अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आय एम बॅक

मागे सांगली बंगाली दरवाजा खोल पिक्चर पाहिला छान होता

माझा कान कुणी तरी चाटत आहे वाटल कुत्र असल म्हणून हाड हाड करत ताडकन उठून बसलो... तर कोणीच नाही घराच्या आजूबाजूला पण पाहिल पण कुठेच कुत्र दिसल नाही<<
बाप्रे, खतरनाक !!

मिमिविजय,
आपण आदिजो यांनी सान्गितलेला उपाय जरुर करावा,व तीन-चार महिन्यानी ईथे कळवावे हि विनंती.

अनिरुद्ध

Submitted by अनिरुद्ध प on 27 February, 2015 - 08:58

माझी सौ. तिच्या माहेरी कोणी नाथपंथीय आहेत त्यांच्या कडे माझी कुंडली दाखवून चौकशी केली असता मला पितृदोष आहे त्यामुळे हे चालूच राहणार आहे

ह्या वर ऊपाय एकच दर आमावस्येला न चुकता संध्याकाळी घराबाहेर तीन दिशांना दहीभात टाकणे

माझ्या काकांनी घेतलेला एक अनुभव .. खूप दिवसापासून इथे पोस्ट करायचा होता पण टायपिंग चा कंटाळा येतो ...
साधारण २०-२५ वर्षांपूर्वीचा आहे हा अनुभव... आमचे वर्ध्याला वडिलोपार्जित घर होते परंतु सगळी मंडळी माझ्या आजोबांनंतर नाशिक आणि पुण्याला स्थलांतरित झाली होती व ते घर बरेच दिवस तसेच पडून होते. शेवटी ते घर विकून टाकावे असे ठरले आणि माझे काका (ते त्यावेळी शिक्षणाला बाहेर होते) तिथे गेले. मोठ्या काकाने त्यांना काही गावातल्यांचे नंबर दिले जेणें करून त्यांना मदत होईल आणि काही हॉटेल्सचे पत्ते दिले आणि घरी न जाता हॉटेलवर राहा असे सुचविले. स्वतः चे घर असताना हॉटेलमधे रहायला का सुचवले हे कळत नव्हते . त्याबद्दल विचारले तेव्हा त्याने तूझी गैरसोय होईल,घर बरेच दिवस बंद आहेत असे सांगितले. पण २-३ दिवसांचीच काम असेल अशी अपेक्षा करून काकांनी घरातच राहण्याचे ठरवले.
घर चांगले प्रशस्त होते पाच खोल्या,अंगण,मागे विहीर पण घर बंद असल्याने थोडी धूळ साचली होती . एक दोन माणसे बोलवून साफ सफाई करून घेतली आणि राहण्याची सोय केली मात्र त्यांना त्या घरात कोणी स्वयंपाकाला मिळाले नाही म्हणून त्यांनी दादाला फोन केला. ते त्या घरात राहतोय हे ऐकून तो चिडलाच आणि त्याने सांगितले, “त्या घरात आत्म्याचा वावर आहे आणि जरी तुला तेथे रहायचे असेल तर कोणालातरी सोबत घेऊन रहा”. काकांनी ते बोलणे हसण्यावारी नेले. संध्याकाळी घरी आले तेव्हा दारात एक म्हातारा माणूस उभा होता, त्याला नीट बघितल्यावर आठवले हा नोकर जनोबा पुर्वी आजोबा नाशिकला येत असताना त्यांच्याबरोबर येई . त्याची विचारपूस केल्यावर कळले की आता तो दिवसा कोणा कोणा कडे काम करतो जेवणाची गैरसोय होतेय हे त्याला कळले म्हणून तो आला आणि रात्रीची सोबतही झाली होती.
त्या घर बद्दल अफवा होत्या म्हणून ४-५ दिवस झाले तरी कोणी गिर्हाईक मिळेना म्हणून शेवटी काका परत आले. घरी आले तेव्हा त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार घर कसे आहे ? भीती नाही वाटली ना ? सोबतीला कोण होते ? त्यांनी शांतपणे सांगितले कि घरात भूत काय भुताचे नखही नव्हते त्यात सोबतीला जनोबा होता मग भिती कसली. त्यांचे बोलने ऐकून त्यांच्या मोठ्या भावाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काकांनी त्याला याचे कारण विचारले..तेव्हा त्याने जे काही सांगितले ते काकांचाच चेहरा पांढरा पडायची वेळ आली.."त्याच्या मते तू म्हणतोयस भुताच नखही नाही बघितलंस मग राहिलास कोणा बरोबर जनोबाचा बाबांच्या म्रुत्युच्या एक महीना आधीच घरामागच्या विहिरित पडून म्रुत्यु झाला..पण अजूनही अनेकांना घरात तो दिसतो . बाबांनाही दिसायचा म्हणून मी तुला तेथे नको रहुस सांगितले होते. काकांना अजूनही हा अनुभव सांगताना अंगावर शहर येतो.

