मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हार्मोन्स वगैरे टाकत नसतील ना>> कालच मटामध्ये याबाबत आलं होतं. हेल्थ सप्लिमेन्ट्स म्हणून प्रकार असतात हे आणि केवळ आपल्या शरीराची गरज आणि डॉक्टरचा सल्ला असेल तरच घ्यावेत.

त्यामुळे या कंपन्या लहान मुलांची प्रॉडक्ट्स टार्गेट करतात- हेल्थ ड्रिन्क, दूधात घालायच्या पावडरी, कसकसल्या गोळ्या वगैरे. मुलं हा सर्वच पालकांचा वीक पॉइन्ट. 'बच्चों के लिये' म्हणलं की पालक घेणारच. त्यात जाहिरातीत गोड पोरं, लाघवी पोरं, स्मार्ट पोरं घेतली की काम फत्ते!

दूधात घालायच्या तमाम पावडरी चॉकलेटच्या चवीच्या का असतात हा प्रश्न मला कायम पडतो! असो.

ती नविन केलॉग्स ची जाहिरात पाहिलीत ?

माँ ने कहां है ब्रेक्फास्ट मे शहद और बादाम खाना चहिये .

माँ ने सान्गण्यात आणि लेकाने ते ऐकण्यात काहीच गैर नाही पण तो आईचा मुलगा ते ज्या टोनमध्ये आणि जो हाव्भाव करत बोलतो ते धमाल आहे .

अस वाट्तं की त्याच्याकडेच काहीतरी न्युज आहे आणि त्याच्या आईने पहिलटकराला खाण्याबद्दल सल्ले दिले आहेत .
देवा !!

गो चीज च्या जाहिरातीत बोललेलं "बह्च्चो के स्वाद की दुनिया है अमेझिंग" ऐकलं की मला हे वाक्य वरवर ऐकायला छान वाटत असलं तरी निरर्थक आहे असं वाटतं. 'बच्चो के स्वाद की दुनिया' असा काही प्रकार आणि तोही अमेझिंग आहे असं मला कधी वाटलेलं नाहीय Happy

'सब' चानेल ची एक जाहिरात आली आहे त्यात ते एक म्हातारे नाचरे आजोबा नाच-गाण करत आजकाल लोक मोबाईलवर कसे गुंतून गेलेत आणि आपसात न बोलता फक्त सोशल साईटवर असतात वैगरे सांगतात मग अचानक ते सब वरील एका पत्राचा उल्लेख करताच सगळे मोबाईल सोडून त्यांच्याशी चर्चा करू लागतात शेवटी एक पणजी म्हणते तिला बालवीर आवडतो आणि मग पणजोबा म्हणतात मलाही. छान आहे संगीत त्या जाहिरातीचे. Happy

हल्ली एक इन्सुरन्स कंपनीची जाहिरात दाखवतात त्यात त्या माणसाला डॉक्टर सांगतो, "सॉरी आपको क्यान्सर हुआ है". आणि मग तो घरातील ज्या ज्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा सुरु होत, "सॉरी सनी : मुलगा बाईकवर बसला असतो अचानक त्याची बाइक गायबते. वडील टीव्ही पाहत असतात टीव्ही गायबतो Sad Sad Sad शेवटी "सॉरी हनी Blush (पक्षी: बायको) आणि तिचा नेकलेस गायबतो. ........... Biggrin Biggrin Biggrin

ती वर्ल्ड कपची भारत-पाकिस्तान आवडली .
पहिल्यान्दा तो तरूण मग शेवटी त्याचा मुलगा फटाके घेउन वाट बघत रहतात >> मस्तंय ती जाहीरात Happy

नविन वाचकः ती तारक मेहता सिरीयल ची जाहिरात आहे. खूप छान अहे. सगळे मस्त नाचतात.
ती कँसर वाली जाहिरात पटली नाही, बाबा/नवरा/मुलगा कँसर मधून वाचण्यासाठी बाईक, नेकलेस आणी टीव्ही गेला तर घरच्याना वाईट वाटेल का?

ती वर्ल्ड कपची भारत-पाकिस्तान आवडली .
पहिल्यान्दा तो तरूण मग शेवटी त्याचा मुलगा फटाके घेउन वाट बघत रहतात .
>>>>>>>
अगदी अगदी, कब फोडेंगे यार Proud

बचपन से हम यही सीखाते आये है के लडके कभी रोते नही,
काश हम ये सीखाते के लडके कभी रुलाते नही,

हि माधुरीची जाहीरात, इफेक्टीव वाटते.

