अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ कल्पतरू

Kadra Quarters guest house
Nav Shree Chintamani Society,

बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही लहान होतो तेव्हा. धुळ्यात रहात होतो.
आमचा एक मामा, जिल्हा परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये कामाला होता. त्याची बदली नवापूर (आताचा जिल्हा नंदुरबार) तालुक्यातील उमराणे या आदिवासी भागात झाली.
मुलांच्या शाळेसाठी मामी धुळ्यातच राहिली होती. मामा मात्र तिथे चाळीत दोन रूमचे घर घेऊन राहत होता. बाजूला स्मशानभूमी होती. आणि तिकडची खिडकी उघडली कि कधी कधी चितेचा धूरही आत यायचा म्हणे.
मामा शनी-रवी धुळे येऊन जाऊन करायचा. मामीही कधी अधे मध्ये मुलांना घेऊन तिथे राहून यायची. आणि बऱ्याचदा कोणी घरात नसले आणि मामी किचनमध्ये काम करत असली कि बाहेरच्या खोलीत 'धप धप' असा पलंगावरून उड्या मारल्याचा आवाज यायचा, आणि बाहेर बघितले कि कोणी नसायचे, असे ती म्हणायची. सुरवातीला तिला लहान मुले उड्या मारतात असे वाटायचे.
एकदा मामा एकटाच होता. आणि संध्याकाळी कामावरून आल्यावर रात्रीच्या जेवणाला एकट्यासाठी काय करायचे तर पोहे करायचे त्याने ठरवले. स्टोव्ह पेटवला आणि तेल नव्हते म्हणून तूप फोडणीला घातले. एकीकडे फोडणी देता देता 'नसिब' सिनेमातले 'चल मेरे भाय तेरे हात जोडता हूं " हे गाणे म्हणत होता. तर खरोखर येऊन बसली ना समोरच एक धिप्पाड आकृती .
मामाला घाबरला म्हणजे कोसळलाच. नंतर काय झालं त्याला समजले नाही. पण त्याला धुळ्याला आणले गेले आणि कित्येक दिवस आजारी होता.
नंतर काही दिवसांनी समजले कि त्या घरात एका पहिलवानाचा खून करून पुरण्यात आले होते.
नंतर मामाने ताबडतोब शिंदखेड्याला बदली करून घेतली.
तेव्हापासून आम्ही 'चल मेरे भाय... ' हे गाणे रस्त्याने जातांना मनात ही आले तरी घाबरायचो.
यावरून आठवले, की आमचे सुरतचे एक जिजाजी ( त्यांच्या मुलीचा किस्सा मी टाकला होता मागे तिच्या अंगात ३-४ जण होते/ आहेत. पुन्हा टाकेन तो किस्सा)
म्हणतात कि, कुठेही जायला निघतांना, निरोप घेताना आपण ," चल , जाऊया,' चला, भेटूया ' किंवा चला, आम्ही जातो असे म्हणायचे नाही.
'निघ' म्हणायचे. आम्ही निघतो असं म्हणायचं. नाहीतर 'चला' म्हटले कि त्या त्या स्थळी जे जे काय अमानवीय असते ते आपल्याबरोबर येते.खखोदेजा Proud

'चला' म्हटले कि त्या त्या स्थळी जे जे काय अमानवीय असते ते आपल्याबरोबर येते>>>> हो हे मी ऐकलाय रे रोडच्या मीरा दातार दर्ग्या संदर्भात.
मित्राने मला सांगितलं होत की तिथे एक अक्षरही बोलायच नाही. मुकाट्याने बाहेर यायच. चला निघू, जाऊ!! म्हणालास तर कोण बरोबर येईल सांगता येत नाही

'चला' म्हटले कि त्या त्या स्थळी जे जे काय अमानवीय असते ते आपल्याबरोबर येते >> हे मी पहिल्यांदाच वाचतोय किंवा ऐकतोय ... काही पटत नाही ...

'चला' म्हटले कि त्या त्या स्थळी जे जे काय अमानवीय असते ते आपल्याबरोबर येते >> अहो असेल अस मल्ल्या म्हणाला असेल चला की गेले की १-२ जण त्याच्यामागे , जस भुताला अडवता येत नाही तस याना कुठे अडवता आलय कुणाला?

जोधपुर – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून जाणारा प्रत्येक व्यक्ती या motorcycle च्या मंदिरात डोक टेकवल्या शिवाय पुढे जात नाही . अनेक भाविक या दुर्घटना क्षेत्रात प्रवास सुखरूप व्हावा म्हणून या मंदिरात प्रार्थना करतात .

