मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती बाई मह्णते - ईव्हन बेटर, आय अ‍ॅम द वुमन ऑफ द हाऊस >>>> As against that, some days back saw a print ad on BEST bus. A lady in bridal jewelry with a line "I couldn't choose my husband. But I chose my bridal jewelry!" Angry

"I couldn't choose my husband. But I chose my bridal jewelry!"

>> फालतु

कानातले फारच मोठे आहेत , पण ती हिरॉईन आवडली .

>> +१. हिरे कसले भारी आहेत. शेवटच्या सीन मध्ये.

थॅक्स पियू .या लिंन्क्स कशा देता ते कुणीतरि सांगा प्लीज .मदतपुस्तिका लिंक दिली तरी चालेल.मला मदतपुस्तिकेत पटकन नाहि सापडलं.

सिनि.. सोप्पं आहे.

युट्युबवर ती जाहीरात मिळाली कि अ‍ॅड्रेस बार मध्ये त्या व्हिडिओचा जो अ‍ॅड्रेस येतो तो इथे कॉपी पेस्ट करायचा.

आता अ‍ॅड्रेस म्हणजे काय तर समजा तुम्हाला या धाग्याची लिंक द्यायची आहे कोणाला..
तर http://www.maayboli.com/node/51027 हे कॉपी पेस्ट करावे लागेल.

आता तुमच्या ब्राऊजरमध्ये "http://www.maayboli.com/node/51027" हि अक्षरे जिथे दिसताहेत त्याला म्हणतात अ‍ॅड्रेस बार. एखाद्या नवीन टॅब मध्ये तो व्हिडिओ चालु करुन त्याचा जो अ‍ॅड्रेस, त्या बारमध्ये दिसेल त्याला इथे कॉपी करा.

तुम्हाला जी जाहिरात हवी होती तिचा अ‍ॅड्रेस https://www.youtube.com/watch?v=UMavzyNt_5A हा होता. हवं तर पुन्हा त्या जाहिरातीचा व्हिडिओ उघडुन अ‍ॅड्रेस कन्फर्म करा.

शुभेच्छा !!!

या जाहीराती बघण्यात जास्त मजा आहे .तरीही हे घ्या.
तनिश्क जाहिरात पाहिली आई मुलाची >>>>या जाहिरातीत मुलगा आपल्या आईसाठी दिवाळीनिमित्त एक गिफ्ट आणतो ..पण त्या आधीच त्याचे वडिल त्याच्या आईला मोठा व सुंदर नेकलेस गळ्यात घालताना व आईला आनंदी पाहतो.थोडासा खट्टु होउन त्याचे गिफ्ट हळुच आपल्या आईला देतो.त्यात चेन पेडंट असते.जे त्याने स्वताच्या बोनस मधुन आणले आहे असे तो आईला सांगतो, आई लेकाकडे कौतुकाने पाहते .आईच्या डोळ्यात आनंदाश्रु येतात व आई खुप खुश होते.

दुसरी कॅडबरी सेलीब्रेशन ची ज्यात आर्मीतील चार जवान एकत्र बसुन चहा पीत आहेत .त्यापैकी एकजण घरच्यांशी दिवाळीनिमित्त अजिबात संपर्क होत नसल्यामुळे उदास आहे .तेव्ह्ड्यात दुसरा मित्र जवान त्याच्या नकळत त्याच्या घरच्यांना इशारा करतो मग बहीण ,आईवडिल आत येतात .जवान सरप्राइजिंगली घरच्यांकडे बघतो तर वडिल त्या मित्राला कॅडबरी सेलीब्रेशनचा डबा देतात .मुलगा वडीलांना विचारतो- मेरे लिये ?वडिल मिश्कीलतेने म्हणतात- माबाप के आशीर्वाद से बढ्कर और क्या हो सकता है?मित्र त्यावर म्हणतो -पॉइंन्ट है.आणी सगळे जवान हसत खेळत डबा एकमेकांकडे पास करत चॉकलेट्स खातात.मग -इस दिवाली खुशीयां ले चलो.हे ब्रीदवाक्य
.. या कॅडबरीच्या अ‍ॅड नेहमीच गोड असतात चॉकलेट्सारख्याच.

कॅडबरीची जाहिरात मस्तय! त्यातला तो मुलगा कोण आहे? आणि पाहिलाय त्याला पण कुठे तेच आठवत नाहीये!

