निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथुन जरा पुढे अजुन एक छोटा बीच आहे तो जास्त स्वच्छ असतो.. >>>>>>हो वैशाली. त्याच बीचवर गेलो होतो. बरीस्ता समोरून रस्ता आहे ना तिथुन गेलो होतो. Happy

तोरणांचा फोटो टाकलेला मी मागे. तोरणे करवंदाहुन थोडी लहान असतात, म्हणजे आपल्याकडे आपण करवंदात डोंगरची काळी मैना म्हणतो ना त्या आकाराची असतात, थोडीशीच लांबुळकी. आणि पिकल्यावर आत थोडी पिठुळ होतात. पिवळसर रंग होतो पिकल्यावर. कच्ची अस्ताना पण अशीच असतात. आंबोलीला आहेत.

गेली कित्येक वर्षे मी ढवसा ढवसा करत होती ती दिव्य ढवसा यंदा मला मिळाली आंबोलीत. फोटो टाकते नंतर. माझ्या आठवणी आता खुप गुंतागुंतीच्या झाल्यात त्यामुळे ढवसा ही पॅशनफ्रुटचा अवतार असतील असे वाटलेले. पण तसे अज्जिबात नाहीय. पॅषनफ्रुट आंबट असते, याची चव मी वर्णू नाही शकणार पण गोडसर आहे, आंबटपणा अज्जिबात नाही. आंबोलीत निसर्गात रस असलेली खुप मंडळी हल्ली
येतात, गावातल्या मुलांना काम मिळाले त्यांना जंगलात नेऊन काय काय दाखवत बसण्याचे.

दिनेश, तुम्ही त्या केवड्याच्या बनात गेला होता असे लिहिलेले, मीही जाऊन आले. कानटांनी मला खायचा प्रयत्न केला पण ती मंडळी पायावर चढली की मला लगेच जाणीव होते त्यामुळे त्यांचा प्रयत्न मी हाणुन पाडला. चौकुळच्या पापडी नावाच्या एरीयात मला चक्क केवड्याची भरपुर फळेही दिसली. छोट्या फणसासारखी आहेत.

आंबोलीचे खुप फोटो आहेत टाकण्याजोगे, घरचा पिसी चालु झालाय पण मला वेळ मिळत नाही.

आंबोलीत गवे आणि रानहत्ती यांचा उपद्रव इतका वाढलाय की यंदा कित्येकानी भातशेती केलीच नाही. लोक मुद्दाम गवे पाहायला दुरून येतात.

जळवा गं. तिथे कानटा म्हणतात. लईच बेक्कार. छोट्या एक इंची गांडूळाएवढी पण पायाला चिकटुन रक्त शोषुन घेतात. एकदा चिकटली की काढता येत नाही, त्यांचे पोट टम्म भरुन ती आपोआप गळून पडतात. तोवर वाट पाहा. तंबाखुचे पाणि टाकले तरच सुटका

साधना संपूर्ण पोस्ट इन्टरेस्टिन्ग्च! (वाचूनच लिहितेय बरं :दिवा:)
कानट ढवसा दोन्ही शब्द प्रथमच ऐकला.
आंबोलीच्या खूप रम्य आठवणी आहेत. कित्येक वर्षांपूर्वीच्या. सगळ्यात उंचावर जे एक गेस्ट हाऊस(तेव्हा असेल ...आता असेलच असं नाही) होतं तिथे राहिलो होतो.
सध्या संपूर्ण कढिलिंब(पत्ता) फळांनी बहरलाय. मागे फोटो टाकला होता. बरीचशी जागूने टाकलेल्या करवंदांसारखी दिअसतात.
फक्त करवंदं गुळगुळीत व ही फळं खडबडीत.
आणि परवा इतकी चर्चा झाली ..........नारळ कधी कुणाच्या डोक्यात पडतो का?...........यावर.
आज प्रचंड आवाज करून एक अख्खी फांदी नारळाच्या एका घोसासकट खाली आली. नेमका एक क्लाएन्ट चालला होता, त्याच्या खांद्याला घासून एक नारळ खाली पडला. थोडक्यात वाचला. बाकी गराजच्या अ‍ॅक्रिलिकच्या पत्र्यावर. थोडा पत्रा तुटला. आता गराजवर काही तरी चांगलं रूफ करून घ्यायला लागणार आहे. नाहीतर गाड्यांच्या टपावर नारळ पडला तर काही खरं नाही.

