मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनी Proud

आमच्याकडे चांगली वेळ म्हणजे आई गरमागरम जेवायला वाढेल तीच नाहीतर नंतर स्वताच्या हाताने गरम करून घ्यावे लागते.
आणि जेवताना टि.व्ही न बघण्याचा पर्यायच नसतो, कारण जेवताना सर्वांनी एकत्र बसायचे हा आईचा नियम आणि त्यावेळी टिव्हीवरच्या मालिका बघणे हा तिचा छंद आहे. फारतर टिव्हीकडे पाठ करून बसू शकतो, पण आजकाल मराठी मालिकांमध्ये हिरोईन छान छान असतात, त्यांना बघून दोनचार घास जास्तच खाल्ले जातात Proud

ऋन्मेष चॅनल चेंज करायचं ताबडतोब.
तरी नशिब झुरळ येतं... अनेक लोक जेवत असताना हुसेन हार्पिक घेऊन येतो त्यांच्या टिव्हिवर Proud

दक्षिणा,
चॅनेल चेंज करायचा हक्क पुरुषांना दिलाय आपल्या संस्कृतीने ?? Uhoh

बाकी तो हुसेन चालसे, पण विशाल आला तर त्यापेक्षा मला त्यांचे प्रॉडक्ट बघणे परवडते. बाबा किती ओवर अ‍ॅक्टींग करतो तो..

मला अत्यंत न आवडणारी जहिरात म्हणजे Phlilips Aquatouch. इलेक्ट्रिक रेझरने दाढी जळालेला तो गलिच्छ चेहरा आणि नंतर शेव्ह केल्यावर अगदीच बावळट दिसणारा मॉडेल. बंडलेस्ट अ‍ॅड आहे.

मुस्लीम शेजार्‍याकडे जायला नकार देणारं ओल्ड कपल, चहाच्या खुशबुमुळे त्या शेजारणीच्या घरी जातं आणि चहामुळे दुरावा संपतो ही अ‍ॅड आवडली.

हिंदी अ‍ॅडची मराठी वर्जन्स त्यातल्या भाषांतरामुळे इतकी फालतु वाटतात.

कार्टून नेटवर्क या गटात बसणार्या चॅनेल्स व्यतिरिक्त फारसे चॅनेल्स बघायला मिळत नाही.
त्यामुळे साधारणपणे लहान मुलांच्या जाहीराती बघायला मिळतात .

बहुतेक अ‍ॅडस मध्ये एखादा मुलगा ( किन्वा मुलगी) दूसर्याला कमी लेखण्याचा प्रयन्त करते असे वाटते .

--छोटे बंटी , तेरा साबून स्लो है क्या?

--लगता है ये छोटा भीम नही देखता . ई. ई.

बहुतेक जाहीरातितिल मुल आगावू वाटतात - टायगर बिस्किटांच्या एका अ‍ॅडमध्ये तो मुलगा , पाच रूपयाच नाण दूकानदाराकडे टिचकी मारून स्ट्रायकर सारख सरकवतो .

" न जाने इसे कब इन्स्टंट एनर्जीकी जरूरत पडे" वाल्या दोन्ही अ‍ॅडस बकवास .
त्यांचे प्रसंग चुकले आहेत .

कार्टून नेटवर्क या गटात बसणार्या चॅनेल्स व्यतिरिक्त फारसे चॅनेल्स बघायला मिळत नाही.
त्यामुळे साधारणपणे लहान मुलांच्या जाहीराती बघायला मिळतात >>> +१
याच चॅनेल्सवर आजकाल सारखी लागणारी सेंटर फ्रूट ची कैसी जीभ लपलपाई (जपानी मुलगी) वाली जाहिरात मस्त जमली आहे.

थोडंसं धाग्याला अवांतर. पोगो वर त्यातल्या त्यात छोटा भीम आणि Zee Q चॅनल एकंदरच सोडलं तर बाकी सगळीकडे लहान मुलांनी पाहू नये असलंच काहीतरी कार्टून च्या नावाखाली दाखवतात!

स्वस्ति +१

आगाऊ असणे आणि चुणचुणीत असणे यात फरक आहे.
जाहिरातीतली बरीचशी लहान मुले आगाउच वाटतात.

