मायबोली टीशर्ट आणि बॅग २०१४

Submitted by टीशर्ट_समिती on 23 June, 2014 - 00:56

तर मंडळी, दरवर्षीप्रमाणेच यंदाही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅग.

मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन प्रकारात टीशर्ट असतील.

  1. खिश्यासहित कॉलर टीशर्ट
  2. blue-collar-men-2014.jpg

    कृपया नोंद घ्या: या फोटोत टीशर्टाला खिसा दाखवण्यात आलेला नाही, परंतु आपण बनवत असलेल्या टीशर्टाला खिसा आहे. मायबोलीचा लोगो टीशर्टच्या खिश्यावर असेल.

  3. राऊंडनेक टीशर्ट
  4. blue-round-men-2014.jpg
  5. लेडिज व्ही-नेक टीशर्ट
  6. T-shirt-Women-2014.jpg
  7. लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट
  8. लहान मुलांसाठी वाईन रेड रंगाचे टीशर्ट आणि रॉयल ब्लू रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. ऑर्डर नोंदवण्यापुर्वी 'महत्त्वाची सूचना' क्र. ५ काळजीपूर्वक वाचावी.

  9. बॅग
  10. maayboli bag with logo 2014.jpg

    बॅग - साईज ९.५ * ७ * ४ - एकूण कप्पे - ४ मेन, १ चोर कप्पा, आणि पुढच्या कप्प्यात पेन आणि मोबाईल ठेवायला जागा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे कप्पे वरच्या फ्लॅपमुळे झाकले जातात.

टीशर्टांच्या मागच्या बाजूला मायबोलीचा वेबअ‍ॅड्रेस असेल.

** साईज :- **

size chart 1.jpg

(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)

Meassure.jpg

** टीशर्टांच्या किंमती :- **

price chart 2.jpg

मायबोली बॅग - किंमत रुपये २८०/- + चॅरीटी रुपये ५०/- = एकूण किंमत रुपये ३३०/-


**टीशर्टांचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना**

पुणे , मुंबई येथे एकाच दिवशी टीशर्टांचे पैसे जमा केले जातील.
सर्वांना नम्र विनंती: प्रत्यक्ष पैसे भरणार्‍यांनी कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचा नियोजन करणे कठीण जाते.

sthal 1.jpg

नोंदणी केलेल्यांचे पैसे ६ जुलै, २०१४च्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.

tsh timing - 2.jpgसर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:

  1. कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचे नियोजन करणे कठीण जाते.
  2. पैसे भरण्यासाठी दिलेली वेळ पाळा. उशीर होणार असेल, इतर काही अडचण असेल तर कृपया संयोजकांशी संपर्क साधा.

टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी दिनांक २० जुलै, २०१४ रोजी करण्यात येईल. ज्याठिकाणी भेटून पैसे भरले त्याच ठिकाणी टीशर्टांचे वाटप करण्यात येईल.

ज्यांना प्रत्यक्ष पैसे देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी 'ऑनलाईन पेमेन्ट पर्याय'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, त्याप्रमाणे पुढील तपशील तुम्हाला कळवण्यात येतील.

अत्यंत महत्त्वाची सूचना -
ऑनलाईन पैसे भरण्याचा पर्याय स्वीकारणार्‍यांसाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख दिनांक ३ जुलै, २०१४ असेल. यानंतर पैसे भरल्यास ६ जुलै, २०१४ पर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही.

आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टांची ऑर्डर नोंदवायची,

कारण ३ जुलै, २०१४ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.

** ऑर्डर कशी नोंदवाल?**

इथे टिचकी मारून

ऑर्डर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी "वेगळा साईज" असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.

फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना: -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टीशर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या ईमेलवर मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची बदललेली ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंकेवर टिचकी मारल्यास बघता येईल.
५.लहान मुलांच्या टीशर्टची ऑर्डर नोंदवताना रॉयल ब्लू रंगाचा टीशर्ट हवा असल्यास ऑर्डर फॉर्ममधे "राऊंड नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी, तसेच वाईन रेड रंगाच्या टीशर्टसाठी "व्ही-नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी.

काही महत्त्वाचे-
१. राऊंड नेक टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे व मुंबईमधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्‍या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्‍या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांशी संपर्क साधू शकता.

१. हिम्सकूल
२. मंजूडी
३. पौर्णिमा
४. नील.
५. पिन्कि८०

टीशर्ट संदर्भातील चौकशी tshirt2014@maayboli.com या ईमेलवर करावी.

यंदा आपण टीशर्ट व बॅगविक्रीतून गोळा होणारी देणगी "ग्रीन अम्ब्रेला" ह्या संस्थेस देण्यात येणार आहे.
वृक्षसखा - ग्रीन अंब्रेलाची वेबसाईट - www.green-umbrella.org

याबद्दल अधिक माहिती मायबोलीकर जिप्सीने लिहिलेल्या वृक्षसखा या बाफवर वाचता येईल.