२५ वर्षापूर्वी इथे एक अद्भुत घटना घडली होती ती अशी …………..

पाली शहरा जवळ चोटीला गावात ठाकूर जोग सिंह राठौर राहत होते . त्यांचा लहान मुलगा ओम सिंह राठोर हा बुलेट चा फार शौकीन होता . एकदा रात्री बुलेट चालवत असताना दुर्दैवाने त्याचा अपघाती मृत्यू झाला . मृत्यू नंतर पोलिसांनी त्याच शव तब्यत घेतल आणि बुलेट पोलिस स्टेशन मध्ये नेउन सुरक्षित ठेवली . पण त्या रात्रीच ती बुलेट अचानक गायब झाली .पोलिसांनी खूप शोध-शोध केली . शेवटी त्यांना कोणीतरी खबर दिली की ज्या झाडाजवळ ओम चा मृत्यू झाला तिथे ती बुलेट उभी आहे. पोलिसांनी तिला परत पोलिस स्टेशन मध्ये नेउन ठेवली .
दुसर्या दिवशी सकाळी परत तोच प्रकार .
बुलेट परत गायब होऊन त्याच झाडाजवळ उभी .पोलिसांनी परत तिला पोलिस स्टेशन मध्ये नेउन ठेवली . तिसर्या दिवशी ही परत तीच घटना.. ही घटना हा हा म्हणता अख्या गावभर पसरली .. . सरते शेवटी पोलिसांनी आणि ओम सिंह च्या वडिलांनी ओम सिंह ची हीच इच्छा असावी अस समजून त्या बुलेटला त्या झाडाजवळ जाऊन कायम स्वरूप स्थापित केली .
ज्या रस्त्यावर ओम सिंह राठौर चा अपघाती मृत्यू झाला होता तो रस्ता दुर्घटना क्षेत्र म्हणून ओळखला जायचा . त्या जागी रहस्यमय रित्या अनेक अपघात झाले होते .
अपघातानंतर दुर्घटनाग्रस्तांना कोणी तरी बुलेट चालवणाऱ्या इसमाने मदत केल्याच्या वार्ता कानी येऊ लागल्या . अपघात झाल्यानंतर अनेक वाहन चालकांनी त्यांना कोणीतरी एक बुलेट चालवणाऱ्या माणसाने येउन मदत केल्याच सांगितल जाऊ लागल . प्रत्येक वेळीस बुलेट च . आणि बुलेट वर ३५० नंबर . बुलेट चालवणारा स्वतः च नाव ओम अस सांगायचा .
ओम सिंह मृत्यू नंतर हे दैवी कार्य करत आहे हे कळल्यावर ग्रामस्थांनी त्याच त्या अपघाती जागेवर एक छोटस मंदिर बांधल . त्या मंदिरात ओम सिंह चा एक फोटो आणि त्याची बुलेट ठेवण्यात आली . त्या बुलेट ची रोज पूजा होऊ लागली . साहजिकच , या दैवी कार्य करणाऱ्या आत्म्य बद्दल लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण झाली . लोक त्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करून लागले .अनेक जण ओम सिंह ला नवस करून लागले . त्या महामार्गा वरून जाताना अनेक जण त्या मंदिरात जाऊन ओम सिंहाचे दर्शन घेतात आणि प्रवास सुखरूप होऊ दे म्हणून प्रार्थना करतात . ओम सिंह ला आता लोक बुलेट बाबा म्हणून ओळखू लागले .
बुलेट बाबा अजून ही त्या रस्त्यावर अपघात ग्रस्तांना मदत करतात अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.

मुंबईतल्या काही जागांबद्दल वाचलेलं किस्से ... कोणी मुंबईकर जास्त काही सांगू शकेल का?

मुंबईतल्या चर्चगेट किंवा फोर्टच्या परिसरात कित्येक कार्यालयं आहेत. बहुतांश कार्यालयं ही ब्रिटिशकालीन इमारतीत आहेत. त्यामुळे संध्याकाळी सातनंतर कार्यालयीन वेळ संपल्यावर या परिसरात शुकशुकाटच असतो. त्यापैकी बॉम्बे हायकोर्टाच्या इमारतीत एक द्विभाषिक भुताचा वास्तव्य असल्याचं मानलं जातं. रात्रीच्या वेळी म्हणे तिथे टाइपरायटर वाजल्याचा आवाज येतो.