बचपन से हम यही सीखाते आये है के लडके कभी रोते नही,
काश हम ये सीखाते के लडके कभी रुलाते नही,<<< ही खूप सुंदर अ‍ॅड आहे. फार आवडली. शेवटी माधुरी नसती तरी चालली असती. Happy

बचपन से हम यही सीखाते आये है के लडके कभी रोते नही,
काश हम ये सीखाते के लडके कभी रुलाते नही>> नाही पाहीली. लिंक प्लीज

त्यात काश ऐवजी शायद आहे जे थोडे अनिश्चितता सुचवणारे आहे. माधुरी मॅडम ने वाक्य थोडे ठासून आणि जास्त आत्मविश्वासाने म्हणायला हवे होते हे माझे वै.म.
या जाहिरातीत 'हमे ये सिखाना चाहिये की लडके रुलाते नही' याऐवजी 'लडके रोते नही' हा संदेश जास्त आदळतो आहे. (अर्थात मला जाहिरात बनवता येत नसताना मी ती कशी चुकली सांगणे या हवेतल्या बाता आहेत.)

मी अनु, नाही. थोडा वेगळा प्रयत्न आहे. जाहिरात वारंवार आदळल्यानं "रडताना क्युट दिसणारी मुलं" हे व्हिज्युअल जास्त आदळणारं आहे. (तेच अभिप्रेतही आहे) त्यानंतर अचानक तेच एक हिंसक व्हिज्युअल येतं जे फारच अंगावर न येणारं आहे तरीही सटल आहे. अशीच दृश्ये जास्त दाखवली तर ते डोमेस्टिक व्हायलन्सवर आधारित ठरलं असतं. इथवरची जाहिरात फार आवडली. इफेक्टीव्हही वाटली. रडू नकोस असं सांगून सांगून केलेला इमोशनल ब्लॉकेज आणि त्यातून "कदाचित" उद्भवणारी हिंसक वृत्ती फार कमी वेळात चांगली दाखवली आहे.

त्यानंतर माधुरीबाई गोग्गोड बोलत सगळा आधी केलेला इम्पॅक्ट घालवतात. त्याऐवजी एखादा हार्ड हिटींग मेसेंजर असता तर जास्त चांगलं वाटलं असतं. सेलीब्रीटी मेसेंजर ऐवजी व्हॉइस ओव्हर आणि अजून एखादे सेम सुरूवातीचे व्हिज्युअल फार परिणामकारक ठरलं असतं.

शेवटी माधुरी नसती तरी चालली असती. स्मित>>

त्यानंतर माधुरीबाई गोग्गोड बोलत सगळा आधी केलेला इम्पॅक्ट घालवतात. त्याऐवजी एखादा हार्ड हिटींग मेसेंजर असता तर जास्त चांगलं वाटलं असतं.>> नंदिनी, सेलेब्रिटी फ़ेसची गरज का असते हे तुला सांगायला नको (आठव- फ़्रूटी आणि शाहरुख ) माधुरी एक वेल-नोन चेहरा तर आहेच, तिला स्वत:चं स्थान आहे. आणि ती गोड गोड कुठे बोलली आहे? बर्‍यापैकी फर्म आवाज आहे तिचा. त्यातून माधुरीला दोन्ही मुलगेच आहेत!! हा इम्पॅक्ट मोठाच आहे जाहिरातीचा उद्देश जास्त दूर पोचवण्यासाठी. माझ्या मते माधुरीला घेऊन त्यांनी हुशारीचं काम केलं आहे. She is the perfect brand ambassador for this campaign. जाहिरात आवडली.

अस वाट्तं की त्याच्याकडेच काहीतरी न्युज आहे आणि त्याच्या आईने पहिलटकराला खाण्याबद्दल सल्ले दिले आहेत .>> +१ Biggrin

पूनम, नाही तिथं माधुरी आवडली नाही. सेलेबच हवी असेल तर ती परफेक्ट बसत नाही. माधुरी मुळातच फार स्वीट वगैरे आहे, (त्यात चुकीचं काही नाही. तिची इमेज तशी आहे) पण तिथं मला एखादा यंग व्ह्ल्नरेबल फेस जास्त अपील झाला असता. मे बी आलिया भट्टच्या लीगमधलं कुणीही.

मुळात शेवटाला येतानाच जाहिरातीचा उद्देश थोडा ढळतोय. दोन्ही उद्देश चुकीचे नाहीत. लडके रूलाते नही हा बिगर पिक्चर झालाय पण त्याहून जास्त "इट्स ओके टू क्राय समटाईम्स" हे फार व्यवस्थितरीत्या पोचत्ंय आणि मला ते आवडलंय. अर्थात ही केवळ एकच अ‍ॅड या कॅम्पेनमध्ये नसणार अशी मलातरी आशा आहे. मला पूर्ण मल्टीमीडीया कँपेन बघायला आवडेल.

पूनम, नाही तिथं माधुरी आवडली नाही. सेलेबच हवी असेल तर ती परफेक्ट बसत नाही.>> ओके. पसंद अपनी अपनी. आवडीपेक्षा ती रेलेव्हन्ट वाटते तिथे. लेट्स अग्री टु डिफर हिअर.

