बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मटार गरम पाण्यात थोडे उकडून तेलाच्या फोडणीत खरपूस परतायचे. वरून सैंधव, तिखट, मिरपूड, चाटमसाला / पावभाजीमसाला आवडीप्रमाणे. (ओव्हन किंवा मावेतही करता येईल, फ्रोझन मटारही वापरता येतील.)

मटार ऐवजी मोड आलेले हिरवे मूग किंवा मोड आलेली मिश्र कडधान्येही वापरू शकता.
आणखी लज्जत वाढवायची असेल तर वरून भाजलेल्या उडीद पापडांचा चुरा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर पेरून लिंबू पिळणे.

बटाटे उकडून फोडी करून तूप जिर्‍याच्या फोडणीवर खरपूस परतून घ्यायचे. वरून आवडीनुसार तिखट, मीठ, मिरपूड. सोबत हवा असल्यास केचप.

वांग्याचे काप.
तंदूरी गोभी.

बिसीबेळेभात सोबत पापड नसतील तर फाऊल होत नाही का तुअम्च्याकडे?

साऊथ इंडीयन आप्पलम आणायचे आणि मायक्रोवेव्ह करायचे. तळले की फार फुलतात मायक्रोमध्येव तितके फुलत नाही पण चव आसपास त्याच्याजवळच जाते.

Girls, finally menu decided for ganpati visarjan..
१. Modak talalele
२. Mokli daal
३. Khamang kakdi
४. Chikkad chhole by Devika
५. Ghadichya polya( no puri/ bhatore to avoid frying)
६. Green peas pulao
७. Aamba modak

शूम्पी, अंजली, स्वाती२, प्राजक्ता, मयेकर, वेका, अकु आणि नंदिनी ह्यांना खूप धन्यवाद!

तळण अजीबातच नको होतं. त्यामुळे कुरकुरीत करायचं तरी काय हा प्रश्न पडला. बंगलोरी स्वयंपाकअम्माच्या नियमानुसार बिबेभाताबरोबर पापड नसला तरी चालतो, पण त्या टेक्स्चरचं काहीतरी हवं. त्याशिवाय मजा नाही. म्हणून बेकाकवर धाव घेतली. तुम्ही दिलेल्या पर्यायांमध्ये काही ना काही कारणांनी लिमिटेशन्स असल्यामुळे पर्याय आवडले तरी करता आले नाही. ते आता पुढल्यावेळी!

प्राजक्ता, दीपचे समोसे बेक केले. ते मस्तं कुरकुरीत झाले.

खाली फोटो टाकते आहे. त्यातले मिनिदोसे 'आरती.' ह्यांच्या पद्धतीचे आहेत, तर आंब्याचा शिरा डीजेच्या आईच्या रेसपीनुसार. दोन्ही पदार्थ आलेल्या मंडळींना फार आवडले. फोटो मात्र दुसर्‍या दिवशी ताट वाढून काढला आहे. ताजा असतानाचा लुसलुशीत, स्पाँजी दोसा तोवर किंचितसा पापडीच्या वळणानं जाऊ लागला. (४ मापं तांदूळ-अर्धं माप डाळ- अर्धं माप पोहे).

bisibelebhaat-and-more-3-maayboli.jpg

मस्तच दिस्तंय ताट! आत्ता ओढून चापावं वाटतांय
समोसे अन शिर्‍याच्या मधे काय आहे?
पांढरी चटणी कशाची? लाल कशाची?
बीसीबेळेभातावर काय आहे?

सगळं डिटेलवार लिवा की... Wink

धन्यवाद!

