Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल अमुलची नवी जाहीरात
काल अमुलची नवी जाहीरात पाहीली... मस्त आहे..
ब्रिटानिया मारी गोल्ड
ब्रिटानिया मारी गोल्ड बिस्कीट्स ची जाहीरात पाहीली... "काही क्षण स्वतःसाठी"
अहोरात्र घरातील सर्वांसाठी झटताना स्वतःसाठीचे खास क्षण जगायला विसरलेल्या स्त्रियांना समर्पित!! टचकन पाणीच आलं डोळ्यात! एक कप गरम गरम चहाचा आयता कप कोणी द्यावा अशी अल्पशी सुप्त इच्छा असंख्यवेळा मनात डोकावून असंख्यवेळा मावळतेही! अशा वेळी कोणीतरी बस गं! किती दमशील? थोडा स्वत:साठी वेळ काढ! असं म्हणत गरम चहाचा कप आणि बिस्कीटे पुढे केली तर?? कष्टांचं काही वाटत नाही, ते समजून घेणारं कोणीतरी आहे ही भावनाच सुखद आहे! नाहीतर घड्याळाच्या काट्याला बांधलेलं आयुष्य पुढे सरकत असतंच यांत्रिकपणे!! लोभस क्षण काही काळ "जगायला" भाग पाडतात!
लगोलग आई ला मेसेज केला! "माझं माहेरपण कायमच साजरं करतेस. आता तू ये माहेरपणासाठी माझ्या घरी चार दिवस!!" म्हणून सांगायला!!
डोकोमो ची 'सोशल बटरफ्लाय
डोकोमो ची 'सोशल बटरफ्लाय निशा' वाली जाहीरात मस्त आहे. त्यात शेवटी ज्याप्रकारे तो गॉगलवाला मुलगा मख्ख्पणे लाईक चा अंगठा दाखवत चालत जातो ते भयंकर विनोदी आहे.
मला आजूबाजूला अनेक सोशाल बटरफ्लाय निशा दिसत असल्याने जास्त मनाला भिडली.
याच धाट्णीवर डोकोमो ची अजून एक माणसाची जाहीरात आहे ती मात्र अजून नीट बसून पाहिली नाही.
मला ती गाणा.कॉम ची अॅड
मला ती गाणा.कॉम ची अॅड आवडली. जिंगल मस्त वाटलं..
दिपु. + १० शेवटी नाचणारी झिद
दिपु. + १०
शेवटी नाचणारी झिद मधली हिरवीण आहे बहुतेक.
हे पाहीलेय कोणी? साध्या
हे पाहीलेय कोणी? साध्या साध्या वाटणार्या गोष्टी... आजूबाजूला पाहीलेल्या... आपल्याही नकळत बर्याचदा आपणही केलेल्या!! खूप रिलेट झालं... https://www.youtube.com/watch?v=M-Qlo6Nxuf4
dreamgirl > आई ला मेसेज केला!
dreamgirl > आई ला मेसेज केला! "माझं माहेरपण कायमच साजरं करतेस. आता तू ये माहेरपणासाठी माझ्या घरी चार दिवस!!" म्हणून सांगायला!! > मस्तंच गं! खूप आवडलं.
ब्रिटानिया ची पण मस्त
ब्रिटानिया ची पण मस्त अॅड..
अगं dreamgirl, नमस्कार अशासाठी कि मि कधीही टीव्ही बघत नाही.. पण अॅड माझ्या आवाडीच्या..
त्याही अर्थ्पुर्ण असतील तर अजुनच गुंतायला होतं मला!
आणि मी टीवी बघत नसतना त्या तु माझ्यापर्यंत पोचव्तेस म्हणुन तुल नमस्कार केला.. लगे रहो..
धन्स धनुकली!! जाहीराती
धन्स धनुकली!! जाहीराती बघायला मलाही आवडतात!
डोकोमो ची 'सोशल बटरफ्लाय
डोकोमो ची 'सोशल बटरफ्लाय निशा' वाली जाहीरात मस्त आहे >> +१ सध्या च्या सोशल सेल्फीज ला पर्फेक्ट!!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=u1whG-9BjsQ
नेसकॅफेची जाहीरात . बोलतानाचा अडखळणारा कसा स्टँडअप कॉमेडीअन बनवतो . आपल्यातली उणीवेला आपली ताकत कशी बनवतो. अतिशय सुंदर
ग्रेटेस्ट अॅड एव्हर. इतकी सकारात्मक जाहीरात क्वचितच बनवली जाते. कल्पकतेला मानाचा मुजरा.
हे पाहीलेय कोणी? साध्या
हे पाहीलेय कोणी? साध्या साध्या वाटणार्या गोष्टी... आजूबाजूला पाहीलेल्या... आपल्याही नकळत बर्याचदा आपणही केलेल्या!! खूप रिलेट झालं...>>>>++१०० खूप सुंदर आहे जाहिरात लिंकसाठी धन्यवाद ड्रीमगर्ल
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=yvEr0fqYWs0 नवीन नाही अॅड. पण पाहा.
आयडीआ ची नविन आयआयएन युनि. ची
आयडीआ ची नविन आयआयएन युनि. ची अॅड डोक्यात जाते
सैफ अलीखान च्या सर्व जाहीराती आणि त्यांच मराठी भाषांतर
मला ती गाणा.कॉम ची अॅड
मला ती गाणा.कॉम ची अॅड आवडली. जिंगल मस्त वाटलं..>>>>>>>>>>छान आहे. ति जिन्गल कुथे मिलेल?