मुळात शेवटाला येतानाच जाहिरातीचा उद्देश थोडा ढळतोय. >> हे मात्र बरोबर.

त्या अ‍ॅड मध्ये माधुरीची निवड चुकली आहे असे मलाही वाटले. परिणिती, आलिया किंवा अगदी प्रिचोसुद्धा जास्त योग्य वाटली असती.

मुळात जाहिरात कोणत्यातरी ठाम वळणाकडे जाते आहे हे जाणवत राहते. प्रत्येक प्रसंगात त्याचा रडणारा क्युट चेहरा आणि शेवटी चेहर्‍यावर राक्षसी आणि दगडी भाव असलेला गर्ल्फ्रेंडला/बायकोला मारहाण करतानाचा तोच चेहरा यातला फरक एकदम भिडतो. पण शेवटी माधुरी मॅडम एक वाक्य म्हणतात आणि तेही 'शायद' टाकून ते परीणाम करत नाही. (म्हणजे मला ते अनेकांचा विरोध असताना सोसायटी मीटिंगमधे घाबरत घाबरत केलेलं 'कदाचित मला असं वाटतं की आता तरी मुलांना नीट वागायला शिकवावं आपण' सजेशन जास्त वाटलं.) हे कोणी चांगलं केलं असतं मला माहित नाही, पण जाहिरातीतला मूळ संदेश लॉस्ट आहे असं दर वेळी वाटतं.
जाहिरात परीणामकारक आहे पण ज्यांनी बघायला हवी ते बघतात आणि मनाला लावून घेतात का अशी शंका दर वेळी येतेच.

म्हणजे मला ते अनेकांचा विरोध असताना सोसायटी मीटिंगमधे घाबरत घाबरत केलेलं 'कदाचित मला असं वाटतं की आता तरी मुलांना नीट वागायला शिकवावं आपण' सजेशन जास्त वाटलं. हे कोणी चांगलं केलं असतं मला माहित नाही, पण जाहिरातीतला मूळ संदेश लॉस्ट आहे असं दर वेळी वाटतं.
जाहिरात परीणामकारक आहे पण ज्यांनी बघायला हवी ते बघतात आणि मनाला लावून घेतात का अशी शंका दर वेळी येतेच.>>>>>>सहमत.

पण शेवटी माधुरी मॅडम एक वाक्य म्हणतात आणि तेही 'शायद' टाकून ते परीणाम करत नाही. (म्हणजे मला ते अनेकांचा विरोध असताना सोसायटी मीटिंगमधे घाबरत घाबरत केलेलं 'कदाचित मला असं वाटतं की आता तरी मुलांना नीट वागायला शिकवावं आपण' सजेशन जास्त वाटलं.) हे कोणी चांगलं केलं असतं मला माहित नाही, पण जाहिरातीतला मूळ संदेश लॉस्ट आहे असं दर वेळी वाटतं.>>> व्हेरी वेल सेड. एकदम सहमत.

ता.क, मला माधुरी आवडतेच.

जाहिरात परीणामकारक आहे पण ज्यांनी बघायला हवी ते बघतात आणि मनाला लावून घेतात का अशी शंका दर वेळी येतेच>>> याबद्दल जर वेळ मिळाला तर नक्की लिहिते. याच बाफवर.

आय यम फ्रोम हरियाना IIN वाली जाहिरात मराठी मध्ये जेव्हा दाखवतात तेव्हा अक्षरश: डोक आपटायची वेळ येते. ते सर्वे लोक डोक्याला मोबाईल लावून नमस्कार करतात तेव्हा तर Angry
( डोक्यात राख घेतलेली बाहुली ).................

माधुरीच परफेक्ट आहे तिथे.
आजच्या हिरोईनींमध्ये आलिया भट, ग्रेट. ती तिथे असती तर किती जणांनी तिलाच सिरीअसली घेतले असते हा इश्यू आहे. अर्थात यात त्या बिचारीचा दोष नाही, पण इमेज मॅटर्स..

अवांतर - किंबहुना अवांतर नाही खरे तर, पण एआयबी सारखे वादग्रस्त शो मध्ये (इथे त्यावर चर्चा नकोय) दिसणारे जर एखादा सामाजिक संदेश देत असतील तर तो किती जणांपर्यत इफेक्टेव्हली पोहोचेल ?

माधुरीने त्यात केलेला अभिनय किंवा संवादफेक फारसा जमला नसेल (अर्थात हा दिग्दर्शनाचाही भाग झाला) असा आक्षेप असल्यास समजू शकतो, ती फार महान अभिनेत्री नाहीच आहे. पण ती लोकप्रिय आहे आणि तिची लोकप्रियता सवंग नाही.

लास्ट बट नॉट द लीस्ट - मेसेज मुलांसाठी आहे, आणि माझ्यापर्यंत तो पोहोचला आहे. अन्यथा मीच इथे त्या जाहीरातीचा उल्लेख केला नसता Happy

Pages