Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीये एकेक अनुभव!
भारीये एकेक अनुभव!
<<सूर्यनमसकार तेलाच्या हातानेच रोज ठराविक angle ने घालायचे .5ft 8 inch हयांची उंची आणि हाताला लगलेलया तेलामुळे पंजा tyels वर टेकवला कि पुढे घसरायचा आणि त्या चे ठसे उमटायचे. <<<
बाप्रे, मी हिम्मतच करु शकणार नाही, तेलाच्या हाताने सुर्यनमस्कार घालायची. नुसत्या कोटा लावलेल्या जमिनीवर पण सटकतात हात घामाने, .... तोन्डावर पडायची भिती वाटते. 
त्यांनी स्पेसिफिकली मार्बल
त्यांनी स्पेसिफिकली मार्बल म्हटलंय म्हणून,....
मार्बल पोरस असतो, त्याच्यावर पडलेले डाग आतपर्यंत जातात, म्हणून नॉर्मली स्वयंपाक घरात ओट्याजवळ मार्बल कमी लावतात.
तेलाचे ठसे , त्यावर धूळ चिकटून डाग तयार झाले असतील., नमस्कार घालताना हातांच्या ओवर laping हालचालींमुळे ठश्याचा आकार मोठा वाटला असेल.
असो... मी उगाच लॉजिक देतोय...
डॉ. मनाली यांनी सांगितलेला
डॉ. मनाली यांनी सांगितलेला अनुभव खूप थरारक आहे. गम्मत म्हणून प्लांचेट करायला गेले आणि त्यांच्यापैकीच एकाला बाधा झाली. जर हे खरे आणि असेच घडले असेल तर त्यामागचे कारण काय असू शकेल असा आपसूक विचार मनात येतोच. या धाग्यावर चिकित्सा करणे योग्य होणार नाही. पण तरीही असे वाटते कि कोणत्याही कारणाने झालेल्या वातावरणनिर्मितीचा (किंवा असलेल्या वातावरणाचा) मानवी मनावर खोल परिणाम होत असावा.
असो. किस्सा खूपच थरारक. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
<<कुठे कसा प्लँचेटचा विषय
<<कुठे कसा प्लँचेटचा विषय निघाला आणि करायचे ठरले.
नेमके काय करत होते आणि कुणाला आवाहन करत होते ठावूक नाही, पण अचानक प्लँचेट चालू असताना भार्गवीने नाण्यावरचे बोट काढले आणि विचीत्र नजरेने पाहू लागली.<<
बाप्रे, भयानक आहे किस्सा!
हॉस्टेलवर आम्हीही हे प्लॅन्चेट वै प्रकार केले होते. पार स्मिता पाटील, राज कपुर, इन्दिरा गान्धी यान्च्या आत्म्याला बोलवले. पण शेवटी त्यान्ना प्रसन्गी रामाची शप्पथ घालुन जायला सान्गायचो!
(हो एकदा, तो ग्लास फिरतच राहिला होता, तेव्हा जाम टरकली होती. )
मग आमच्यातच," तु बोटाने हलवतेस, नाही तु हलवला..." वै वै वाद झाले. आणि प्लॅन्चेट प्रकार कायमचा बन्द झाला.
काय एकेक कल्पना ना!
(हो एकदा, तो ग्लास फिरतच
(हो एकदा, तो ग्लास फिरतच राहिला होता, तेव्हा जाम टरकली होती. ) >> काही का?
प्लांचेट चा किस्सा भयानक आहे.
प्लांचेट चा किस्सा भयानक आहे.
असे बोलवल्याने आत्मे येत अस्ते तर किती छान झाले अस्ते.
गुगु >>>
गुगु >>>

प्लांचेटचं माहिती नाही पण हाक
प्लांचेटचं माहिती नाही पण हाक दिल्याने अतृप्त आत्मा येतो/त्याची जाणिव होते. सभोवतालचं वातावरण पुर्णपणे बदलून जातं. याचा अनुभव तिनेक महिन्यापूर्वी स्वत: घेतलाय !
atuldpatil प्लँचेटचा हा
atuldpatil प्लँचेटचा हा किस्सा आमच्या ग्रूपमध्ये कित्येकदा चघळला गेला होता. पैकी संपदाला (नावे फक्त काल्पनिक ) मी पर्सनली ओळखते. ती आता प्रथितयश त्वचारोगतज्ञ आहे.
