मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॅगन आर ची नवीन जाहिरात छान आहे.बालवाडीच्या मुलांना वृध्दाश्रमात वृद्धांबरोबर वेळ घालवण्यासाठी घेऊन जाणे आणि तिथेच त्यांची शाळा सुरु करणे ही आइडियाची कल्पनाच फार सुंदर वाटली.
ह्या सगळ्यात गाडीचं काय कौतुक हे मात्र समजलं नाही. वॅगन आर चालवणारे वेगळा विचार करतात वगैरे असेल.. तर ते असो..पण जाहिरात मात्र आवडली.

"अब उसे खाओ , मेरा दिमाग मत खाओ " , डोमिनोज सब्विच .

मला जाम मजेशीर वाटली . दोघही आवडली .
तो तर जामच शोधून काढलाय Happy धोब्याचे पाच रुपये ..... अशक्य !!

हल्ली खास मुलांसाठी असलेल्या उत्पादनांच्या बहुतेक जाहिराती अत्यंत घआतक आहेत. जाहिराती म्हणून त्या खूप कॅची आहेत पण त्यातून मिळणारा संदेश मात्र खूप चुकीचा असतो.

जिम जॅम बिस्कीट्स - खोटे बोलून, फसवून मित्राकडची वस्तू मिळवा
किसान जॅम / एव्हरेस्ट पावभाजी मसाला - एखादी गोष्ट मिळवण्याकरता लाच द्या

वरवर शुल्लक वाटणार्‍या ह्या गोष्टी त्या अजाण वयात मात्र खूप सहज आत्मसात केल्या जातात.

ह्या सगळ्यात गाडीचं काय कौतुक हे मात्र समजलं नाही>>>> हो ना रिक्षानेजरी मुलं गेली तरी ती कल्पना छानच वाटणार . जाउद्या बाबा ,वॅगन आर वाल्यांना राग यायचा. Happy

स्वस्थि यांनी दिलेल्या वधुच्या पहील्या अ‍ॅड ची मॉरल ऑफ द स्टोरी ही आहे की-- मुली ह्या मुलांपेक्शा हुशार व एक कदम पुढेच असतात. Happy

आणि दुसरी मी दिलेल्याची अ‍ॅड ची मॉरल ऑफ द स्टोरी ही -- वधुकडे लग्नाच्या शेवटच्या क्षणापर्यंत चांगले ऑप्शन्स असतात.त्यामुळे मुकाट्याने मान खाली घालुन आपली हार पत्करावी आणि हार घालुन घ्यावा. फार गर्व करु नये नवरदेव असण्याचा . Proud Happy

जाहिरातींमधल्या शरीरप्रदर्शनाला आळा घालायला हवा.

"अब उसे खाओ , मेरा दिमाग मत खाओ " , डोमिनोज सब्विच .
मला जाम मजेशीर वाटली . दोघही आवडली .

>>>>

आजच काही तासांपूर्वी माझ्या ग'फ्रेंडने याचा उल्लेख केला. डोमिनोजमध्ये नवीन आयटम आला आहे. सब्विच म्हणून, सँडवीचचा भाऊ वगैरे..
मी त्यावर म्हणालो, की असेल काहीतरी फालतू, तर म्हणाली, जाहीरात तरी चांगली आहे Happy
आणि आता इथे हे..
अवांतर - डोमिनोज पिझ्झापेक्षा मला त्यांचा कॅलेझोन पॉकेट जास्त आवडते. ज्यूसी, यम्मी आणि वर भुरभुरलेला चटकदार मसाला..

जाहिरातींमधल्या शरीरप्रदर्शनाला आळा घालायला हवा. >>> सहमत आहे, भले जाहिरात कॉफीची का असेना Happy

खरे तर या मादक जाहीरांतीमुळे कॉफी हे पेय त्याच्या लायकीपेक्षा जास्त किंमतीला विकले जाते असे म्हटल्यासही वावगे ठरू नये.

लखन खुश झाला म्हणाला मी धावण्यात आलो पहिला
आई म्हणाली २ मिनिट
ही मॅगिची मराठीकरण झालेली जाहिरात डोक्यात जाते Sad जाहिरात एकूण बरी आहे पण त्याचं मराठी भाषांतर अगदीच असह्य आहे.

लखन खुश झाला म्हणाला मी धावण्यात आलो पहिला
आई म्हणाली २ मिनिट
ही मॅगिची मराठीकरण झालेली जाहिरात डोक्यात जाते जाहिरात एकूण बरी आहे पण त्याचं मराठी भाषांतर अगदीच असह्य आहे.
>>>
+11111111111111111111111111111111111111111111111111

खरे तर या मादक जाहीरांतीमुळे कॉफी हे पेय त्याच्या लायकीपेक्षा जास्त किंमतीला विकले जाते असे म्हटल्यासही वावगे ठरू नये.>> नाही पटलं!! Happy

जाहिरातींमधल्या शरीरप्रदर्शनाला आळा घालायला हवा.>> सहमत!!

