अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार वर्षांपूर्वी माझी आजी (आई ची आई)बराच काळ आजारी होती तेव्हा तिला जीव घाबरा व्हायचा आणि चहा प्यावासा वाटायचा. ती सारखे मामा किंवा आजोबाना चहा करून द्यायला सांगायची आणि जेवण जात नव्हते.
ती वारल्यानंतर काही दिवस मामा ला रात्री सारखे स्वप्न पडायचे आणि ती ' मुकुंदा मला थोडा चहा करून दे' सांगायची आणि त्याला ते इतके खरे घडतेय असे वाटायचे कि मामा actual मध्ये उठून किचन मध्ये जायचा चहा करायला (तो कधीच झोपेत चालत नाही). पण स्वप्न लक्षात आल्यावर परत झोपायला जायचा. हे असे काही महिने चालले आणि मग आपोआप थांबले. मामाला मात्र कधी भीती वाटली नाही पण आम्हाला हा किस्सा त्याच्या कडून ऐकताना जाम भीती वाटली होती.

भूत्याभाऊ grudgeची लिंक दया जरा
तिकडे शोधायला गेलो तर ३ वेगवेगळे दिस्तायेत
एक जापनीज
एक २२००४ आणि२००९
Wink
:कन्फ्यूज झालेलं भुत:

लहानपणी ईविल डेड पाहिलेला पण तो एकंदर विचित्र हिडिस मुखवट्याचा पसारा हॉरर पेक्षा कॉमेडी जास्त वाटलेला Uhoh

जॅक निकल्सनचा द शाईनिंग पहा. फाडू आहे. डीप्रेसिंग वाटू शकतं
मी पॅरीसला जाताना विमानात पाहीला, जाम फाटली, नर्व्हस झालो . मग सरळ क्रॉनिकल्स ऑफ नार्नीया लावून मुड सुधारला.

The Exorcist (1973) चा माझा अनुभव असाच भयानक आहे.
३ च्या सुट्टीत मे महीन्यात नागपुरला मामाकडे गेलो होतो. त्याला बोलवायला त्याच्या मित्राकडे गेलो तर तिथे हा चालू होता. मी आणि ताई बसलो. आणि मग दोघे एकटेच घरी आलो. एकच गल्ली पण नागपुरची मे मधली दुपार शुकशुकाट, आम्ही दोघे दर पाच पावलांनंतर मागे वळून पहात होतो. कुठेही जाताना आजीचा हात हातात. आमची खुप थट्टा केलेली तेव्हा.
पण कल्याणला घरी परतल्यावर शूरवीर होऊन तिथे Exorcistच कथानक सांगत घाबरवत फिरत होतो.

अंबज्ञ ,
२००४चा ग्रज पाहा.. तो पहिला.. नंतरचे बोर वाटले मला..
एकट्यात लाईट बंद करुन पाहा..
मस्त वातावरणनिर्मिती होते..

भूत्याभाऊ grudgeची लिंक दया जरा
तिकडे शोधायला गेलो तर ३ वेगवेगळे दिस्तायेत
एक जापनीज
एक २२००४ आणि२००९>>>>>

तुम्हाला २२००४ मध्ये येणारा चित्रपट आता दिसतो आहे हा खरच 'अमानवीय' अनुभव!!! Proud Proud Proud

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 13 February, 2018 - 19:27 Rofl
दिलायकी वरती उत्तर
पहा बर्र नीट :बाहुली: कोण ते

Hiii. मी नवीन सदस्य आहे माबो वर पण माबो वरच्या कथा खूप आधी पासून वाचतेय .दोन्ही धागे वाचले .. खुप थरारक अनुभव ... माझ्या आजोबांनीही पाहिलेलं भूत अस ते म्हणतात ... त्यांचा अनुभव लिहेन...

