चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही विटॅमिन्स १०० डिग्री से ( उकळत्या पाण्यात) डिकॉम्पोज होतात व ती शरीराला मिळत नाहीत. शिजविण्याची प्रक्रिया सुलभ पचनासाठी सुरु झाली . सूप फॉर्म मध्ये ही विटॅमिन्स मिळत नाहीत. म्हणून भाज्या आणि फळे कच्चीच खाण्याची शिफारस केली जाते.पण हे पुन्हा वैय्यक्तिक पचनशक्तीवर अवलम्बून आहे. काहीना कच्च्या भाज्या डायजेस्ट होत नाही.

देवकि, स्मूदी मिक्सर मधून काढले व गाळले कि, ज्युसर मधुन काढले?>>>>> सॉरी! उशिरा लिहितेय.
स्मूदी मिक्सरमधून काढून किंचितच पाणी घातले आणि झालेले गिरगिट ,चमच्याने खाल्ले.लालभोपळा,पहिल्यांदा कच्चा खाल्ला.पण नंतर थोडसा शिजवून बाकी पदार्थ कच्चे(काकडी,गाजर,पुदिना) घालते.मीठ घालत नाही. मी हे सर्व थोड्या प्रमाणात करते.तेही हल्ल्लीहल्ली चालू केलेय.कधी बंद होईल पत्ता नाही.

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ? या चित्रगुप्त यांच्या लेखाचा व त्यावरील चर्चेचा धागाकर्ते व वाचक यांना आनंद घेता येईल.

मिपा वरचा तो लेख वाचला. आधी ते कोलोन फोटो पाहून प्रतीक्रिया यक्क्क अशी होती.पण लेखकाला जो त्रास आहे त्यामुळे त्याला हे उपाय करुन फायदा झालाही असेल.
तसेच लेखातले सकाळीच रस काढून बाटल्यात नेणे आरोग्याच्या दृष्टीने पटले नाही.(ज्याला रसाहार करतो हे ऑफिसात दाखवणे चालते त्याला एखादा मिनी ज्युसर पँट्रीत ठेवून ताजा रस काढणेही चालेल असे वाटले.)

कुठलीही गोष्ट ( ती कितीही चांगली असली तरी) अति प्रमाणात वाईट अस माझ मत .

संतुलित आहार अन व्यायाम याला पर्याय नाही Sad

आता ऑफिस टाइम जरा लवकर सुटण्याचा आहे त्यामुळे बर्‍याच दिवसांची योगा जॉइन करण्याची इच्छा पुर्ण करु शकते. पण .. आता योगा की पावर योगा मधे कंफ्युज झाले आहे. कुणी माहीती देउ शकेल काय?

वजन वाढलेय , उद्यापासून योग्य आहार आणि व्यायाम .सकाळी लवकर उठणे अजून त्रासदायक होते , मग वेळ न मिळणे सुरु होते .
पण उद्यापासून मनावर घ्यायचे ठरवले आहे.
अजून कोणा कोणाला कमी करायचे वजन ? त्यांनी पण व्यायामाला सुरुवात करा .

छोट्या छोट्या गोष्टी

१. डॉक्टरकडून किंवा आहारतज्ञांकडून आहार लिहून घ्यावे.
२. सकाळी रिकाम्या पोटी एकदा आणि रात्री झोपताना वजन करावे.
३. खिशात मावेल अशी डायरी करा. त्यात रोजचा आहार लिहावा.
४. आहाराची सवय झाली कि एखादा व्यायामप्रकार सुरू करावा (चाळीशीनंतर डॉ. ना विचारून).
५. वजन वाढले की डॉक्टर / आ.त. यांना डायरी दाखवावी व काय चुकलेय ते जाणून घ्यावे.
६. डॉ. कडे नियमितपणे वजन केल्यास वजन कमी करण्याचे दडपण राहते. बरेचदा आपणच आपले जज्ज असलो की जाऊदे , राहू दे असं होतं आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं सुरू होतं. सगळं माहीत असतं पण सोनाराकडून कान टोचून घेणं आवश्यक असतं. ज्यांचा स्वतःवर ताबा आहे ते अपवाद समजावेत.
७. शक्य झाल्यास एक किलो वजन उतरल्यावर बॉडी मसाज घ्यावा.
८. सण, समारंभात डाएट प्रोग्रामची बो-या उडालाच तर झेपेल इतका व्यायाम वाढवावा.
९. व्यायामाच्या आधी आणि नंतरही वजन करावे.
१०. महीन्याला तीन किलोच्या आसपास वजन उतरेल अशा पद्धतीने एकदा प्रोग्राम सेट झाला की पुढचे काही महीने त्यात बदल करण्याची आवश्यकता नसते ( खूप जास्त वजन असलेल्यांसाठी ). सहा सात महीन्यात भरपूर वजन कमी झाल्यानंतर पुढचा प्रोग्राम पुन्हा एकदा डॉक्टरांकडून लिहून घ्यावा.
११. प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते त्यामुळे नेटवरचे प्रोग्राम वाचून त्याप्रमाणे स्वतःच साहस करू नये.