पोगो वर त्यातल्या त्यात छोटा भीम आणि Zee Q चॅनल एकंदरच सोडलं तर बाकी सगळीकडे लहान मुलांनी पाहू नये असलंच काहीतरी कार्टून च्या नावाखाली दाखवतात!

>> मी जुन्या कार्टून नेटवर्कची आणि हाना-बार्बराची फॅन आहे खुप मोठ्ठी.
फ्लिन्स्टन्स, जेटसन्स, स्कुबी डू आणि बरेच..
इथे कोणी आहे का जुन्या काने चा चाहता?

मित , झी॓ क्यु , मला पण आवडलं , लेक ही आवडीने बघतो .

डिस्कवरी किड्स वर " किड्स स्पाएझ " लागते ती पण आवडते पण त्यावरील बाकी कार्यक्रम इतके नाही आवडले.

मिस्टर मेकर पण मस्त आहे .चॅनेल आठवत नाही .
दूसरी एक आवडती वाहीनी म्हणजे निक ज्यु. त्यावरचे सगळेच कार्यक्रम आवडतात - डोरा , उमीझूमी , पीटर रॅबिट .

अवांतराबद्दल क्षमस्व Sad

बहुतेक जाहीरातितिल मुल आगावू वाटतात
>>>
अगदी अगदी, स्मार्ट जनरेशन दाखवायचा प्रयत्न असतो बहुधा त्यांचा.

मॉम पण स्मार्ट झाल्यात .. वात्सल्यच हरवत चाललेय ..
मग त्या तनिष्कच्या जाहीरातीतील मुलाकडून हिरा स्विकारणारी आई खूप भावते ..

सगळ्याच अ‍ॅड अश्या आगाउ मुलांच्या नसतात काही अपवादही असतात . 'सबूत आगे है मेरे दोस्तो' -

https://www.youtube.com/watch?v=_d8O-CqtH4U .

https://www.youtube.com/watch?v=-Jdc8ckZYxE .

https://www.youtube.com/watch?v=6RsEQdVWQz4 .

https://www.youtube.com/watch?v=yX45sau4EHM .

मुलांचं बालपण ,निरागसपणा कायम राह्ण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. मला जे सुंदर बालपण मिळालं त्याच्या सारखच बालपण माझ्या पुढ्च्या पिढीला मिळावं या साठी मी तरी नक्की प्रयत्न करेन.

सगळ्याच अ‍ॅड अश्या आगाउ मुलांच्या नसतात काही अपवादही असतात . 'सबूत आगे है मेरे दोस्तो' ->>>>
अग्रीड

पण या जाहिराती लहान मुलांसाठीच्या नाहीत .
म्हणजे याचा टार्गेट ऑडिअन्स Happy

ऋन्मेऽऽष -नाही(मी तेवढीही हुशार नाही) Happy .
मी फक्त अ‍ॅड बघते .आवडली तर इथे टाकते .सर्वांना आस्वाद घेता यावा म्हणुन, या जाहीरातींचा माझा काहीही संबंध नाही रसिक या नात्यानेच मी या इथे टाकते .( संशय येणार्यांनी तो केवळ योगायोग समजावा). Lol (हे कंसातलं असं का लिहीतात तेही एक कोड्चं आहे). Happy .
वयाने मोठी माणसे विचाराने वागली तर टार्गेट होत नाहीत . Happy .

हे पाहुन नक्कीच तुम्ही इमोशनल व्हाल पण चेहरयावर एक सुंदर स्मित येईल .जे या दिवाळीत तुमच्या घरच्या लोकांसाठी खुप खास असेल.

https://www.youtube.com/watch?v=IclB2EBK4iw .

https://www.youtube.com/watch?v=U9fAGp47-4s .

https://www.youtube.com/watch?v=DlB4hFTAxOo .

https://www.youtube.com/watch?v=q0ATHqGKadQ .

https://www.youtube.com/watch?v=odmcmnWjK10 .

https://www.youtube.com/watch?v=8C7XNMpwBr4 .

https://www.youtube.com/watch?v=WAFpIN1-p-E .

https://www.youtube.com/watch?v=3jd_DJMlWSc .

https://www.youtube.com/watch?v=LLh7MO8M4GA .

आणि ही माय फेवरेट ओल्ड क्लासिक https://www.youtube.com/watch?v=FVChyy_moiM .

