तर मंडळी, दरवर्षीप्रमाणेच यंदाही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅग.
मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन प्रकारात टीशर्ट असतील.
- खिश्यासहित कॉलर टीशर्ट
- राऊंडनेक टीशर्ट
- लेडिज व्ही-नेक टीशर्ट
- लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट
- बॅग

कृपया नोंद घ्या: या फोटोत टीशर्टाला खिसा दाखवण्यात आलेला नाही, परंतु आपण बनवत असलेल्या टीशर्टाला खिसा आहे. मायबोलीचा लोगो टीशर्टच्या खिश्यावर असेल.


लहान मुलांसाठी वाईन रेड रंगाचे टीशर्ट आणि रॉयल ब्लू रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. ऑर्डर नोंदवण्यापुर्वी 'महत्त्वाची सूचना' क्र. ५ काळजीपूर्वक वाचावी.

बॅग - साईज ९.५ * ७ * ४ - एकूण कप्पे - ४ मेन, १ चोर कप्पा, आणि पुढच्या कप्प्यात पेन आणि मोबाईल ठेवायला जागा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे कप्पे वरच्या फ्लॅपमुळे झाकले जातात.
टीशर्टांच्या मागच्या बाजूला मायबोलीचा वेबअॅड्रेस असेल.
** साईज :- **

(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)

** टीशर्टांच्या किंमती :- **

मायबोली बॅग - किंमत रुपये २८०/- + चॅरीटी रुपये ५०/- = एकूण किंमत रुपये ३३०/-
**टीशर्टांचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना**
पुणे , मुंबई येथे एकाच दिवशी टीशर्टांचे पैसे जमा केले जातील.
सर्वांना नम्र विनंती: प्रत्यक्ष पैसे भरणार्यांनी कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचा नियोजन करणे कठीण जाते.