पहिल्यांदा लिहितेय काही चूक झाली तर माफ करा...
तर झालं अस माझे आजोबा 8-9 ला असतानाची गोष्ट...
त्यावेळी त्यांच्या शेतात मुगाचे पीक खूप जोरदार आलेले...
म्हणून एके संध्याकाळी ते गावातील काही छोट्या मुलांना घेऊन शेंगा काढायला गेले होते... शेंगा काढता काढता मुलांची मस्ती मस्करी सुरु होती. काही वेळाने आजोबांचे लक्ष कुंपणाबाहेर असलेल्या बोराच्या झाडाखाली गेले. तेथे एक धनगरी वेशातील मुलगा उभा होता .आजोबांना वाटलं असेल गुर घरी न्यायला आलेला कोणी. म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. उन्ह उतरणीला लागल्याने मुलं घाई करत होती. आजोबांनि परत सहज म्हणून पुन्हा त्या झाडाखाली पाहिलं तर त्या मुलाची उंची वाढली होती . त्यांना वाटलं अगोदर तो छोटा असल्याचा भास झाला असेल . नि ते परत शेंगा काढू लागले. पण त्यांचं मन त्यांना स्वस्थ बसू देई ना मनात शंका नको म्हणून परत त्या मुलाकडे पहिले तो त्याची उंची झाडापेक्षा उंच झाली होती.... हे पाहून त्यांची खात्री पटली कि हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे नि तिथून मुलांना घेऊन त्यांनि पोबारा केला.... त्यांनतर पण कितीतरी वेळा ते संध्याकाळी शेतावर गेले पण परत तस काही दिसलं नाही...

भारी अनुभव Biotechnologist
आणि मायबोलीवरील प्रथम लिखणासाठी अभिनंदन.

अजून एक किस्सा ...
माझ्या मैत्रिणीने सांगितलेला ....
ती 12 वी असताना त्यांच्या टीचर ने त्यांना सांगितलेली हि घटना 100% खरी आहे त्या टीचर सोबत नि आमच्याच कॉलेज मध्ये घडलेली .
तेव्हा 12 वी च्या बोर्ड परीक्षा सुरु होत्या नि टीचर examiner म्हणून एका वर्गात होत्या. पेपर संपायला अर्धा एक तास बाकी असताना एक मुलगी अचानक जागेवरून उठली नि पेपर टाकून विचित्र आवाजात ओरडत पूर्ण वर्ग भर फिरत होती. नि मधेच माझा योगेश कुठेय ? योगेश कुठेय ? अस विचारत होती. टीचर ने तिला थांबवायचा प्रयत्न केला तर तीने टीचर ला हात लावताच टीचर जोरात धक्का दिल्यासारखं दूर पडल्या. त्याबरोबर ती मुलगी वर्गाबाहेरच्या पॅसेज मध्ये वेड्यासारखी योगेश योगेश ओरडत धावू लागली . एव्हाना आवाजाने इतर टीचर्स पण गोळा झालेले. त्यातल्या काही लेडी टीचर ने तिला कसबस पकडलं . तरीही ती त्या 4 टीचर्स ला एईलत नव्हती. म्हणून तील रस्सीने खुर्चीला बांधले .त्यानंतर ती अचानक बेशुद्ध झाली. नि काही वेळातच परत शुद्धी वर येऊन योगेश मला सोडून का गेलास अस ओरडू लागली म्हणून या टीचर ने तिच्या जवळ जाऊन प्रेमाने विचारले काय झालं तर ती रडत सांगू लागली: योगेशवर माझं खूप प्रेम होत. त्यांच हि होत माझ्यावर. आम्ही पळून जाऊन लग्न करणार होतो. पण तो कुठे आहे माहित नाही आता .मला माझा योगेश पाहिजे .अस बोलून ती रडू लागली तिच्याकडे थोडी चौकशी केल्यावर तिने स्वतःच नाव वर्षा सांगितले पण तिच्या क्लास टीचर सांगत होत्या कि हीच नाव वर्षा नाहीये. अजून थोडी चौकशी केल्यावर तिने योगेश च पूर्ण नाव , रोल नंबर, पत्ता , फोन नंबर सगळं सांगितल. त्या वरून एवढं कळलं कि तो मुलगा commerce च्या वर्गातील होता पण त्या वर्गात चौकशी केल्यावर तसा कोणताही मुलगा आढळला नाही .मग तिची तब्येत अजून बिघडू नये म्हणून तिच्या घरी कॉल करुं तिला घरी नेण्यास सांगितले. नि मग टीचर नो तिच्या घरच्यांकडे पण चौकशी केली. हीच बाहेर काही प्रेम प्रकरण होत का पण तिला ओळखणारा प्रत्येक जण हेच सांगत होता कि हि नाकासमोर सरळ चालणारी मुलगी आहे आजवर कोणत्याही मुलाशी बोलली हि नाही. मग योगश कोण हे काही दिवस कळलच नाही . काही दिवसांनी 2 3 वर्षयापूर्वीचे रजिस्टर तपासल्यावर योगेश शी तंतोतंत जुळणार वर्णन असलेला मुलगा सापडला. तोच तो योगेश . त्याच 2 वर्षयापूर्वीच अकॅसिडेंट होऊन देहावसान झालं होत. नि ती मुलगी जी स्वतःला त्याची प्रेयसी सांगत होती तिनेही त्याच्या मृत्यूनंतर प्राण सोडला होता. पण तिला योगेश या जगात नाहीये हे कोणीच सांगितलं नसल्याने योगेश तिला सोडून गेला असच तिला वाटत होत.

