चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यांना आवरा रे कोणी! लाज नाही वाटत का अक्कल चालवून गेला जीव लिहायला!
वजन किती हवं हा प्रश्न आहे. देता येत असेल तर उत्तर द्या नाहीतर फुटा! डोक्याला ताप!

एक वेळचे जेवण सोडण्यापेक्षा कार्ब्स कमी (दिवसातुन २ पोर्शन्स फक्त), सहा ते आठ पोर्शन भाज्या/ सॅलड, चार पोर्शन प्रोटीन केल्याने भरपूर फरक पडेन. हे बायकांसाठी .
पुरुषांना पेक्षा जास्त खावे लागेल.

पेरू धन्यवाद.
ह्या असल्या चुकीच्या माहिती मुळे अनेक जीवाला मुकले आहेत.>>> कोणती चुकीची माहिती? भात सोडणे की आठवड्यातून १ डिनर स्कीप करणे?
तुम्ही करेक्ट माहिती द्या ना मग.
श्रिदेवी चं उदाहरण चुकलय..

लंघन करणे हां उपाय प्रचलित आहेच त्यामुळे त्यात काही वाईट परिणाम होतील असे नाही वाटत. फक्त तो लंघनाचा दिवस अति स्ट्रेसफूल शेड्यूलचा नसावा आणि हे तारतम्य प्रत्येकाकडे असतेच.

<त्यात काही वाईट परिणाम होतील असे नाही वाटत> कृपया सरसकट विधाने करू नयेत. सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी मानवतील असं नाही.

भरत तुम्ही फक्त सिलेक्टीव्ह वाचणे आणि वाक्य कोट करणे कमी केले तर बरे ना. पुढचे वाक्य जास्त महत्वाचे होते आणि आहे.

नसतं तारतम्य सगळ्यांकडे. लोकसत्तेत सध्या वेग वेगळ्या डाएट्सच्या फॅडमुळे लोकांमध्ये आरोग्याच्या नव्या समस्या कशा निर्माण होताहेत, त्यावर लेख येताहेत. वाचा. आणि फक्त स्ट्रेसचा संबंध नाही. कोणाला इतर कसले हेल्थ इश्युज असू शकतात. त्यांना लंघनाचा त्रास होऊ शकतो.

बाकी मायबोलीवर इंटरमिटंट फास्टिंग करणार्‍यांनी कामाच्या दिवशीही ते पाळलेलं नाही. तो शरीराला सवय लावण्याचा भाग आहे.

ओके
गॉट युअर पॉइंट
म्हणूनच तारतम्य लिहिले होते.
आणि सर्व काही लोकसत्ताच्या भरवश्यावर वाचून करायचं तर एक्सपर्ट्स / डायटिशयन्स उपाशी मरतील की. जे काही सोशल साइट वरच वाचून प्रयोग स्वतावर करायचे त्यात आधी तज्ञ व्यक्तीचा (फुकटचा नव्हे ) तर विकतचा सल्ला घेणे आवश्यक असते ज्याला थोडक्यात तारतम्य लिहिलेले मी.

लोकसत्तेत लेखमाला लिहिणार्‍या एक्स्पर्टच आहेत हो. आणि एक्स्पर्ट म्हणजे ऋजुता दिवेकर नाही. त्याही तिथे डाएट टिप्स देत नाहीत. तर वेगवेगळ्या डाएट्समागचा विचार , त्यातले दुष्परिणाम दाखवतात.

तारतम्यचा तुम्हांला अभिप्रेत असलेला अर्थ पोचला नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याने (एकाऐवजी दोन शब्द) असं स्टँडर्ड डिस्क्लेमर देता आलं असतं.