मंजूडे, राग काय, सॉरी काय काही कळलं नाही! पाव सेकंद ट्यूबच पेटली नाही. मग मागचं पान वाचून पेटली तेव्हा तुझं पोस्ट पुन्हा चारदा वाचलं. पण राग येण्याजोगं काही मटेरिअल सापडलं नाही. त्यामुळे तुझ्या डोक्यात हे रागाचं का आलं ते पण कळलं नाही. Proud धन्यवादाच्या यादीत नाव राहून गेलं, त्याबद्दल मात्र ए. डा. मा. क. टा. ! Happy

>>समोसे अन शिर्‍याच्या मधे काय आहे?
मुठिये. दीपचे समोसेच नाही तर मुठीयेपण मिळतात. आपल्या त्या ह्यांनी फक्त समोश्यांना प्रसिध्दी दिली म्हणून हे असं झालंय. Proud

>>पांढरी चटणी कशाची?
तेलात परतलेलं डाळं, शेंगदाणे, २ लसूणपाकळ्या वाटून, त्यात दही, साखर, मीठ घालून वरून तिखटपूड, मोहरी, जिरं, हिंग आणि कढीलिंबांच्या पानांची फोडणी.

>> लाल कशाची?
चमचाभर उडीद डाळ, लाल मिर्च्या, कांदा, टोमॅटो आणि बारकासा आल्याचा तुकडा तेलात खरपूस परतून बारीक वाटला. त्यात किंचित गूळ, मीठ घालून फोडणी दिली.

>>बीसीबेळेभातावर काय आहे?
खारी बुंदी. हो, इकडे अशीच मिळते. Proud

ताट भारतातलं आणि त्याखालचं कोस्टर IKEA मधलं आहे.

धन्यवाद अमित.

नाही नाही, हमसपेक्षा अनेक पटींनी चांगली लागते. Proud शेंगदाणे जास्त आहेत. आणि डाळ्याची चव अजीबात चिकपीसारखी नाही. दही आणि मेझोलाची फोडणी आहे. काय हिंम्मत होईल त्या हुम्मसाची चवीला ह्या चटणीसारखं लागायची !

ताट एकदम तोपासु दिसतयं, लाल चटणीच्या फोडणीत काय घातलं होतं? उद्या दोन्ही चटण्या करायचा विचार आहे.

इथे कानपुरात आम्हा मराठी मैत्रीणींचा एक भिशी ग्रुप आहे. आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागतल्या आहोत. त्यामुळे या फेरीत प्रत्येकीने आपापल्या भागातले प्रसिद्ध पदार्थ बनवावे अशी थीम आहे. मी पुण्याची आहे. मला २० लोकांसाठी सहज करता येतील असे अस्सल पुणेरी पदार्थ सुचवा ना.
मला सुचलेला मेनू : उपवास मिसळ आणि आंबा मस्तानी

अस्सल पुणेरी पदार्थ हवेत की अस्सल मराठी पदार्थ हवेत?

मराठी पदार्थ हवे असतील तर ह्या पदार्थांचा विचार करता येईलः
मसालेभात, जिलबी-मठ्ठा, बटाटेवडे-चटणी, श्रीखंडपुरी बटाट्याची भाजी, पुरणपोळी-कटाची आमटी, मिसळ, कोथिंबीरवडी, पाटवडी, पियुष, टोमॅटोचं सार, गोड शिरा, कांद्याची भजी, सांज्याची पोळी, साबुदाण्याची खिचडी, खमंग काकडी, शेवयांची खीर, भरली वांगी, पंचामृत

वीस लोक्स आहेत. त्यात समजा ६/७ जणांचा गृप तर सात ते दहा पदार्थ होतील बहुतेक. फार फापटपसारा वाला पदार्थ नको खाताना. तुमच्याकडे मेन डिश असेल तर काही जास्त पदार्थ करता येतील.
मटार करंजी/ कचोरी
उकडीचे मोदक
उकडीचे आंबा मोदक
बटाटावडा-चटणी
अळूवडी
सुरळीची वडी
सोलकढी
इ पर्याय आहेत Happy

माझ्या वरच्या यादीत उकडीचे मोदक, अळूवडी, डाळींब्यांची उसळ, गूळपोळी, खांडवी, खोबर्‍याची वडी, रव्याचे/ बेसनाचे लाडू यांसारखे अनेक पदार्थ घालायचे राहिलेत.

Pages