नोंदणी केलेल्यांचे पैसे ६ जुलै, २०१४च्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.
सर्व मायबोलीकरांना नम्र विनंती:
- कृपया आपल्या ऑर्डरीचे 'नेमके' पैसे घेऊन यावेत. ऑर्डरींची संख्या मोठी असल्यामुळे हिशोब ठेवणे आणि सुट्ट्या पैश्यांचे नियोजन करणे कठीण जाते.
- पैसे भरण्यासाठी दिलेली वेळ पाळा. उशीर होणार असेल, इतर काही अडचण असेल तर कृपया संयोजकांशी संपर्क साधा.
टीशर्ट वाटप पुणे, मुंबई या दोन्ही ठिकाणी दिनांक २० जुलै, २०१४ रोजी करण्यात येईल. ज्याठिकाणी भेटून पैसे भरले त्याच ठिकाणी टीशर्टांचे वाटप करण्यात येईल.
ज्यांना प्रत्यक्ष पैसे देणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी 'ऑनलाईन पेमेन्ट पर्याय'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, त्याप्रमाणे पुढील तपशील तुम्हाला कळवण्यात येतील.
अत्यंत महत्त्वाची सूचना -
ऑनलाईन पैसे भरण्याचा पर्याय स्वीकारणार्यांसाठी पैसे भरण्याची शेवटची तारीख दिनांक ३ जुलै, २०१४ असेल. यानंतर पैसे भरल्यास ६ जुलै, २०१४ पर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही.
आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टांची ऑर्डर नोंदवायची,
कारण ३ जुलै, २०१४ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.
** ऑर्डर कशी नोंदवाल?**
ऑर्डर फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी "वेगळा साईज" असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.
फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना: -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टीशर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात हवे असलेले एकूण टीशर्ट लिहिण्याची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या ईमेलवर मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची बदललेली ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंकेवर टिचकी मारल्यास बघता येईल.
५.लहान मुलांच्या टीशर्टची ऑर्डर नोंदवताना रॉयल ब्लू रंगाचा टीशर्ट हवा असल्यास ऑर्डर फॉर्ममधे "राऊंड नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी, तसेच वाईन रेड रंगाच्या टीशर्टसाठी "व्ही-नेक" कॉलममधे 'वेगळी साईज' लिहून आवश्यक ती संख्या लिहावी.
काही महत्त्वाचे-
१. राऊंड नेक टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे व मुंबईमधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांशी संपर्क साधू शकता.
१. हिम्सकूल
२. मंजूडी
३. पौर्णिमा
४. नील.
५. पिन्कि८०
टीशर्ट संदर्भातील चौकशी tshirt2014@maayboli.com या ईमेलवर करावी.
यंदा आपण टीशर्ट व बॅगविक्रीतून गोळा होणारी देणगी "ग्रीन अम्ब्रेला" ह्या संस्थेस देण्यात येणार आहे.
वृक्षसखा - ग्रीन अंब्रेलाची वेबसाईट - www.green-umbrella.org
याबद्दल अधिक माहिती मायबोलीकर जिप्सीने लिहिलेल्या वृक्षसखा या बाफवर वाचता येईल.
लोकहो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोली टीशर्ट आणि मायबोली बॅगेच्या खरेदीसाठी तुम्ही झुंबड उडवाल याची आम्हांला खात्री आहे.
महत्त्वाची सूचना - टी-शर्ट नोंदणीची मुदत आजचा एक दिवस वाढवण्यात आलेली आहे. टी-शर्टची नोंदणी, भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत करता येईल..
नियती, मग माझ्या मते
नियती, मग माझ्या मते त्याच्यासाठी २८ नंबरच्या टिशर्टची ऑर्डर नोंदव.
माझ्या मुलीला भारतातला ३४
माझ्या मुलीला भारतातला ३४ साईझ बसतो..तर ईथे कुठला साईझ बसेल?
धन्यवाद मंजूडी.
धन्यवाद मंजूडी.
केया, XXS बसेल. ३४"
केया, XXS बसेल. ३४"
"ओर्डर नोदवली तर पुण्यात टी
"ओर्डर नोदवली तर पुण्यात टी शर्ट घरपोच मीळतिल का? " साधारण कधी पर्यन्त मीळतील ? मी भारता बाहेर आहे म्ह्णुन ही विचारणा..
नमस्कार.. मी माणिक..
नमस्कार.. मी माणिक.. मायबोलीवर अगदी नविन आहे.. हा माझा पहिलाच प्रतिसाद.. मला हा टीशर्ट घ्यायला खुप आवडेल.. कोणती साईझ घ्यायची ते नक्की झाले की लगेच ऑर्डर देते..
सुहास्य, तुमच्या घरच्या
सुहास्य, तुमच्या घरच्या कोणालाहि शक्य असल्यास बालगंधर्वला जाता येइल. पैसे आणि टीशर्ट असे दोन्ही काम होइल. किंवा माबो वर को णी परिचित पुण्यात असल्यात्यांना हि कलेक्ट करायला सांगु शकता. वर लिहिल्या प्रमाणे टीशर्ट हे साधारण २० जुलै ला रविवारी बालगंधर्वला मिळ्तील.
टी शर्ट संयोजक आणि ववि संयोजक
टी शर्ट संयोजक आणि ववि संयोजक .. हा धागा फ्रंट पे़ज वर घेता येइल का....
म्म दर वर्षी ह्या एकाच
म्म दर वर्षी ह्या एकाच कारणामुळे मा बो चे टी शर्ट घेता येत नाहियेत.....असो .. पहाते काही करता आले तर .....
सुहास्य,तुमचे टि-शर्टस/बॅग मी
सुहास्य,तुमचे टि-शर्टस/बॅग मी घेऊन ठेवेन पाहीजे तर. तुमच्या घरच्यांना नंतर मला फोन करायला सांगा. मग बघता येईल कसे कलेक्ट करायचे ते..
धन्यवाद मयुरेश......मी
धन्यवाद मयुरेश......मी आपल्याला ई मेल करते...
ओर्डर नोदवली तर टी शर्ट
ओर्डर नोदवली तर टी शर्ट घरपोच मीळतिल का? यावर काही करु शकत असाल तर प्लिझ करा, कारण मबोवर जवळ राहणारे कुणी परीचीत नाही आणी मि वैयक्तिक कारणा मूळे कलेक्ट करायला येउ शकत नाही.
घरी नाही आले तरी वाशी किंवा खारघर इथे पोहचल तरी चालेल.
मी आपल्याला ई मेल करते....>>.
मी आपल्याला ई मेल करते....>>. ओके
माझ्यासाठी, नवर्यासाठी आणि
माझ्यासाठी, नवर्यासाठी आणि मुलासाठी टीशर्टची आणी बॅगेची ऑर्डर दिली आता वाट पाहाते आहे शिवाजी मंदिरला सगळ्यांना भेटण्याची...
कोणी ऑनलाईन पैसे भरणार आहे का? कसे भरायचे आहेत? जर डिटेल्स दिलेत तर मी सुद्धा ऑन्लाईन भरेन.
शिवाजी मंदिरला सगळ्यांना
शिवाजी मंदिरला सगळ्यांना भेटण्याची...>>>>शिवाजी मंदिर नव्हे शिवाजी पार्क. शिवाजी मंदिरात कुणीही नसणार.