आशू२९,
सध्या आम्ही भात (पांढरा/ब्राउन) , बटाटा,पास्ता हे रेझिस्टंट स्टार्च स्वरुपात थोड्या प्रमाणात (१ सर्विंग) खातो. भात, बटाटा, पास्ता हे आदल्या दिवशी शिजवून रात्रभर फ्रीजमधे ठेवतो. असे केल्याने त्यातला रेझिस्टंट स्टार्च वाढतो. खाली जॉन्स हॉपकिन्सची लिंक आहे.
रेझिस्टंट स्टार्च
याशिवाय मायप्लेट गाईडलाइन्स वापरतो. कढधान्यातले कार्ब्ज विचारात घेतो. रात्रीच्या जेवणात पालेभाजी/नॉन स्टार्ची भाजी, नॉन वेज असल्यास त्या सोबत नुसते वाफवलेले ब्रोकोली/गाजर किंवा लाल मुळा/गाजर/लाल कोबी/ लेट्युस असे सॅलड + घरगुती सॅलड ड्रेसिंग.
मी इंटरमिटंट फास्टिंग करते मात्र त्यासाठी हळू हळू सवय केली. ब्रेकफास्ट चे प्रमाण कमी करणे आणि वेळ वाढवत नेणे हे हळू हळू केले. +१ च्या नोकरीच्या वेळा, कामाचे स्वरुप बघता त्याला हे शक्य नाही. तो सव्वा पाचला व्यवस्थित ब्रेकफास्ट करतो.

२००३ च्या दरम्यान मी ओव्हरवेट झालो. कमी केलं. पुन्हा वजन वाढले, हे चक्र काही दिवस सुरू राहीले. नंतर सिंहगड चढणे वगैरे बंद झाल्यावर वजन वाढले ते उतरायला बरेच कष्ट पडले. आता नियंत्रणात आहे. पण पूर्वी जसा पाप्याचा पितर होतो तसा आता नाही. Happy

या धाग्याच्या निमित्ताने एक गोष्ट शेअर कराविशी वाटते. सोशल मीडीयात लेख (किंवा काहीही) माझ्याकडून का लिहून होत नाही हा प्रश्न गेले काही दिवस छळत होता. आज हा धागा वाचताना उजळणी झाली आणि उत्तर मिळाले. याचे कारण झोपेच्या तासांशी तडजोड करत नाही.
ऑफीस मधे केबिनला लागून एक छोटीशी जागा आहे तिथे अरुंद बेडच बनवलाय. पाच मिनिटे का होईना पावर नॅप घेतो. टाळत नाही. संध्याकाळी आल्यावर तासभर ताणून देतो. कधी कधी तीन तास असाच झोपतो. मग रात्री उशिरा झोप नाही आली तर जबरदस्ती करत नाही. पुन्हा रात्री दोन ते तीन तास झोप. एकूण पाच ते सात तास झोपेचा कोटा पूर्ण करतोच.

त्यामुळे लिखाण वगैरे वेळखाऊ कामांना वेळ मिळत नाही. त्यातही संदर्भ तपासून ते घुसडायचे असतील तर मग कंटाळा येतो. आपण लिखाण करतो ते स्वतःसाठी हे खरे असेल तर आपल्याला त्याचा त्रास नको व्हायला. नाहीतर लोकांचे मनोरंजन करण्यासाठी तब्येतीशी खेळ काही कामाचा नाही.

हे आपलं आत्ता जाणवलं म्हणून या धाग्यावर लिहीलं. अवांतर वाटले तर क्षमा करावी.

नाहीतर लोकांचे मनोरंजन करण्यासाठी तब्येतीशी खेळ काही कामाचा नाही >> सहमत.

साने गुरुजी म्हणतात, करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. पण प्रभूशी नाते इतक्या लवकर जोडायची घाई करायची गरज नाही. तब्येत सलामत तो लेख पचास.

<< पुन्हा रात्री दोन ते तीन तास झोप. एकूण पाच ते सात तास झोपेचा कोटा पूर्ण करतोच. >>

इतकी कमी आणि अनियमित झोप चांगली आहे की नाही, ते डॉक्टरांना विचारून घ्या एकदा.

Pages