कपोचे चांगली पोस्ट आहे . स्पेशली मुद्दा क्रमांक १ आणि ११ खूप महत्वाचा आहे

राजगिऱ्याला इंग्रजीत काय म्हणतात ते माहित नाही . पण इथे मुंबईत भैय्याला राजगिराचे लाडू आहेत का ( हो हो भैय्याला देखील मराठीतच विचारते Wink ) अस विचारलं असता बरोबर काढून देतो म्हणजे राजगिराच म्हणत असावेत हिंदीत . चूभूदेघे

पादुकानन्द धन्यवाद.

माझं दुपारचं जेवण एक वाजता आणि संध्याकाळचं सातच्या पुढे असतं. यादरम्यान साडेचार ते साडेपाच या वेळेत मला मुरमुरे, ३ वा ताक असं काही तरी घ्यायला सांगितलं आहे. रस्त्यात येता जाता राजगिरा घेणं हे जास्त सोयीचं असल्याने त्यातल्या कॅलरीजब्द्दल विचारणा करीत होतो.

मी सहा किलो ओव्हरवेट आहे, मला चालायला जायचेय, पण रोज काही ना काही अडचण येतेय..
>>
डीविनिता आणि इतर जे आळस करतात त्यांच्यासाठी अनुभवाचे बोल. (सगळ्यांचे आरोग्य चांगले राहो ही श्री पादुकांना प्रार्थना)
टच्वूड..
पण काही तरी झटका बसल्याशिवाय माणूस भानावर येत नाही.
आमच्या एका महिला नातेवाइकाना डायबेटीसचा त्रास होउ लागला . खाण्यापिण्याची अतोनात आवड. व्यायाम नाही. वैद्यकीय सल्ला मनायचा नाही. हळूहळू एकेक स्टेज पार करीत इन्सुलिन इंजेक्शनवर पाळी आली . तरी सगळं जिथल्यातिथं चालूच. व्यायाम न करणेही. वजनही बरेच वाढल्याने व्यायमही मुश्किल होऊ लागला. चालायला सांगितले की १५-२० मिन्टे चालून यायचे. नन्तर तर शुगर एवढी वाढू लागली की आठ आठ दिवस अ‍ॅडमिट करून ती नॉर्मल करावी लागे. हे मीस्वतः पाहिले कारण त्यांच्या हॉस्पिटलायझेशन ची जबाबदारी घर इस्पितळाच्या जवळ असल्याने आमची. त्याला काही हरकत नव्हती म्हना.

