मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यू लोकांना भारताने नेहमीच चांगले वागवले आणि आजही अनेक ज्यू भारतात वास्तव्य करून आहेत.
(आशा भेंडे पुर्वीच्या ज्यू होत्या. माझी अ‍ॅडव्होकेट पण ज्यू होती. ) त्यांच्या संस्था, सिनेगॉग अजूनही भारतात आहेत. शिवाय जर तंत्रज्ञानात, खास करून ऋषी क्षेत्रात त्यांची मदत मिळाली तर भारताला हवीच असेल.

सर्व जगांनी नाकारल्यावरही त्यांनी जी प्रगती केली त्याबद्दल त्यांचे कौतूक करायलाच हवे. फार लांब कशाला अगदी २५ वर्षांपुर्वी भारतातही बोटींना, ती कधी कुठल्याही इस्रायली बंदरात गेली नाही असे प्रमाणपत्र घ्यावे लागत असे.

आता ते सगळे निवळले आहे. राजकारणात कायमचे शत्रुत्व परवडत नाही.

उदयन
नमस्कार

मला कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल आवड नावड नाही. भारताचे हित कशात असू शकेल इतकाच विचार करावासा वाटतो व त्यातून जे सुचले ते लिहिले.

ज्याच्यामुळे भारतातील जातीपातीचे राजकारण मोडीत निघेल व भारतीयांच्या एकजुटीत वाढ होईल, जो खात नाही व खाऊ देत नाही, जो निर्णय घेताना फक्त भारताचे हित पाहातो व झटपट निर्णय घेतो तो माणूस मला आवडतो. असा माणूस कोणत्याही पक्षाचा असला तरी मला चालेल.

मोदी माणूस असा असावा असे वाटतेय म्हणून सद्या तरी आवडतोय.
बघू पुढे काय होतेय.

तरीपण तुम्हाला माझ्या लिखाणामुळे जो त्रास झाला त्याबद्दल क्षमा असावी.

इस्राइलात यान्त्रिक शेती होते कारण एकाच्या नावाव मोठी जमीन. भारत अल्प भु धारकान्चा देश आहे. नान्गरायला यन्त्र सुरु करुन लगेच बन्द जरी केले तरी ते तोवर दुसर्याच्या शेतात घुसले असेल

रीपण तुम्हाला माझ्या लिखाणामुळे जो त्रास झाला त्याबद्दल क्षमा असावी>> त्रास नाही हो... यात कसली क्षमा मागतायत Sad
जे काही झाले ते सगळ्याच सरकार मधे झालेले फक्त परिस्थिती तेव्हा वेगवेगळी होती...
म्हणुन Happy

@लक्ष्मी गोडबोले.
इस्त्रायल जशी शेती करतो अगदी तशीच शेती आपण केली पाहिजे असे काही नाही. माझे तर म्हणणे आहे की डोळे झाकून कोणाचेही अनुकरण करू नये.

त्यांच्या पध्दतीत आपल्याला योग्य अशी सुधारणा करता आली (इंडिनायझेशन) म्हणजे झाले. त्यासाठी आवश्यक अशी तज्ञांची भली मोठी फळी आपल्या नशिबाने भारतात उपलब्ध आहे. बी, बियाणे, खते, साठवणूकीचे व पॅकेजिंगचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, मार्केटिंग, क्वालिटी कन्ट्रोल वगैरे बर्‍याच गोष्टी आहेत आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारख्या.

भारताचे एक वैशिट्य आहे. भारत मूलभूत संशोधनात मागे असला तरी कोणत्याही मालाचे उत्पादन कमी खर्चात करण्याची हातोटी भारतीयांकडे आहे. त्यासाठी नवीन उत्पादन पध्दती विकसीत करणे भारतीयांना जमते. पण अजून तरी आपण ह्या कलेचा उपयोग नीट करून घेऊ शकलो नाही आहोत.
असो.

<<इस्राइलात यान्त्रिक शेती होते कारण एकाच्या नावाव मोठी जमीन. भारत अल्प भु धारकान्चा देश आहे. नान्गरायला यन्त्र सुरु करुन लगेच बन्द जरी केले तरी ते तोवर दुसर्याच्या शेतात घुसले असेल>>>

सहकारी तत्वावर सामुदायिक शेती हा यावर एक चांगला पर्याय ठरू शकेल. मला आता नक्की आठवत नाही पण पंजाबमध्ये तसे ओरिसामध्ये असे यशस्वी प्रयोग झालेले आहेत.

<<इस्राइलात यान्त्रिक शेती होते कारण एकाच्या नावाव मोठी जमीन>>

आधीच टिचभर देश त्यात किती मोठी जमीन असणार एकाच्या नावावर?
तेव्हा याविषयी काही पुरावा असल्यास सादर करावा. अगदी सातबारा नको Proud पण काही पुरावा असल्यास द्यावा. अभ्यासाला बरा पडेल.

