मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आबासाहेब , मी ती जाहिरात कालच पाहिली . तेव्हा जरी पोस्टि वाचल्या तरी ऑफिसमध्ये यु ट्यूब ब्लॉक असल्याने पाहता आली नव्हती . त्यामुळे लक्षात राहिले नाही.

नवीन रणबीर कपूर ची जाहिरात पाहिली का? सगळ काही द्यायच्या नादात नेमक याला काय म्हणायचे आहे हे मला जेव्हा जेव्हा बघते तेव्हा तेव्हा नाही कळले. हां फक्त ती अनुष्का त्याला कॉल कर ची जी खुण करते तेवढाच डोक्यात गेल. Uhoh

इथे क्रिकेट म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न असताना पिचवरचा विराट डावलुन रणबीरच्या माकडचाळ्यांना आणि अनुष्काच्या जुनाट स्माईलला लोकं भुलतील अस वाटलच कस त्या जाहिरातदारांना Wink Lol

मला तर नक्की काय करतोय तो हेच कळत नाही Sad

जाहिरात कशाची आहे ते माहित नाही.. एकदाच बघितलेली.. कॅफे मधे जेवण किती वाईट आहे, बाहेर जाउ वगैरे म्हण्त असतो तो.. बॉस ला वाटतं तिलाच म्हणतोय.. पण तो मोबाइलवर बोलत असतो. नंतर तो डायरेक्टली तिलाच म्हणतो बाहेर जाउ या जेवायला म्हणुन.. अर्थात तो मुद्दाम ती फोनची ट्रिक वापरतो.. आवडली जाहिरात मला.

शुभांगी. | 10 March, 2015 - 14:03
इथे क्रिकेट म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न असताना पिचवरचा विराट डावलुन रणबीरच्या माकडचाळ्यांना आणि अनुष्काच्या जुनाट स्माईलला लोकं भुलतील अस वाटलच कस त्या जाहिरातदारांना

मला तर नक्की काय करतोय तो हेच कळत नाही
>>>>शशुभांगी तेच म्हणतेय मी. काही काही काळत नाही तो का एवढा नाचतो. खरच माकडचाळे करतो Biggrin Biggrin Biggrin

कॅफे मधे जेवण किती वाईट आहे, बाहेर जाउ वगैरे म्हण्त असतो तो.. बॉस ला वाटतं तिलाच म्हणतोय.. पण तो मोबाइलवर बोलत असतो. नंतर तो डायरेक्टली तिलाच म्हणतो बाहेर जाउ या जेवायला म्हणुन.. अर्थात तो मुद्दाम ती फोनची ट्रिक वापरतो.. आवडली जाहिरात मला.>>>>>>>>> ही म्हणजेच रणबीर / विराट / अनुष्का ..... का????????

Biggrin Biggrin Biggrin
Biggrin Biggrin Biggrin
नाहि नाहि अहो>>>.:G Biggrin Biggrin
ती नाही हि वेगळी आहे. TV वर म्याच चालू असते आणि ओपेन ग्राऊंडवर रणबीर आणि प्रेक्षक पहात असता अचानक बॉल प्रेक्षकात भिरकावला जातो तो नेमका रणबीर कडे आणि मग तो कपड्यात विंचू शिरावा तसा नाचायला लागतो वैगरे वैगरे.

रणबीर / विराट / अनुष्का ..>>> तद्द्न फालतु जाहिरात .

आज रेडिओ वर सरकारच्या 'सुकन्या' उपक्रमाची जाहिरात ऐकली .

एक: मी माझ्या मुलीला ईंजिनिअर बनवणार
दोन : मी माझ्या मुलीला पायलट बनवणार
तीन : त्यासाठी खूप खर्च येइल . आणि लग्न ?

मग 'सुकन्ये' ची माहिती.