हुश्श.. आता बस नाहीतर मला ब्रँन्ड अ‍ॅम्बॅसेटर समजायचे सर्वजण या प्रोड्क्ट्चे . Happy Happy Happy Happy .

सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेछा .

एवढा जास्त ही विचार करायचा नाही . मी सहज म्हणाले होते, त्याचा अर्थ लहान मुलांना " बँक " यात रस नसतो किंवा कळत नसते .जसं मोठ्या वयाची माणसे केवळ अ‍ॅड पाहुन वस्तु किंवा इतर गोष्टी घेत नाहीत.विचार करुन खरेखोटेपणा तपासुन घेतात .एवढच .कधी कधी मी पण अ‍ॅड ला भुलते Happy पण आता त्या गोष्टी टाळते .
एनी वे ,बाय ,आता दारात पणत्या लावायच्या आहेत खरयाखुरया.

टीबीझेडच्या दोन्ही नवीन जाहिराती खूप मस्त आहे.. वधू जाम खोडकर आणि वराचे एक्स्प्रेशन्सही मस्त. ज्वेलरी कसली आहे यार त्यातली...क्लास!!!

टीबीझेडच्या दोन्ही नवीन जाहिराती खूप मस्त आहे.. वधू जाम खोडकर आणि वराचे एक्स्प्रेशन्सही मस्त. ज्वेलरी कसली आहे यार त्यातली...क्लास!!!>>> + १०००००००००००

कोण आहे कोण ती ? कट्रीना ची चुलत बहिण वाटते .

https://www.youtube.com/watch?v=Sw3tEcz2PK0

"बहुतेक अ‍ॅडस मध्ये एखादा मुलगा ( किन्वा मुलगी) दूसर्याला कमी लेखण्याचा प्रयन्त करते असे वाटते .
--छोटे बंटी , तेरा साबून स्लो है क्या? "
या जाहिरातीत लाकडी बादल्या इ, दाखवण्याची गरज नव्हती. खर्चिक आणि भारतातला न वाटणारा कँपिंग सेट अप आहे.

कोण आहे कोण ती ? कट्रीना ची चुलत बहिण वाटते . > वाणी कपुर आहे शुध्द देशी रोमांस मधली.

रेमेंण्ड ची नवीन अ‍ॅड देखील छान आहे. बाळासाठी आई घरी न थांबता वडील घरी थांबतो. छान कंन्सेप्ट चेंजिंग अ‍ॅड आहे

पोगो वर त्यातल्या त्यात छोटा भीम आणि Zee Q चॅनल एकंदरच सोडलं तर बाकी सगळीकडे लहान मुलांनी पाहू नये असलंच काहीतरी कार्टून च्या नावाखाली दाखवतात!<<< डिस्ने ज्युनिअर निक ज्युनिअर आणि झी क्यु आमच्याकडे आवडीची चॅनल्स आहेत. छोटा भीम बिल्कुल आवडत नाही. कार्टून्सच्या नावाखाली अतिशय घाण स्टीरीओटायपिंग दाखवतात.

टीबीझेड क्लास जाहीराती दाखवतायत.. एक्सप्रेशन्स आणि गाणं काय कमाल आहे! प्रसंग किती घिसेपीटे.. पण त्यातही भरभरून नावीन्य ओतलंय. कन्सेप्ट टीमला दाद आहे.

टीबीझेड क्लास जाहीराती दाखवतायत.. एक्सप्रेशन्स आणि गाणं काय कमाल आहे! प्रसंग किती घिसेपीटे.. पण त्यातही भरभरून नावीन्य ओतलंय. कन्सेप्ट टीमला दाद आहे.>>>>>>>>>> + १००

रेमेंण्ड ची नवीन अ‍ॅड देखील छान आहे. बाळासाठी आई घरी न थांबता वडील घरी थांबतो. छान कंन्सेप्ट चेंजिंग अ‍ॅड आहे.

टीबीझेड क्लास जाहीराती दाखवतायत.. एक्सप्रेशन्स आणि गाणं काय कमाल आहे! प्रसंग किती घिसेपीटे.. पण त्यातही भरभरून नावीन्य ओतलंय. कन्सेप्ट टीमला दाद आह
>>>>> + १००

Pages