वेल, ऑनलाईन पेमेंटचे डिटेल्स
वेल, ऑनलाईन पेमेंटचे डिटेल्स जाहिर करणार नाही. ते खाजगी ईमेलवर पाठवण्यात येतील, अर्थात फॉर्म भरताना ज्यांनी ऑनलाईन पेमेंटचा पर्याय स्वीकारला असेल त्यांनाच हे डिटेल्स पाठवण्यात येतील.
आणि शिवाजी मंदिरला नाही, शिवाजी पार्कात उद्यान गणेश मंदिराच्या मागच्या कट्ट्यावर भेटायचे आहे, वेळ - संध्याकाळी ५ ते ७.
मंजूडी - ओके शिवाजी पार्क.
मंजूडी - ओके शिवाजी पार्क. मला ऑन्लाईन पेमेंट डिटेल्स म्हणजे सगले नको आहेत. फक्त एवढं हवं आहे की कार्ड पेमेंट फॅसिलिटि आहे की अकाउंट ट्रान्सफर.
अकाऊंट ट्रान्स्फर असेल.
अकाऊंट ट्रान्स्फर असेल.
पलक, मी बेलापुरला राहते, सो
पलक, मी बेलापुरला राहते, सो मी तुझ्यासाठी घेऊ शकते, पण थोडासा त्रास हा आहे की मी स्वतः शिवाजी पार्क उद्यानात जाणार नाही. कोणालातरी घ्यायला सांगेन माझ्यासाठी.
जर कोणी माझ्यासाठी घेणारा भेटला तर मग मी तुझ्यासाठीही घेतले तर चालेल का?
नवि मुंबैतील माबोकरांसाठी :
नवि मुंबैतील माबोकरांसाठी : संयोजकांपैकी काहि जण नवी मुंबैत राहातात त्यांच्याशी ही संपर्क करु शकता.
ghaaruanna, kon rahate navya
ghaaruanna,
kon rahate navya mumbait??
sulekhan nahiye ka? ka ka ka
sulekhan nahiye ka?
ka ka ka ka?
havay buva!
order karate lavkarch
रिया,तुला हवय ना म्हणुनच
रिया,तुला हवय ना म्हणुनच मुद्दाम सुलेखन केलेलं नाहीये
This is not correct
This is not correct
रीया... तुला काय हवंय?...
रीया...

तुला काय हवंय?... 'सुलेखन'?... की 'बुवा'?...
Confused...
...
...
...
नवि मुंबैतील माबोकरांसाठी :
नवि मुंबैतील माबोकरांसाठी : संयोजकांपैकी काहि जण नवी मुंबैत राहातात त्यांच्याशी ही संपर्क करु शकता.
>>
पलक/साधना - मी नवी मुंबईत राहतो आणि शिवाजी पार्कात जाणार आहे.
साधना ताई चालेल मला.
साधना ताई चालेल मला.
ऑर्डर नोंदवलेली आहे. पोच
ऑर्डर नोंदवलेली आहे.
पोच मिळाली आहे.
केश्वे,पोच मिळाली की नाही
केश्वे,पोच मिळाली की नाही तुला अखेर?
मया, मिळाली ना! मी लिहिलंय
मया, मिळाली ना! मी लिहिलंय तसं वर
आमच्या सर्वरमुळे गडबड होत होती. तिसर्यांदा ऑर्डर प्लेस केल्यावर झालं काम.
Pages