अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते चांगलं लिहितात यात शंकाच नाही, पण ज्या वेगाने त्यांचे नवनवीन धागे येत आहेत तो वेग पाहता 'विठ्ठल' यांची शंका रास्त वाटते!!! Happy>>>

यशोधन वर्तक नाव आहे त्यान्च. फेस बुक वर खुप लिखाण आहे त्यान्चे. माबो वर ही आधी होता. पण मधे गायब होता. आता तो परत इकडे लिहायला लागला आहे. ह्यातले बरेच लेख तिकडे सापडतिल. एकादमात सगळे टाकले त्याने.

????

ऋन्मेऽऽषचे स्पर्धक आहेत असे म्हणायला काही हरकत नाही! >> पहिले पहिले जे त्यांचे धागे वर आले होते ते २०१२ वगैरे मधले जुने होते . आता ते नवीन लिहायला लागले आहेत . कदाचित ते त्यांच आधीच कुठेतरी लिहिलेल लेखन असेल आता त्यांचे धागे इथे वर आल्यावर दुसरं लेखन इथे पण पोस्ट करताहेत असं वाटत Happy

ह्या धाग्यावर कदाचित हा अमानवी व्यक्तींनी मानवास भ्रमात टाकण्यासाठी काही पोस्ट केल्या असाव्यात धागाकर्त्याने find it युजर is human अशी संरक्षक लिंक टाकावी

Zankar >> Happy Happy Happy

अंनिस वाले आले की काय या धाग्यावर? एकही नवा किस्सा नाही. हा धागा वर आल्याचे पाहून बरेच दिवस भुतांच्या खत्रूड गोष्टी वाचायच्या अपेक्षा वाढतायेत. नवीन किस्से नाहीत म्हणून संपूर्ण जुना धागा वाचून काढला. येवू दे थोडी भूतं, हडळी, पिशाच्च वै. Uhoh

फार भीती वाटते आधीचा धागा वाचून. किती दिवस (रात्री) मी देवाचा फोटो उशीच्या बाजूला ठेवून झोपत होते.

याला अमानवी म्हणता येईल का नाही माहित नाही 2/3 वर्षे झाली आम्ही मनालीला trip ला गेलो होतो. माझ्या जवळच्या मैत्रिणीचा 4/5 दा फोन आले. Network नसल्याने बोलता आले नाही रात्री झोपेत ती माझ्या स्वप्नात येऊन म्हणाली की तिचे वडील वारले.घरी आल्यावर समजले की ते खरंच गेलेheartattack ने अचानक

Submitted by shamika on 26 January, 2018 - 08:19>>> हे इंटरेस्टींग आहे!

स्वप्न दृष्टांत हां अतिंद्रिय शक्तिचा एक भाग होवू शकेल पण अमानवीय / भुत वगैरे नसावा. शमिकाजी पूर्ण किस्सा ऐकायला आवडेल.
झंकार Rofl

सत्य घटनांवर आधारित काहि हॉरर चित्रपट

1. The Exorcist (1973)
The Exorcist हा चित्रपट एका पुस्तकांवर आधारित असून ते पुस्तक रोलंड डो नावाच्या एक मुलाच्या जीवनावर आहे जो एका शैतानी शक्तीने झपाटलेला आहे. या पुस्तकावरूनच हा चित्रपट बनवलेला आहे.. चित्रपट अतिशय भयानक आणि भयावय आहे.. दरम्यानच्या काळात हा चित्रपट पाहून लोक खूप घाबरली होती..म्हणून या चित्रपट वर ब्रिटनमध्ये काही वर्ष बॅन देखील करण्यात आला होता. १९७३ प्रदशित हा चित्रपट आज हि हॉरर चित्रपटमधील सर्वात भीतीदायक चित्रपट मानला जातो.

2. The Amityville Horror (2005)
हा चित्रपट १९७५ सालील अमिटीविले, लुट्झ कुटुंबाच्या नवीन घरवर आधारित आहे. जेव्हा जॉर्ज लुट्झ आणि त्याची पत्नी, कॅथी, अमिटीविले, एन.वाय. मधील एका लहानशा गावात एक सुंदर नवीन घर शोधतात, त्यात ते घर त्यांना खूप कमी किमती विकत मिळते.तास त्या घराचा इतिहासच तसा होता म्हणा.. भूतपूर्व भाडेकरुने अमानवीय शक्तीच्या नियंत्रणा खाली जाऊन आपल्या कुटुंबाची हत्या केली. पण तरीही लुट्झ कुटूंब त्या घरात राहायला येते.. तेव्हा त्याचा बरोबर काय घडते ते या चित्रपटात दाखवले आहे.

3.The Conjuring (2013)
१९७० साली पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेटर्स लॉरेने आणि एड यांना कॅरोलिन आणि रॉजर यांच्या घरी बोलावले जाते. कॅरोलिन आणि रॉजर आपल्या ५ मुलींनसह अलीकडेच एका मोठ्या घरात राहायला आलेल्या असतात. त्या घरात काही घरात काही अमानवीय शक्तींचा वास असतो. त्या अमानवीय शक्तीपासून लॉरेन आणि ऍड कशाप्रकारे सुटका करून देतात ते खरंच पाहणे सारखे आहे.

