मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते जाऊंद्या....ती मॉडेल अप्रतिमच सुंदर आहे.....
फराह करमाई का असेच काहीतरी नाव आहे

रेमन्डची तरुण मुलीच्या बापाची लेट इट गो वाली जाहीरात खूप आवडली. मुख्यतः शेवटी चष्मा हातात चाळ्वत त्याचे एक्स्प्रेशन्स.

पॅरॅशूट् बॉडी लोशन्च्या जाहीराती आचरटच असतात .
या अगोदरची , ती लपाछुपी आणि पैंजणाची होती वाटतं .
पडद्यामागे लपतात ती .

एच.सी.एल ची जाहीरात आवडली . लांबलचक आहे , तरीही .

जाहीरातीतील शरीरप्रदर्शनाला माझा विरोधच आहे .पण ती जाहीरात आचरट जरी असली तरी त्यामागचा थॉट मला आवडला ,केवळ मुल झाले म्हणुन नवरा बायको तला रोमॅन्स आणि प्रेम कमी होता कामा नये.

क्वीकर च्या सर्व जाहीराती चांगल्या आहेत.
सोफा, मोबाईल, हाय फाय जिम च्या आणि ती बडी बडी बाते ओएलएक्स आहे का क्वीकार आठवत नाही पण चांगली आहे.

टायटन आय प्लस एनिग्मा ची चित्रांगदा सिंगची नवीन जाहिरात क्लास आहे...
चष्म्याच्या फ्रेम्स नक्की कश्या आहेत हे बघायला जाहिरात परत परत पहावी लागणार...कारण सध्या तरी त्या जाहिरातीत चित्रांगदा वरुन नजर हटत नाही Wink

आवडलेल्या जाहीराती... सध्या एवढ्याच आठवताहेत
त्यापैकी काही वर इतर प्रतिसादांत आहेतच.
रेमंड
https://www.youtube.com/watch?v=2hv42havE4w
https://www.youtube.com/watch?v=b5zba1xYyXI

किनले
https://www.youtube.com/watch?v=wgV-nwDttwE

एअर टेल वन टच इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=XseTNOFEE2A

नेसकॅफे (ही खूप आवडली... फ्रेश!! नेसकॅफेसारखीच!!)
https://www.youtube.com/watch?v=u1whG-9BjsQ

किंडल ची माटी तेरी कहानी तेरी वाली जाहीरात सुंदर. ते गाणं ऐकतच रहावंसं वाटतं.
आणि बांग्लादेश ची जाहीरात पण छान.
एनिग्मा टायटन ग्लास ची जाहीरात पण छान. चित्रांगदा सुंदर दिसते.

ड्रीमगर्ल सगळ्या अ‍ॅड मस्तच. रेमंड च्या मी पाहील्या नव्हत्या.पहीली अ‍ॅड तर आवडलीच .पण त्यात जी गाडी बाळाची आई चालवत आहे ती कार सुद्धा मस्त आहे.
दुसरी The Complete Man - Knowing when to let go मस्तच. किती क्रीयेटिव अ‍ॅड आहे ही, इमोशनल सुद्धा . Happy

एअर टेल वन टच इंटरनेट ची पण मस्त .त्यात ती लहान मुलगी लाजाळु च्या पानांना हात लावते व ती पाने मिटतात तेव्हाचे तीचे एक्स्प्रेशन्स क्युटच आहेत.

नेसकॅफे ची तर मी पाहीली होती .त्यातलं तर प्रत्येक वाक्य भारी. Happy
जसं की "मै भी धीट हुं , जोक सुनाये बगैर जाउंगा नही".
"सुबसुबह पार्क गया, वहां खुदही समझ गया , लाफ्टर क्लब , They'll lough at anything . मस्तच

पण मला जाम आवडली ती ही" किनले "ची --आशिष विद्यार्थी यांची ही बाप मुलीची अ‍ॅड फारच सुंदर आहे.प्रत्येक टीनेजर मुलींच्या वडिलांनी पहावी अशी. ज्यांना आपली मुलं मुली वाईट मार्गाने जातील याची उगाच भीती आहे.
वडिल न रागावता "लौटते हुवे चिक्की लेके आना" म्हणतात ते खुप एमोशनल पण मस्त Happy Happy