खर तर आम्ही स्वतः उलटसुलट चर्चा केलेल्या आहेत या किस्स्यावर. अगदी मस्करीपासून , मानसिक आजार ते थेट संपूर्ण प्रसंगाच्या विश्वासार्हतेवर.
मला फक्त hypothermia ( शरीराचे कमी झालेले तापमान) बुचकळ्यात टाकते. बाकी सर्व घटनेतील बाबींना तर्कसंगत कारणे आहेत.
खर तर एवढ्यासाठीच हा प्रसंग मी पोस्ट केला. मानवीय किंवा अमानवीय, काही स्पष्टीकरण आहे का?
@डॉ. मनाली... मनाचा शरीरावर
@डॉ. मनाली... मनाचा शरीरावर असणारा ताबा. आणि तीव्र भीती किंवा चिंता (anxiety) असेल तर मनाने "प्रतिक्रिया" म्हणून शरीरात निर्माण केलेली शक्ती. "अंगात येणे" या प्रकारात हि अवस्था असते. शरीरात प्रचंड ताकत येते. मी एक दृश्य पाहिले आहे. एका प्रसिद्ध मंदिरात गाभाऱ्यात भाविकांच्या गर्दीत अचानक त्या स्त्रीच्या अंगात आले होते. खरे तर ती खूप कृश आणि दुबळी होती. पण "अंगात आल्या" नंतर तिच्या अंगात इतकी शक्ती संचरली कि हातवारे करत गर्दीतल्या आसपासच्या चार-पाच जणांना तिने बघता बघता जाग्यावरच लोळवले. आता त्या अवस्थेत अशा व्यक्तीच्या शरीराचे तापमान काय असते हे मात्र मला ठावूक नाही.
मला जास्त आश्चर्य याचे वाटते:
>> त्या इमारतीच्या गच्चीवर एका गुरख्याच्या बायको चा म्रुत्यु झाला होता असे कळले
त्यांना याविषयी आधी माहिती होती का? प्लान्चेट करताना त्यांच्या मनाने कदाचित याबाबत धास्ती घेतली असेल कि "हि तर येणार नाही ना?".
बाकी, अशा अनेक घटनांमध्ये हा कॉमन धागा आढळतो कि त्या ठिकाणी आधी कोणाचातरी मृत्यू झालेला असतो. हे कसे काय ते मात्र कळत नाही.
खरे तर ती खूप कृश आणि दुबळी
खरे तर ती खूप कृश आणि दुबळी होती. पण "अंगात आल्या" नंतर तिच्या अंगात इतकी शक्ती संचरली कि हातवारे करत गर्दीतल्या आसपासच्या चार-पाच जणांना तिने बघता बघता जाग्यावरच लोळवले. आता त्या अवस्थेत अशा व्यक्तीच्या शरीराचे तापमान काय असते हे मात्र मला ठावूक नाही.>>>>
अतुलजी, अशी अंगात आलेली सामान्य किंवा लहानश्या शरीरयष्टीची माणसं -बाया प्रसंगी पंधरा विस जणांना एकाचवेळी लोळवताना बघितली आहेत !
अंगात आलेलं असताना शरीराच्या तापमानात विशेष फरक नसतो. अर्थात् थर्मामीटर लावून बघितलं नाही !
रच्चाकने, तो अंगात आलेला भूतात्मा मरण्याच्या आधी कूल होता की हॉट यावर काही अवलंबून असेल काय...
प्लांचेटचं माहिती नाही पण हाक
प्लांचेटचं माहिती नाही पण हाक दिल्याने अतृप्त आत्मा येतो/त्याची जाणिव होते. >>>>> तृप्त आत्मे कधीच येत नाही का ??? की आत्मे हे कायम अतृप्त असतात ????
प्लांचेट च्या मागच्या पोस्टी आठवुन मला आता प्लॅचेंट करावे असे वाटतेय.
प्लांचेट मला पण करावेसे वाटू
प्लांचेट मला पण करावेसे वाटू लागले आहे.
कोणी त्याची रेसीपी सान्गू शकेल का
प्लॅन्चेट करताना एकाच
प्लॅन्चेट करताना एकाच नावाच्या दुसर्या व्यक्तिचाही आत्मा येतो म्हणे. मग ते चेक करावे लागते त्याची परिक्षा घेउन. त्याची मुले बाळे, गाडीचा नंबर काय वै वै विचारुन चेक करतात. असा दुसर्या व्यक्तिचा आत्मा आला आणि लवकर जात नसेल तर त्याला ही ,"तुम्ही जा, तुम्हाला रामाची शप्पथ आहे' असे म्हणुन पाठवतात.
