निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, मस्त बरसतोय आपल्याकडे पाऊस......
वर्षूदी, <<<< वितळणार्‍या सोन्याच्या सूर्याचे फोटो>>>>> कित्ती मस्त उपमा दिली आहेस तू, वा!!!!!!!
मानुषीताई, मस्त फोटो. ५ नं. चा फारच आवडला मला.
हे रोज अ‍ॅपल (जाम). हे खाताना खरच रोज सिरपसारखा सुगंध जाणवतो. पण आपल्या नेहमीच्या जाम सारखे खुप ज्यूसी- रसरशीत नसतात हे. चव मस्तच असते ह्याची.

jam2.jpgjam3.jpgjam4.jpgjam5.jpg

आत्ताच ऑफिसच्या बाहेर आलो होतो. थोड्या वेळापूर्वीच पावसाचा शिडकावा होऊन गेल्याने आकाश अगदी स्वच्छ धुतल्यासारखे दिसत होते. मस्त निळा रंग (जो मुंबईत प्रदुषणामुळे फार कमी दिसतो). पांढरे ढग/काळे ढग आणि निळे आकाश आणि हो त्यावर अर्धवट उमटलेले "इंद्रधनुष्य". आजचा टि ब्रेक एकदम झक्कास + १००००० फक्त इथे शिडकावा नाहीय तर धोधो नळ सुरू झालेला सकाळी.

मला पावसाळा अजिबात आवडत नाही. फक्त तिन गोष्टी चांगल्या असतात - एक म्हणजे अंग घामेजुन जे चिकचिक होत असते ते होत नाही , हवेतला धुळीचा करडा पडदा पावसाने धुवुन काढल्याने सकाळचे उन अगदी करकरीत स्वच्छ सुंदर आणि त्यामुळे आत्ताच सुर्याने प्रसन्न होऊन आपल्याकडे पाठवल्यासारखे दिसते, त्यामुळे झाडे, दगड, धोंडे इ.इ. सगळे काही सुंदर दिसु लागते आणि तिसरे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे परत हवेतला धुळीचा करडा पडदा पावसाने धुवुन काढल्याने घरात येणारी धुळ ९०% ने कमी होते.

बाकी पावसाळा म्हणजे रस्त्यावरचे काळे पाणी, त्यात वेगाने जाऊन आपल्या अंगावर ते घाणेरडे पाणी उडवणारी वाहने, गळक्या ट्रेन्स आणि बसेस, भिजलेल्या रिक्षा इ.इ.इ. अनंत. नक्को तो पावसाळा हे माझे प्रामाणिक मत आहे. आज सकाळीच रस्त्यांवर पाणी साचले होते. Sad

बाकी पावसाळा म्हणजे रस्त्यावरचे काळे पाणी, त्यात वेगाने जाऊन आपल्या अंगावर ते घाणेरडे पाणी उडवणारी वाहने, गळक्या ट्रेन्स आणि बसेस, भिजलेल्या रिक्षा इ.इ.इ. अनंत. नक्को तो पावसाळा हे माझे प्रामाणिक मत आहे. आज सकाळीच रस्त्यांवर पाणी साचले होते. >>> साधना, १०० % अनुमोदन

उजु... हे फळ पुढे पांढरट गुलाबी होतं का ? गोव्याला मंगेशीच्या देवळाबाहेर असतात विकायला.

साधना.. अगदी बरोब्बर बोललीस!!

देस, गाँव, पीपल की छाँव वगैरे कवितेत छान वाटतात वाचायला..परदेशात राहताना तर अजून आवडतात.. कारण त्यावेळी रस्त्यावरची डबकी, डास, चिखल , बीचवर( अप टू इन्फिनिटी ) दिसणारा कचरा, वहाणांचा , प्लास्टिक पिशव्यांचा ढिगोरा.. इ.इ. अजिब्बात आठवत नाही , स्वानुभावावरून.. Wink

म्हणून तर आता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पळून जातोय ,एकदम सप्टेंबर मधे भेटू , इसी जगह , किसी भी समय Lol

देस, गाँव, पीपल की छाँव वगैरे कवितेत छान वाटतात वाचायला..परदेशात राहताना तर अजून आवडतात.. कारण त्यावेळी रस्त्यावरची डबकी, डास, चिखल , बीचवर( अप टू इन्फिनिटी ) दिसणारा कचरा, वहाणांचा , प्लास्टिक पिशव्यांचा ढिगोरा.. इ.इ. अजिब्बात आठवत नाही , स्वानुभावावरून.. >>> अगदी बरोबर वर्षु, मला ही पावसाळा अजिबात आवडत नाही इथला. पण तु लकी आहेस पळून जाऊ शकतेस. मी पळून नाही जाऊ शकत आत्तातरी इथून.