..
..
मतितार्थ : तुम्ही या अकांउट मधून दोनदा पैसे काढू शकता . - एकदा शिक्शणासाठी आणि नंतर लग्नासाठी .
म्हणजे शेवटी मुलगी म्हणजे लग्नासाठी खर्च , त्याची तरतूद करून ठेवा , हा विचार काही मागे पडत नाहीये .. आणि तो ही शासकिय जाहीरातातुनही Sad

याच निमित्तने मला नीना कुलकर्णीची एल.आय.सी. ची जाहिरात आठवली . ती मूलीची पाठवणी करून ननंतर नवर्याच्या फोटोसमोर येउन म्हणते " इन्होने अपनी जिम्मेदारीया पूरी तरह से निभायी थी " असच काहीतरी
जाम डोक्यात जायची माझ्या ती जाहिरात Sad

बस पापाको खुष करना - ही जाहिरात, त्यातील मुले, वडील व आया पाहून आणि ते गाणे गातानाचा 'सर्दीने व्यापलेला' आवाज ऐकून हे जग तिरस्करणीय वाटू लागते.

एक हजारोंमे मेरे पापा है म्हणे!

येप-मी च्या जाहिराती आवडल्या -- शाखाच्या नाही त्या मुलीन्च्या .
" सियापा हो गया यार , मैने तो एक ही ... " मस्त मुलगी आहे ती .

कंन्टिन्यूटि ???
आपण चित्रपटात कन्टीन्यूटी शोधतो तसच जर जाहिरातीत पण शोधायची ठरवली तर खुप त्रुटी मिळतील
उदा* एका प्रसिद्ध डिटर्जेंट कंपनीची जाहिरात,
आजोबा (रमेश देव) नातवाला सांगताहेत आम्ही लवकर परत येवू
नातू हिरमुसलेला तेवढ्यात त्याला ऐकू येते आजोबा बूट शोधत आहेत
नातू पळत पळत जाउन बूट शोधतो
बुटाना पॉलिश नसल्याचे लक्षात येताच स्वतः पॉलिश करतो अर्थातच पूर्ण पांढरा टी शर्ट व पैंट पॉलिशने काळी झालेली
आजोबा तारीफ करतात तर आजी कौतुकाने सुनेला म्हणते तुझ्या हातांचे काम वाढले
सुन अर्थात मुलाची आई म्हणते टीशर्ट वरील डाग काढणे सोप्पे आहे (अशी कौतुक करणारी आई फ़क्त जाहिरातीच दिसते खरी मिळणे दुरापास्तच)

नेक्स्ट 4 सेकन्द ग्राफिक्स च्या माध्यमातुन डिटर्जेंटचे कौतुक (दहा हातांची शक्ती वगैरे)

पुढील फ्रेम मध्ये आजोबा आजी आई मुलगा बाबा घराबाहेर
बाबा गाडीत बॅग चढवण्याचा प्रयत्न करताहेत
मुलगा म्हणतो बाबाना पण हवी दहा हातांची शक्ती
हे म्हणताना त्याचा टी शर्ट एकदम पांढरा सफेद पैंट पण स्वच्छ
म्हणजे आईने दहा हातांची शक्ती वापरली
शर्ट पैंट धुतली वाळवली
आजोबा आजी 5-6 थांबले व सर्व नीट झाल्यावर प्रवास चालु करणार

धन्य ती जाहिरात व धन्य ते कंट्यूयूटी पाळणारे दिग्दर्शक

(हा एक विनोद म्हणून घ्यावा ,त्या मुलाकडे तसेच 2 शर्ट पैंट होते अश्या कॉमेंट करू नयेत हाहाहाहा)

---निलेश जोशी

Airtel Smartphone Network ची नवीन जाहिरात चार मित्र (३ मुले १ मुलगी) आपल्या आईस्कीमवाल्या अंकलची उधारी चुकवण्यासाठी एकत्रित एवुन त्यांना नवीन बस टाईप आईस्क्रीमची गाडी भेट देतात. त्या अंकलच्या चेह्रावारचे भाव काय छान आहेत आणि ते खरे खुरे वाटतात.

चार मित्र (३ मुले १ मुलगी)>>> कालच पाहिली पहिल्यांदा. मस्त जमलीये जाहिरात. जरा मोठी आहे. एअरटेलवाले काही दिवसांतच काटछाट करुन दाखवायला लागतील (सेकंदा सेकंदाचे आर्थिक गणित अर्थात), तेव्हा मात्र पूर्ण फिल येणार नाही असं वाटतं.

Pages