निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आय हेट मुंबई>>>>> त्रिवार निषेध!!!!

मुंबई आणि मुंबईचा पाउस माझ्या मर्मबंधातली वगैरे म्हणतात ना तशी ठेव आहे. घाण गलिछ माणसांनी भरलेली, गरीब श्रीमंत कशीही मुंबई मला आवडेतच.. तिच सर्व सामावले पण आवडत. तिचा शिव्या देणार्याना पण खाउ घालण आवडत...तिच समुद्राने वेढलेलपण आवाडत.. न्सतील आमचे बिचेस सुंदर पण समुद्र तर आहे..नको तितकी माणस येतात इथे. तितका कचरा करतात आणि आमच्या कडे जागाच नसल्याने आम्ही ते धकलतो आम्च्य स्मुद्राच्या पोटात. तो पण बिचार जमेल तित्क घेतो आणि मग बाहेर ओकओतो. ती पण दुखी होउन बघत रहाते. पण तरी हसत रहाते आपल काम करत रहाते. तिल न चिडुन चालत न रागवुन तिने घेतलय व्रत जमेल तितक्यान जमेल तस पोसासर. ति उतत नाहि मातत नाही..माणस येतात राहतात सिव्या देतत पण ति चालुच राहते..अनि मग तो येतो...जसा मुम्बईत येतो तसा कुथेचअयेत नाहि अगदी कोकणात पण नाहि..

आडवा तिडवा येतो.. बेह्बान होतो ती पण मग थाबतेच त्याच्यासाट्।ई सगळ बाजुल अठेवते आणि मस्त गळा भिटि होते ति जशी आहे तशी तिला मिठितत घेतो...

असा सगळा मस्त मामला असतो..

आपण कस वागायच विच्चर कारायचा सगळ आपल्या हातात असत....

फक्त जमेल तितका जेथे आपण रहातो जिथे वाढलो त्या ठिकाणाल नावे ठेवु नये...जाण आपल्या हातात आहेच.. जितके दिवस आहोत तेवढे आनंदात काढावे...अन होता होइल तितक ह्या जागेला सुंदर कराव Happy

नाहितर आम्ही आहोतच जमेल तितक सुंदर करणारे आजुन येणार्या लोकांसाठी

ही पोस्ट बरीच लांबली आहे.. आणि अशुध्द आहे...

माबो खुप स्लो आहे....

जिप्सी वर्सोव्याला कुठे आला होतास..

म्युनिसीपाल्टी वाले आता करतील सगळे बिचेस क्लिन हळुहळु..

मानुषी मस्त आलेत फोटो. परदेशात असे ट्रेल्स खुप असतात. अगदी सिंगापूर मधेही असे ट्रेल्स आहेत.

सर्व पालप्रेमींसाठी आनंदाची बातमी Happy

http://www.loksatta.com/pune-news/new-genus-of-house-lizard-at-kaas-plat...

साताऱ्याच्या कास पठारावर संशोधकांना पालीची नवीन प्रजाती सापडली आहे. गोल आकाराची बुब्बुळे, करडा- तपकिरी रंग आणि अंगावर अधूनमधून पिवळ्या रंगाचे डाग असलेल्या या पालीच्या प्रजातीला 'नेमॅस्पिस गिरी' ( Cnemaspis girii) असे नाव देण्यात आले आहे.
बंगळुरूच्या 'नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस' आणि 'सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस' या संशोधन संस्थांच्या चमूने या पालीचे विश्लेषण केले आहे. सरिसृप जीवांच्या अभ्यासात 'बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे संशोधक डॉ. वरद गिरी यांच्या असलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या नावावरून या पालीचे नामकरण करण्यात आले आहे.
गोल आकाराची बुब्बुळे हे या पालीचे वैशिष्टय़ आहे. इतर पालींची बुब्बुळे मांजरीच्या बुब्बुळांसारखी उभी असतात. ही पाल कास पठारावरील दाट झाडीत सापडत असून ती कडेकपारीत आणि झाडांच्या मध्ये असणाऱ्या फटींमध्ये आश्रय घेते. ही नवीन प्रजाती सापडल्यामुळे कास पठारावरील जैवविविधतेसंबंधी आणखी अभ्यास होण्याची गरज अधोरेखित झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
जून २०१० मध्ये हर्षल भोसले, झीशान मिश्रा आणि राजेश सानप यांना ही पाल कास पठारावर प्रथम सापडली होती. 'नेमॅस्पिस' या जीवशाखेतील केवळ दोन पालींच्या प्रजाती राज्याच्या दक्षिण भागात सापडतात. ही पाल त्या दोन्हीपैकी कोणत्याच प्रजातीची नसल्याचे लक्षात आले. मग या नवीन पालीची प्रजाती कोणती, हे समजून घेण्यासाठी मिश्रा आणि सानप यांनी लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये जाऊन देशात सापडणाऱ्या पालींच्या इतर प्रजातींविषयी माहिती घेतली. अभ्यासानंतर ही पाल इतर नेमॅस्पिस पालींपेक्षा वेगळी असून तिचे नव्याने नामकरण व विश्लेषण होण्याची गरज त्यांना वाटली. पालींचे अभ्यासक सौनक पाल यांनीही या पालीच्या वेगळेपणावर शिक्कामोर्तब केले. गेल्या वर्षी (२०१३) भोसले आणि मिश्रा यांनी पुन्हा कास पठारावर जाऊन या पालीचा अभ्यास केला होता.