@ Biotechnologist ,
बर्याच दिवसांनी या धग्यावर एखादा किस्सा आलाय. त्यामुळे तुम्हाला धन्स.

फक्त भुताचेच किस्से चालतील कि इतरही दैवी घटना पण चालतील. ???>>दोन्ही प्रकार अमानवीय असल्यामुळे चालायला हरकत नसावी.

Submitted by Biotechnologist on 16 February, 2018 - 16:11>>>> हा किस्सा इतका फिल्मी आहे न कि जरी तुम्ही म्हणताय कि हा खरा आहे तरी विश्वास नाही बसत आहे.

असो.

माझ्या मावस भावाने घेतलेला एक अनुभव... तोही फार जुना नाही तर २०१५ मधला ....

तो एशिअन पेन्ट्स मध्ये एरिया सेल्स मॅनेजर आहे आणि कामसाठी बरेचदा फिरतीवर असतो. एकदा काम निमित्त तो नाशिकहून
मुंबई ला गेला होता आणि डोंबिवलीला कुठे तरी कस्टमर्स मीटिंग होत्या. ३-४ दिवसाचा प्रश्न होता म्हणून कंपनीने त्याची सोय डोम्बवलीतल्या त्यांच्या एका गेस्टहाऊस वर केली. तो एक १ बेड रूम फ्लॅट होता आणि त्या मजल्यावर इतर ३ फ्लॅट्स बंद होते. पहिल्या रात्री तो थकून आला आणि सरळ जाऊन झोपला. रात्री त्याला kitchen मधून काही खुडबुड ऐकू आली, कदाचित उंदीर असतील म्हणून त्याने दुर्लक्ष केले आणि झोपला. सकाळी पहिले तर जी काही थोडीफार भांडी होती सगळी खाली फरशीवर. जास्त विचार ना करता त्याने ती उचलून ठेवली आणि परत आपले routine सुरु केलं.
त्या दिवशी तो साधारण ८ - ८:३० ला परत आला तेव्हा बिल्डिंग मधील watchman ने त्याला विचारले पण कि तिथे का उतरलात जमलं तर हॉटेल मध्ये जा पण याने दुर्लक्ष केलं. त्या रात्री तो लॅपटॉपवर काम करत बसला होता तेव्हा वातावरण अचानक थोडे थंड झाले असे वाटले, पण AC फुल्ल असेल म्हणून हा काम करत राहिला, नंतर त्याला असे वाटले कि kitchen मधून कोणीतरी डोकावून बघते आहे, त्याने मान वळून बघितले तर कोणीच नाही. परत थोड्यावेळाने भांडी वाजली असे वाटले म्हणून शेवटी चिडून तो kitchen कडे गेलं आणि light सुरु करणार तेव्हड्यात त्याला ओट्याजवळ एक बाई उभी असलेली दिसली.
गडी एकदम तंतरला आणि सरळ धावत फ्लॅटच्या बाहेर आला. तेव्हा रात्रीचे १ - १:३० वाजले असतील, कोणी ओळखीचे नसल्याने सरळ watchmen केबिन गाठले. उर्वरित रात्र तिथेच काढली. watchmen ने त्याला सांगितले कि तिथे कोणीच राहत नाही, तिथे एकप्रकारचे विचित्र दडपण येते म्हणून तो फ्लॅट भाड्यानेपण जात नाही. शेवटी मुळ मालकाने तो कंपनीला भाड्याने दिला. त्याला पण त्या जागेबद्दल जास्त माहिती नव्हती,
भावाने दुसऱ्या दिवशी त्याचे बस्तान हॉटेलला हालवले आणि कंपनीला पण कळवले. तेव्हा त्याला कळले कि अश्या तक्रारी आधीपण आल्या होत्या आणि कंपनी ते गेस्ट हाऊस बंद करतेय. ती बाई कोण होती आणि त्या जागेचा काय इतिहास होता हे काही कळले नाही.