फार पुर्वी आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या एका मामाने केले होते. त्यातले आठवले.मामाने आमच्या आजोबांना 'बोलवले' होते. तेव्हा मी नुकतीच ४थी कि ७वी ची स्कॉलरशीप परिक्षा दिली होती. मामाने अगदी सहज म्हणुन ही परिक्षा पास होईल का असे 'आजोबांना विचारले. तेव्हा त्यांनी हो उत्तर दिले आणि गम्मत म्हणजे त्यांनी सांगितलेला तोच नंबर आला होता माझा.
आर्यातै
आर्यातै
तु स्वतः अनुभव घेतला आहे म्हणुन मला आता विश्वास ठेवावा वाटतोय प्लँचेट वर.
<<तु स्वतः अनुभव घेतला आहे
<<तु स्वतः अनुभव घेतला आहे म्हणुन मला आता विश्वास ठेवावा वाटतोय प्लँचेट वर.<<
हा तसलाच काही प्रकार वाटला मला.
अग हो, पण तो किती लहानपणी अनुभव घेतलाय. आणि त्यावरुनच हॉस्टेलला असताना गमतीत हे प्रकार केले.
पण का कुणास ठाउक माझा नाही विश्वास बसला. अग साधा पाण्याचा ग्लास ही पाणी पिउन उपडा मारला तर आपोआप सरकतो... त्यातील हवा बाहेर निघेपर्यन्त.
माझ्या मित्राचे एक शेजारी
माझ्या मित्राचे एक शेजारी होते त्यांनी केलं होतं प्लँचेट. मित्राचे आमच्या एका मैत्रिणीचे दहावीचे मार्क सांगितले. मित्र ९ वी तर ती मुलगी ७ वीत होती पण मार्क बरोबर निघाले.
तसा मित्राचा वाडा आणि शेजारचा वाडा भारलेलाच होता.
त्याच्या आजोबांना एक बाई दिसायची फिरताना.
शेजारच्या वाड्यात एका तिसर्या मजल्यावरच्या खोलीत कोणीतरी आत्महत्या केलेली.
क्रिकेट खेळताना एकदा आणि एकदाचा बॉल तिथे गेला . माझा मित्र गेला होता आणायला.
तो येई पर्यंत बातमी घरी पोचली होती. आधी दृष्ट वगैरे सोपस्कार करून मग खच्चून ओरडा खल्ला.
तुम्ही जा, तुम्हाला रामाची
तुम्ही जा, तुम्हाला रामाची शप्पथ आहे>>>>> हे म्हणजे काय नव्हेच ते

atuldpatil भार्गवीला या
atuldpatil भार्गवीला या म्रुत्युबद्दल माहिती होते. म्हणूनच या प्रकाराला मानसशास्त्रीय कारणे असणार असा तर्क लावला.
भार्गवी त्या फ्लॅटमध्ये चार वर्ष राहत होती. पहिल्या वर्षी कधीतरी कामवाल्या बाईने उल्लेख केला होता. ती वॉचमनची बायको बाळंतपणात वारली.पण तिथे कोणालाही या घटनेच्या आधी काहीहि त्रास झाला नव्हता.
In fact भार्गवीने याआधी किंवा नंतर काही त्रास झाल्याचे सांगितले नाही.
प्लॅंचेट कस करतात सविस्तरपणे
प्लॅंचेट कस करतात सविस्तरपणे कोण सांगेल काय? मी तिन वर्ष् झाली एका पोस्ट् साठी परिक्षा देतोय पण फेल् होतोय्. फि फुकट जाते. यावेळी विचारुन प्रवेश घेतो. म्हणजे पैसे फुकट जाणार नाहीत.
म्हणजे स्वताच्या
@आनंद.: खरे आहे. "अंगात
@आनंद.: खरे आहे. "अंगात येणाऱ्यांच्या" अंगात बाकी काय येते न येते माहित नाही पण प्रचंड शक्ती मात्र येते
>>हे म्हणजे काय नव्हेच ते Lol Rofl
+१
>>कोणी त्याची रेसीपी सान्गू शकेल का

@डॉ. मनाली: तिला माहित होतं
@डॉ. मनाली: तिला माहित होतं यातच बरीच उत्तरे दडली आहेत.