mi Mumbai madhye rahat nahi.

please sagalyani halak ghya. mala ata ithe vaad hotat ki kay ashi bhiti vatayala lagaliye Sad

रिया,
वाद नाही होणार...सगळे शहाणे आहेत इथे...

आणि मुंबई बाहेरच्या माणसांनी खरच मुंबईला काही बोलु नये..काहिच माहीत नसताना केलेली कमेंट वाटते ती... "हेट" हा फारच तीव्र शब्द आहे....आवडत नाही एक वेळ ठिक आहे.....

असो...मला जे वाटत ते मी लिहल आहेच.....

आणि मुंबई बाहेरच्या माणसांनी खरच मुंबईला काही बोलु नये
>>
I don't Agree Happy

asoch!
mala Mumbai nahich avadat ani mi tithe nahich rahu shakat Happy that's final Happy
ani te maz mat ahe so kuni manawar ghyayach karan nahi Happy

वैशाली मस्त लिहिले आहेस...

बट आय स्टिल हेट मुंबई. Sad Sad जिथे राहतो तिथे आनंदाने राहावे हे खरेच पण मला नकोसे आहे हे राहणे. मला शक्य तितक्या लवकर माझ्या आंबोलीला जायचेय.

करवंदे ही सुरुवातीला हिरवी असतात आणि पिकल्यावर काळी होतात. मी त्या प्रकारचेच एक झुडुप पाहिले त्याला फिकी पिवळी (ऑफ व्हाईट) गुलाबीसर अशी फळे होती - पिकल्यावर काळी दिसत होती. बाकी सेम करवंदासारखेच (पाने, फुले व काटे) पण ही अशी फळे कधी करवंदांना दिसली नाहीत - त्या फळांसाठी गुगलून पाहिले तर Carissa conjesta हेच नाव येत आहे ??? काय गौडबंगाल आहे ?? का ही करवंदांचीच वेगळी जात (उपजात) आहे ??

Carissa spinarum हे करांद म्हणून दिलंय आणि याची फळे करवंदासारखी आहेत - कच्ची आणि पिकलेलीही ....

वैशाली पोस्ट आवडली. जसे प्रत्येक माणसात चांगले वाईट गुण असतात तसेच शहरांमध्येही. आपण जास्तीत जास्त चांगल्या गुणांना वाव द्यायचा विचार करायच्या. मुंबईतील चौपाट्या, राणीचा बाग, इतर गार्डन्स, पुरातन झाड हे काही नसण्यापेक्षा सुंदर आहेतच ना.

रिया आणि साधनालाही मुंबईला वाईट नाही म्हणायचेय. तिथल्या प्रचंड गर्दिने आणि त्यांच्या बेफिकरपणे कचरा करण्याने, तसेच काही प्रमाणात सरकार योग्य दखल घेत नसल्याने जे लोकांचे हाल होतात किंवा त्यांना जे अनुभव येतात त्याबद्दल बोलायचे आहे.

प्लिज आता मुंबई हा विषय बंद करुन छान निसर्गावरच्या गप्प्पा मारा.

हो शशांक, ती डोक्यात माळायचीलच करवंदे. पुर्वी वेणी वळायचे त्यातही ती असत. ते झुडुप फळे आल्यावर खुप छान दिसते. ड्राय फ्रुटस च्या दुकानात मिळणारी लालभडक चेरी म्हणजे तिच असावीत असा मला दाट संशय आहे. खरी चेरी (पाकवलेली ) आपल्याकडे अभावानेच दिसते.

व्वा छान पाऊस पडतोय एकडे! सुंदर रमणिय वातावरण आहे....

rain.jpg (फोटो अंतरजालाहुन)

मन चिंब पावसाळी, झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी, आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या ,पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता ,झाडे निळी कुसुंबी

घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यांत गलबताच्या मनमोर रम्य गावी
केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे

मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले

हिच ना ती करवंदे? मागे एकदा ही मी बाजारात एक फुले विकणार्‍या बाई कडून विकत घेतली होती जुनी आठवण आली म्हणून.