@samadhi
हे फिल्मी वाटू शकत पण हे खर आहे. मी हि त्या टीचरानां ओळखते .मैत्रिणीने सांगितल्यावर एके दिवशी त्या टीचर शी बोलताना मी सहजच या बद्दल पण विचारलेलं त्यांनि हे खार आहे असच सांगितलेलं. नि कॉलेजात हीच गोष्ट मी इतरांकडून पण ऐकलेली. बाकी यात किती खर खोट ते तेच जाणोत.

माझापण हा मायबोलीवर लिखानाचा पहीलाच अनुभव आहे. त्यामुळे लिहतांना चुका झाल्यास माफी असावी.
मला आलेला अनुभव पुर्नपने अमानवीय नाही. पण थोडा विचीञ आहे. साधारनता दहा वर्षापुर्वी मी नोकरीच्या शोधात पुण्यात आले तेव्हाची गोष्ट आहे. पुण्यात माझे एक लांबचे काका पिंपरी चिंचवड भागात रहातात. माझ्या वडीलांचा चुलतमामाचा मुलगा. मामा काही वर्षापुर्वीच वारले. घरात मामी म्हणजेच माझ्या आजी आणी त्यांची दोन मुले म्हणजेच काका आणी आत्या रहातात. काही महीन्यांपुर्वीच त्यांनी बंगल्याचे बांधकाम केले होते आणी घरावर दूसरा मजला चढवून काही खोल्या बांधल्या होत्या. मी पहील्यांदाच घर सोडून रहानार होते म्हनून माझी आईदेखील माझी रहान्याची सोय लावून देन्याकरीता माझ्यासोबत आली होती.
आम्ही राञी साडेसात आठच्या सुमारास त्यांच्या घरी पोहचलो असू. काही कारनांमुळे त्या आत्याचे काही कारनांमुळे लग्न झाले नव्हते, त्यामुळे काकाचेही झाले नाही. तर त्या राञी आम्ही त्यांच्याघरी पोहचल्यापासुन मला थोडे अस्वस्थ वाटू लागले होते. घरात एक विचीञ शांतता होती. जेवन करून आम्ही झोपायला गेलो, एका खोलीत झोपायला गाद्या टाकल्या होत्या. मी पलंगावर आणी खाली आई आत्या आणी आजी झोपल्या. पण का कूणास ठाऊक मला राञभर झोप लागली नाही. काहीतरी विचीञ अस्वस्थ वाटत होते.
दूसय्रा दिवशी सकाळी मी आईला म्हटले चल ईथून जाऊया आपण आई पण हो म्हणून लगेच त्यांचा निरोप घेऊन निघाली. तिथून आम्ही पत्ता शोधत वडीलांच्या चुलत आत्याकडे गेलो.
त्यांच्या घरीपण आजी काका काकू असे तिघेच होते पण घरात प्रसन्न वातावरण होते. आजींशी बोलून मला त्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हनूण ठवून आई दूसय्रा दिवशी परत गेली.
त्यानंतर मग काही दिवसांनी मी माझे बाकीचे सामान आनन्यासाठी घरी गेले असतांना माझ्या ताईने बोलतांना सांगीतले की ती सहा महीन्यांपूर्वी पोलीस ट्रेनींगकरीता पूण्यात असतांना त्या मामीआजीचा तिला फोन आला होता की घराचे बांधकाम चालू असतांना एका मजूराची लहान मूलगी खेळतांना हौदात पडली व गेली. नंतर त्यांनी त्या लोकांना भरपाई देऊन ते प्रकरन संपवले. मला तिथे राहावे लागले तर मला भिती वाटू नये म्हनून ती काही बोलली नाही.