"आपलं घरी कुणीतरी वाट बघतय, वाहन सावकाश चालवा " Happy गाडी चालवताना अशी वाक्य असलेले बोर्ड दिसतात.पण त्याचबरोबर गाडी चालवताना हेलेम्ट घालणे ,चारचाकी चालवताना सीटबेल्ट लावणे या गोष्टी पण तीतक्याच महत्वाच्या आहेत. त्याच महत्व सांगणारया जाहीराती पुढे दिल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=A4yGNDBBuy8 आणि ही ,

https://www.youtube.com/watch?v=muCU6_Y_Kyo

लोकहो,

ही जाहिरात चांगली म्हणावी का वाईट! खास माबोवर आलीये गूगलकडून.

muslim_marriages_ad.jpg

ही जाहिरात येण्यापूर्वी हा धागा पाहत होतो.

आता बोला.

आ.न.,
-गा.पै.

ड्रीम्गर्ल... रेमन्ड च्या दोन्ही खूपच मस्त आहेत... खूपच!

वेअर युउर हेल्मेट वाली आई ची पाहीली होती.. मस्त आहे!

डाबर लाल तेल तर मस्तच!!! एक्दम हसुच आलं!

विविधभारतीला रमेश डाईंग ची मराठी जाहिरात लागते
मुझको ठंड लगरही है मुझसे दूर तू ना जा...
नवरा - थं डी वाजतेय ना? हा घे रमेश डाईंग चा स्वेटर
बायको - मुझको गर्मी हो रही है मेरे पास तु ना आ...

ही काय जाहिरात आहे? Sad

ती किंडल पेपर व्हाइट ची जाहीरात नाही आवडली एव्हढी... Sad
आजु बाजुला किती छान निसर्ग आहे आणि हा येडचाप किंडल मध्ये डोस्कं खुपसुन बसलाय Sad

मेन वुईल बी मेन च्या सगळ्याच मस्त पण ही विशेष आवडते... दोघांचेही एक्स्प्रेशन्स लाजवाब Proud https://www.youtube.com/watch?v=9DeyMVa0LeM

हे मिळालं अचानक मस्त प्रॉडक्ट्स प्रमोशन!! https://www.youtube.com/watch?v=gG3cTS28JMc

निवियाची जाहिरात पाहिली का ? मस्त आहेत शब्द
थोडासा प्यार है थोड़ा दुलार है , इस पल मै तेरा खयालहै . आवडली जाहिरात

किंडल पेपर व्हाइट ची जाहीरात मला तरी आवडली.
१. लांबच्या कंटाळवाण्या प्रवासात वाचनासाठी पुस्तकांच ओझ बाळगण्याची गरज नाही.
२. प्रवासात कुठेही कसेही पुस्तक वाचनाचा आनंद घेऊ शकता. अंधारात , प्रखर सुर्य प्रकाशात वगैरे
३. किंडलवरचे पुस्तक वाचुन तो त्या मुलांना खळखळौन हसवतो , रडवतो , त्यांच्या जिद्द निर्माण करतो.
४. शेवटच्या शॉटमधे तो पाया पडतो त्याचा मी घेतलेला अर्थ , जेव्हड जास्तीत जास्त तुम्ही वाचाल तेव्हडे जास्तीत जास्त तुमची निष्ठा द्रुढ होत जाते.
पार्श्व संगीत आणि गाण मला तरी खुपच आवडल. बर्‍याच दिवसांनी मिनिंगफुल अ‍ॅड पाहिल्यासारख वाटल.

ड्रीम्गर्ल तुला ___________________/\_____________________ ??? धनुकली?? ओव्हरडोस झाला की काय जाहीरातींचा?? अगदी कोपरापासून घातलंय Proud

धनुकली परमब्रत ची अ‍ॅड मस्त आहे .आधी नव्हती पाहीली. Happy

सॅमसंगची मी पण कालच पाहीली. टाकणार होते मीच पण dreamgirl ने बाजी मारली. मस्त आहे ती अ‍ॅड . आजकाल जुनी परिस्थिती बदलते आहे. असं वाटते हे वडिल पाहुन. Happy

मस्त प्रॉडक्ट्स प्रमोशन>> सुपर्ब .खरच कोपरापासुनचा नमस्कार माझापण. क्रियेटीव आहे एकदम .स्लीपरचा वापर फुलझाडांसाठी कमाल आहे ना!! Happy

Pages