इस्त्राईलबद्दल प्रेम असलेल्यानी अगदी काहीच नाही तरी निळू दामल्याण्चे जेरुसलेम हे पुस्तक वाचावे. १९७७ मध्येही इस्त्राईलकडे राजकिय दृष्ट्या झुकणाचे प्रयत्न झाले होते. सुदैवाने ते फार पुढे गेले नाहीत.

अकलेची दिवाळखोरी आणि "अपात्र"ता असली की दुसर्‍यांची मते हे वैचारिक मुडदुस वाटू लागतात. Wink

अश्विनी, मी वाचलेच आहे. पण सुरवात कुणी केली ते कृपया पहावे. घाणेरड्या कमेंट्स आल्या इब्लिसच्या म्हणून उत्तर दिले इतकेच. यापुढे विषयाला धरुन कमेंट्स केल्या जातील पण कुरापतखोर कमेंट्स आल्या तर काय करावे याचे आपण मार्गदर्शन करावे.

@रॉबीनहूड
निळू दामले यांचे नाव पत्रकारीता, ICSAR मधील कामगार संघटनांबद्दलचा अभ्यास तसेच प्रत्यक्ष युध्दभुमीवर जाऊन अरब इस्त्रायल संघर्ष यावर लिहिलेले पुस्तक आणि एकंदरीतच महाराष्ट्रातील एक Socialist म्हणून ते प्रसिध्द आहेत.

त्यांनी इस्त्रायलचा शेतीविषयक अभ्यास केलाय हे प्रथमच कळतय. त्यांनी इस्त्रायलचे शेती तंत्रज्ञान भारताला उपयोगी नसल्याचे लिहिलेय? खर नाही वाटत.

प्लिज रॉबीनहूड, जेरूसलेम पुस्तकात त्यांनी शेतीविषयक काही लिहिले असेल तर कुठल्या पानावर त्यांनी हे लिहिले आहे ते सांगाल का? एकंदरीत मला ते पुस्तक परत वाचायला लागणार असे दिसतेय. शेतीचा हा उल्लेख माझ्या नजरेतून कसा काय सुटला आश्चर्यच आहे.

मला फक्त इस्त्रायलच्या शेती तंत्रज्ञानात विशेष करून पाणि नियोजनात रस आहे आणि भारताला ते मिळणे फायद्याचे होईल किंवा नाही इतकेच तपासायचे आहे.

मोदी हा शब्द जिथेजिथे येईल तिथेतिथे वाद झालेच पाहिजेत का?
प्रत्येकजण इथे आपलाच पक्ष कसा चांगला आणि दुसर्‍याचा कसा वाईट इ. वादात का पडतो आहे?
आपल्या भांडण्याने कुणाचे काय साधणार आहे?

आता आहे हे असे आहे. मग कोणी का निवडून येईना.
आपल्या हातात आता फक्त इतकेच आहे कि आता आलेल्या सरकारचे निर्णय काय आहेत यावर लक्ष ठेवणे.
इतके दिवस जे जे राजकारण या विषयाबद्दल उदासिन होते (मी स्वतःसुद्धा) त्यांनी नागरीकशास्त्राची थोडीफार रिविजन करणे आणि एक भारतीय नागरीक म्हणून सरकारवर चांगले आणि भ्रष्टाचाररहीत काम करावे यासाठी एकत्रितरीत्या दबाव आणणे. काँग्रेस, भाजप, शिवसेना इ.इ.

माझी सर्वच आयडींना (जुन्या-नव्या-ओरिजिनल-डुप्लिकेट) विनंती आहे कि आपण वाद घालण्यापेक्षा किंवा वैयक्तिक पातळीवर हाणामारी करण्यापेक्षा मुद्द्याला धरुन चर्चा केली तर फार बरं होईल. याचा अर्थ सर्वांनी सरकारचे गोडवे गायचे किंवा सर्वांनी टिका करायची असे नाही. दोन्ही बाजुंची मते तितकीच महत्वाची आहेत. पण वैयक्तीक भांडणांतुन काहीच साध्य होणार नाही.

अर्थात माबोचा इतिहास बघता माझी हि पोस्ट कोणी सिरियसली घेईल असे वाटत नाही. पण सगळ्या धाग्यांवर वादच वाद दिसले म्हणुन राहावले नाही. आपण सगळ्यांनीच एक क्षण थांबुन विचार करायची गरज आहे.

पियू तुम्हाला अनुमोदन. मी हेच करत होतो, पण काही कमेंट्स मुळे उत्तर देत गेलो. आता तुमच्या सूचनेनुसार संबंधीत पोष्टीच टाकेन.