केम्प्स कॉर्नरच्या ग्रॅन्ड पारडी टॉवरच्या आठव्या मजल्यावरील वासुदेव आणि तारा दलाल या वृद्ध दाम्पत्याने मुलगा आणि सून यांच्या छळाला कंटाळून आठव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली होती. त्यानंतर सात वर्षानी त्याच खिडकीतून मुलगा बाळकृष्ण, त्याची पत्नी सोनल आणि त्यांची कॉलेजमध्ये जाणारी तरुण मुलगी पूजा यांनी उडी टाकून आत्महत्या केली होती. १९७६ मध्ये ही इमारत बांधली गेली तेव्हापासून कित्येक मुलं, नोकर यांनी आत्महत्या केली आहे. म्हणून या इमारतीत घर घ्यायला लोक घाबरतात.

मालाडच्या मार्वे मढ आयलंडच्या रस्त्यावर नवरीच्या वेशातील एक महिला पौर्णिमेच्या रात्री लोकांकडून काहीतरी दुखण्याचा बहाणा करून मदत मागते. जे मदत करायला तयार होतात, त्यांच्या गाडीच्या बरोबर धावते आणि त्या गाडीचा अपघात घडवते, असं ऐकायला मिळतं. साधारण पंचवीस वर्षापूर्वी म्हणे, एका मुलीचा तिच्या लग्नाच्या दिवशी रात्रीच खून झाला आणि तिचा मृतदेह तिथल्याच खारफुटीमध्ये टाकण्यात आला
होता.
जुहू येथील एसएनडीटी कॉलेजच्या शिक्षक वसाहतीत एक शिक्षिका रात्री दोनच्या सुमारास मोठमोठय़ाने पाढे म्हणताना ऐकू येतं. हा आवाज स्थानिक रहिवाशांनी ऐकला आहे. काही मुलांनी याचा छडा लावायचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना काहीच सापडलं नाही. ते गेल्यावर पुन्हा आवाज आला.

बोरिवलीच्या आयसी कॉलनीत प्लॉट नं. १८ येथील बगिच्यात कोणीही मुलं खेळायला जात नाहीत. ती जागा विकली गेली तेव्हा तिथल्या माळ्याची नोकरी गेली. हा धक्का त्या माळ्याला सहन झाला नाही. त्याने तिथे आत्महत्या केली. तो मुलांना खेळू देत नाही.

ही गोष्ट 40 वर्षापुर्वीची आहे. माझी आत्या बाळंतपणाकरिता माहेरी आली होती. पहिले नातवंड म्हणून आजीआजोबा खुशीत होते. आत्या बाळाला झोळीत टाकून पलंगावर झोपली होती. माझी आजी तिच्या सोबतीला खाली झोपली होती. अचानक आत्याला जाणवले की आजी तिच्याशेजारी बसून तिचा गळा दाबतेय. तिला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि ती आजीचे हात सोडवण्याचा प्रयत्न करतेय पण सोडवले जात नाहीये. आत्या जवळजवळ अर्धमेली झाली. तिच्या पाय झाडण्याच्या आवाजाने घरातले सगळेच उठले आणि आत्याला भानावर आणले.
आत्याम्हणे आई माझ्याकडे एकटक बघत होती आणि काही कळायच्या आतच गळा आवळला. असे का झाले कोणालाच कळले नाही.

ग्रॅन्ड पारडी टॉवर स्मशानावर बांधली आहे अस म्हटलं जात.
गिरगावात खोताची वाडी आणि गोरेगावकर लेन या भारलेल्या जागा आहेत.

फोर्ट मधे चकवा आहे. मी स्वतः अनुभवलाय. पुर्वी लिहीलाय परत सांगतो.
माझा क्लास आताच्या BNP Paribas बिल्डींगमधे होता. लवकर आल्यामुळे मी जरा आजुबाजूला फिरायच ठरवलं. होर्निमन सर्कल, सेंट्रल लायब्ररी, फाऊंटन वगैरे
अचानक लक्षात आलं की ग्रँड हॉटेलच्या साईडला पोचलो होतो जिथे जायची काहीच गरज नव्हती.
खुप उदास वाटत होतं. धावत क्लासमधे पोचल्यावर कळलं की सुरू होऊन बराच वेळ झाला होता. मी तब्बल ४५ मिनीटं फिरत होतो.