मराठीकरण झालेली जाहिरात डोक्यात जाते जाहिरात एकूण बरी आहे पण त्याचं मराठी भाषांतर अगदीच असह्य आहे.>> जवळपास सगळ्याच जाहीरातींचे मराठीकरण असह्य आहे!! काय कारण असावं बरं???

कारण माज्याकडे आहे ५ रूपयांचा शिक्का.... (नाणं म्हणण्या ऐवजी हिंदी सिक्का या शब्दाचं सरळ सरळ भाषांतर? :अओ:)

जाहिरात इफेक्टिव्ह बनवायची असेल तर त्या त्या भाषेवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तिंना ते काम देऊन जाहिरात पुन्हा बनवून घेतली पाहिजे किंवा निदान जिंगल तरी

'लडके रोते नही' जाहीरातीत जो संदेश द्यायचा आहे तो जाहीरात खूप मोठी असल्याने भरकटतोय असे वाटते.
जी गोष्ट टाळायची आहे ती दहा वेळा रिपीट केल्याने त्याचा प्रभाव वाढतो आणि शेवटी नेनेबाईंचे फक्त एक वाक्य पॉझिटीव्ह प्रभाव पाडत नाही तितकेसे.
शिवाय या जाहीरातीतला लडके रोते नही ची उदाहरणे जरा कमी करुन शेवटी 'लडके क्या अच्छा कर सकते है ' हे दाखवण्यात वापरले असते तर?

जाहिरात इफेक्टिव्ह बनवायची असेल तर त्या त्या भाषेवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तिंना ते काम देऊन जाहिरात पुन्हा बनवून घेतली पाहिजे किंवा निदान जिंगल तरी >>अनुमोदन! पण त्यासाठी जास्त वेळ, जास्त काम, जास्त पैसा कोण घालवणार?? या लोकांना कमीत कमी एफर्ट्स आणि कमीत कमी इन्वेस्टमेंट मध्ये जास्त फायदा घ्यायचा असतो! क्वालिटीचा एवढा विचार करतील तर आधी प्रॉडक्टच्या क्वालिटीचाही करतील ना? पण नाही!!

"माझ्या मुलांना ऋतूंची दृष्ट न लागो! " डबिंग असले तरी माधुर्र्ररी ने काय गोड एक्स्प्रेशन्स दिलेत. नाही लागणार बाई दृष्ट,पण तुझ्या या अदा अशाच राहू दे असंच म्हणावंसं वाटतं लगेच. Proud

डोमिनोज पिझ्झापेक्षा मला त्यांचा कॅलेझोन पॉकेट जास्त आवडते. ज्यूसी, यम्मी आणि वर भुरभुरलेला चटकदार मसाला.. >>>अग्रीड Happy

आणि गर्लिक ब्रेड ही .
सब्विच खाल्लं , नाही आवडल.

मराठीकरण झालेली जाहिरात डोक्यात जाते जाहिरात एकूण बरी आहे पण त्याचं मराठी भाषांतर अगदीच असह्य आहे.>> जवळपास सगळ्याच जाहीरातींचे मराठीकरण असह्य आहे!! काय कारण असावं बरं???>>>>

कारण ते भाषांतर करतात , रूपांतर नाही Happy

आईचं दाट दूध मध्ये 'आईचं कोलोस्ट्रम' म्हणजे नेहमीच्या आईच्या दूधापेक्षा दाट पहिलं दूध अपेक्षित असावं.

आम्ही नाय खात पिज्जा बिज्जा Wink ,फक्त घरचे मुगाचे डोसे ,धिरडी ,थालीपिठं खातो . Happy

ते सबवीच ,बर्गर आणि सॅन्ड्वीच ची एकत्र केलेली कॉपी आहे. शेप मस्त ब्रेड चा दिसतोय त्रिकोणी पण खाल्लं नाहीये.

आपण बाबा घरचे बाहेरचे भेद नाही करत, अटक मटक ज्याची जीभेला लागेल चटक ते सारे खातो.
आज पाहिली ती जाहिरात, त्रिकोणी ब्रेडवाल्या सबविचची ..
आता ग'फ्रेंडच ठरवेल कधी खायचे ते
देव करो आणि तिला न आवडो

ग'फ्रेंडची काळजी घेताय ते चांगलच आहे. बहुतेक माझी वरची वधु अ‍ॅड वाली थियरी पट्लेली दिसतेय. Proud Happy

आणि हो तुम्हाला कॅलझोन आवडलेलं चालत आणि ग'फ्रेंडला सबवीच खायला आवडु नये यासाठी देवाला प्रार्थना .दिस इज नॉट फेअर . ( हातात छडी घेतलेली स्माईली)

सिनि,
हे तुमच्या दिस इज नॉट फेअर चे उत्तर ==> कॅलेझोन मी माझ्या'च पैश्यांनी खातो, आणि ग'फ्रेंड सबवीच माझ्या पैश्यांनी'च खाणार. Proud
असो, हा मला अगदी स्वतंत्र धाग्याचा विषय दिसतोय, तर इथे पुन्हा जाहीरातींवर येऊया Wink

Pages