निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसला ऑस्सम आहे फोटो जिप्स्या.. खतरनाक.. आणी किती पेशंस आहे तुला.. ग्रेट !! Happy

दिनेश जवळ कसलीही माहिती चे भंडार असते तय्यार.. फक्त माऊस वर बोट ठेवा कि त्याच्या डोक्यातला कर्सर खर्र्र्र्कन
सर्व माहिती निग वर पटापट टाकेल .. Happy

माझ्या लक्षात कसं राहतं, याचे मालाही कधी कधी नवल वाटते !
हा वरचा स्टील फोटो ( स्थिर चित्र ) आहे पण सध्या टाईम लॅप्स व्हीडिओ चे तंत्र बरेच वापरले जाते. काही सेकंदाच्या दृष्यासाठी सहा महिने ते दोन वर्षे कॅमेरा एका जागी लावलेला असतो.
आपल्या डोळ्यांच्या ज्या मर्यादा आहेत त्यावर आपण कॅमेराने मात केलीय.
मून लाईट, कँडल लाईटच नव्हे तर आता स्टार लाईट कॅमेरा पण आला आहे.

vOv.........jipsee kasala khatarnak foto!
marathi kaa taayapala jaat naahiye???????????????????????

काल आम्ही कुठे तरी निघालो होतो आणि मी ड्राइव्ह करत होते तर कारच्या समोरच्या काचेवर पाल अचानक दिसली.
खूप जोरात किंकाळी फोडून चुकून अ‍ॅक्सिलेटर्वर पाय दाबला. गाडी एकदम बुंग. शेजारी नवरोबा ...त्यांना काही कळलंच नाही.काय झालं. ते घाबरले. आणि गडबदीत पाल गाडीत नाहीये ती काचेवर उलटी दिसतीये हे माझ्या लक्षातच आलं नाही. नवरोबा कसले ....काय गोंधळ आहे नमकं लक्षात आल्यावर त्यांनी वायपर चालू केला. आणि पाल वायपरखाली आली एक दोन वेळा फिरली आणि खाली पडली. जर माझ्याकडची काच खाली असती आणि ती पाल वायपरखालून उडी मारून उघड्या काचेतून माझ्या अंगावर आली असती तर???????????????????????????
बापरे मी सुटकेचा नि:श्वास टाकला. ३/४ मिनिटात अगदी प्राण कंठाशी आले. एक उलटी पाल इतक्या जवळ! तेही अचानक.
सध्या इतक्या पाली झाल्यात घरात. पेस्ट कंट्रोल्वाल्यांना पाचारण केलंय.

वर्षुताईना मम.

मानुषीताई मस्त किस्सा. अगदी डोळ्यासमोर उभा राहिला. मग ड्रायव्हिंग कंटीन्यु केलंत की नाही.

पाल, झुरळे, किडे मी पण सहन करू शकत नाही.

पाल , झुरळ , सासु, ही सुद्धा निसर्गाचीच लेकरं आहेत त्यामुळे लगे रहो.
मानुषी, किस्सा मस्त.
जिप्सी मस्त फोटो , त्याच विश्लेषण दोन्ही मस्त आणि दिनेशदांची माहिती सुद्धा.

जिप्सी,जिवेश अप्रतिम फोटो.स्टार ट्रेल फोटोग्राफी प्रथमच पाहिली.ग्रेट!
जागू तुझेही फोटो मस्त.

मानुषीताई आमच्याइथल्यासारखे साप नाहीत नशिब तुमच्याइथे :हाहा:. पूर्वी आमच्या सायकलच्या चेन मध्ये वगैरे, गाडीच्या टायरवर लपलेले असायचे.

जिप्स्या फोटो मस्तच.

अलमांडा

मायकेल पालिनची, न्यू युरप हि सिरीज सध्या सिडीजवर बघतोय. रशियाच्या विभाजनानंतर युरपमधे नव्याने सामिल झालेल्या देशांची ही सफर आहे... काल एस्टोनियाचा भाग बघत होतो. त्यांच्याकडे चक्क निखार्‍यावरून
चालण्याची प्रथा आहे. खरे तर त्यात फार काही नाही. निखार्‍याचा स्पर्श पायाला तीन सेकंदापेक्षा कमी वेळ झाला तर फारसे भाजत नाही.
तिथेच एका देशात "यानी" नावाचा समारोह होतो. त्यात जंगलात जाऊन मध्यरात्रीच्या सूर्याचे स्वागत करायचे.
रानफुलांचा मुकुट करून डो़क्यावर घालायचा आणि नाचायचे.. असे करतात. त्या मुकुटात शक्यतो सत्तावीस प्रकारची फुले असतात आणि ती सर्व त्यांना त्या जंगलातच सापडतात... अगदी आपल्या हरतालिकेच्या पूजेची आठवण आली.