आमच्या गावच्या रोडवर एक गुरांचा दवाखाना होता. त्यांच्या कंपाउंडमध्ये पूर्वी ह्या करवंदाचे झाड होते. कुणाची खाजगी मालमत्ता नसल्याने आम्ही ती करवंदे शाळेतून येता जाता काढायचो. मैत्रीणींना भेट द्यायचो. बर्‍याच बायका तेंव्हा ही करवंदे पिकल्यावर गुलाबी झाल्यावर डोक्यात घालायच्या. खायलाही मस्त लागतात.

व्वा मस्तय करवंद, एकदम तोपासु.... हो आमच्या शाळेत बाई होत्या पानसे म्हणुन, त्या घालायच्या डोक्यात.
याचा साखरआंबा पण करतात... चटणी, लोणचं... व्वा आता येतीलच बाजारात एखद आठवड्यात....

येस्स जागू - हेच ते ... Carissa conjesta - काय मस्त रंग आहे ना ? ही खातात का ?

बरं - अजून एक प्रश्न - मग तोरणं काय प्रकार असतो ??

तोरण हा प्रकार मी ऐकलाय. अजुन पाहीला नाही आणि खाल्लाही नाही. रोहा-माणगाव ह्या एरियात असतात ती जास्त. माझ्या सासूच्या बोलण्यात ऐकलय मी बर्‍याच वेळा. आठोरन आणि तोरण अस काहीतर नेहमी म्हणतात त्या. खातात ती पण.

तोरणं अशीच पण आकाराने जरा लहान असतात. चवीला गोडसर पिठूळ लागतात. ( किंचीत बकुळफळासारखी ) त्याचा तोठरा बसत नाही. झाडावरून काढल्यावर थोड्या वेळानी ती फरमेंट व्हायला लागतात. मग त्यांना किंचीत मोहाच्या फुलासारखा वास यायला लागतो. झाडावरून तोडून खाल्ली तर मस्तच लागतात.

वॉव.. सुर्रेख करवंदं... बाप्रे कित्येक दशकात नाही खायला मिळालीत.. आता लक्ष ठेवीन बाजारात आली तर

स्लर्प!!!

वैशाली, मस्त पोस्ट Happy

रिया, डोन्ट टेक टेन्शन. इथे कुणीही मनावर घेणार नाही. Wink

वैशाली, शनिवारी वर्सोवा बीचवर आलो होतो. खरंतर घाटकोपर-वर्सोवा मेट्रो प्रवास करायचा होता पण शनिवारी चिक्कार गर्दी होती म्हणुन आम्ही कारने वर्सोवा बीचवर गेलो. पण दुसर्‍या दिवशी मात्र मेट्रो सफारी करून आलो. याआधी मी दिल्ली, फिनलंड इ. ठिकाणी मेट्रोने भरपूर प्रवास केला, पण मुंबई मेट्रोची बात और ;-). आदल्या दिवशी शनिवारी वर्सोवा ते विक्रोळी २ तास लागले तेच मेट्रोने २०-२२ मिनिटात. मेट्रोची तिकिट थोडीफार वाढावी असेच वाटते नाहीतर लोकं त्याचीही लोकल केल्याशिवाय राहणार नाही. Happy

रच्याकने, महाराष्ट्रात पहिली मेट्रो मुंबईतच धावली आहे. (नारायण नारायण नारायण :फिदी:)

रिया... माझं सुद्धा... काय गायली आहे हंसीका अय्यर.. Happy
म्हणुन तर पुर्ण गाण पोस्ट केल्या शिवाय थांबु नाही शकले....

खरंच ही करवंद खातात का ?
शाळेत असताना एक मैत्रीण सांगायची की ती विषारी असतात म्हणून .......
आणि आम्ही अगदी निरागसपणे विश्वास ठेवला....
.धन्य ते बालपण Happy

रिया मुंबई आवडत नाही म्हटलंस तर काही वाटणार नाही, 'हेट' म्हणालीस ते थोडं खटकलं, बाकी काही नाही. बऱ्याच जणांना नाही आवडत मुंबई. तसच मला पुणे फार काही आवडत नाही. मी प्रॉपर मुंबईला कधीच राहिले नाही, मी ठाणे जिल्ह्यात राहाते, पण मुंबईबद्दल प्रेम आहे. असो. जागू तू लिहूनही परत थोडे या विषयाबद्दल लिहिलं sorry.

वैशाली मस्त पोस्ट. सायली मस्त कविता. जागू मस्त करवंद. ती तोरणं बघितली आहे बाजारात दिनेशदा म्हणतात ती.

जिप्सी अगदि माझ्या दारात उतरलास तू

उतरल्ञा वर लगेच्च आहे त्या बीच वर गेला होतास का?

तिथुन जरा पुढे अजुन एक छोटा बीच आहे तो जास्त स्वच्छ असतो.. तिथे मोठे मोठे दगड आहेत...

अशा मस्त मस्त जागा अहेत "मुंबईत" (नारायणी नारायणी Wink

Pages