निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश कायपुली मस्तच!

नॅशनल हार्बर...................आणखी काही फोटो.........


एक मनुष्याकृती प्रचंड स्कल्प्चर वाळूत गाडलं आहे.


घरी परततानाच्या संधीप्रकाशात हे फ्लाय ओव्हर्स सुंदर दिसत होते!


वॉव, मानुषी - सगळे फोटु भारीचेत गं ........

एक मनुष्याकृती प्रचंड स्कल्प्चर वाळूत गाडलं आहे. >>>>>> हा हा हा हा ......

मानुषी, कित्ती सुंदर.. आणि आठवणीने इथे शेअर केल्याबद्दल खुप खुप आभार. टुरिस्ट स्पॉटचे फोटो पाहण्यापेक्षा तिथल्या रोजच्या हलचलीचे फोटो पाहायला मला जास्त आवडतात. आपणच तिथे जाऊन आल्याचा भास होतो. Happy परत एकदा ठँक्यु गं.

जिप्स्प्या, काय फायदा नाय झाला. लोकांनी मला इग्नोर मारलं.... Angry Angry

(रच्याकने, तु मस्त लिहिलंस)

सुप्रभात...
मनुषी ताई खुप सही फोटोज....टुरिस्ट स्पॉटचे फोटो पाहण्यापेक्षा तिथल्या रोजच्या हलचलीचे फोटो पाहायला मला जास्त आवडतात. आपणच तिथे जाऊन आल्याचा भास होतो. +१००%

जिप्सी, छान संदेश...:) आजच पेपर मधे वाचलं, वडाच्या फांद्या तोडु नका... झाडाचीच पुजा करा...

नवरा ऑफीसला जाताना म्हणाला, मग काय सात जन्मी मीच ना? मी म्हण्टल सात जन्मी नाही, जन्मो जन्मी तुच... फक्त मागतांना थोड वेरीएशन.... गॉड गीव मी सेम हनी विथ सम मोअर मनी!!!;)

मानुषीतै, मी हळूच डोकावून डोकावून वाचतेय Proud

बाकी उलटी पाल इमॅजिन केलं Sad
तुम बडी शुर्हो!
मी तर गाडी ठोकलीच असती १००%

मानुषी.. मस्त फोटो.. एकदा अंगोलाच्या सामान्य जीवनाचे पण दर्शन घडवायचे आहे.
साधना... खरं तर अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी.. आपल्या नि. ग. वर असल्या प्रवृत्तींना स्थानच नाही. म्हणून तर आपण अजून एकत्र आहोत आणि असेच कायम राहणारही आहोत.

मानुषी कसले सह्ह्ह्ह्ही फोटो आहेत. मस्त. Happy
तो सँड बाथ वाला माणुस सही. काय एकेक आयडीया येतात ना लोकांना. नी तो किती व्यवस्थीत राहिलाय. आपल्याकडे एव्हाना ती हाता पायाची बोटे, केस असे काय न काय चोर बाजारात गेले असते विकायला. Sad Angry

मनीमोहरच्या धाग्यावर लिहिलेला प्रतिसाद पुन्हा इथे लिहितेय कारण इथे सगळे फार गोड आहेत. मला नेमकं काय सांगायचय ते कळून घेणारे Happy

तर वटपौर्णिमेला माझी आई आणि मावश्या हीच सगळ्यांना खटकणारी पद्धत वापरतात कारण आमच्या आसपास वडाचं झाड नाही.
ते शोधत फिरण्या एवढा वेळ नसतो कारण पुजा करून ऑफिसला/ शाळेत जायचं असतं....
पण हो! दर वर्षी न चुकता त्या फांद्या मात्र आसपासच्या शाळंमध्ये/ कंपन्यांमध्ये (जवळ एम आय डी सी आहे) आवारात लावायला नेऊन देतात. मला वाटतं कोणीतरी लावलेल्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा बेटर पद्धत आहे ही. आणि शाळांमध्ये लावलेले वड मुलं फार मनापासुन जोपासतात. पुढच्या वर्षी त्या वडाची पुजा करायला जमणार्‍या गर्दीमुळे शाळा डिस्टर्ब होते खरी पण उपाय नाही.लोकांना एवढं साधं कळत नाही की तुमची व्रत वैकल्य असतील पण चिल्ली पिल्ली अभ्यास करतायेत. तुम्ही तिथे वडाला साखर वगैरे टाकणार आणि मग मुंग्या होणार. अशाने तुम्ही या पिल्लांची मधल्या सुट्टीत डब्बा खायची जागा खराब करताय. किती मुंग्या, मुंगळे असतात तिथे Sad पुन्हा या बायका तिथे जातात आणि जोर जोरात गप्पा मारत बसतात. मुलंच ती शेवटी.. किती वेळ अभ्यासावर लक्ष देणार? मग सगळं सोडुन तो सोहळाच बघत बसतात सरळ खिडकीत येऊन...
तेंव्हा किमान माझी आई आणि मावशी तरी ते करणं टाळतात आणि फांदी घरी घेऊन येतात, पुजतात आणि मग पुन्हा एखाद्या शाळेत, कंपनीच्या आवारात लावण्यासाठी नेऊन देतात. झाडांची वाढ होते तेंव्हा एक फांदी कापून पुन्हा लावली तर काही बिघडत नाही. नोट - पुन्हा लावली तरच काही बिघडत नाही... असं मला वाटतं....