नाही दुखत. तीच तर गंमत आहे. त्यांच्या लाळेत दोन घटक असतात. एक घटक वापरुन जिथे चावायचे ती जागा एनेस्थेशीया दिल्यासारखी सुन्न केली जाते आणि दुस-या घटकाने रक्तप्रवाहाची गुठळी करणे बंद केले जाते. त्यामुळे रक्त गुठळी न होता त्यांना शोषता येते. या दुस-या घटकामुळे जळवा गळून पडल्यावरही थोडा वेळ रक्त वाहात राहते.

ऐतेनच! Happy

मस्त माहीती आहे ही
माझ्यासाठी नवी होती.
आता मी दुसर्‍यांना सांगून शायनिंग मारुन घेते Proud

ही करवंदं पूर्वी लग्नाच्या रिसेप्शनला येणार्या पाहुण्याना देत. मग गुलाब देण्याची प्रथा आली. आम्ही ही करवंदं चिक्कार खाल्ली आहेत. शिवाजी पार्कला ब्राह्मण सहायक संघाच्या गल्लीत याचं झाड आहे.

हत्ती आंबोलीत पोहोचले ? ४/५ वर्षांपुर्वीच ते कर्नाटकमधून गोव्यात यायला लागले होते. त्यांची पाण्याची आणि चार्‍याची गरज प्रचंड असते. काय करणार ते तरी.
आफ्रिका सिरीजमधे केनयातला एक रस्ता दाखवलाय. तो नेमका हत्तींच्या येण्याजाण्याच्या वाटेवर आडवा बांधला गेला. त्यावर तोडगा म्हणून त्या रस्त्याखाली खास हत्तींसाठी म्हणून एक बोगदा केला. आणि हत्ती त्याचाच
वापर करतात. भारतातल्याप्रमाणे आफ्रिकन हत्ती माणसाळत नाहीत. त्यामूळे आपल्याकडल्यासारखे त्यांचा
करमणूकीसाठी, अवजड कामांसाठी वापरही होत नाही. तरीपण वाळवंटात पाण्याचा शोध घेण्यासाठी त्यांची
मदत घेतात तिथे. हत्तींना पाण्याचा सुगावा फार दूरवरून लागतो.

ढवसे मला पण बघायचे असतील. फोटो बघितल्यावरच कळेल. केवड्याची फळे इथे आफ्रिकेत खातात.
अननसासारखीच पण जरा कमी गोड लागतात. आपल्याकडे खातात का ?

कानटांचा / जळवांचा प्रसाद मला मिळाला नाही अजून. पुर्वी खेडेगावात "दूषित" रक्त काढण्यासाठी त्याचा सर्रास वापर करत. रशियामधे पण करतात असा वापर.

मानुषी, झावळीसकट नारळ पडले ? मला उंदरांची शंका येतेय.

साधना मस्त लिहिलंय. ढवसाचा फोटो नक्की टाक, नाव पण वेगळंच वाटतेय.

हल्ली कोकणात गोवा बॉर्डरजवळ काही वर्षे ह्या हत्तींचा त्रास जास्त होतोय. आंबोलीला पण होतोय अरे बापरे.

वेका मस्त आहेत स्नोपीज, हिरवेगार.

ओ एम जी.. पाली, जळवा.. गॉश!!!!!!!!!!!!!

ढवसे.. फोटो टाका बाबा आता...

वेके स्नोपीज मस्त आहेत फ्रे श्श!!! ( बी टी डबलु ... तेरे फोनवा के इंतजार मे अभी तक हूँ ..
तू फक्त चीन चा नं सेव केलायेस ना???????? Lol

मामी, अजून झाड आहे का ते. मला बघावेसे वाटतेय. पुर्वी वसईला बघितली होती खुप. >> एकदा चेक करते पुन्हा आणि सांगते.

