मायबोली टीशर्ट आणि बॅग २०१४

Submitted by टीशर्ट_समिती on 23 June, 2014 - 00:56

तर मंडळी, दरवर्षीप्रमाणेच यंदाही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅग.

मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन प्रकारात टीशर्ट असतील.

  1. खिश्यासहित कॉलर टीशर्ट
  2. blue-collar-men-2014.jpg

    कृपया नोंद घ्या: या फोटोत टीशर्टाला खिसा दाखवण्यात आलेला नाही, परंतु आपण बनवत असलेल्या टीशर्टाला खिसा आहे. मायबोलीचा लोगो टीशर्टच्या खिश्यावर असेल.

  3. राऊंडनेक टीशर्ट
  4. blue-round-men-2014.jpg
  5. लेडिज व्ही-नेक टीशर्ट
  6. T-shirt-Women-2014.jpg
  7. लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट
  8. लहान मुलांसाठी वाईन रेड रंगाचे टीशर्ट आणि रॉयल ब्लू रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. ऑर्डर नोंदवण्यापुर्वी 'महत्त्वाची सूचना' क्र. ५ काळजीपूर्वक वाचावी.

  9. बॅग
  10. maayboli bag with logo 2014.jpg

    बॅग - साईज ९.५ * ७ * ४ - एकूण कप्पे - ४ मेन, १ चोर कप्पा, आणि पुढच्या कप्प्यात पेन आणि मोबाईल ठेवायला जागा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे कप्पे वरच्या फ्लॅपमुळे झाकले जातात.

टीशर्टांच्या मागच्या बाजूला मायबोलीचा वेबअ‍ॅड्रेस असेल.

** साईज :- **

size chart 1.jpg

(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)

Meassure.jpg

** टीशर्टांच्या किंमती :- **

price chart 2.jpg

मायबोली बॅग - किंमत रुपये २८०/- + चॅरीटी रुपये ५०/- = एकूण किंमत रुपये ३३०/-


**टीशर्टांचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना**

पुणे , मुंबई येथे एकाच दिवशी टीशर्टांचे पैसे जमा केले जातील.
सर्वांना नम्र विनंती: प्रत्यक्ष पैसे भरणार्‍यांनी कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचा नियोजन करणे कठीण जाते.

sthal 1.jpg

नोंदणी केलेल्यांचे पैसे ६ जुलै, २०१४च्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.

tsh timing - 2.jpgसर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:

  1. कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचे नियोजन करणे कठीण जाते.
  2. पैसे भरण्यासाठी दिलेली वेळ पाळा. उशीर होणार असेल, इतर काही अडचण असेल तर कृपया संयोजकांशी संपर्क साधा.

टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी दिनांक २० जुलै, २०१४ रोजी करण्यात येईल. ज्याठिकाणी भेटून पैसे भरले त्याच ठिकाणी टीशर्टांचे वाटप करण्यात येईल.

ज्यांना प्रत्यक्ष पैसे देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी 'ऑनलाईन पेमेन्ट पर्याय'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, त्याप्रमाणे पुढील तपशील तुम्हाला कळवण्यात येतील.

अत्यंत महत्त्वाची सूचना -
ऑनलाईन पैसे भरण्याचा पर्याय स्वीकारणार्‍यांसाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख दिनांक ३ जुलै, २०१४ असेल. यानंतर पैसे भरल्यास ६ जुलै, २०१४ पर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही.

आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टांची ऑर्डर नोंदवायची,

कारण ३ जुलै, २०१४ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.

** ऑर्डर कशी नोंदवाल?**

इथे टिचकी मारून

ऑर्डर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी "वेगळा साईज" असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.

फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना: -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टीशर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या ईमेलवर मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची बदललेली ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंकेवर टिचकी मारल्यास बघता येईल.
५.लहान मुलांच्या टीशर्टची ऑर्डर नोंदवताना रॉयल ब्लू रंगाचा टीशर्ट हवा असल्यास ऑर्डर फॉर्ममधे "राऊंड नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी, तसेच वाईन रेड रंगाच्या टीशर्टसाठी "व्ही-नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी.

काही महत्त्वाचे-
१. राऊंड नेक टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे व मुंबईमधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्‍या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्‍या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांशी संपर्क साधू शकता.

१. हिम्सकूल
२. मंजूडी
३. पौर्णिमा
४. नील.
५. पिन्कि८०

टीशर्ट संदर्भातील चौकशी tshirt2014@maayboli.com या ईमेलवर करावी.

यंदा आपण टीशर्ट व बॅगविक्रीतून गोळा होणारी देणगी "ग्रीन अम्ब्रेला" ह्या संस्थेस देण्यात येणार आहे.
वृक्षसखा - ग्रीन अंब्रेलाची वेबसाईट - www.green-umbrella.org

याबद्दल अधिक माहिती मायबोलीकर जिप्सीने लिहिलेल्या वृक्षसखा या बाफवर वाचता येईल.

लोकहो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅगेच्या खरेदीसाठी तुम्ही झुंबड उडवाल याची आम्हांला खात्री आहे.

महत्त्वाची सूचना - टी-शर्ट नोंदणीची मुदत आजचा एक दिवस वाढवण्यात आलेली आहे. टी-शर्टची नोंदणी, भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत करता येईल..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनुअमिता,वविचा बाफ लवकरच येईल. त्यात सगळी माहिती मिळेल. २७ जुलै ही तारीख कॅलेंडरमध्ये राखीव ठेवा.