जवळपास प्रत्येक बिल्डींग स्मशान कबरस्तान च्या जागेवर बांधली आहे असा तीकादेच्या लोकांचा (खरे तर तिकडच्या लहान मुलांचा दावा असतो)
हि बिल्डींग माझ्या बिल्डींग पासून जवळच आहे, आमची बिल्डींग पण स्मशानाच्या जागेवर बांधली आहे असं लहानपणी ऐकायचो,
आता ४००-५०० मीटर च्या अंतरात २ स्मशाने नसावीत Happy

आपले राष्ट्रपती भवन सुद्धा खर्या खर्या दफनभूमी वर बांधले आहे असे ऐकून आहे

माझ्या ऐकण्यात आलेला प्रसंग आहे.
मैत्रीणीची थोरली बहीण संपदा मेडिकल कॉलेजला होती.
ती हॉस्टेलमध्ये रहात असे. संपदा , तिची मैत्रीण भार्गवी आणि समीर असे तिघे घट्ट मित्र.
पैकी भार्गवी कॉलेज जवळ फ्लॅटमध्ये एकटी रहात असे.
तिघांना ग्रुप स्टडीची सवय. परिक्षेच्या काळात तर रात्रभर भार्गवीच्या फ्लॅटवर रीवीजन चालत.
अश्याच एका रात्री भार्गवीचा वाढदिवस म्हणून हे दोघे केक रात्री केक घेवून गेले. बारा वाजता केक कापला आणि गप्पा रंगल्या.
कुठे कसा प्लँचेटचा विषय निघाला आणि करायचे ठरले.
नेमके काय करत होते आणि कुणाला आवाहन करत होते ठावूक नाही, पण अचानक प्लँचेट चालू असताना भार्गवीने नाण्यावरचे बोट काढले आणि विचीत्र नजरेने पाहू लागली.
तोंडाने घुमल्यासारखा आवाज येत होता.
या दोघांना वाटलं मस्करी करतेय.
" हम तुमको नही छोडेगा. "अस काहीतरी बरळायला लागली. आवाज वेगळा वाटत होता, कोणीतरी शिकावू हिंदी बोलल्या सारखा.
तिने जवळच पडलेली , नुकताच कापलेल्या केकची सुरी ऊचलली आणि समीरवर धावून गेली. त्याने दचकून हात बचावासाठी समोर केला आणि दुसऱ्या हाताने तिचा हात पकडला.
संपदा आणि समीर बावचळले. प्रकार गंभीर वाटू लागला. संपदाने तिला मागून पकडले. भार्गवीचे टेंपरेचर सॉलीड थंड होते. बर्फासारघे जवळजवळ. हायपोथर्मिया म्हणावा तर तिची एनर्जी मात्र भयंकर होती. सामान्यतः असा पेशंट अगदी काकडत असतो. इकडे ही दोघांना आवरत नव्हती. काय करावे ते सुचेना, पाणी मारले, येईल ती स्तोत्रे म्हणून झाली, हाका मारल्या पण शर्थ.
बर हे सगळे तिला आवरून पकडून करावे लागत होते. साधारण अर्धा पाउण तास हा प्रकार चालू. संपदा , समीर हवालदिल झाले. समीरला सुरी 2-3 जागी लागली सुद्धा.
अचानक भार्गवी जोरात किंचाळली, " stop it.बस्स." आणि बेशुद्ध झाली. दोघे चमकले. कारण हे वाक्य ती तिच्या आवाजात म्हणाली होती. 5-10 मिनिटे प्रयत्न करून काही शुद्धी वर येईना. शिवाय टेंपरेचर अजूनही बर्फच. नाडी मात्र खणखणीत लागत होती, bp सुद्धा normal, pupils proper.
दहाव्या मिनीटाला समीरने सरळ उचलून हॉस्पिटलमध्ये जायला काढले. मध्यरात्री कुठे रिक्षा मिळते. शेजारीच मदतीला आले. तेसुध्दा आरडाओरडा ऐकून जागेच झाले होते.
आश्चर्य म्हणजे , हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत भार्गवीचे टेंपरेचर बर्यापैकी normal कडे येऊ लागले .तिची ती अवस्था, समीर च्या जखमा , यांचे स्पष्टीकरण देता देता संपदाला नाकीनऊ आले.
पहाटे भार्गवी शुद्धीवर आली. ती solid दमलेली वाटत होती. आवाज खोल गेला होता.
ती म्हणाली तिने रात्रभर एकाच शरीरात दोन व्यक्ती असल्याचे अनुभवले. तिला आजूबाजूला काय चालले आहे ते जाणवत होते. पण त्या बाईचे व्यक्तीमत्व भार्गवीला रोखत होते. तिची मानसिकता फार हिंसक होती.
त्या इमारतीच्या गच्चीवर एका गुरख्याच्या बायको चा म्रुत्यु झाला होता असे कळले. पुनः काही त्रास झाला नाही. पण भार्गवी तो फ्लॅट सोडून हॉस्टेलमध्ये राहायला गेली.

