मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेरी गाय चरते चरते वापिस आ जायेगी, मगर मेरा आमका सिझन गया की गया....
ती जाहिरात, त्यातिल अविर्भाव वगैरे मस्त.

जाहिराती कश्या असू नयेत ह्याचे धडे कोणाला हवे असतील तर मायक्रोटेक इनवर्टरच्या जाहिराती पहाव्या! त्यांच्या सगळ्याच जाहिराती ब-क-वा-स असतात. या जाहिरातींचं मराठी भाषांतर आणि आवाज तर त्याहून भीषण !

तेरी गाय चरते चरते वापिस आ जायेगी, मगर मेरा आमका सिझन गया की गया....
ती जाहिरात, त्यातिल अविर्भाव वगैरे मस्त.>>> ती जाहिरात त्यांनी बंद करावी अशी अपेक्षा होती. (पण बहुतेक फॅमिलीला सपोर्ट मिळेल म्हणून चालू ठेवली असावी)

मला अजिबात आवडत नाही. मुळात फेअर अ‍ॅण्ड लव्हलीचि अति जाहिरात करायची गरजच काय?
हा ब्रांड वेल एस्तब्लिश आहे. मी अगदी लहान असल्यापासून काही वस्तूंचे ब्रांड अजूनही चालू आहेत हा त्यातला एक. मग यांना एवढे world challenge लावायची का गरज भासते काय माहित.
माझी आई फेअर अ‍ॅण्ड लव्हली, केओ कार्पिन, कोलगेट, लक्स, लैफ़्बोय, सिंथोल( माझी मावशी गोदरेज कंपनीत कामाला होती यामुळे गोदरेज कंपनीचे सगळेच साबण/शाम्पू आम्ही लहानपणी वापरले आहेत आणि अजूनही वापरतो - आता मावशी नाही आहे) असे सगळे वापरायची अगदी जोन्सेन & जोन्सेन, शिवाय बेबी फूड सुद्धा.

जाहीरातीची लिंक द्यावी. जेणे करुन सग़ळ्यांनाच जाहीरात बघायला मिळेल. वरील उल्लेख केलेली जॉन्सन अँड जॉन्सनची जाहीरात सापडली नाही

तेरी गाय चरते चरते वापिस आ जायेगी, मगर मेरा आमका सिझन गया की गया....
ती जाहिरात, त्यातिल अविर्भाव वगैरे मस्त.>>> ती जाहिरात त्यांनी बंद करावी अशी अपेक्षा होती. (पण बहुतेक फॅमिलीला सपोर्ट मिळेल म्हणून चालू ठेवली असावी) अर्थ कळला नाही.

.

>>> ती जाहिरात त्यांनी बंद करावी अशी अपेक्षा होती. (पण बहुतेक फॅमिलीला सपोर्ट मिळेल म्हणून चालू ठेवली असावी) <<<
नंदिनी, याचा संदर्भच लागला नाही मला काही... काय आहे? <<<< आता लागला..
http://indianexpress.com/article/entertainment/bollywood/death-of-an-unk...
ओह, मेरी गाय चोरी हो गयी म्हणणाराच हाच तो का? ग्रेट अ‍ॅक्टिंग... मला तर तो खरोखरीचा कोणतरी गावंढळ पकडून आणून अ‍ॅड केलिये असे वाटले होते.

आबासाहेब. | 18 March, 2015 - 15:30
maaza ad ashraful गुगल मध्ये टायपुन पाहा, कदाचीत वरची पोस्ट एडिट कराल.

मुळीच नाही. प्रत्येक जण का कायम एकाच मोड मध्ये असतो ?
"पण बहुतेक फॅमिलीला सपोर्ट मिळेल म्हणून चालू ठेवली असावी" या वाक्यातून लगेच मला तो अक्टर आणि त्याची फमिली डोळ्यासमोर कशी काय येवू शकते? तुम्ही त्या मोड मध्ये आहात म्हणून समोरचाही त्याच मोड मध्ये आहे हे अगदी गृहीत धरण्यासारखे झाले. मुळात मी त्या त्या जाहिरातीला हसले त्या कलाकाराला नाही.