वविची तारीख फिक्स्ड नव्हती.
अस्वे, वविची तारीख नेहमीच फिक्स्ड असते विसरलीस का? जुलैच्या शेवटच्या रविवारी. Angry
तरी असं कसं करु शकतेस?

I hv told d reason to concerned persons long back. No need to tell others.

ऑर्डर नोंदवली आहे, ऑनलाइन पेमेंटचा पर्याय निवडलाय आत्ता पेमेंटची माहिती वाली इमेलच्या प्रतिक्षेत.

एक प्रश्न : वविनंतर अथवा २० जुलैनंतर जर टी-शर्ट अथवा बॅग हवी असेल तर उपलब्ध होऊ शकेल का?

वविनंतर अथवा २० जुलैनंतर जर टी-शर्ट अथवा बॅग हवी असेल तर उपलब्ध होऊ शकेल का?>> रंगासेठ, होईल पण ऑर्डर आत्ताच द्यावी लागेल.

धन्यवाद मंजूडी, पण हे टी-शर्ट/बॅग वापरल्यानंतर काही नॉन-माबोकर लोकांना त्या वस्तू आवडल्यास नंतर उपलब्ध होतील का हा प्रश्न पडला होता. पण आत्ताच ऑर्डर देणे जास्त चांगलं राहील. मी विचारून देऊन टाकतो ऑर्डर.

केश्वे किती तो त्रास करुन घेते आहेस... एखादा ववि हुकणारच.. कोर्टातच उभे केल्यासारखे करते आहेस.. चिल माडी..

पौर्णिमा आणि वेल, धन्स प्रतिसादासाठी.
तिचं सध्याचं वय २. १ महिने आहे. घेतलेले कोणतेही कपडे २-३ महिन्यांत लहान होतात. म्हणून संभ्रमात आहे २२ की २४?

ववि खरच तिसर्‍या रविवारी करता आला तर बरं होईल Happy

अपल्या इथे काही नविन लग्न झालेले लोकं आहे. मंगळवारी त्यांची मंगळागौर असल्याने ते बिझी असणारेत त्यामुळे वविला इच्छा असुन त्यांना येता येणार नाहीये Sad
एका माबोकर मित्राने वविला न येण्याचं हे कारण दिलंय मला Happy

आता मंगळागौरीचा रविवारशी काय संबंध वगैरे प्रश्न मला न विचारता स्वतःच विचार करा प्लिजच कृपया!

या बीबीवर ही पोस्ट उगाच वाटत असेल तर कुठे टाकू ते ही सांगा मी हलवते पोस्ट..

टी शर्टची ऑर्डर मी प्रितीची पण द्यायची आहे का हे विचारून देते आज रात्री देते.

******

लोकहो, ऑर्डर फॉर्ममधे मुंबई पुणे यांबरोबरच ठाणे आणि वाशी ही ठिकाणेही घालण्यात आली आहेत. मुंबईकरांनी योग्य ते ठिकाण निवडा. ज्यांनी आधी फॉर्म भरून पाठवला आहे त्यांना तो फॉर्म 'संपादित' करून आवश्यक ते बदल करून पुन्हा सबमिट करता येईल. त्यानंतर 'अवलोकन'मधे जाऊन केलेले बदल तपासून पाहता येतील. बदल केल्याबद्दल ईमेल येणार नाही.

मला पुरुषांसाठीचा जो राउंडनेक टी शर्ट आहे तो घ्यायचा आहे
पण साइज़ कशी निवडायची
म्हणजे आपण जी नॉर्मल साइज़ निवडतो तोच पर्याय निवडू का

आपण जी नॉर्मल साइज़ निवडतो तोच पर्याय निवडू का>> हो जाई.

स्वाती आंजर्लेकर | 26 June, 2014 - 11:45

पोचपावती मिळाली. पण आता घेण्यासाठिचे ठिकाण कसे बदलु? ठाण्यात घेईन मी!
>> स्वाती, तुला ती पोचपावती आली आहे त्यावर सर्वात खाली एक लिंक आहे. ती लिंक तुला परत तुझ्या ऑर्डर फॉर्मवर घेऊन जाईल. तिथे जाऊन ठिकाण बदल आणि सबमिट/सेव्ह कर.
तुला परत ईमेल येणार नाही, पण बदल नोंदवला गेला असेल Happy

फॉर्म संपादित करून 'टी-शर्ट कुठून घेणार? - ठाणे' आणि 'पैसे कसे भरणार? - प्रत्यक्ष' असे बदल केले आहेत.

फॉर्म संपादित करून 'टी-शर्ट कुठून घेणार? - ठाणे' आणि 'पैसे कसे भरणार? - प्रत्यक्ष' असे बदल केले आहेत.
मला तो आवडत्या शर्टाचा लेख आठवला... डुक्कराशी टक्कर वाला...

समिती, धन्यवाद.

ऑर्डर नोंदवली, मेलही आला.

रंग आवडले. आता प्रत्यक्ष शर्टस् आणि बॅग्ज आल्या की पाहू Happy

ऑर्डर दिली. मला लहान मुलांचा १ शर्ट पाहिजे होता म्हणुन मी रोउन्ड नेकसमोर साइज २४ , संख्या १ असे लिहिले. बरोबर आहे ना?

Pages