कालच मला हा अनुभव आला, भुता खेतांचा नाही पण जरा विचित्र होता. तर आपल्या आशु सरांच्या सायकल लेखमालेवरून प्रेरित होऊन मी एक सायकल घेतली रोजच्या वापरासाठी, रविवारी जरा लांबच्या राईड्स करतो, काल डोंबिवली ते तळोजा असा 50 किमीचा गोल राउंड मारला, तळोजावरून पुढे midc रोड वरून जाताना अचानक सायकल जड झाल्याची जाणवली, जसं कोणाला तरी डबल सीट घेऊन जातोय असं वाटत होत, चढण पण न्हवती आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाऱ्याचा पण काही त्रास न्हवता, शेवटी मी बरेच वेळा स्पीड येण्यासाठी उभं राहून पेडल मारले पण परिस्थितीत काही फरक नाही पडला, दोन वेळा तर सायकलवरून उतरून हवा वगैरे पण चेक केली, पण तिथेही काही प्रॉब्लेम न्हवता, मीच खूप दमलोय अशी समजूत काढून पाच किमी साधारण अशीच सायकल रेटली, 5 किमीचा तो टप्पा जसा संपला तशी सायकल अचानक पूर्वीसारखी पाळायला लागली. थोडासा विचित्र अनुभव होता,

अश्या प्रकारचा अनुभव कोल्हापुरला जाताना आंबा घाटात आलाय. तेहि दुपारच्या वेळी Happy ह्याबाबतीत सुद्धा ठराविक टप्पा पार पडला व गाड़ी अचानक सुरळीत सुरु झाली. गाडीत काही दोष नव्हता हे मैकेनिककड़े नंतर कन्फर्म झाले त्यामुळे घडले ते खरेच अनाकलनीय होते.
तसे तर तो घाट रात्रीच्या प्रवासासाठी ह्या व अजुन भयंकर प्रकारच्या अनुभवांसाठी फेमस (!)आहे

