकार अ‍ॅड

टुकार अ‍ॅड>>> पहिल्यांदा पाहिल्यावर आवडली होती.. किंवा एकदम अनपेक्षित असल्याने हसू आलं... आताशा खरंच डोक्यात जायला लागलीये Happy

डिस्ने वर एक डोरेमॉन फ्लिपकार्ट ची जाहीरात लागते >>टुकार अ‍ॅड>> डिस्ने पाहत नसल्याने माहीत नाही!
कल्याण ज्वेलर्स>>हुंडा हे प्रकरण नुसतं चूकच नाही तर कायद्याने गुन्हाही आहे. या सगळ्याचा काही पत्ताच नाही....
वा शाब्बास...>> मलाही ती जाहीरात त्या गोष्टीसाठी अजीबात पटली नाही! पण सोनं खरेदी आणि लग्न ही मानसिकता येवढी तयार झालेय की मानपान, स्त्रीधन ही विचारसरणी अजूनही जपणार्‍या समाजाला टार्गेट करण्याची सोपी(आणि चुकीची) पद्धत!

सन बिर्ला ची खुद को कर बुलंद ही प्रॉडक्ट पेक्षा ऑटीझम वरील शॉर्ट फिल्मच वाटते. https://www.youtube.com/watch?v=tzbo5YpJDvQ पण छान आहे!

रेडिओवर वेगवेगळ्या राज्यांच्या टुरिजमच्या जाहिराती लागतात .
आज सकाळीच एक ऐकली.

" क्या बात है प्रिया तुम बहोत परेशान , थकी हुई लग रही हो ."
"क्या करू , मेरे बेटा हमेशा बिमार रहता है . परेशान हो गयी हूं. मेरे पति भी चिंतीत है"
"चिंता ना कर , १४ और १५ जनवरी को गंगापूर मे गंगोत्सव हो रहा है.
तुम्भी अपने परिवार के साथ वहां जा .
पवित्र गंगा मैया मे डुबकी लगाके अपने सारे दुखोन्से छुटकारा पाले "
"जय गंन्गा मैयां" " वेस्ट बेंगॉल टुरिजम.

थोड्या फार तपशीलाच्या फरकाने ... पण भावना समजून घ्या .

आइशप्पथ डोकच फिरलं.

वृध्दांची काळजी घ्या. या अर्थाची अक्षय कुमारच्या आवाजात जाहीरात आहे.

छान आहे. तो प्रसंग आणि त्यावरचे शब्द तर अंगावर शहारे आणतात Sad

Pages