साधना वेळ मिळाल्यावर अम्बोलीचे फोटो जरुर टाका. खूप आवडेल.

रिया आयूर्वेदात जे पन्चकर्म म्हणतात, त्यात खूप जरुर असेल तर पेशन्टच्या अन्गाला या जळवा लावतात. त्या अशुद्ध रक्त शोषुन घेतात. आणी रक्त शुद्ध होते, असे आयूर्वेदीक डॉक्टर म्हणतात. मी प्रत्यक्ष बघीतलेल्या नाहीत.

http://vishwakosh.org.in/kumar-vishwakosh/index.php/ascites/leech

कानटे - म्हणजेच जळवा - ज्यांचा वापर आयुर्वेदात कित्येक (हजारो) वर्षांपासून करताहेत ....

WebMD Health News (http://www.webmd.com/heart/news/20040628/leeches-cleared-for-medical-use... )

June 28, 2004 -- Coming to a pharmacy near you, hordes of blood-sucking leeches!

It may sound like a horror movie, but the FDA says it's good medicine.

After thousands of years of use as an alternative treatment to blood-letting (an antiquated and abandoned practice of draining blood to cure diseases) and amputation, the FDA today approved the commercial marketing of leeches for medical purposes.

Medicinal leeches (Hirudo medicinalis) are blood-sucking aquatic animals that live in fresh water.

The small, slimy creatures were widely used in the 19th century to cure a variety of ailments. Currently, they are used in many parts of the world to help heal wounds and restore circulation in blocked blood veins.

Medicinal Leeches Finally Earn FDA Approval

Ricarimpex SAS, a French company, is the first to request and receive FDA clearance to market leeches in the U.S. as medical devices. The firm has been breeding leeches for 150 years in a certified facility and tracks each lot of leeches it produces.

In approving leeches as a medical device, the FDA says it reviewed the literature on leeches use in medicine and evaluated the safety information provided by Ricarimpex.

Under the law, a medical device is any article designed to diagnose, cure, treat, prevent, or mitigate a disease or condition; or to affect the function or structure of the body that does not achieve its effect primarily through a chemical action and is not metabolized.

(फोटो आंतरजालावरुन साभार ....)

Leeches.jpg

युक.. ह्या जळवा यक दिसतात अजुन.

आंबोलीचे फोटो नक्कीच टाकते. वेगळा धागाच उघडुन टाकते.

दिनेश केवड्याची फळे नाही खात गावी. खुप फळे लागलेली जी काढण्याइतपत जवळ असुनही काळी पडुन सुकलेली. याचाच अर्थ खात नसणार Happy

स्नोपीज मस्तच.

परवाच एक स्टर फ्राय वेज्जी रेसिपी पाहिली त्यात हे अख्खे मटर पाहुन आधी नवल वाटले आणि नंतर ट्युब पेटली.. इथे वाचलेले आधी म्हणुन बरे नाहीतर मी मुर्खात काढले असते शेफला. Happy

जळवा व्याक दिसतायेत अगदी Sad

काल मी साधनाची पोस्ट वाचून विचार करत होते की भुलीचं औषध ज्याने शोधुन काढलं त्याला जळवांकडुनच आयडिया मिळाली असेल का? Happy

मला अजुनही इंद्रधनूष्य नाही दिसलं सो मी व्याकूळ आहे Proud

अन्जु धन्यवाद...
साधना, केवढ्याच्या बनात जाउन आलीस... व्वा.. खुप सुंगध दरवळत असेल ना!
अम्बोलीचे फोटो जरुर टाक.. तोरणा, ढवसा हे सगळं बघायच आहे आणि हे गवे म्हणजे काय?
जळवा बद्द्ल मी पण ऐकले आहे, अशुद्ध रक्त काढण्या साठी उपयोग करतात म्हणुन...