आज एक अनुभव वाचनात आला-

सकाळची आवराआवर झाली,मी कपड्यांचया घडया घालणयाचया नादात होते. मुंल शाळेत,सासुबाई खालती किचन मध्ये ,आणि अचानक आमची झाडू पुसणं करणारी बाई ओरडत खाली आली.आम्ही या बंगल्यात रहायला येऊन ५/६ वर्षे झालीत.सगळे विधी न चुकता केलेले.वास्तूशांती
,सतयनारायण,रोज सासरे गुरुचरिञ भक्तीभावाने वाचतात.ईथे रहायला आलयापासून कुठला विचित्र अनुभवही नाही.कधी भितीही वाटली नाही,मग असं का होतं य?आमच्या घरात सारासार विचार करणारी सगळी जण आहेत पण जे पाहीलं ते घाबरवून टाकणारं होतं. मला आमच्या वरच्या बेडरूममध्ये अनु घेऊन गेली,मुलांची असली तरी मुलं अजून लहान असल्यामुळे ती वापरात नव्हती ,अनुने संगमरवरी टाइलसवर ऊमटलेले दोन हातांचे ठसे दाखवले वहिनी,"हे काहीतरी वेगळं आहे"मी ईतकी वर्षे काम करतेय पण हे असलं दिसलं नव्हते कधी.बरं खोटं म्हणावं तर समोर प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टी नाकारायचया तरी कशा?खरं तर मीही हादरले होते हाताचे जे पंजे उमटले होते ते नाँरमल माणसाचे निश्चितच नव्हते अनुने तिचे दोन्हीही हात लावून दाखविले पण ईतके मोठे हात एखाद्या राक्षसी माणसाचेच असावेत,बरं रंगारी,टाईलस बसवणारा जरी म्हटला तरी अशक्यच कारण मग ईतके दिवसांनी का दिसताहेत ?बरं तिने surf ,फिनेल ,डेटाँल सगळ्यांनी धुतले तरी जाईनात,आता माञ मी सासु ,सासरे ,हे, सगळ्यांना बोलावून घेतले . हयांनी तर मुरखातच काढलं मला. माझा ही असलया गोष्टींवर अजिबातच विश्वास नव्हता आजही नाहीये पण वेळ च तशी होती.२/३ दिवस वाट पहायची आणि कुणा जाणकार माणसाला बोलवावे असं ठरलं. अनु तर त्या खोलीत जायलाच तयार होईना. मग काय देवघरातला वाडीचा अंगारा सगळी कडे शिंपडला,रामरक्षा म्हणून झाली ,राञ जाता जाईना.दुसरे दिवशी मीच अनुला म्हटलं चल बघुया काय परिस्थिती आहे ते.अनु १/१.30 च्या सुमारास वरती पुसायला जायची. आजही कालचाच प्रकार...तरी तिने माझ्या समोरच जोर ला लावून फरशी पुसली थोडे फिके झाले डाग पण पुरते गेले नाहीत.सासुबाईंनी तिरथ नृरसिंहवाडींच शिंपडलं ण.खोली बंद केली . पुरुष लोक निवांत होते .पण मी आणि सासुबाई जाम घाबरलो होतो..खरंतर आमच्या घरी येणारा प्रत्येक जण तुमच्या घरी आलं कि,शांत, प्रसन्न positive energy आहे असं म्हणायचा. शेवटी आईंनी २/३दिवस वाट बघू नाहीतर गुरुजींना बोलावून कोणी अशा भूत,खेत,जादुटोणा,भ
ानामती,ऊतारे यांवर ऊपाय करणारा आहे का ते बघायचं ठरलं. मी रत्नाकर मतकरी,Agatha Cristi,Sherlock Holmes, कोळून पयायलेले तरी भिती मनातून जाईना..देवावर प्रचंड श्रद्धा ,विश्वास यामुळेच २/३ दिवस कसेबसे गेले . आणि ४था दिवस उजाडला .ह्यांना सोमवारी सुट्टी असते निवांत होते.आणि ह्यांनी वरच्या बेडरूममधून हाका मारायला सुरूवात केली. ईतके दिवसांचा ताण क्षणात नाहीसा झाला. आयुष्यात पहीलयांदा सवतःचया मुरख पणावर हसलो असु. रोज morning walk ला हे जायचे ,आले कि अंघोळीला जायचे . या 8/15 दिवसात यांनी सूर्यनमसकार घालायला सुरुवात केली होती . आधी डोक्यावर तेल लावून नमस्कार घालायचे आम्हाला distrub नको म्हणून रोज वरच्या बेडरुम मध्ये सूर्यनमसकार तेलाच्या हातानेच रोज ठराविक angle ने घालायचे .5ft 8 inch हयांची उंची आणि हाताला लगलेलया तेला मुळे पंजा tyels वर टेकवला कि पुढे घसरायचा आणि त्या चे ठसे उमटायचे. संगमरवर असलयामुळे सहज ते ठसे दिसायचे नाहीत पण तिरकं होऊन पाहीलं कि तेलामुळे चकाकायचे.रोज फरशी पुसली तरी दुसरे दिवशी हे पुन्हा पूर्व पश्चिम त्या च ठीकाणी नमस्कार घालायचे .....मला सांगा कुठलं भूत आणि कुठंलं काय. हे लक्षात यायला ही किती दिवस गेले ... म्हणून म्हणतात ना भितया पोटी बृरहम राक्षस ! हा माझा अनुभव आहे आपण घाबरलो कि ,सारासार विचार करायची बुद्धी खुंटते,... नाही नाही ते भास होतात,.. नजरबंदी च होते,...जे नसतं ते सुद्धा आभास निर्माण करतं म्हणून घाबरु नका , practical विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने करा..... सौ.लीना देशपांडे

रं तिने surf ,फिनेल ,डेटाँल सगळ्यांनी धुतले तरी जाईनात,???
.5ft 8 inch हयांची उंची आणि हाताला लगलेलया तेला मुळे पंजा tyels वर टेकवला कि पुढे घसरायचा आणि त्या चे ठसे उमटायचे. संगमरवर असलयामुळे सहज ते ठसे दिसायचे नाहीत पण तिरकं होऊन पाहीलं कि तेलामुळे चकाकायचे.>>>>
कुछ तो गडबड है दया, तेलाचे ठसे जायला पहिजेत की, सर्फ, फिनेल ने

" कुछ तो गडबड है दया, तेलाचे ठसे जायला पहिजेत की, सर्फ, फिनेल ने" exactly ++++१००००
त्यात या बाई स्वत:च्या नवर्‍यालाच राक्षस म्हणतायत.

Pages