उदास जवान -वेक उप सिड मधला रणबीर चा मित्र जो पास होतो
दुसरा मित्र-लुटेरा मधला रणवीर सिंग चा मित्र

मला कॅडबरी सिल्क कॅरॅमलची जाहिरातही आवडते. तरूण जेव्हा जेव्हा कॅरॅमल सिल्क खातो तेव्हा तरूणी येऊन ते खाऊन टाकते.. शेवट फार गोड आहे त्या जाहिरातीचा. मुलापेक्षा मुलगी मस्त आहे. तिचे ऑफिस फॉर्मल्स तर वॉव आहेत. तिने मस्त कॅरी केलेत.
माझ्यासाठी ही कॅडबरी सिल्कची पहिलीच अ‍ॅड जी पाहून इइइइ होत नाही! Proud

अमृता सुभाष ची नविन अ‍ॅड आवड्ली. वडील घरी नसल्यामुळे मुलगा उदास असतो आता क्रिकेट कोण शिकवनार म्हणून, तर ती मोबाईल वर व्हिडीओ पाहून मुलाला क्रिकेट खेळायला शिकवते, ती..

<< Dell च्या जाहीरातीतील मुलगी बापाला tubelight म्हणते
आमच्या तिर्थरूपानी कानाखाली आव्वाज काढला असता >>

कुणी अजून हॉलिडे चित्रपट पाहिलेला नाहीये का?

पैलवानासारख्या शरीरयष्टीची सोनाक्षी सिन्हा तिच्या सामान्य तब्येतीच्या वडिलांच्या कानाखाली एक जोरदार आवाज काढते. ह्या दृश्याबद्दल इथल्या वाचकांचं मत जाणून घ्यायला आवडेल.

>>पैलवानासारख्या शरीरयष्टीची सोनाक्षी सिन्हा तिच्या सामान्य तब्येतीच्या वडिलांच्या कानाखाली एक जोरदार आवाज काढते.

ह्याबाबत तिच्या पिताश्रींचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल Wink

माझं नाव शिवसेना या जाहिराती मस्त जमल्यात.
>>>>>
अगदी अगदी, हेच या धाग्यावर लिहायला आलो होतो.

गेले दोन दिवस घरी असल्याने बरेच राजकीय जाहीराती बघणे झाले त्यात शिवसेनेच्याच बेस्ट वाटल्या.
थीम मस्त आहे, शिवसेनेने एक संघटना म्हणून रूटलेव्हलला जे काम केलेय ते पाहता मुंबईकरांना तरी या जाहीराती पटतील आणि भिडतील अश्या आहेत. तसेच सादरीकरण आणि अभिनयाच्या बाबतीतही टॉप क्लास आहेत. राजकीय जाहीरातींमध्ये कल्पकता बघणे हा सुखद धक्काच!

अवांतर - कित्येकांनी आपल्या सोशलसाईट प्रोफाईलचे नाव किंवा स्टेटस वगैरे "माझं नाव शिवसेना" केलेय यातच या जाहीरातींचे यश!

आणि हो शिवसेनेच्या इतरही लोकगीतांच्या जाहीराती आहेत त्या देखील छान वाटल्या.

तळटीप - हे मत जाहीरातींचा रसिक या नात्यानेच दिलेले आहे, याचा कोणत्याही राजकीय पक्षाकडे झुकणार्‍या माझ्या कलाचा संबंध नाही याची खात्री बाळगा Happy

पैलवानासारख्या शरीरयष्टीची सोनाक्षी सिन्हा तिच्या सामान्य तब्येतीच्या वडिलांच्या कानाखाली एक जोरदार आवाज काढते.
>>>>> सिरीअसली???? Uhoh

गेले दोनचार दिवस नेमके जेवताना काला हिट कॉक्रोचची कसलीशी अ‍ॅड लागतेय आणि तो जगातला सर्वात किळसवाणा किटक झुरळ जेवता जेवताच पटकन बघितला जातोय Angry

गेले दोनचार दिवस नेमके जेवताना काला हिट कॉक्रोचची कसलीशी अ‍ॅड लागतेय आणि तो जगातला सर्वात किळसवाणा किटक झुरळ जेवता जेवताच पटकन बघितला जातोय राग>>
तर मग जेवताना काला हीट जवळ ठेवा... झुरळ आला की टीव्हीवर फवारा. Wink

व्होडाफोनच्या जाहिराती मस्त आहेत. शिटी वाजवून पब्लिक खूश होत नाही असं पाहून सगळी वाद्ये एकाच वेळी वाजवणारा कलाकार किंवा जगप्रवासाला निघालेल्या आपल्या व्यक्तीला बनवून दिलेली लाकडाची सायकल... खूपच छान. जाहिरातीतले संगितही छान जमले आहे.

चांगल्या वेळी जेव किंवा जेवताना tv बघु नकोस Proud राजकारणावरचे धागे काढ्तोस त्याचा बद्ला घेतायत ते:फिदी: Happy

Pages