मला आठवतंय लहानपणी आम्ही वटपौर्णिमा याचा अर्थ वडाचं एक झाड लावायचं पण त्याआधी त्याची पुजा करायची (सायकल आणली की वापरण्याआधी त्याची पुजा केली जाते तशी) असाच समजायचो.इतर झाडं लावताना त्यांची पुजा का नाही केली जात याचं उत्तर स्वतःच शोधलं होतं कारण तो दिवस वडाचा हॅपी बड्डे असतो Proud म्हणून त्याचं औक्षण करतात. त्याला नवे कपडे (धागे) घेतात Lol आणि मग त्याला लावतात. Proud

आणि बाकी झाडांचा बड्डे कोणाच्या लक्षात राहीला नाहीये म्हणून त्यांची पुजा केली जात नाही Proud

लहानपणी सोसायटीमधल्या चिल्ल्या पिल्ल्यांना गोळा करून असा गुलाब, मोगरा वगैरेचा पण बड्डे साजरा केल्याचं आठवतंय Lol

जस्ट इमॅजिन, गुलाबाच्या झाडाला गुंडाळलेल्या दोर्‍या Lol

थोड्या प्रमाणात झाडाच्या फांद्या तोडल्या तर झाडाचे नुकसान होत नाही, नवीन फुटवा येतो. पण फार मोठ्या प्रमाणावर फांद्या तोडू नयेत. त्याने झाडाचे नुकसान होते. फांदी पूजणे हा शहरी शॉर्टकट आहे. पुर्वी गावातले एखादे झाड निवडून त्याची विधीवत मुंज होत असे आणि मगच त्याला हा मान मिळत असे. शहरातही असे वृक्ष आहेतच. प्रत्येक घरी फांदी पूजण्यापेक्षा सोसायटीची वगैरे कॉमन पूजा करता येईल.
वडाची लागवड करण्याचे काम पक्षी करत असतात. वडापिंपळाच्या बिया रुजायला त्यांच्या पोटाची ऊब लागते.
अशी लागवड झाल्यावर अवघड जागी म्हणजे इमारतीवर वगैरे उगवलेली झाडे हळुवारपणे सोडवून ती रस्त्याच्या कडेने ( पण कुठल्याही बिल्डींगपासून लांब) लावावीत.

रिया भापो.

पण मला वाटते - पुर्वी बायका बाहेर पडत नसत सो एक गेट टुगेदर, मोकळ्या वातावरणात स्वास घेणे ए. शिवाय,
या व अशा झाडातुन मिळणारा ऑक्सिजन हेही यामागचे कारण असु शकेल. हेच सेम लॉजिक आपट्याच्या पानांना. मला ते दसर्‍याला वाटले जाणारे आपट्याची पाने बिच्चारे वाटतात.

तुला एक सांगु ती फांदी घरीच कुंडीत का नाही लावत? २/३ वर्षे सांभाळायची मग द्यायची. दरवर्षी नवीन नाही आणायची.

शिवाय तुझी आई व मावशी व त्यांच्यासारखे असे किती जागरुक नागरिक आहेत? जेवढ्या फांद्या विकल्या जातात त्यातल्या १ टक्का पण अशा संवर्धन होत नसतील. हे चांगले - वाईट स्केल वर कसे बसवायचे ते तु ठरव.

प्रत्यक्ष झाडाजवळ जाणे व एका फांदीची घरी पुजा करणे यातला फरक तुझ्याच लक्षात येईल विचार केलास तर. Happy

त्यांनाही समजाऊन सांग. मी याला फॉर वा अगेन्स्ट नाही. पण मी पुजा / उपवास पण नाही करत. पण हो सकाळी (अशा काही दिवशी तरी) देवाच्या पाया पडुन फक्त नवराच कशाला घरच्या / ओळखीच्या सगळ्यांसाठीच आरोग्य मागायचे. (हे खरे तर रोज करावे पण मी नाही करत).

होप तुला पटतेय.