वेका स्नोपिज मस्तच आहेत.. आवदा पीकपानी मोप हाय +++++ Happy Happy

दिनेश दा, शशांक जी छान माहिती, केवढ्याचे फळ पण असते?....

मनुषि ताई, क्लाएन्ट थोडक्यात वाचला तुमचा...

हो मी आईच्या तोंडून बर्‍याचदा ऐकलय की दुषीत रक्त काढण्यासाठी जळवांचा वापर करतात.

मानुषी लागल का ग त्या क्लायंटला?

वेका हिरव्यागार स्नोपिज मस्त आहेत.

साधना टाक ग लवकर अंबोलीचे फोटो. ते ढवसे काय आहे ते पाहुदे.

स्नोपिज सही. Happy

साधना त्या अगम्य शब्दांचे संदर्भासहित स्पष्टीकरण येऊ देत. फोटोही. Wink

जळवा हा खुप जुना उपचार आहे. शरीरातील अशुद्ध रक्त काढुन टाकायचा. माझे अनिहाउ हे प्रत्यक्ष बघायचे राहिलेच आहे अजुन. Uhoh

गवा / हत्ती अरे देवा Uhoh एका कुत्रामुळे एवढा त्रास झालाय हे असे प्राणी फिरत असले रस्त्यावर तर कठीण आहे माणसाच फिरणे. कालच का परवा फेबु वर एका बिथरलेल्या हत्तीची क्लीप पाहिली. एका माणसाला सोंडेत उचलुन आपटुन मारले त्याने. बहुदा कोणत्यातरी उत्सवातली घटना आहे ती. बरेचसे सजवलेले हत्ती होते त्यातला एक पिसाळला मग ती लोकांची धावाधाव नी त्या माणसाचा.... Sad शहारा आलेला...

विवि, तपशिल लवकरच येऊ द्या... शिर्षक छान आहे....

पुण्यामधे पहाण्या सारखे काय काय आहे... उद्या पासुन ७ दिवस मुक्काम पोस्ट पुणे.....

सायली इथे बरेच पुणेकर आहेत. शोभा, शशांक-शांकली, रिया आहेत. आणि खुप ठिकाण आहेत पुण्यात फिरण्यासारखी. माझ्या माहितीतली सारसबाग, शनिवारवाडा, सिंहगड, एक अभय अरण्या पण आहे. नाव आठवत नाही. तुळशी बाग माझी फेव्हरेट शॉपिंगसाठी. Happy

केवड्याची फळे पिकल्यावर अननसासारखीच दिसतात.. एका मराठी पुस्तकात उल्लेख होता, " अननसाच्या झाडाखाली बाइक पार्क केली ... "

केवड्याची फळे पिकल्यावर अननसासारखीच दिसतात.. एका मराठी पुस्तकात उल्लेख होता, " अननसाच्या झाडाखाली बाइक पार्क केली ... "

तुम्ही पाहिली नाहीयेत अजुन?? मी दुरून पाहिली . दुरुन हिरव्या फणसासारखी दिस्ली. आकाराने आपल्या बोटांसकट तळहाताएवढी आणि वर फणसासारखे काटे पण दिसले. लहान भाजीचा फणस कसा दिसेल तशी दिसत होती. जुनी झालेली काळी झालेली. नेटवर फोटो पाहिले ते थोडे वेगळे दिसताहेत, अननसासारखे. तसेच असणार बहुतेक. माझ्याकडचे फोटो अजुन मी नीट पाहिले नाहीत. आता बघते लवकर आणि डकवते.

सायली, केवड्याला केवडा लागला नव्हता गं. असता तर मला आत नेणा-याने धाडस केले नसते जायचे. पावसाळ्यात फुलतो तिथला केवडा. आणि खुप फुलतो कारण बाहेर रस्त्यावर सुगंध येतो. गावातले लोक जायला घाबरतात तिथे. माझ्या घरच्यांना आधी कळले असते मी जाणार तिथे तर मलाही पाठवले नसते.

sayali, sinhgad ani khadakawasala ya vatavaran must visit places ahet Happy

Pages