असो. पण कदाचित या धाग्याची मजा जाईल त्या चर्चेने. अन्यत्र (विपुमध्ये वगैरे) बोलता येईल त्यावर आपल्याला.
@आनंद - नक्की काय अनुभव घेतला
@आनंद - नक्की काय अनुभव घेतला आहे ते सांगा इथे ...
प्लॅंचेट करताना आपण काही
प्लॅंचेट करताना आपण काही scientific प्रश्न नाही का विचारू शकत? कोणी प्लॅंचेट करणार असेल तर विचारुन बघा.
उदा. Discovery of time machine वगैरे...
प्लॅंचेट करताना आपण काही
प्लॅंचेट करताना आपण काही scientific प्रश्न नाही का विचारू शकत? कोणी प्लॅंचेट करणार असेल तर विचारुन बघा.
उदा. Discovery of time machine वगैरे...
नवीन Submitted by L on 29 March, 2018 - 09:55
प्लॅंचेट करून कोणा तरि शास्त्रद्याला बोलवावे लागेल ,
आन्डूपान्डूला बोलावले तर त्याला विषय कळणार पण नाही
आणि मला बोलावून असा कठीण प्रश्न विचारला म्हणून रागावून परत जाणार नाही
मग बसा बोम्बलत
Stephen Hawking
Stephen Hawking ?
पण ते रामाच्या शपथेनी जातिल का ?
तर त्याना कोणाची शपथ घालावी
प्लँचेट चा आम्ही पण एकदा
प्लँचेट चा आम्ही पण एकदा प्रयोग केला होता. तेव्हा ते कसं करायचं ते ठावूक होतं. माझी एक आतेबहिण, आतेभाऊ, आत्याच्या शेजारचा एक इंजिनियर झालेला मुलगा इ जण होतो ते तर आठवतेय. बहुधा अजून १-२ चिल्लिपिल्ली होती. तर तो जो इंजिनियर झालेला होता त्याने टेल्को मध्ये अॅप्लाय केले होते. आम्ही असाच कुणितरी प्रसिद्ध आत्मा बोलवला होता
आणि त्याचे टेल्को चे काम होईल का आणि जॉइनिंग डेट काय असेल असे विचारले होते. आम्ही प्लँचेट केले तो महिना असा एप्रिल की मे होता. काम होइल ला येस आणि जोईनिंग डेट ला १६ का २४ जुलै अशी कायशी डेट सांगितली आणि ती चक्क बरोबर आली होती.
प्लँचेट चा आम्ही पण एकदा
प्लँचेट चा आम्ही पण एकदा प्रयोग केला होता. तेव्हा ते कसं करायचं ते ठावूक होतं. माझी एक आतेबहिण, आतेभाऊ, आत्याच्या शेजारचा एक इंजिनियर झालेला मुलगा इ जण होतो ते तर आठवतेय. बहुधा अजून १-२ चिल्लिपिल्ली होती. तर तो जो इंजिनियर झालेला होता त्याने टेल्को मध्ये अॅप्लाय केले होते. आम्ही असाच कुणितरी प्रसिद्ध आत्मा बोलवला होता Biggrin आणि त्याचे टेल्को चे काम होईल का आणि जॉइनिंग डेट काय असेल असे विचारले होते. आम्ही प्लँचेट केले तो महिना असा एप्रिल की मे होता. काम होइल ला येस आणि जोईनिंग डेट ला १६ का २४ जुलै अशी कायशी डेट सांगितली आणि ती चक्क बरोबर आली होती.
नवीन Submitted by दक्षिणा on 29 March, 2018 - 14:31
ओह , म्हणजे नक्कीच प्लॅंचेट करणे शिकायला पाहिजे .
कोणी तरी त्याची रेसीपी सान्गा
amchya shejari ek kaku varlya
amchya shejari ek kaku varlya kahi divsanpurvi, karyachya divshi kahi lokanmadhe paddat aahe ki vishista asa Bhajani mandal vadya vajvat tyamule geleli vaktichya kahi eccha rahilya astil tar tya yetat konachya hi angat, karyachya divshi tya bhajan mandalini tin Naral thevle hote ani te konalahi navte mahit ki tya vakticha navacha konta naral aahe to bhajan suru zale , barach vel zala ani tya kakunci choti mulgi ghumu lagli halu halu tine toch naaral uchlala barobar ani tya kakuncyach awajat bolu lagli, khup radli ti mulana javal geun ani mag geli.
Pages