मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रिटानिया मारी गोल्ड बिस्कीट्स ची जाहीरात पाहीली... "काही क्षण स्वतःसाठी"
अहोरात्र घरातील सर्वांसाठी झटताना स्वतःसाठीचे खास क्षण जगायला विसरलेल्या स्त्रियांना समर्पित!! टचकन पाणीच आलं डोळ्यात! एक कप गरम गरम चहाचा आयता कप कोणी द्यावा अशी अल्पशी सुप्त इच्छा असंख्यवेळा मनात डोकावून असंख्यवेळा मावळतेही! अशा वेळी कोणीतरी बस गं! किती दमशील? थोडा स्वत:साठी वेळ काढ! असं म्हणत गरम चहाचा कप आणि बिस्कीटे पुढे केली तर?? कष्टांचं काही वाटत नाही, ते समजून घेणारं कोणीतरी आहे ही भावनाच सुखद आहे! नाहीतर घड्याळाच्या काट्याला बांधलेलं आयुष्य पुढे सरकत असतंच यांत्रिकपणे!! लोभस क्षण काही काळ "जगायला" भाग पाडतात!

लगोलग आई ला मेसेज केला! "माझं माहेरपण कायमच साजरं करतेस. आता तू ये माहेरपणासाठी माझ्या घरी चार दिवस!!" म्हणून सांगायला!!

डोकोमो ची 'सोशल बटरफ्लाय निशा' वाली जाहीरात मस्त आहे. त्यात शेवटी ज्याप्रकारे तो गॉगलवाला मुलगा मख्ख्पणे लाईक चा अंगठा दाखवत चालत जातो ते भयंकर विनोदी आहे.
मला आजूबाजूला अनेक सोशाल बटरफ्लाय निशा दिसत असल्याने जास्त मनाला भिडली.
याच धाट्णीवर डोकोमो ची अजून एक माणसाची जाहीरात आहे ती मात्र अजून नीट बसून पाहिली नाही.

हे पाहीलेय कोणी? साध्या साध्या वाटणार्‍या गोष्टी... आजूबाजूला पाहीलेल्या... आपल्याही नकळत बर्‍याचदा आपणही केलेल्या!! खूप रिलेट झालं... https://www.youtube.com/watch?v=M-Qlo6Nxuf4

dreamgirl > आई ला मेसेज केला! "माझं माहेरपण कायमच साजरं करतेस. आता तू ये माहेरपणासाठी माझ्या घरी चार दिवस!!" म्हणून सांगायला!! > मस्तंच गं! खूप आवडलं.

ब्रिटानिया ची पण मस्त अ‍ॅड..

अगं dreamgirl, नमस्कार अशासाठी कि मि कधीही टीव्ही बघत नाही.. पण अ‍ॅड माझ्या आवाडीच्या..
त्याही अर्थ्पुर्ण असतील तर अजुनच गुंतायला होतं मला!
आणि मी टीवी बघत नसतना त्या तु माझ्यापर्यंत पोचव्तेस म्हणुन तुल नमस्कार केला.. लगे रहो.. Happy

डोकोमो ची 'सोशल बटरफ्लाय निशा' वाली जाहीरात मस्त आहे >> +१ सध्या च्या सोशल सेल्फीज ला पर्फेक्ट!!

https://www.youtube.com/watch?v=u1whG-9BjsQ

नेसकॅफेची जाहीरात . बोलतानाचा अडखळणारा कसा स्टँडअप कॉमेडीअन बनवतो . आपल्यातली उणीवेला आपली ताकत कशी बनवतो. अतिशय सुंदर
ग्रेटेस्ट अ‍ॅड एव्हर. इतकी सकारात्मक जाहीरात क्वचितच बनवली जाते. कल्पकतेला मानाचा मुजरा.

हे पाहीलेय कोणी? साध्या साध्या वाटणार्‍या गोष्टी... आजूबाजूला पाहीलेल्या... आपल्याही नकळत बर्‍याचदा आपणही केलेल्या!! खूप रिलेट झालं...>>>>++१०० खूप सुंदर आहे जाहिरात Happy लिंकसाठी धन्यवाद ड्रीमगर्ल Happy

मला ती गाणा.कॉम ची अ‍ॅड आवडली. जिंगल मस्त वाटलं..>>>>>>>>>>छान आहे. ति जिन्गल कुथे मिलेल?