लोकहो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅगेच्या खरेदीसाठी तुम्ही झुंबड उडवाल याची आम्हांला खात्री आहे.

महत्त्वाची सूचना - टी-शर्ट नोंदणीची मुदत आजचा एक दिवस वाढवण्यात आलेली आहे. टी-शर्टची नोंदणी, भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत करता येईल..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठाण्याला पोस्टाने पाठवता येईल का? फक्त टी शर्ट घेण्यासाठी रविवारी ठाण्याहून दादर ला जाणे फार लांब (म्हणून वेळखाऊ) आहे!! आणि पोस्टेज किती लागेल?

पलक, साधना माझे ऑफीस वाशी ला आहे, गेल्या वर्षी ही दोन माबोकरांची टीझ मी कलेक्ट केली होती. तुम्ही जर मला वाशी ला भेटू शकाल तर मी कलेक्ट करेन. नो ईश्युज.

मायबोली टीशर्ट्स आणि हँडबॅग ऑर्डर करायचा विचार आहे. बोरिवलीहून कोणी शिवाजी पार्कला जाऊन कलेक्ट करणार असेल तर मी ऑर्डर नोंदवते कारण ६ जुलैला मला शक्य नाहीये.

२२ साईज म्हणजे रूंदी, उंची किती असेल? मुलासाठी टीशर्ट्स घ्यायचे आहेत. सध्या अडीच वर्षांचा आहे तब्बेतीनी किरकोळ आणि उंची आहे. वाढत्या अंगाचा घेऊ की २४ खूप मोठा होईल? २२ उंचीला खूप छोटा होईल का? साईज कन्फर्म झाली तर टी शर्ट्स आणि बॅग ची ऑर्डर देता येईल.

वेल कधी जाणारेस गं? सोबत येईन. ऑर्डर कन्फर्म झाली की कळवते.

आशिता, ड्रीमगर्ल- तुमच्या मुलांना सध्या व्यवस्थित बसणार्‍या टीशर्टचं माप घ्या. त्या मापाप्रमाणे ऑर्डर नोंदवू शकता. वर दिलेली मापं ही इंचांमध्ये आहेत.

वैयक्तिक मत- मुलांना वाढत्या मापाचे कपडे घेतले तरी चालतात. आत्ता लगेच झाला नाही टीशर्ट, तर सहा महिन्यांनी होतोच Happy

धन्स मंजू, पौर्णिमा... कपडे स्मॉल मध्ये घेते. अंगाला लावून बघते त्यामुळे आता माप घेणे आले. मलाही २४ घ्यावा असे वाटतेय पण बघू आज नक्की माप घेते आणि आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी ऑर्डर नक्की. Happy

टी शर्ट कुठुन घेणार मध्ये सध्या मुंबई, पुणे व इतरत्र हे ऑप्शन्स आहेत. तिथे वाशी व ठाणे अ‍ॅड होणार आहेत काय? तसे असेल तर मग आता इतरत्र हा ऑप्शन घेऊन ऑर्डर देण्यापेक्षा वाशी दिसायला लागले की ऑर्डर देईन.

हो साधना. होतील ते ऑप्शन्स अ‍ॅड.

स्वाती,स्पॅम चेक कर. तिथेही नसेल तर थोड्यावेळाने चेक कर. तरी आली नाही तर परत एक्दा तीच ऑर्डर पाठव. सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे होऊ शकतं.

सगळ्यात पहिली ऑर्डर दिल्याबद्दलचं बक्षिस मला वविला आले नाही तर मिळणार नाही का? Wink २७ तारीख आधीच बूक्ड असल्यामुळे २७ ला वविला येणं अशक्य आहे. पहिल्यांदाच ववि हुकणार आहे माझा Sad

धिस इज नॉट फेयर हा केश्वे.. ववि कधी असतो हे माहीत नाही का तुला? मग २७ आधीच कशी बुक्ड होऊ दिलीस.. ?:डोमा:

ड्रीमगर्ल - अभिज्ञला उंचीला २६ लागतो अंगाला २४ पुरतो. मग मी २६च घेते. तुझा लेक सुद्धा अभिसारखाच आहे. २४ घे ग. दादरला जाऊ एकत्र आपण.

आशिता तुझ्या मुलीला २२ लागेल.

मया, अरे २ महिने आधीपासून बूक्ड आहे. आणि ज्या कामासाठी वेळ देतेय त्याचं शेड्युल बदलणं माझ्या हातात नाही. २७ जमणार नाहिये हे मी घारु आणि मुग्धाला एक महिन्यापुर्वीच सांगितलं होतं पण तेव्हा वविची तारीख फिक्स्ड नव्हती. नेहमी ३र्‍या रविवारी असतो ना ववि? तेव्हा कदाचित काही अ‍ॅडजस्ट करता आलं असतं. करा धमाल तुम्ही Sad

Pages