मलाही गेल्यावर्षी डाक्टरानी वार्निंग दिली होती की तुम्ही प्रिडायबेटिक स्थितीत आहात तुम्ही तुमचे वजन ( ९६ कि) कमी करा व्यायाम करा इत्यादी. पण दुर्ल्क्ष , आळस, वेळ होत नाही, जमत नाही, उद्यापासून, वगैरे. इनपुट चा कार्यक्रम व्यवस्थित चालू होता Wink
एका आठवड्यात जरा जास्तच जडपणा, सुस्ती, झोप, जाणवायला लागली. थकवा जाणवू लागला . म्हणून स्वतःच शुगर्स लॅबमधून तपासून घेतले आणि उडालोच. दोन्ही शुगर्स वाढल्लेया ,च्कोलेस्टेरॉल, ट्रायग्लि सराईड्स वगैरे सगळे धोक्याच्या पातळीच्या वरून वाहू लागलेले. काही लिटरेचर वाचले तर डायबेटीस हा सायलेंट किलर असून त्याने रेटिना , किडन्या डॅमेज होतात असे वाचले. लगेच एका डायबेटालॉजिस्टची अपाँटमेन्ट घेतली . ते दिवाळीच्या सुटीनिमित्त आठवडाभर नव्हते. तोवर मी स्वतःच डायट नियमन सुरू केले व चालू लागलो. पहिले म्हनजे मीठ, आणि सर्व गोड पदार्थ एकदम बंद केले. ( मी तेवढ्या बाबतीत फार फर्म असतो. एकदा ठरले की मात्र ठरले. मला कसलेही क्रेविंग येत नाही ) पूर्ण दिवाळीत फराळाचा एक कणही खाल्ला नाही.नन्तर डोक्टराची भेट झाली. त्यानी सुगर घेतली अर्थातच जास्तच होती. पण मागच्या टेस्ट पेक्षा कमी. त्यानी सोनोग्राफी , रेटिनोग्राफी वगैरे सगळ्या टेस्ट करायला सांगितल्या . का तर काही डॅमेज झालेय का ते पहायला. मग मात्र टरकलो. टेस्ट होईपर्यन्त जिवात जीव नव्हता , सुदैवाने सुरुवातच असल्याने काही निघाले नाही. मग डॉक्टरानी 'सदुपदेश ' केला . तो एरव्ही मलाही माहीत होत पण ते सगळे दुसर्‍याने पाळायचे मला काय झालेय म्हणून दुर्लक्ष. मात्र आता लक्षपूर्वक ऐकले. त्यानी सगळे मेटॅबॉलिक कन्सेप्ट म्हणजे शुगर , इन्शुलिन, त्याला रेसिस्तन्स कसा व का होतो, काय करायला पाहिजे सगळे समजाच्वून सांगितले.
औषधाच्या गोळीची तूर्त गरज नाही मात्र तुअम्च्यावर 'वॉच ' ठेवून तुमचे ' वर्तन 'कसे आहे त्यावर पुढचे ठरवू असे सांगितले. मग मी खाण्याची पथ्ये विचारली. आश्चर्य म्हणजे सगळे पदार्थ खाण्याची परवानगी त्यानी दिली. एक तास ब्रिस्क वॉकिंग मात्र...
मात्र ...
मात्र...
त्यानी जो कंडिशनल फॉर्म्युला दिलाय तो फारच महत्वाचा आहे.
तो असा....
माजे आदर्श वजन ७५ ते८० किलो आहे (सध्याचे ९६). या ८० किलोला रोज २५ -३० कॅलरीज प्रति किलो आवश्यक आहेत. म्हणून १६०० ते १८०० कॅलरीजच फक्त घ्यावयाच्या. त्या खालील वेळात
_________________________________________
१) वेळ ......................कॅलरीजची टक्केवारी .................१६०० कॅल. ची आहारातली विभागणी
________________________________________
सकाळ चहा .................५% ...........................८०
नाश्ता ................२०% ........................... ३२०
दुपारचे जेवण ............... ३०% ...........................४८०
संध्याकाळ स्नॅक्स ..............१५% ........................... २४०
रात्रीचे जेवण ...............२५% ........................... ४००
झोपताना दूध्/कॉफी ............. ५% ............................ ८०
________________________________________
आता पदार्थाचे वजन आणि कॅलरीज हे अनुभवाने व वेगवेगळ्या चार्टने ठरवावे .व आवडत्या पदार्थाची अदलाबदल करावी. म्हणजे असे की आईसक्रीम खायचे असेल तर त्याच्या कॅलरी इक्विवॅलन्सचा पदार्थ (उदा:भात वगैरे ) ताटातून बाहेर काढून त्याग करावा. भात आवडत असेल तर तेवढ्याच कॅलरीजचाच भात घ्यावा. पोळी काढावी. वगैरे. अशा पद्धतीने सगळे पदार्थ खा पण इक्वीवॅलन्स एक्सचेंज पद्धतीने ::फिदी:
डोक्टरांच्या टेबलवर एक छोटा किचन बॅलन्स (तराजू) होता त्यावर मूठभर शेंगदाण्याची एक पुरचुंडी पारदर्श कॅरी बॅगमधे होती तिचे वजन १०० ग्रॅम होते ( मूठभरच होते हो तरीही १०० ग्राम) . डॉ. नी सांगितले की ह्या १०० ग्राम शेंगदाण्याच्या ६०० कॅलरी ज होतात.म्हनजे तुमच्या जेवणाच्या क्यालरीजचा दिवसाचा एक तृतीयांश कोटा मूठभर शेंगदाण्यात संपेल.बाप रे !!! मग मी मनातल्या मनात माझ्या पोटात काय काय जाते त्याचा हिशेब करायला सुरु वात केली तर क्यालरीजची संख्या कॅल्क्युलेटरचे डिजिट संपल्यावर जसा एरर मेसेज येतो तसा येऊ लागल्यावर बंद केले गणित. ( पुढे चालू)