मलाही आवडतो पाऊस, पण मुसळधार पाहिजे. रीपरीप पावसाचा कंटाळा येतो.

रिया Proud

बीचवर( अप टू इन्फिनिटी ) दिसणारा कचरा>>>>>>याचा मात्र खूप राग येतो.

काल वर्सोवा बीचला गेलो होतो (वर्षूदी सॉरी, तुझ्या घराजवळुनच गेलेलो. Wink ), ३-४ दिवस ज्या महाकाय लाटा उसळत होत्या त्यामुळे सगळे प्लास्टिक, कचरा. इ. बीचवर सगळीकडे विखुरला होता. Sad अगदी घाण वाटत होतं. तेथुन लगेचच निघालो Sad

जिप्स्या... जुहू बीच सोडून सरळ वर्सोवा बीच ला गेलास.......... तुला काय वाटलं ही वर्षूदी न दिसो कुठे जुहू बीच वर वॉक करताना.. उगाच कबाब मे _ _ _ _ हाँ?????????

हो रे पावसाळ्यात सर्व बीचेस ची वाट्ट लागणारे.......... सॅड!!!!!!!!

दिनेश कुठायेस तू.. इथे पावसाळा लवर्स आणी हेटर्स चा डिबेट ग्रुप सुरु होतोय.. तू ये रेफरी बनून Happy

रिये.. तू मिल पहले मुझे.. Lol

पाऊस वरून पडतो.. त्यामूळे वर बघावे.. खाली बघू नये.

दिवसेंदीवस मुंबई आणि इतर शहरातला कचरा वाढत चाललाय, त्यात पावसाचा काय दोष ? अच्छे दिन आने वाले आहे म्हणतात. गंगे पाठोपाठ आमच्या मिठी, उल्हास आणि दहीसर नद्याही साफ होऊ द्या.

उजू फळ मस्तय. पहिल्यांदाच पहातेय.
इथे (नगरात) मागील आठवड्यात प्रचंड वादळ आणि पाऊस झाला. त्यामुळे अव्हनचं Proud टेंपरेचर जर्रा कमी झालंय.

आपण जे निसर्गाला देतो ते निसर्ग पावसा थ्रू आपल्याला परत देतो Happy

रस्त्यात कचरा टाकणारे आपण म्हणून पावसाळ्यात गटारं तुंबल्याचा त्रास आपणच सहन करायचा.
पावसाचा काय दोष त्यात? माणसाच्या सवयी बदलल्या की निसर्गाच्याही बदलतील हो Wink

मला खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊप आवडतो पाऊस.
रिमझिम, रिपरिप्,धो धो , मुसळधार! कसाही
पावसाचं नि माझं एक गुढ नातं आहे.
माझा पहिला आणि आयुष्यभराचा बॉयफ्रेण्ड आहे तो.... त्याला काही म्हणाल तर माझ्याशी गाठ आहे कळ्ळ ना? Proud

I love rain!
येच तू मुंबईला लोकलच्या गर्दीत छत्री,पर्स आणि स्वतःला सांभाळत .

तरीही पाऊस आवडतो. मुख्य म्हणजे घामाची चिकचिक कमी होते.आसपासची झाडे मस्त टवटवीत दिसतात.फक्त तो पाऊस ऑफिसला जायच्या वेळी नको.

