अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@Praj_n - मी वाचले आहे ते पुस्तक. ती स्टोरी मस्त आहे पण झी वाले सिरीयल मध्ये पाणी घालून त्याची माती करणार असे दिसतंय

असे हे प्रश्न कोणालाही विचारलेत तर उत्तर देउ शकतात का? म्हणजे टेल्को च्या परीक्शेबद्दल वॉचमनच्या बायकोला विचारले तर ती सांगु शकेल का? की रिलेटेड असायला हवे?
कोणी तरी रेसीपी द्याच आता..:हाहा:

>>कोणी तरी रेसीपी द्याच आता<<

हो हो प्लीज द्या, मी हि लगे हात मेगा मिल्यन लॉटोचा जॅकपॉट नंबर विचारुन घेईन. हाफ बिल्यन मधले काहि मिल्यन डॉलर्स मी अचुक रेसीपी देणार्‍याला द्यायला एका पायावर तयार आहे...

राज
गंमत म्हणून ठिक पण त्याची किंमत साधीसुधी नसते बरं.

"@Praj_n - मी वाचले आहे ते पुस्तक. ती स्टोरी मस्त आहे पण झी वाले सिरीयल मध्ये पाणी घालून त्याची माती करणार असे दिसतंय

Submitted by भुत्याभाउ on 29 March, 2018 - 13:59"

Barobar ahe Bhutyabhau. Ratris khel chale chi jashi vaat lavali tase nako vhayala.

आम्ही पण प्लँचेट केले होते. बहिणीच्या दहावीच्या मार्कांचा आकडा अचुक आला>>>>>>>

त्यानंतर सातत्याने प्रत्येक निर्णय असेच प्लँचेट करून घेतला का? आयुष्य फारच सोपे झाले असते...

>>>>त्यानंतर सातत्याने प्रत्येक निर्णय असेच प्लँचेट करून घेतला का? आयुष्य फारच सोपे झाले असते...-----

प्लॅचेट निर्णय घेण्यासाठी नसते. अंदाज वर्तविण्यासाठी असते. निर्णय आपले आपणच घ्यायचे असतात, सर्व अंदाज, शक्यता पडताळुन.

परवा भुत्याभाऊंशी बोलताना हा किस्सा सांगितला आणि त्याच्या आग्रहा खातर इथे देतोय. पुर्वी सांगितला असेल तर पुनःप्रत्ययाचा आनंद

माझ्याकडे मराठी ऑटोबायॉग्राफी ऑफ अ योगी पुस्तक आहे. योगदा सत्संगच ओरीजनल त्यांचा गोल्डन लोगो आहे.
ऑफिसमधली माझी मैत्रिण म्हणाली होती की या पुस्तकाला व्हायब्रेशन्स आहेत. मी अविश्वास दाखवला नाही पण हलकेच घेतलं.
एकदा पुण्याला जाताना हातात ते पुस्तकं होतं वाचता वाचता डोळा लागला.
अचानक अस जाणवलं की हाताला झिणझिण्या येतायत. गॅस लायटर जर हाताला लावला तर साधारण जे फिलींग येत ते.
मी जागा झालो.
इतक्यात समोर जाणार्‍या गाडीखालून एक दगड उडून तो आमच्या बसला लागला मग माझ्या खिडकिच्या काचेला लागून गेला.
मी पहील्यारांगेतच होतो.
समोरची सगळी काच फुटली.
आम्ही वाचलो.

तेव्हा आठवलेल्या काही घटना.
काही दिवसांपुर्वी
दरवाज्यात उभ असताना एक दगड डोळ्याजवळून गेला दुसर्‍या दगडाने ऐरोली स्टेशनवर पाडलं
आणि त्याच पंधरवड्यातला हा तिसरा दगड होता.

जेव्हा हे पुस्तक मी वाचायला सुरूवात केली. ते माझ्या बॅगेत होत.
ऐरोलीला तेव्हा गाड्या कमी होत्या. म्हणून चालती गाडी पकडण्याच्या प्रयत्नात फरपटत गेलो
पण स्वतःला प्लॅटफॉर्मच्या बाजूला झोकून दिलं आणि वाचलो.

@गुगु - मला वाटतं तू ते पुस्तक वाचू नकोस ... माझ्या बाबतीत असे चतुर्थीला होतं ... जे काही अपघात झाले आहेत ते नेमके चतुर्थीलाच झाले आहेत .. का ते माहित नाही ...