4.The Rite (2011)
मायकल कोवक नावाचा एक मुलगा व्हॅटिकन स्कूल ऑफ एक्सऑर्सिसम जॉईंट करायचे ठरवतो.. कारण त्याच्या मते भूतबाधा हि मानसिक बिमारी आहे.. नाही कोणती शैतानी ताकत. पण तिथे गेल्यावर त्याचा एक्सऑर्सिस्ट एक्स्पर्ट फादर लुकस यांच्याशी संपर्क होतो आणि तो त्यांचा विद्यार्थी बनतो..त्यांचा सोबत झाडफुक चे प्रयोग बघून त्याचे सगळे गैरसमज दूर होतात.

5.The Exorcism Of Emily Rose (2005)
हा चित्रपट अँनेलीसी मायकेलच्या जीवनावर आधारीत आहे जी कि, द्रुष्ट आत्म्याने झपाटलेली होती. त्या द्रुष्ट आत्म्याला तिच्यापासून मुक्त करणे साठी जवळजवळ १ वर्षाचा कालावधी लागतो यावर आधारित हा चित्रपट आहे.

6.The Possession
या चित्रपटात इम नावाची मुलगी एका सेल मधून एक लाकडी पेटी विकत घेते आणि नंतर तिच्या सोबत खूप विचत्र घटना घडू लागतात. त्यावर आधारित हा चित्रपट आहे.

Kadhi diesel bayangi bhut mala?

Submitted by Ashuuu on 11 February, 2018 - 11:38 >>>> तुम्ही बायंगी भुत बघायला माबो जॉईन केली????

इकडे भुते असतात का????

बादवे, तुम्ही रत्नागिरी म्हणजे कोकण ना
मग तिकडे असतात की खुप सारी भुते, मग तिकडेच बघा न कदाचित दिसेलही

ही बायंगी भुतं भाड्याने मिळतात. आमराईची राखण, घरात सुबत्ता आणणं असली काम करतात. पण ती एकनिष्ठ असतात ती देणार्‍या भगताशी. त्याला जर योग्य मान मिळाला नाही तर वाटोळही करतात.

याबद्दल एका मासिकातला एक लेख आहे माझ्याकडे पण तो कॉपी पेस्ट करता येत नाही. कोणाला शक्य असेल तर मी ईमेल करतो.

भुत्याभाउ मी एक्झॉरसिस्ट आणि एक्झॉरसिझम ऑफ एमिलि रोज हे दोन्ही सिनेमे पाहिले आहेत ते पण घरात पण तरिही भितीने गाळण उडाली होती माझी.
एक्झॉरसिस्ट पाहताना तर मी तोंडावर पान्घरूण घेऊन मैत्रिणीना विनंती करत होते आवाज बारिक करा, बन्द करा.. खरंच भयंकर सिनेमा आहे.
अजून एक सिनेमा आहे त्याचं नाव नाईट मेअर ऑन एल्म स्ट्रीट तो पण भयंकर आहे Sad

मी सुद्धा, The Exorcist, conjuring 1 & 2 पाहीलेत, पण ईतकीशी नाही घाबरले.
conjuring 1 सत्यकथा आहे असे ऐकले होते म्हणून एकदा घरी एकटी असताना पहिला होता तो ही मध्यरात्री, दिवे बंद करून
एखादं सिनला दचकली पण घाबरली नाही

Vb ना अनुमोदन
अजिबात दचकायला घाबरायला नाही झालं
फारसे भीतिदायक नाही वाटले
रात्रि पाहून सुद्धा

बायांगि असो की अजुन काही भुत/शक्ति जिचा आपल्या स्वार्थासाठी वापर केला जातो ते फक्त क्षुद्र दैवताना प्रसन्न करून साध्य होत असते आणि अश्या प्रसंगात सर्व नियम (वामाचार पंथी) काटेकोर पाळणे बंधनकारकच असते अन्यथा ही क्षुद्र दैवते कोप पावतात व उपासकास भयंकर त्रासास सामोरे जावे लागते. म्हणून ह्या अनुचित /वाममार्गाने काही मिळवण्याचा वैचारिक लोभ सर्व स्तरावर निव्वळ नुकसान दायकच ठरतो.

Are tumchi Kai picture baddal boltai, jar konala bayangi cha experience asel tar mala jara help kara, what's app var ७३५००७०६०३

@@ दक्षिणा --- एकाच चित्रपट पाहून मी घाबरलो होतो तो म्हणजे grudge .... कदाचित त्यावेळी मी घरात एकटा होतो आणि सगळी कडे अंधार करून तो चित्रपट पहिला म्हणून असेल ... पण माझ्या मते तो आजवरचा सर्वात भीतीदायक चित्रपट ...

पण माझ्या मते तो आजवरचा सर्वात भीतीदायक चित्रपट ...>> +१
मला सकाळीपन दिसणारे भूतं अज्जिब्बात आवडत नाही..

Pages