TBZ च्या दोन्ही जाहिराती छान आहेत. काय गोड दिसते ती मोडेल वधूच्या वेषात, शिवाय ती नवरदेवाला वाकायला ज्या पद्धतीने लावते एकदम मज येते आणि जुते दो पैसे दो मध्ये ती स्वतःच त्याचे बूट पायात लपवते आणि ज्या गोड पद्धतीने हसते. कातिल.......दोन्ही मोडेल छान आहेत.

डोमिनोची चीजी हॅपी फीलिन्ग आवडली>>>

आमचे चिरंजीव मागच्या आठवड्यात पॉटीसीट वर बसून अखंड" चिजी हॅपी फिलिंग" गुणगुणत होते. तेव्हा काय बडबडतोय हेच समजत नव्हतं... आता ही जाहिरात आवडली तरी कसं म्हणू Happy

सैफ अलीखान च्या सर्व जाहीराती आणि त्यांच मराठी भाषांतर राग Angry आणि त्याचा आवाज काढण्याचा क्षीण प्रयत्न... अजूनच Angry

मित Happy

https://www.youtube.com/watch?v=tfGWo-gDt6s वोडाफोन रेड : मस्त अ‍ॅड!

टायटन रागा ची अ‍ॅड मस्तंय The Raga Woman Of Today : https://www.youtube.com/watch?v=zXRobOjVI9s

गोदरेज च्या या अ‍ॅड्स पण मस्त आहेत जुन्याच आहेत पण हिवाळ्यातच येत असल्याने आठवत नव्हत्या
https://www.youtube.com/watch?v=Ew8GnL3XMuk याचं जिंगल पण मस्तंय
https://www.youtube.com/watch?v=dJw4oSUIuk0 ही पण मस्त! आणि नुकतीच आलेय फ्रेश कॉज अ‍ॅड!! इझी हग्ज म्हणून!

dreamgirl,

The Raga Woman Of Today मस्तच आणि त्यामागचा थॉट तर अप्रतीम Happy ज्यांनी बनवली आहे अ‍ॅड त्यांना दंडवत आणि तुम्हालाही. Happy

गोदरेज च्या या अ‍ॅड्स>>हिवाळ्यात येणारया अ‍ॅडमधील लोकरीच्या कपड्यांसाठी उपयुक्त असं ते प्रोड्क्ट आहे.
दुसरी पण मस्त. नव्हती पाहीली.

ती वरची वोडाफोन ची पण मस्त - Get many good things in one. Happy

नवीन प्लॅटीनम इवारा ची अ‍ॅड आवडली. https://www.youtube.com/watch?v=9yj2jxKcCRY

ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट अ‍ॅड आणि प्लॅटीनम मस्त जमवलयं.आजकाल मराठी कलाकार अश्या अ‍ॅड मधे खुप दिसतात.(चांगलच आहे). यात ऐश्वर्या नारकर आहे.जिंगल असलेलं गाणं पण छान आहे . आवाज अमित त्रिवेदी च्या "इकतारा" ची आठवण करुन देतो .अ‍ॅड मधील आवाज कुणाचा आहे ?

अमुल ची नविन जाहीरात पण मस्त.. जुनच गाण कायम ठेवुन वेगळ्या चाली मधे दाखवतात.पदार्थ अर्थातच तोपांसु. Happy

जुनच गाण कायम ठेवुन वेगळ्या चाली मधे दाखवतात.>> हो, आवडले हे Happy

ऐश्वर्या नारकरला प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या जाहिरातीत पाहून खूपच गार वाटलं! Happy जाहिरातीचं गाणंही सुरेख आहे.

सेट मॅक्स च्या 'दिवाना बना दे' थीम वाल्या जाहिराती भन्नाट आहेत.. दोन पाहिल्या कालः-

पाहिली:- सुहागरात चा सेट. नववधू ला 'चके दे' स्टाईल मधे ' सत्तर मिनट है तुम्हारे पास' तिच्या मैत्रिणी ऐकवतात. हे सगळं समजावून सांगितल्यावर वर त्या रुम मधे येतो.. त्याचे एक्सप्रेशन्स जबरी आहेत Happy

दुसरी:- राजस्थानातल्या वाळवंटात खचाखच भरलेली सायकलरिक्शा (बहुतेक). चालक हळूहळू त्याचा गाडा ओढतोय. सगळेजण एकापाठोपाठ एक 'धूम' ची ट्यून गायला लागतात आणि तो चालक जोशात पळवायला लागतो Happy

Pages