Submitted by भुत्याभाउ on 18 December, 2017 - 21:15 >>> भुत्यभाऊ, हा अनुभव आधी कुठे टाकलाय का????

मी हा किस्सा , अगदी असाच या पूर्वी कुठेतरी वाचलाय.
आत्ता आठवत नाहीये कि कोणत्या साईटवर वाचलाय ते

काल रात्री आम्ही कुणीच झोपु शकलो नाही. खूप भिती वाटत होती. छातीवर भयानक दडपण आलं होते काल. माझी ३ वर्षांची मुलगी रात्रभर मुसमुसत होती. त्यात बायकोला पॅसेजमध्ये कोणीतरी आहे असा भास होत होता. सकाळी कॅलेंडर पाहिलं तर 'अमावस्या'. या घरात मागच्या काही महिन्यात भास होत आहेत. काल सन्ध्याकाळी मुलगी पॅसेज मधुन एकदम ओरडत आली, खुप रडवेली झाली होती. काय झाला विचारलं तर फक्त रडत होती.

@चिखलु - आता सगळे ठीक ठाक का? आपण बहुधा भारत बाहेर आहात का?>>आहे, सगळे ठीक आहे
भारताबाहेर आहे.

हे घर सोडणार आहे लवकरच.

@चिखलु >> उत्तम, आता नवीन अपार्टमेंट मध्ये जातांना एक दत्तगुरूंच्या फोटो पण न्या म्हणजे असला त्रास होणार नाही परत...

आपण कुठंल्या भागात आहेत अमेरिकेत ?

साधारण २००९-१० च्या सुमारास नाशिक निफाड गावच्या रस्त्यावर रात्री १०-११ च्या सुमारास घेतलेला अनुभव...

मी आणि माझी बायको निफाडहून नाशिकला चाललो होतो ... रात्रीची वेळ होती आणि बायकोला तिच्या purse मधून काहीतरी काढायचे होते म्हणून मी गाडीतला बल्ब चालू केला . पण त्या बल्बच्या प्रकाशात मी जेव्हा बायकोकडे नजर टाकली तेव्हा मला तीच्या बाजूने असलेल्या गाडीच्या काचेतुन मला गाडीबाहेरून आमच्या सोबत अजून कोणीतरी दोघे जण प्रवास करतायेत असा भास झाला. थोडे आशचर्य वाटले पण जास्त लक्ष नाही दिले ... असाच साधारणतः काही किलोमीटरचा रस्ता कापला असेल अचानक मला अचानक कोणीतरी पुढून रस्ता ओलांडून गेल्याचे स्पष्टपणे जाणवले . मी गाडीला तिथल्या तिथेच जोरदार ब्रेक लावला व गाडीचा वेग तात्काळ कमी केला . पण गाडी थांबविण्याची हिंमत काही झाली नाही . मी बायकोला , " तुला काही दिसले का गं ? " असे भीतभीतच विचारले . तीनेही थरथरत रस्त्यावर बोट करत अंदाजे साडेपाच ऊंचीची एक मानवी आकृती रस्ता पार करून जाताना पाहिल्याचे मला सांगितले . तीने नंतर केलेल्या त्या आकृतीचे वर्णन व मी पाहिलेली ती अर्धदृश्य आकृती यांत कमालीचे साम्य होते .
ते काय होते काहीच कळले नाही परंतु ताशी ५०-६० किलोमीटर ने जाणाऱ्या गाडीच्या समोरून अगदी आरामात मानवी आकृती कशी काय ओव्हरटेक करू शकते याचे गूढ काही सुटले नाही ... तसंच तिथे आजूबाजूला सगळीकडे उसाची शेती होती आणि मानवी वस्ती पण नव्हती ....

पण त्या बल्बच्या प्रकाशात मी जेव्हा बायकोकडे नजर टाकली तेव्हा मला तीच्या बाजूने असलेल्या गाडीच्या काचेतुन मला गाडीबाहेरून आमच्या सोबत अजून कोणीतरी दोघे जण प्रवास करतायेत असा भास झाला>> ते तुमचं दोघांचं प्रतिबिंब असू शकतं.