जूनी आहे हि सिरीज.. पण हे देश आपल्या ऐकण्यातलेही नसतात त्यामूळे छान वाटते बघायला.

जिप्सी, फोटो खासच.

मानुषी, तुम्ही पालीला घाबरलात?

जागू, बापरे! म्हणजे प्रत्येकवेळी सायकलला किंवा गाडीला हात लावण्यापुर्वी साप आहे की नाही ते तपासावे लागत असणार.

दिनेशदादा, ह्या सिडीज कुठून घेतल्यास?

जागू, बापरे! म्हणजे प्रत्येकवेळी सायकलला किंवा गाडीला हात लावण्यापुर्वी साप आहे की नाही ते तपासावे लागत असणार.<<<< आधीच्या कंपनीत पिंपरीमधे आपल्या जागेवर बसण्यापुर्वी आम्हाला टेबल खुर्च्यांवर काठीने वाजवून बघावे लागायचे. दोन वेळा धामण पायाखालून सळसळत गेलीये.

आधीच्या कंपनीत पिंपरीमधे आपल्या जागेवर बसण्यापुर्वी आम्हाला टेबल खुर्च्यांवर काठीने वाजवून बघावे लागायचे. दोन वेळा धामण पायाखालून सळसळत गेलीये.>>>>अरे बापरे!!!

वसईला माझ्या आईकडे अजुनही रात्रीच्या वेळेस भात खचराच्या बांधावरुन जाताना घरी जाताना मोठ्याने आवाज करत, पाय जरा जोरात आपटतच जाव लागतं. स्पेशली भात शेतीची कापणी झाल्यावर सप्टेंबर - ऑक्टोबर मधे. कारण आमच्या घराच्या चार ही बाजुने खाचरं आहेत, मधे आमचं घर Happy साप, विंचू, खेकडे इ. सगळे शेजारी Wink

साप, विंचूच काय अजगराचे पण आपण भक्ष्य होऊ शकत नाही. आपल्यापासून स्वतःचा बचाव करावा म्हणून त्यांनी रात्री अंधारात शिकार शोधायची सवय लावून घेतली तर आपण त्यांना रात्री पण स्वातंत्र्य देत नाही Happy

स्निग्धा, आम्ही नालासोपारा इथे राहायचो तेव्हा पाठीमागे झाडे होती आणि पेरूच्या झाडाची एक फांदी आमच्या किचनच्या खिडकीजवळ यायची. तेव्हा तिथून मोठा साप एकदा आला नशीब खिडकीला जाळी होती कारण माझा लहान मुलगा तिथेच बसला होता, बापरे मी एवढी घाबरले होते. थोड्या वेळाने तो आला तसा परत गेला मग ज्यांनी पेरूचे झाड लावलं होतं त्यांना सांगून थोड्या फांद्या कापल्या.

माझी आई नेहमी म्हणते जीवाच भय सगळ्यानाच असत, आपल्यालाही आणि त्यांनाही. आपण त्यांना त्रास दिला नाही तर तेही आपल्याला काही करत नाहीत.

या सरपटणार्‍या प्राण्यांचे विष त्यांच्या भक्ष्यांना मारण्यासाठीच असते. माणसावर त्याचा वापर करणे त्यांना परवडणारे नसते ( कारण माणूस त्यांच्या खायच्या कामाचाही नसतो ! ) त्यामूळे ते आपणहून आपल्यावर हल्ला
करतील यांची शक्यताच नाही !

१. वर अलामांडाचे कौतुक चाललेय त्यात अजुन भर - यावेळी आंबोलीला लोकांच्या घरातला वेल- अलामांडा पाहिला,फुले चक्क आपल्या बोटांसकट तळव्याएवढी मोठ्ठी आणि पिवळीजर्द. माझा गावातला भाऊ पर्यटकांना जंगलात घेऊन जात असतो, त्याला तिथे काही वेगळे दिसले तर लगेच मला फोटो टाकतो. त्याने एक फुल टाकले काल, पिवळाजर्द रंग आणि पाकळ्या आपल्या अनंतासारख्या. त्याला अजुन माहिती विचारली तर म्हणाला की वेल होती म्हणुन, म्हणजे अनंत नाही. शांकलीला विचारले पण तिने बहुतेक मेसेज पाहिलाच नाही अजुन. आज एकाने सांगितले की ते फुलही अलामांडाच पण डबल पाकळ्याचे. नेटवर पाहिले तर allamanda williamsi निघाले. सेम फुल. शक्यतो डबलपाकळ्या वाली फुले संकरीत असावीत असा माझा समज झालेला पण हे चक्क जंगलात सापडले, म्हणजे निसर्गाने पण असले उद्योग केलेत.

