चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीएम डाएट अजिबात करू नका. जिथून या डाएटबद्दल माहिती मिळवलीत तिथेच शोधाशोध केलीत तर भरपूर आकलनीय कारणे मिळतील.

मायबोलीवरच बर्‍याच भक्तांनी माहिती टाकली आहे. मला तर त्यात फारसे अनिसर्गिक दिसत नाही. सिद्ध समाधी योग या प्रणालीच्या बर्‍याच जवळ जाणारा हा कार्यक्रम वाटतो...

कारणे दाखवा>>>> ज्या वेगाने वजन कमी होईल त्याच्या दुप्पट वेगाने वाढेल हे डायट बंद केल्यावर . हपिसातल्या एकीचा आँखो देखा हाल है .
मुळात डायट म्हणजे हिरवे गवत , बिनमिठाचे पदार्थ खाने वगैरे पूर्वग्रह मनातून काढून टाका . ताबडतोब डायटीशियनला गाठा

हॅप्पी फूडिंग

रॉहू, १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी ब्लेझरमध्ये शिरण्याचा पराक्रम करायचा आहे का? तर करा जी एम डाएट Proud

जोक राहू दे, तात्पुरत्या परीणामांसाठी जी एम डाएट ठीक आहे, पण कायमस्वरुपी उपायासाठी उपयोगी नाही. उलट शरीराची हानीच जास्त होते. त्यातून तुमची मर्जी!
जीएमडाएटमध्ये १ ते ७ दिवस काय आणि किती खायचे हे तपशीलात दिलेले आहे. महिन्यातून एक आठवडा हे पाळा असे म्हणतात. पण तो एक आठवडा संपल्यानंतर ८व्या, ९ व्या दिवशी काय खायचे हे कुठे दिले आहे का? किंवा डाएटचा आठवडा सोडून बाकी ३ आठवडे काय खायचे हे कुठे आहे काय?

सोनचाफा, अभिनंदन.. हीच चिकाटी सुरु ठेव.. हॅव पेशंस.. तीन महिन्यांत रिझल्ट मिळायला सुरुवात होईल

माझी मैत्रिण डॉक्टरांच्या सल्ल्याने हा उपाय करतेय.
१ मूठ तांदूळ +१ मूठ मूग डाळ+ १२ पट पाणी हे तीन वेळा (स.दु.सं.) २ दिवस.
नंतर वरील प्रमाण +६पट पाणी + वेलवर्गीय भाज्या कमी तिखटाच्या२ दिवस
नंतर खिचडी +वरील भाजी+सॅलड (टॉमेटो सोडून),गोड पदार्थ नाही.तेलकट नाही.गहू नाही.भाकरी खायची
२ जेवणात फळ खाणे.
१५ दिवस झाले.१ १/२ किलो वजन कमी झालेय तिचे.सर्वात महत्वाचे त्वचेचा पोत सुधारला आहे.तिला मानले पाहिजे की ती हे निष्ठेने पाळतेय.

रॉहू, जी एम डाएट इज कंप्लीट नो नो..

डेस्परेट मोमेंट मधे झालंय करून.. रिझल्ट अगदी तात्पुरता मिळेल..

रिमेंबर स्लो अ‍ॅण्ड स्टेडी विन्स द रेस?? Happy

या पद्धती ला फॉलो करत, डिझायरेबल वजन अचीव करून जवळ जवळ एक वर्षं होत आलंय मला. गेल्या ७ महिन्यांत १०० ग्राम ही वाढलं नाही वजन.उलट व्यायाम वाढवला तर दर आठवड्याला एक किलो वजन अजून कमी होतंय (स्वानुभावाने)

माझ्या घरी, कपालभातीचे १२००-१३०० स्ट्रोक्स्,अनुलोम-विलोम १५ मिनिटे ,वर्ष-दीड वर्ष चालू आहे.आकारमान बरेच कमी झाले आहे. माझी टाप नाही हे करायची.

रॉहू, जी एम डाएट इज कंप्लीट नो नो..

डेस्परेट मोमेंट मधे झालंय करून.. रिझल्ट अगदी तात्पुरता मिळेल..

>> + १ . दोनदा केलेल आहे . वजन परत आहे तेवढच , उलट थोड जास्तच होत .

>>>
मनोनिग्रह म्हणाल तर हिरवे अथवा वाळलेले गवत देखील बिन मिठाचे खायची तयारी आहे :फिदीफिदी<<<

अहो मनोग्रह झालाच आहे मग सुरु करा व. अनुभव लिहाच गवत खाण्याचा. इथे मायबोलीवर " वाळलेले गवत आणि वजन" अशी कथा पाडा/ किस्सा लिहा / बीबी नवीन काढा.

Proud

जोक्स अपार्ट,

जीएम डायट घातकी आहे.