मला आलेले या वर्षातला दोन अनुभव

ताथवडे उद्यानात मी कधी कधी संध्याकाळी जातो. त्या दिवशी तिथे जवळ मोटरसायकल लावली व जरा लवकर झाल्याने टंगळ मंगळ करत चालत होतो. तिथे टॆंकर जवळ एक भिकारी म्हातारी बसली होती. मी तंद्रीत तिथून चालत गेलो. एकदम मनात आले की त्या म्हातारीला काहीतरी दिले पाहिजे. आपल्या आईच्या वयाची आहे. मग मागे आलो पाहिले तर म्हातारी गायब. अरे इतक्यात कुठे गायब झाली. फुगेवालीला विचारल ती म्हणली गेली. झपाझप चालत आजूबाजूला पाहिले. दिसली नाही. विचार केला एवढी जक्ख म्हातारी चालून चालून किती लांब जाणार? गाडी काढली व आजूबाजूला गेलो तिचा पत्ता लागला नाही. अस्वस्थ झालो. नंतर सात आठ दिवस त्याच वेळी तिथे येउन म्हातारी दिसते का हे पहात राहिलो. म्हातारी परत दिसलीच नाही विषय डोक्यात असाच रेंगाळत राहिला.
२) सकाळी चालायला जातो डहाणूकर कॊलनी ते गांधीभवन वरुन पुढे गोपीनाथनगर. तिथे द्त्ताच देउळ आहे. पुढे टेकडीचा पायथा व डेड एंड आहे. भुभु लोक असतात तिथे. माझी बहिण जवळच राहते. ती पण येते कधी कधी दिसते. त्या दिवशी टेकडीच्या पायथ्याशी दिसली. मी विचार केला जरा भुभु मंडळींशी दोन मिनिट खेळून जावे भेटायला. नंतर गेलो तर बहिण गायब. अरे आता इथे होती. मग झपाझप पावले उचलली द्त्तमंदीरात पाहिले दिसली नाही. पुढे परतीच्या वाटेवर वेगाने जात राहिलो. दिसली नाहि. परत मागे येउन पाहिले नाहीच कुठे? अरे दोन मिनिटात कशी गायब झाली. कालावधी व वेग याची तुलना करत मी परिसर पिंजला होता. अरे त्या म्हातारी सारखी गायब! मग घरी आलो. बहिणीला फोन लावला. ती म्हणाली मी थेट नेहमीच्या रस्त्याने घरीच आले. मग मी निष्कर्ष काढला की माझ्या मेंदुत time & space चे गणित काहीतरी चुकले असावे. आपल्या अंदाजापेक्षा मेंदुत वेगळेच काहीतरी गणित झाले असावे. ती दोन मिनिटे प्रत्यक्षात जास्त असणार आहेत.

भुभु लोक असतात तिथे.>>>>>
भुभु लोक म्हणजे??? मला तर Vodafone च्या जाहिरातीतील झुझू आठवले!

भुत्याभाउ तुम्ही प्रतीलिपी च्या गोष्टी ईकडे का पोस्ट करता?
Submitted by पलक on 11 January, 2018 - 10:38 >>>>>>. मलाही हा प्रश्न पडतो यांचे किस्से वाचून

थोडाफार फेरबदल करून ईकड- तिकडचे किस्से स्वतः चे म्हणून टाकतात असे वाटते म्हणजे निदान मलातरी

उगीच काय?? चांगलं लिहिताहेत की ते.>>>>
... तर या ठिकाणी मला, श्री.जय यांचा एक जगप्रसिद्ध डायलॅग आठवत आहे.
आणि तो , मी इथे लिहित आहे..
... प्यारी नहीं.. बहुत सारी बातें करती है !

उगीच काय?? चांगलं लिहिताहेत की ते.>>>>>
ते चांगलं लिहितात यात शंकाच नाही, पण ज्या वेगाने त्यांचे नवनवीन धागे येत आहेत तो वेग पाहता 'विठ्ठल' यांची शंका रास्त वाटते!!! Happy
ऋन्मेऽऽषचे स्पर्धक आहेत असे म्हणायला काही हरकत नाही!

ऋन्मेऽऽषचे स्पर्धक आहेत असे म्हणायला काही हरकत नाही!>>>>> ..नाही विमु!
ऋन्मेषला तोड नाहीये..ऋमध्ये फक्त भरमसाठ लिहीणे एवढा एकच (अमानवीय Lol ) गुण (कि दुर्गुण Wink ) नाही.. त्याचं 'अभिजात' लिखाण आणि एक व्यक्ती म्हणून त्याच्याठायी असलेला चांगुलपणा+मोठेपणा इतरांकडे असेलच असं नाही. ऋ ला कोणी स्पर्धक आहे की नाही हे ठरवायला आपल्याला वेळ जाऊ द्यावा लागेल. सध्यातरी मला तसं वाटत नाही.

Pages