आय हेट मुंबई Proud

मला नाही जमत मुंबईत रहायला Happy
लोकल, उकाडा, गर्दी! मी नाहीच राहू शकत Happy

बाकी इथेही चिकचिक आणि बसची गर्दी असतेच की गं Happy
तरीही पावसासाठी सगळं माफ Happy

जिप्सी ........तुझा विक्रम यंदेवरचा लेख व फोटो पाहिले होते. पण सध्या नेट गंडलंय त्यामुळे नेट चालू केल्यानंतर सत्राशेसाठ प्रकार होतात. त्यामुळे तिथे प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला होता पण................. Angry
अगदी आयपॅड आणि(यू एस ए तलं) वाय फाय पासून ........ हपिसातला डेस्कटॉप आणि बीएसएनएल चं गणलेलं नेट
असा प्रवास झालाय.
असो.......परवाच्या वादळाने दोन्ही नारळाच्या खूपच झावळ्या पडल्यात आणि इकडे तिकडे तारांवर लटकल्यात. माणूस बोलावून सगळं निस्तारणं आलं. दोन्ही झाडं खूप उंच गेली आहेत . वादळात अगदी झुलंत होती. पण बघताना जरा भीतीच वाटंत होती.
आता ३/४ दिवसात आंब्याला कलम करायंचं आहे.
एक झाड कुंडीत आहे वरच्या मजल्यावरच्या सिटाउटमधे. तो आंबा दशहरा आहे. उत्तम.
दुसरं झाड खाली अंगणात आहे. खालीच आलेलं ............तो हापूस असावा. आता कलम करताना कशाची फांदी कशावर कलम करावी? प्लीज सांगा......................साधना, जागू, दिनेश ..............................कोकणातली मंडळी????

असू द्या असू द्या
माफ करा Proud
पण ते आहे ते तसचं रहाणारेय Proud

आज मस्त रिपरिप पावसात भिजत ऑफिसला आले.
आय लव्ह रेन!

आता किमान ४ महिने मी प्रचंड खुष वगैरे असणारेय Happy

आय हेट मुंबई>>>>> त्रिवार निषेध!!!!

मी आय हेट मुंबई गटातली आहे, रिया तुला कंपनी.. Happy

माझा निषेध करणा-यांनो, या, तुमचा घसा निषेध करुन कोरडा पडला असेल तर पन्हे देते पण मला मुंबई अज्जिब्बात आवडत नाही हे मात्र त्रिवार खरे. पहिली संधी मिळताच पळणार आहे इथुन. याआधी एकदा पळालेले पण नशिबाने परत इथेच आणले, यावेळी नशिबाला संधी नाही देणार.

मानुषी, मला यातले फारसे कळत नाही पण माझी माहिती अशी आहे -

साध्या जंगली आंब्याचे रोप वाढवतात, ते थोडे मोठे झाले की त्यावर हापुसची फांदी कलम करतात. तु जरी हापुस खाऊन त्याची कोय रुजवली तरी त्यातुन वाढलेल्या झाडाला हापुसच लागेल याची खात्री नाही. त्यामुळे तु वर जे लिहिलेस ती झाडे तु कोयी रुजवुन वाढवली असतील तर मग त्यांचे एकमेकांवर कलम करण्यच्या फंदात न पडता त्यांचे त्यांना वाढू दे, कारण कोणाला कशी फळे लागतील ते सांगता येणार नाही.

जर वरचे झाड दशहरा आहे याची खात्री असेल तर त्याचे कलम कर खालच्या झाडावर. दोन दोन दशहरे येतील. खालचे झाड कोय लावुन आलेले असेल तर ते हापुसच असेल याची खात्री नाही.

आणि मुद्दाम हापुसच हवा असेल तर सरळ भरवशाच्या नर्सरीतुन कलम आण.

जमिनीत आलेले झाड तसेच वाढू द्यावे... त्याला कैर्‍या लागतील, आंबे पण लागतीलच. आंबा गोड नसला तर कैर्‍या वापरता येतील !

तो हापुस आहे या बाबत शंका असेल तर त्यावर कर. नाहीतर साधना म्हणते त्याप्रमाणे एखाद्या बाठ्याच्या झाडावरच लाव.

मला पाउस खुप आवडतो. फक्त विजा नाही आवडत. लहानपणापासूनच घाबरते मी विजेला. पावसाळा म्हणजे हिरवळ, स्वच्छ झाडी, रानभाज्या, रानफुले, भरलेल्या विहिरी, तलाव, पावसाळी गाभोळीने भरलेले मासे, भरलेल्या पाण्यात डुबुक डुबुक करत चालणे, हिरवीगार शेते हे सगळे डोळ्यासमोर येते.

Pages