@उदयन
खास तुमच्यासाठी
इस्त्रायलच्या शेतीविषयक अभ्यासाला महाराष्ट्रात सुरवात प्रथम शरद पवारांनी केली हे तुम्हाला माहिती आहे का? स्वतः शरद पवार इस्त्रायलला भेट देऊन आले. अनेक जणांना त्यांनी अभ्यासासाठी इस्त्रायलला पाठवलेले होते. त्या अभ्यासावर एक मोठी पाच भाग असलेली सचित्र लेखमालिका सकाळ मधे येत होती. फारच सुंदर व अभ्यासपूर्ण लेखमालिका होती ती. मी ती सगळी वाचली आहे आणि बरेच दिवस जपून ठेवली होती ती माझ्याकडे.
तेव्हापासूनच इस्त्रायलकडे मी कौतुकमिश्रीत नजरेने पहातोय.

अंदाजे २० वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत ह्या. पण पुढे काही झाल्याचे व महाराष्ट्रातील शेतकर्‍यांमधे फरक पडल्याचे अनुभवास येतय काय ? शरद पवार त्यावेळेस महाराष्ट्राचे मु़ख्यमंत्री होते पण परराष्ट्र धोरण मुख्यमंत्र्याच्या हातात नसते. हे सगळ्यांनाच माहितेय.
पण कशासाठी जुने दळत बसायचे. जाऊ दे.

२०१४ मधे बदलेली परिस्थिती व कशाने भारताचे हिग साधले जाईल याबाबत चांगला विचार करायला काय हरकत आहे.
मोदी उद्या माबोवर येऊन हे सगळे लिखाण वाचणार आहेत आणि मग निर्णय घेणार आहेत असा भ्रम कोणत्याच माबोकराला झालेला नाहिये हे काय कमी आहे.

अहो तुम्ही आता शेती कडे वळालेत .. आधी विदेश निती मधे होतात.. दोन्ही वेगळे आहेत ..मी फक्त विदेशनितीवरुन इस्त्रायल वर लिहिले होते. शेतीवरुन नाही .. Happy

हाहा
ओके

10 वर्ष भाऊ चे दूकान बंद होते Lol
ते दुसर्याबद्दल लिहीत आहे
कमाल आहे Wink

आणि लिहिले कुणाबद्दल Wink बरखा दत्त जीला वाजपेयींनीच पाठिंबा देउन कारगील कव्हर करायला पाठवलेले Wink ज्यातुन सगळ्या देशाला "आम्ही पण युध्द करु शकतो" हे दाखवायचे होते. (जे यशस्वी झालेच नाही तो भाग अलहिदा Wink )
आता काम निघुन गेले तर टिका सुरु .. जाम भारी गामा Biggrin
असले ब्लॉग ला प्रमाण मानायला सुरुवात केली तर ... असो Wink

उदयन, ते नुसते ब्लॉगलेखक नाहीत तर पुण्यनगरी नामक जागतिक दर्जाच्या पेपरातही लिहितात असे मला हल्ली ह इथे तिथे लिंका मिळाल्या त्यावरून समजले.

उदयन..,

>> असले ब्लॉग ला प्रमाण मानायला सुरुवात केली तर ...

तुम्हाला सदैव प्रमाणाची गरज भासते का? स्वत:चा विचार करता येत नाही वाटतं?

आ.न.,
-गा.पै.

भाऊ तोरसेकर उच्च दर्जाचे पत्रकार आहेत. आधी सामना मधे लिहीत असत. सद्ध्या ते कुठल्या पेपरात लिहीतात यावरुन त्यांच्या उच्च दर्जाची कल्पना करणार असाल तर कठीण आहे. तर ते असो.

Lol
उच्च. भाजपा तर्फे लांगुलचालन चे लिहिले की उच्च दर्जाचे आणि बरखा दत्त ने विरुध्द लिहिले की ... असोच आता Biggrin

पुण्यनगरी नामक जागतिक दर्जाच्या पेपरातही लिहितात >>>>>. अरे बापरे.... Sad हे माहीतीच नव्हते ..

कृपया मी लिहिल्या गेल्या सगळ्या विरुध्द पोस्टींची जाहीर क्षमा मागतो .
आशा आहे इथले भक्त उदार मनाने मला माफ करतील Wink

उदय, मी ते काय लिहीतात त्याबद्दल बोललो नाही. ते अत्यंत हुशार आहेत एवढंच बोललो. बाकी ते लिहीतात ते योग्य की अयोग्य याची मिमांसा ज्याने त्याने करावी. पण अर्थात तो धाग्याचा विषय नाही. तर ते असोच.

धाग्याच्या शेवटी धागाकर्तीने वैय्यक्क्तिक कमेंट्स करु नका असे लिहीले आहे ते फक्त माबोकरांपुरते आहे की ते भाऊंनाही लागू होते. नाही तर "लोका सांगे....." असा प्रकार व्हायचा.

Pages