ह्यासाठी आणखी काय कारणे? शाळेत शिकलोच की चौरस आहार नित्यनेमाने घ्यायचा. आता ह्यातच समजा. नाहीतर वाळकं गवत आहेच. Proud

एक ग्यारंटीड उपाय, मला उपयोग झालेला. संध्याकाळचे लाईट जेवण सात साडे सात पर्यंत झालेच पाहीजे. (नंतर हेवी जेवण नाही Happy ) ज्या ज्या वेळेस मी हे करू शकलो आहे त्या त्या वेळेस लोकांच्या लक्षात येइल असा बदल एक दोन आठवड्यात झाला आहे.
सद्ध्या पुनः प्रयोग चालू आहे.:)

लोक्स, बर्याच महिन्यांच्या आळसानंतर परत ग्रुपात येत आहे.
आहार तज्ञाचि वेळ घेतलि आहे. तो परयंत भात पुर्ण बंद, आणि साखर कमीत कमी, तेलकट बंद, बाहेरचे अन्न बंद असे ठरविले आहे.
पण मला ईडली, दोसे, आप्प्पे असे पदार्थ खुप खावेसे वाटतात.

आज काल फेसबुक वर निती मोहन या मुलीचं डिटॉक्स डायेट फारच फेमस झालंय, एका फेबु गृपवर लोकं / बाय्का अगदी १ महीन्यात ७-८ किलो कमी झालंय म्हणतायत आणि त्वचेचा आणि केसांचा पोत सुधारला आहे असं ही म्हणताय्त.

इथे कोणी स्मूदी पिणारी मंडळी आहेत का?
असतील तर मला प्लीज सांगा आयडिअली कोणत्या वेळेला स्मूदी प्यावी (वजन कमी होण्यासाठी)
फळ सालासकट घालता का? दुध घालून फिरवायचे का मिक्सरला? दुध आणि फळं हे कॉम्बी चालते का?

मी स्मूदी करुन पिते रोज सकळी आणि सन्ध्यकाळी
कृती : ५-६ पालकाची किन्वा कुठल्याही पालेभाजीची पाने (मेथी व शेपू सोडून), ४-५ पुदिन्याची पाने, ४-५ तुलशीची पाने, १ विड्याचे पान, अर्ध्या लिम्बाचा रस, २ सफरचंद किन्वा पेअर्स, चिमुटभर सैंधव मीठ, हळद, दालचिनी
पावडर, मिरपूड, दीड ग्लास पाणी. मिक्सरमधुन फिरवणे. ताजे उपाशी किन्वा अन्शीपोटी पिणे उत्तम
अर्धा तास काही खाऊ पिऊ नये.
फळे (सालासकट) व पाने गरम पाण्यात धुऊन घेणे.
वजन कमी होण्यास आणि अ‍ॅसिडीटी कमी होण्यास उत्तम.

ऑल द बेस्ट

.

हो प्राची नीती संजीवच ती. Happy facebook वर Let's dot it raw नावाचा ग्रुप आहे. खुप लोकांनी ८-१० किलो ही कमी केलंय.

मीही १५ पाउंड कमी केलंय नीतीच्या डायेटने पण मी सॅलड मध्ये एखाद चमचा आमटी किंवा भाजी घेते. पण सकाळी १२ सुर्यनमस्कार आणि संध्याकाळी अर्धा तासा वॉक आताच चालू केलाय. अजून एक महीन्यात १० पाउंड कमी करायचा गोल आहे. मला वाटतं माझं अजून कमी झालं असतं पण सकाळी २ तास तरी मला काहीही खायला वेळ मिळत नाही आणि तेव्हढ्यातच २ कप चहा होतो.

रोज मी ग्रीन स्मूदी पीते. सुरुवातीला फार मिळीमीळीत लागली पण आता तशीच आवडतेय.

नीती संजीव भरपूर आहेत. नेमकं कोण आहे ते बघावं लागेल.
पिंपळे सौदगर्/औंध भागात कुणी चांगला डाएटिशिअन आहे काय? अथवा अन्य भागातील पण चालेल.

आज स्मूदी करून प्यायले.काकडी+गाजर+पुदिना+कोथिंबीर+सफरचंद एकत्र मिक्सर मधून काढले.अर्धी वाटी पानणी घालून त्यात लिंबूरस घातला.पुदिना व कोथिंबीर वगळता सगळे थोडेसे तुकडे घेतले होते.

ववि नंतर गेले सुमारे अडीच महिने प्रोजेक्ट्च्या कामामुळे व्यायाम अन आहाराकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वजन ८७ Sad
कितीतरी दिवस स्कोर अगदी ०-२ होता Sad
परत जोमाने सुरूवात करावी लागणार Happy
काल परत १०/१०

Pages