@गुगु - मला वाटतं तू ते पुस्तक वाचू नकोस ... माझ्या बाबतीत असे चतुर्थीला होतं ...>>>>

माझा एक निळ्या रंगाचा सदरा आहे, त्याबाबतीत माझं असं होतं. तो घालून मी गाडी चालवली की ती हमखास बंद पडते. इतर वेळी तिला काही होत नाही किंवा मी तो सदरा घालून बस, ट्रेनने कुठे गेलो तरीही (त्या बस, ट्रेनला) काही होत नाही. पण तो सदरा घालून गाडी चालवायला गेलो की ती बंद पडतेच. असे २-३ वेळा झाले आहे. आता यात योगायोग किती आणि अंधश्रद्धा किती माहित नाही!!!

विक्षिप्त्_मुल्गा, तुमचा निळ्या रंगाच्या सदरा आणि गाडी बंद पडण्यामागे काहितरी लॉजिकल एक्स्प्लनेशन असायला हवं. जसं या घटनेमध्ये वनिला आयस्क्रिम आणि गाडी बंद पडण्यामागे होतं... Happy

भुत्याभाउ
अरे त्या पुस्तकामुळे मी वाचलो असेन अस मी मानतो. आध्यात्मात प्रगती करणार्‍यांसाठी ते पुस्तक फार महत्वाच आहे.
तो रेल्वेचा अपघात होण्यापुर्वी मला सारख वाटत होत की मी ऑफिसमध्ये फोन करून सांगतोय की मला अ‍ॅक्सिडेंट झालाय मी येऊ शकत नाही.

माझ्याकडे मराठी ऑटोबायॉग्राफी ऑफ अ योगी पुस्तक आहे. योगदा सत्संगच ओरीजनल त्यांचा गोल्डन लोगो आहे. >>> संग्रही ठेवण्यासारखे व प्रत्येकाने वाचावे असे आहे. माझ्याकडे वोरा प्रकाशन चे आहे. भेट म्हणुन मिळालेले.

@ mr.pandit & गुगु - माझ्या कडे इंग्लिश version आहे ... मराठी कुठे मिळाले तर पाहतो ... किंडल वर मिळेल का? काही माहिती?

सध्या अतिशय भितीदायक, भयकारी अनुभव

भिरभिरतो पिरपिरतो काउ....

या डोळ्यांची दोन पाखरे
फिरतील तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील
असा कुठेही जगती
भिरभिरतो पिरपिरतो काउ....

चिरचिरतो, कुरकुरतो , फुसफुसतो काऊ
आणी म्हणतो निरुला, आता रमा तुझी मंगु

आणी म्हणतो रमाला दूर दूर जाऊ

नवीन अनूभव वाचण्यासाठी, अर्र्र्र पहाण्यासाठी सिद्ध व्हा! येत आहे ( चालू आहे ) नवी सिरीयल.Halloween skeleton

सिरीयलचे नाव आहे मंगलची दंगल, चॅनेल आहे झी मराठी हॉरर टाईम.Watching Horror movie

कलाकारः - जुन्या दमाची पल्लवी जोशी, दमुन भागुन थकलेला योगेश देशपांडे, Exhausted

.. भिरभिरतो, बोलवतो चा इतका अतिरेक झालाय, की
आंबा पिकतो, रस गळतो..
पण आता त्याच चालीत म्हटलं गेलं माझ्याकडून काल Wink

Lol काही वेळेस आवडत नसणारी गाणी सारखी ऐकायला मिळाली तर तीच गुणगुणली जातात. या भिरभिरतो च्या बाबतीत असेच झाले आहे.

>> सारखी ऐकायला मिळाली तर तीच गुणगुणली जातात
हो. पहिल्यांदा मला हा अनुभव माधुरीच्या एक दोन तीन गाण्याबाबत आला होता Happy
सारखे सारखे ऐकवून आवडवायला लावतात. हे एकप्रकारे अमानवीयच म्हणायचे Biggrin

काही वेळेस आवडत नसणारी गाणी सारखी ऐकायला मिळाली तर तीच गुणगुणली जातात. >>>> +१
माधुरीच्या एक दोन तीन गाण्याबाबत आला होता>>>>>. हे तर चांगलं गाणं आहे. मी मध्यंतरी सारखं जलेबीबाई जलेबीबाई गुणगुणायचे. Happy

हे तर चांगलं गाणं आहे. मी मध्यंतरी सारखं जलेबीबाई जलेबीबाई गुणगुणायचे >>>> Rofl सस्मित ईमॅजीन केले मी अन हसु आवरले नाही

माझेही असेच होते... सारखे सारखे एखादे गाणे ऐकु आले न की ते आवडो न आवडो गुणगुणायला लागते Happy

Pages