>>> ती जाहिरात त्यांनी बंद करावी अशी अपेक्षा होती. (पण बहुतेक फॅमिलीला सपोर्ट मिळेल म्हणून चालू ठेवली असावी) <<<
नंदिनी, याचा संदर्भच लागला नाही मला काही... काय आहे?<<<<<<<<<<, सेम माझेहि तेच झाले.

अपर्णा, एवढं पॅनिक होण्यासारखं काय आहे त्यात?
फक्त नंदिनीने जे लिहिलंय त्यात हसण्यासारखं काही नाहीये हे आसांनी सांगितलं.
मलाही नंदीनीच्या पोस्टचा अर्थ लागला नव्हता. पण तुमच्या जागी मी असते तर मी कळाल्यानंतर न चिडता माझी पोस्ट एडिट केली असती Uhoh

पण बहुतेक फॅमिलीला सपोर्ट मिळेल म्हणून चालू ठेवली असावी) <<<खरंच या उद्देशाने परत जाहिरात लावत असतील तर स्तुत्य आहे.
एक भाप्र:- जाहिरात तयार झाली, त्यातल्या कलाकारांना त्यांचं मानधन मिळालं, जाहिरात चॅनल्सवर प्रसारण व्हायला लागली. थोड्या दिवसानी त्याच प्रॉडक्टची वेगळी जाहिरात येऊ लागली. आता त्या जुन्या जाहिरातीतल्या कलाकाराला परत मानधन (जसं सिनेमातले प्रमुख कलाकार प्रॉफिट शेअरिंग करतात), ती जाहिरात परत प्रसारित व्हायला लागल्यावर मिळू शकतं ?

no I am not panic I'm just defending myself that I'm not ruthless. तरीही मी एडीट करते.

ते काका अगदी खरेखुरे वाटतात बहुदा actor नसावि ती व्यक्ती<<<< ते life ok च्या महाकुंभ मध्ये होते आणि तिथेही छान काम केलं होतं.

एक कुटूंब डायनिंग टेबलावर पराठे खात बसलंय. घरची बाई एक टूथपेस्ट तिथे आणून ठेवते. बरं खूप सामान घेऊन आली आहे आणि एकेक बाहेर काढताना टूथपेस्ट बाहेर ठेवते असं ही नाही (मी मुद्दाम २ -३ वेळा निरखून पाहिलं) आता नाश्ता सुरू असताना कोणी टूथपेस्ट विषयी का बोलेल? Uhoh
त्यातूनही मै कहाँ शुगर ज्यादा खाता हूं? असं नवरा म्हणल्यावर बायको चक्क पराठ्याची प्लेट हिसकावून घेऊन त्या जागी साखरेच्या क्यूबचा बाउल ठेवते Uhoh Angry
शुगर अ‍ॅसिड न्युट्रिलायझर्स युक्त कोलगेट टूथपेस्टची ही बकवास जाहिरात. Angry

शुगर अ‍ॅसिड न्युट्रिलायझर वाल्या सर्व जाहिराती मिसगायडिंग (समाजाच्या दृष्टीने) आहेत असं मला वाटतं.
"काय वाट्टेल तितकं गोड खा, काहीही बदलू नका, फक्त एक सवय बदला" कदाचित ती टूथपेस्ट चमत्कारी असेल पण, पण गोड खाऊन मुलां मध्ये आणि मोठ्यांमध्ये येणार्‍या इतर आजारांचं आणि जाड्पणाचं काय?

पेप्सी नवीन जाहिरात : पेप्सी कि याड बनाओ ओफ़िसियल याड को रीप्लेस करो. आजोबा/आजी आणि कुटुंब जाहिरात बनवून ती अपलोड करतात. मधेच त्या नाचऱ्या रणबीरला नाचवतात वैगरे. या जाहिरातीची हाईट शेवटी विराट आजीला विचरतो " आंटी मै क्या करू?" आणि ती म्हणते " तू कुछ मत कर बस अपने खेल पर ध्यान दे' त्या रणबीरबरोबर आपल्यालाहि फिसकन हसायला येते.

Pages