ग्रेटेस्ट अॅड एव्हर. >>>>>
ग्रेटेस्ट अॅड एव्हर. >>>>> +१ मलाही ती जाहीरात प्रचंड म्हणजे प्रचंडच आवडली
TBZ च्या दोन्ही जाहिराती छान
TBZ च्या दोन्ही जाहिराती छान आहेत. काय गोड दिसते ती मोडेल वधूच्या वेषात, शिवाय ती नवरदेवाला वाकायला ज्या पद्धतीने लावते एकदम मज येते आणि जुते दो पैसे दो मध्ये ती स्वतःच त्याचे बूट पायात लपवते आणि ज्या गोड पद्धतीने हसते. कातिल.......दोन्ही मोडेल छान आहेत.
डोमिनोची चीजी हॅपी फीलिन्ग
डोमिनोची चीजी हॅपी फीलिन्ग आवडली
TBZ ची नवीन वाचक म्हणतात ती
TBZ ची नवीन वाचक म्हणतात ती अॅड मस्त वाटतेय.. दोन्हीही मस्त!
डोमिनोची चीजी हॅपी फीलिन्ग
डोमिनोची चीजी हॅपी फीलिन्ग आवडली>>>
आमचे चिरंजीव मागच्या आठवड्यात पॉटीसीट वर बसून अखंड" चिजी हॅपी फिलिंग" गुणगुणत होते. तेव्हा काय बडबडतोय हेच समजत नव्हतं... आता ही जाहिरात आवडली तरी कसं म्हणू
सैफ अलीखान च्या सर्व जाहीराती
सैफ अलीखान च्या सर्व जाहीराती आणि त्यांच मराठी भाषांतर राग आणि त्याचा आवाज काढण्याचा क्षीण प्रयत्न... अजूनच
मित
https://www.youtube.com/watch?v=tfGWo-gDt6s वोडाफोन रेड : मस्त अॅड!
मित , ईईईईईईई
मित , ईईईईईईई
टायटन रागा ची अॅड मस्तंय
टायटन रागा ची अॅड मस्तंय The Raga Woman Of Today : https://www.youtube.com/watch?v=zXRobOjVI9s
गोदरेज च्या या अॅड्स पण मस्त आहेत जुन्याच आहेत पण हिवाळ्यातच येत असल्याने आठवत नव्हत्या
https://www.youtube.com/watch?v=Ew8GnL3XMuk याचं जिंगल पण मस्तंय
https://www.youtube.com/watch?v=dJw4oSUIuk0 ही पण मस्त! आणि नुकतीच आलेय फ्रेश कॉज अॅड!! इझी हग्ज म्हणून!
dreamgirl, The Raga Woman Of
dreamgirl,
The Raga Woman Of Today मस्तच आणि त्यामागचा थॉट तर अप्रतीम ज्यांनी बनवली आहे अॅड त्यांना दंडवत आणि तुम्हालाही.
गोदरेज च्या या अॅड्स>>हिवाळ्यात येणारया अॅडमधील लोकरीच्या कपड्यांसाठी उपयुक्त असं ते प्रोड्क्ट आहे.
दुसरी पण मस्त. नव्हती पाहीली.
ती वरची वोडाफोन ची पण मस्त - Get many good things in one.
नवीन प्लॅटीनम इवारा ची अॅड
नवीन प्लॅटीनम इवारा ची अॅड आवडली. https://www.youtube.com/watch?v=9yj2jxKcCRY
ब्लॅक अॅन्ड व्हाईट अॅड आणि प्लॅटीनम मस्त जमवलयं.आजकाल मराठी कलाकार अश्या अॅड मधे खुप दिसतात.(चांगलच आहे). यात ऐश्वर्या नारकर आहे.जिंगल असलेलं गाणं पण छान आहे . आवाज अमित त्रिवेदी च्या "इकतारा" ची आठवण करुन देतो .अॅड मधील आवाज कुणाचा आहे ?
बिजलि बचाओ , देश बनाओ जामच
बिजलि बचाओ , देश बनाओ
जामच आवडली ...
https://www.youtube.com/watch?v=fJxpyqN1SPg
धनुष ची से.न्टर फ्रेश ची 'हे
धनुष ची से.न्टर फ्रेश ची 'हे स्वीटी' जाहीरात आवडली.
सगळे खूप छान करतात रेट्रो नाचगाणे.
अमुल ची नविन जाहीरात पण
अमुल ची नविन जाहीरात पण मस्त.. जुनच गाण कायम ठेवुन वेगळ्या चाली मधे दाखवतात.पदार्थ अर्थातच तोपांसु.
जुनच गाण कायम ठेवुन वेगळ्या
जुनच गाण कायम ठेवुन वेगळ्या चाली मधे दाखवतात.>> हो, आवडले हे
ऐश्वर्या नारकरला प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या जाहिरातीत पाहून खूपच गार वाटलं! जाहिरातीचं गाणंही सुरेख आहे.
सेट मॅक्स च्या 'दिवाना बना
सेट मॅक्स च्या 'दिवाना बना दे' थीम वाल्या जाहिराती भन्नाट आहेत.. दोन पाहिल्या कालः-
पाहिली:- सुहागरात चा सेट. नववधू ला 'चके दे' स्टाईल मधे ' सत्तर मिनट है तुम्हारे पास' तिच्या मैत्रिणी ऐकवतात. हे सगळं समजावून सांगितल्यावर वर त्या रुम मधे येतो.. त्याचे एक्सप्रेशन्स जबरी आहेत
दुसरी:- राजस्थानातल्या वाळवंटात खचाखच भरलेली सायकलरिक्शा (बहुतेक). चालक हळूहळू त्याचा गाडा ओढतोय. सगळेजण एकापाठोपाठ एक 'धूम' ची ट्यून गायला लागतात आणि तो चालक जोशात पळवायला लागतो
Pages