असो . ह्या कॅलरी अक्षरशः छोटा वेईंग स्केल आणून पदार्थाचे वजन मोजले तरी हरकत नाही. नंतर अंदाज येतोच.
काही धक्कादायक कॅलरीजः

१ स्लाईस ब्रेड =७०., एक मूद भात =१००, ज्वारीची भाकरी = २०० ( ही मी पोळीच्या ऐवजी 'हलके 'अन्न म्हणून खात असे Wink , चीज (१०० ग्राम) =३५०, आईसक्रीम १ वाटी=२००, १ घडीची पोळी =१६०,
बटातेवडा , ४५ ग्राम=१२०, भजी ६० ग्राम , १ मसाला डोसा ,=२०० , पावभाजी १ प्लेट = ७७५ , २ समोसे= २८५, सँड्विच =२००+, व्हेज कटलेट = ३००, जिले बी ४ =५००, सर्व एकदल धान्ये १०० ग्राम= ३५०, ओलनारळ्=ळ १०० ग्राम =४५०, खोबरे सुके १०० ग्राम =६६०,भाज्या १०० ग्राम= ४० ते५० कॅ, मनुका खजूर १००ग्रा.= ३००, लोणी १०० ग्रा.=७३०. तेल १०० ग्९००= ९०० व्हिस्की= २५० Wink ,

मग माझा डायट प्लान असा
सकाळी ०६:३० वाजता ४ मारी बिस्कीटे व कोमट पाणी . चहा नाही.
०७०० ते ०८:३० फास्ट वॉकिंग
०८:३०... २०० मिलि दूध, १०० ग्रा. पपई
०१:३० -- एक पोळी आणि भाजी ( बिनमीठाची)
१७:३० संध्याकाळी --- थोडे फुटाणे
२०:३० रात्री--- एक पोळी व व्हाईट ऑम्लेट किंवा भाजी.
आठवड्यातून एकदा वाफवलेला फिश. १००-२०० ग्राम
गेल्या दोन महिन्यात साखरेचा एक कणही घेतलेला नाही.
सुरुवातीला एक तास आणि आता दीड तास जलद चालतो
परिणामः-
शुगर फास्टिंग १०० आणि पीपी १३० असते.
वजन ५ किलो कमी झाले आहे ( अजून १२ किलो कमी करायचे आहे)
मला थोडा बीपी असल्याने मीठ मी क्वचित घेतो ...
मला दिवसाच्या कोणत्याही वेळेस काही तरी खावे असे क्रेविंग येत नाही. रात्री साडे दहाला झोप डोळ्यावर येते . दिवस भर फ्रेश वाटते.

तात्पर्य अगदी गळ्याशी आले म्हणून एवढी आणीबाणी पुकारावी लागली. सबब; जमत नाही, वेळ नाही, हे खाल्ल्याशिवाय ते खाल्ल्याशिवाय जमत नाही, पोट भरल्यासारखे वाटत नाही या सबबी बंद करा . नुसते जेवण ( १८०० कॅलरीज Sad ) पाच वेळा विभागले तरी वजन कमी होऊ लागते.
धीर सोडू नका विजय तुमचाच आहे.
मी आता केदार जाधवला गुरू करीत आहे !

पादुकानंद वर तुम्ही अगदी बरोबर लिहिलय . कॅलरी बद्द्ल आपल्या काही गैर समजुती आहेत .
पोळी ऐवजी भाकरी अन नो भात ही एक मेजर .
अन ती डायजेस्टिव्ह बिस्किटे दुसरी . फक्त १० -१५% ओट्स, व्होल व्हीट वगैरे अन उरलेला मैदाच असतो . अन अरे आत्ता डायजेस्टीव्ह खातोय ना मग खाऊ २ ऐवजी ४ म्हणून ते कांउटर इंट्युटिव्ह का काय ते होते Happy

Pages