मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनी कूकिंग ऑइल आणि फेविकॉल च्या नवीन एड्स मस्त आहेत.

सनी ऑइल च्या नवीन ऍड स्त्रियांना वेगवेगळ्या सिचुएशन कश्या हॅन्डल करायच्या हे स्वतःच ठरवा अश्यावर बेस्ड आहेत. आईला समजले की तिचा किशोरवयीन मुलगा त्याच्या ममाच्या सेलफोनवर अश्लील पहात आहे. ऍड मध्ये एक आई मोबाईल शोधत येते मुलगा मोबाईल बघत असतो ती म्हणते बेटा रेसिपी देखनी है मोबाईल देना आणि मुलाच्या हातून मोबाईल घेते मुलाचा चेहरा घाबरलेला आणि कॅमेरा आईच्या हातातील मोबाईल च्या स्क्रीन वर पॉर्न साईटवर पॉर्न पाहत असतो (हे ब्लर दाखवले आहे) आणि मग व्हॉईसओव्हर लाईन येते इस सिचुएशन को कैसे हॅन्डल करना है ये आप डिसाईड किजीये "लाईफ आपकी, रेसिपी आपकी"
ऍड आणखी एक स्पॉट अशा महिलेचे प्रदर्शन करते जी गर्भधारणेच्या गुंतागुंतातून जात आहे आणि तिला निवड करावी लागेल - तिने बाळाला ठेवले पाहिजे की नाही.
फेविकॉल ची ऍड एक लाकडी सोफा जो वर्षानुवर्षे चालतो यावर आहे.

बिकाजी च्या अमिताभला घेउन केलेल्या 'अमितजी, लव्ह्ज बिकाजी' जाहिराती मस्त आहेत.

लव्ह फॉर बिकाजी 'इज इन द एअर'
https://www.youtube.com/watch?v=89VEWPvvAyo

आज तो हॅटट्रिक पक्की!
https://www.youtube.com/watch?v=weMXJSGXOno

मला आवडलेल्या काही:
थँक्यू मॉम - पी अ‍ॅन्ड जी
https://www.youtube.com/watch?v=BnBvlz8EaZ0

लाइक अ गर्ल - ऑल्वेज
https://www.youtube.com/watch?v=XjJQBjWYDTs

डंब वेज टू डाय - पब्लिक सर्विस अनाउन्समेन्ट (मेट्रो ट्रेन्स मेलबर्न)
https://www.youtube.com/watch?v=IJNR2EpS0jw

Pages