निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.
"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.
आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.
वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सुप्रभात... नलिन इंद्रधनुष्य
सुप्रभात...
नलिन इंद्रधनुष्य मस्तय...
नलिनी मस्तच आलाय फोटो.
नलिनी मस्तच आलाय फोटो. आमच्याकडे पण दोन दोन दिसतात बहुदा.
नलिनी, मस्त फोटो. दिनेशदा,
नलिनी, मस्त फोटो.
दिनेशदा, खास तुमच्यासाठी हे फोटो. तूम्हाला भरून आलेल्या आभाळाचे फोटो बघायचे होते ना.
तरी पण अजुन फार काही झाकोळून येत नाहीये आभाळ.
उजु काय सही फोटो आहेत.....
उजु काय सही फोटो आहेत.....
नलिनी, उजु मस्त फोटो
नलिनी, उजु मस्त फोटो
निसर्गाची परतफेड फेसबूकवरील
निसर्गाची परतफेड
फेसबूकवरील मरीन ड्राईव्हवरील हा फोटो बघा :(. कधी सुधारणार आपण.
https://www.facebook.com/photo.php?fbid=677500158982335&set=a.4473360286...
जिप्सि, मला पिकासात फोटो
जिप्सि, मला पिकासात फोटो रिसाइज कसे करायचे ते सांग ना प्लीज.
उजू.. खुप आठवणी दाटून येतात
उजू.. खुप आठवणी दाटून येतात असे फोटो बघितले कि... शाळेच्या, मित्रांच्या, शाळेच्या वाटेच्या !
पिकासात रिसाईझचे ऑप्शन नाही.
पिकासात रिसाईझचे ऑप्शन नाही. पेंटब्रशमधे आहे कंट्रोल ड्ब्ल्यू .
नलिनी, उजु फोटो मस्त.
नलिनी, उजु फोटो मस्त.
दा, आता बघते पेंट्मध्ये.
दा, आता बघते पेंट्मध्ये.
सांजघनांच्या मिटल्या
सांजघनांच्या मिटल्या ओळी
मिटले माझे नयन निळे
शिरीष फुलांच्या शय्येवरती
क्षितिजावरचे रान जळे --- ग्रेस
वा उजू मस्त आहेत फोटो आणि
वा उजू मस्त आहेत फोटो आणि सोबत ग्रेस यांची कविता, क्या बात है.
वा सुंदर फोटो आणि ओळीही !
वा सुंदर फोटो आणि ओळीही !
शिरीष फुलांची शय्या.. हि
शिरीष फुलांची शय्या.. हि कल्पनाच छान आहे. अगदी मऊमुलायम असणार ती शिवाय सुगंधीही !
हो दा, मला शिरीषचा सुगंध
हो दा, मला शिरीषचा सुगंध आवडतो. मंद असतो अगदी.
आणि जमले एकदाचे वॉमा टाकून रीसाइज करायला फोटो. आता तूम्हा सगळ्यांचे काही खरे नाही
मस्त फोटो आणि सुंदर ओळी
मस्त फोटो आणि सुंदर ओळी
उजु, काव्य आणि फोटो दोन्ही
उजु, काव्य आणि फोटो दोन्ही मस्त. मजा आली.
जिप्सि, तू फोटो चांगले
जिप्सि, तू फोटो चांगले म्हणाला म्हणजे तूझे फोटो बघुन बघुन जरा बरे फोटो काढता यायला लागले असे म्हणता येइल तर आता.
(No subject)
उजू, मस्त फोटो!
उजू, मस्त फोटो!
उजु.. वितळणार्या
उजु.. वितळणार्या सोन्याच्या सूर्याचे फोटो अक्षरशः डोळे दिपवणारे आहेत..
सुंदर ओळी
जिप्स्या, वर्षू, उजू, जागू...
जिप्स्या, वर्षू, उजू, जागू... सर्वांनी मिळून मुंबईतल्या पावसाची एक प्रकाशचित्र मालिका करा ना... अस्सा पाऊस जगात कुठे पडत नाही.
मी पण १३ तारखेला सं. ६.३० वा.
मी पण १३ तारखेला सं. ६.३० वा. इंद्रधनुष्य पाहीला.
,'अस्सा पाऊस जगात कुठे पडत
,'अस्सा पाऊस जगात कुठे पडत नाही...' दिनेश............ हो ना!!!!!!
थोड्याश्याच शॉवर मधेच किती चिखल झालाय... ऊप्स!!!!!
थोड्याश्याच शॉवर मधेच किती
थोड्याश्याच शॉवर मधेच किती चिखल झालाय... ऊप्स!!!!! >>> वर्षु, +++ १
घराबाहेर पाऊल टाकावसं वाटत नाहीये.
काल पुण्यात पण एक मस्त सर
काल पुण्यात पण एक मस्त सर येउन गेली पावसाची. लगेच उन. "चुकून श्रावण महिना गडबडीत आधी आला की काय" असे वाटले
उजु, फोटो फारच सुंदर.
हो प्रज्ञा.......>>>>>>>काल
हो प्रज्ञा.......>>>>>>>काल पुण्यात पण एक मस्त सर येउन गेली पावसाची. लगेच उन. "चुकून श्रावण महिना गडबडीत आधी आला की काय" >>>>>>>>>
अगदी अगदी! काल पुण्यात होते.
उजु फोटो मस्तच!
फाउन्टनहेड पार्क
फाउन्टनहेड पार्क
चक्क कावळा बाल कोकिळेला भरवतो
चक्क कावळा बाल कोकिळेला भरवतो आहे!!
हा टिपलेला दुर्मिळ क्षण खास तुमच्यासाठी! इंटरनेटवरून साभार.
https://www.facebook.com/photo.php?fbid=10203239662089753&set=gm.1015211...
Pages