दिनेशदा, जिथे झाडं नाहीत असांनी फांद्या आणल्या तरी त्या कुठे तरी फेकून न देता त्यांची लागवड करावी आणि फांद्या आणल्या म्हणुन गिल्ट घेऊ नये इतकंच मला सुचवायचं आहे Happy

मोना, तू म्हणतेयेस ते भापो..... म्हणूनच लिहिलं गं की ती फांदी पुन्हा लावली तरच उपयोग आहे Happy

बाकी ज्यांना शक्य आहे त्यांनी झाड पुजलं तर त्यात काही गैर नाही आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी फांदी आणुन पुजली आणि फेकून दिली तरच त्यात गैर आहे एवढंच मला म्हणायचंय Happy

कुंडीतच झाड का लावत नाही आई हा प्रश्न कधी मनात आला नाही. पुर्वी मी लहान असताना तिने कुंडीत लावलेलं झाड आठवतय. आता का बंद केलं ते माहीत नाही. मी विचारेन नक्की Happy

मोनाली, रिया फांदी आणुन पुजा करुन ती फेकुन न देता ती लावावी हे पटतय मला...
पण कुंडीत झाडलावुन पुजा करायची.... मग आपण इतक नटलेलं मैत्रीणींना कस दिसणार... आणि त्या कशा तय्यार
झाल्या आहे हे कसे कळणार...:D Lol जोकींग हा! कुंडीतली आयडीया पण आवडली हं....

मग आपण इतक नटलेलं मैत्रीणींना कस दिसणार... आणि त्या कशा तय्यार झाल्या आहे हे कसे कळणार>>> Happy हेही खरय म्हणा. पण इतके नटुन थटुन करात का हल्ली कोणी पुजा? Uhoh

मोनाली, आज माझ्या ऑफिसात काही बायका भारी साड्या नेसुन आल्यात, त्या पुजा करुनच आल्या असाव्यात. Happy

पुजा करताना नटून थटून करायची पद्धत आहे आणि (माझ्यासकट) काही बायकांना असले काही आवडत नसले तरी हे सगळे आवडणारा एक मोठ्ठा बायकवर्गही आहे. मार्गशीर्षातले उपास असतात तेव्हा भरजरी साड्या आणि भरगच्च दागिने घालुन अख्खा दिवस बसतात बायका ऑफिसात. त्यांना आवडते, आपले काय जातेय. मी त्यांच्या साड्या बघते Happy

साधना, माझ्या ऑफिसमध्ये पण बायका नटुन थटुन आल्यात. Happy

एकीच नुकतंच लग्न झालंय Happy

ती यूपीची आहे आणि मुलगा मराठी.
तिला नवीन आहे हे सगळं. कसलं भारी वाट्तय ती ज्या पद्धतीने माहीती गोळा करतेय ते बघुन Happy

आयेम फीलिंग जेलस Happy

मुंबईला शिवाजी पार्कजवळ समुद्राचे पाणी रस्त्यावर आल्याची बातमी आहे. मी बरीच वर्षे त्या भागात जातोय, १९८१ / ८२ ला तर तिथे चौपाटी होती. अगदी चौपाटीसारखे स्टॉल्सही होते. मग वांद्रे रेक्लमेशन, माहीमच्या खाडीत भराव... असे होता होता समुद्र अगदी किनार्‍याजवळ आला. आता तर रस्त्यावरच आला.
जागू कडे काही झाले का असे ?

मानुषीताई, मस्त फोटो.
स्वच्छता पाहुन छान वाटते.

आमच्या सोसायटीत बाल्डीत वडाचे झाड लावले आहे.
आम्ही त्याच झाडाची पुजा करतो.
प्रत्यक्ष झाडाजवळ जावुन पुजा करणे मस्त वाट्ते.

हम्म्म्म साधना रिया. खरय ट्रेन मधे पण होत्या बायका. पण फार नाही. बहुदा एव्व्व्व्व्व्व्ढे सगळे करुन उशीरा गेल्या असाव्या कामावर.

मला एक कळत नाही. मुळात आपल्याकडे पुरुष या कॅटेगरीला स्वतःची मते, हक्क, डामडौल, इ. इ. इ. सगळे आहे. मग स्वतःचे आयुष्मान / आरोग्य नसते का? प्रत्येक वेळी घरातील / नात्यातील स्त्रीने त्याच्या आरोग्य व आयुष्यासाठी देवाला का कामाला लावावे लागते? त्याची अशी एक कुंडली असते ना मग त्याप्रमाणेच त्याचे जीवन असणार ना. जर त्याच्या जीवनाबद्दल ठरवणे / मागणे हे स्त्रीच्या कार्याने प्रभावीत होते तर आपला समाज पुरुषश्रेष्ठ का?

जऊदे झालं. उगाच विषयांतर पण लिहीलय तर खोडणार नाही आता मी.

दिनेशदा, समुद्राच्या लाटा खूप उसळल्या आणि पाणी मुंबईला बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर आले. मुंबई (शिवाजी पार्क, वरळी सी फेस, माहीम, गेट वे ऑफ इंडिया) आणि रत्नागिरीचे आत्ता टीव्हीवर बघितले.

वरिल सर्व फोटो मस्त!
समुद्राला पोर्णिमेमुळे भरती आलेय का?

Pages