इथे दैवी अनुभव लिहिले तरी चालेल हे वाचले अन लहानपणीची एक आठवण जागी झाली,

खरेतर आता माझा न देव न भूत दोघांवर हि विश्वास नाही आहे.
पण एक जागा आहे जिथे गेले की मनाला खूप शांत वाटते, तिथलाच हा किस्सा
पंत बाळे कुंदरी महाराज मठातील

तर लहान असताना माझी मावशी, तिची दोन मुले, मम्मी , मी आणि माझा भाऊ तिकडे गेलो होतो दर्शनाला

मठात नेहमी प्रमाणे खूप शांतता अन स्वच्छता होती, पूर्ण परिसरात खूप सारी आंब्याची , चिकूची अन फुलझाडे होती, तरीसुद्धा कुठेही पालापाचोळा नव्हता कि काही नाही.
अन इतकी सारी आंब्याची झाडे पाहून माझ्या भावाला आंबा खायची इच्छा झाली पण मम्मीने कसेबसे त्याला समजावले, बिचारा खूप उदास झाला त्यामुळे.
थोड्यावेळाने दर्शना नंतर आम्ही सर्व तिथेच एका आंब्याच्या झाडाखाली पारावर विश्रांतीसाठी बसलो तेव्हा अचानक त्या झाडावरून दोन आंबे पडले तेही माझ्या भावासमोर, ते पाहून खूप आनंद झाला.

आता तो योगायोग असेल किंवा काहीही पण त्यामुळे माझा उदास भाऊ खूप आंनदी झाला अन आम्ही सर्व पण.

Biotechnologist, height वाढलेली दिसने ह्या पोस्टला अनुमोदन.
माझ्या आजोबांना पन असाच अनुभव.
बघता बघता अचानक एखाद्याची प्रचंड height वाढली.
आजोबांनी रामरक्षा म्हणत त्वरित घर गाठले .

गाणगापुर ला दर गुरुवारी दुपारी १२ वाजता आरती असते.
त्यावेळेस अंगात आलेली लोकं भराभर मंदिरातील खांबांवर चढतात आणि दत्ताची माफ़ी मागतात.
मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे. काही psychologists ह्यास मानसिक रोग देखिल म्हणतील.
पण एकदा पाहण्यासारखा थरारक अनुभव .

ताडदेवच्या दत्त मंदिरातही हा अंगात येण्याचा प्रकार घडतो.. सध्याचे माहीत नाही, लहानपणी आईबाबांसोबत जायचो तेव्हा अनुभवलेय. अर्थात ते काही भूत प्रेत अमानवीय असावे यावर माझा विश्वास नाही.

हा अनूभव माझ्या सासरच्या व्यक्तीबाबत आहे. म्हणजे माझ्या चुलत चुलत सासुबाई यांचा. हे दोघेही नवरा बायको रीटायर व्हायचे होते, ऑफिस ठाण्याला आणी यांना घर बघायचे होते डोंबिवलीला. एजंट दोघांना घेऊन गेला. फ्लॅट तीन खोल्यांचाच होता. तो एजंट आणी माझे ते सासरे बाहेर बोलत उभे होते. किचन कसे आहे बघावे म्हणून माझ्या सासुबाई ( चुलत ) आत गेल्या तर तिथे एक बाई ओट्याजवळ उभी होती. आणी माझ्या सासुबाईंना अचानक अस्वस्थ वाटु लागले, त्या बाहेर येऊन म्हणाल्या की कोणी कामवाली पण पाठवलीत का लगेच तुम्ही? तर ते एजंट म्हणाले की नाही, काय संबंध? त्या एकदम दचकल्या आणी त्यांनी पाहिलेले सांगीतले. तिघेही परत आत जाऊन बघतात तर तिथे कोणीच नव्हते. साबा खूप घाबरल्या कारण फ्लॅटला एकच मुख्य दरवाजा, मग ती बाई आली कुठुन ? मग त्यांनी तिथे चौकशी केली तर कळले की त्या फ्लॅट मध्ये एका बाईने स्वतःला जाळुन घेतले होते. साबांनी ते घर घेतलेच नाही.

Pages