हा नेटावरचा फोटो - http://toptropicals.com/catalog/uid/allamanda_williamsii.htm. माझा घरचा काऑप्प आता बंद पडलाय त्यामुळे मी फोटो नंतर टाकेन.

२. वर जिप्स्याचे अभिनंदन चाललेय..... कारण कळेल काय?? की लग्नानंतरची अपेक्षीत बातमी Wink Wink

३. अजुन थोडे संशोधन करता अभिनंदनाचा सुगावा लागला. जागु दरवेळी इतके मस्त मस्त लिहायची, पण तिचे इतके कौतुक कोणी केले नाही, जिप्स्याने एकदाच इथे काय लिहिले, लोक धावले कौतुकायला. सेलेब्रीटीजनी नुसते शिंकले तरी बातमी होते असे ऐकले होते..... Happy

साधना, डबल अलमांडा मस्तच. मी नव्हते बघितले.
कौतूक जिप्स्याचे नाही, जिवेश म्हात्रेचे चाल्लेय. त्याचे फोटो बघच.

आणि हा निरोप जागूचा आहे का ? शक्यता कमी आहे तरीपण विचारतोच Happy

कायपुली... आज हे नाव मला सापडले. खरे तर यातला आनंद तूम्हाला सविस्तर सांगितल्याशिवाय कळणार नाही.
हे असते एक लिंबू वर्गातले फळ. गोड वा आंबट नसते तर चक्क कडवट असते. हे फळ निखार्‍यावर भाजून कुर्गी लोक त्याचा एक अप्रतिम प्रकार करतात. आमचे कुर्गी शेजारी होते त्यांच्याकडे खुपवेळा व्हायचा. पण ते फळ मुंबईत मिळत नसे. त्यांच्याकडे गावाहून कुणी आले तरच होत असे. आणि दरवेळी मला आवर्जून पाठवला जात असे.
का कुणास ठाऊक पण ते फळ मी कधी बघितलेही नव्हते कि त्याचे नाव विचारल्याचे सुचले नव्हते. ते कुटुंब
मुंबई सोडून गेले त्यालाच आता २५ वर्षे झाली. ते नेहमी बोलावतात आम्हाला. माझे आईवडील जाऊनही आले
त्यांच्याकडे. त्यांची लहान मुलगी कृपा आणि माझी घट्ट मैत्री होती.

त्यांच्याकडचा वासाचा तांदूळ ( आणि त्याचे पदार्थ ) वेलची, कॉफी आमच्या घरी येतच असे. अवाकाडोची ओळखही मला त्यांच्यामूळेच झाली. त्यांच्या पद्धतीची आमटी, फरसबीची भाजी आमच्याकडे खुपदा होते.

तर हे आहे कायपुली.. आणि त्याचे पदार्थ

http://www.acookeryyearincoorg.com/?p=704

वा दिनेशदा नवीन माहिती.

कुर्गची कॉफी फेमस आहेना? ते प्रसिद्ध आहे कॉफी लागवडीसाठी.

खुप सुंदर जागा हे ती.. ते लोकही फार देखणे असतात. त्यांची साडी नेसायची पद्धतही वेगळी असते. आता पर्यटक जातात तिथे.

व्वा! साधना बरेच दिवसांनी दिसते आहे! लेकी नी लापटोप दिला वाट्ट! डब्बलचा अलमांडा छानच आहे
थोडासा डेफोडील सारखा वाटतो नाही!

दिनेश दा मस्त माहिती....

ससा.. काय भयंकर अनुभव...

मलाही पहिल्यांदा डॅफोडिल्सच वाटलेले. आता ऑफिसतुन लिहिलेय. घरी पायरेटेड विंडॉज आहे, त्यामुळे आता मशिनच बंद पडलेय.

डायन नाही पाहिली. दिनेश काये ते?
अन्जू..........अगं गाडी तर ऑलरेडीच बुन्ग झाली होती. पण तरी थोड्या बाचाबाचीनंतर (:फिदी:) इच्छित ठिकाणी पोचलो. " तू असं गाडीत अजगर आल्यासारखं काय किंचाळतेस इ.इ.??"
नलिनी........अनपेक्षितपणे वीतभर अंतरावर उलटी पाल..........घाबरणार नाहीतर काय?
जागुले............साप बघून तर हार्ट फेलायचीच शक्यता!
अरे लोक्सहो........ती रिया कुठेय?
असो........... आम्ही मायलेकींनी मदर्स डे नॅशनल हार्बर(अर्थातच डीसी!; इथे साजरा केला होता.

Pages