मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

कोंग्रेस करेल तर ते लांगूलचालन. मोदींनी केले तर राजकारण. भजनाला ऊत आलाय नुसता.

भजनाला ऊत आलाय नुसता.<<< Lol

तुमचे जे चालले आहे त्याला 'श्रद्धांजलीला ऊत आलाय नुसता' म्हंटले तर चालेल का?

As many as 84 government departments have prepared 20-minute power point presentations for the new prime minister.

The meetings can be "at any time and any place", the officials have been warned. Sources say Mr Modi is keen to have one-on-one meetings with each secretary.

It is rare for secretaries of the government of India to meet the PM directly, officials told NDTV. The outgoing Prime Minister, Manmohan Singh, never had such meetings, they added.

चेंज ! गुड गव्हर्नंससाठीचे पहिले पाऊल. !
>>>>>>>>>>>>>

Damn good. Clogs in Govt machinery are being removed even before the new PM has taken oath......

कोंग्रेस करेल तर ते लांगूलचालन. मोदींनी केले तर राजकारण. भजनाला ऊत आलाय नुसता.
>>>>>>>>

Switch off the chanel if you dont wish to listen to the bhajans.. simple.

IBLIS kinwa je koni asel te.

tumhee ragawoon bolat ahat he health la changale nahee. tyamule BP vadhu shakato. tumhee shant pane sagitale tari chalu shakate. Mala PROXY mhanaje kay tech mahit nahi. Mee var sangitale aahe ki mala Devnagari madhe (ithalya) vel lagato.

maza adhicha baraha hota te kahitari prob houn band jhale aahe. tyat ani yat thoda farak aahe, mhanun godhal udato. te chalu jhala ki mala kahich problem nahi. ithala pan typing jamel. baki technical details mala kalat nahit. tumhala vichar samajale tar kam jhale .

फु.स. - चालू -
दु-कान राव - बरहा पुर्वी फुकट होते आता ते पैसे आकारतात हा एक फरक झाला आहे.
तसेच तुम्ही जेथे प्रतिसाद लिहिता तेथे वर तुम्हाला सफरचंदाचे (अ‍ॅपल) एक चित्र (आयकॉन) दिसेल,
त्याच्या शेजारी एक प्रश्नचिन्ह आहे त्याला क्लिक करून पाहिलेत तर देवनागरीत टंकण्याची पुर्ण माहिती मिळेल.
तसेच वर एक मदतपुस्तिका नामक लिन्क पण आहे.

ग म भ न करून लिहिलेत आणि वेळ लागला तरी चालेल, येथे तशीही भरभर लिहिण्याची स्पर्धा नाही आहे.
फु.स. - बंद

amarch.JPG

भाउ.. Happy

>>>>Switch off the chanel if you dont wish to listen to the bhajans.. simple.<<<< अनुमोदन साधना.

मीं इथल्याच दुसर्‍या एका धाग्यावर म्हटल्यानुसार, नोकरशाहीवर अंकुश ठेवण्याची धमक व तीला विकासकार्यासाठी राबवण्याची क्षमता हे मोदींच्या प्रतिमेचे पैलू देशातील सर्व लोकाना विशेष करून भावले असण्याची दाट शक्यता आहे. सचिवांशी बैठका घेण्याचा नविन प्रघात पाडणं, हें याबाबतीतलं महत्वाचं पाऊल असूं शकतं; व प्रशासनाच्या सर्व थरांवर याचा नेमका संदेश जातोच, म्हणून याला खास महत्वही असावं.

अदाणी समुहाला कच्छमधून पाकिस्तानला वीज निर्यात करायची आहे. त्याने मोदींची परवानगी मागितली आहे.

http://www.financialexpress.com/news/adani-power-wants-narendra-modi-gov...

पाकिस्तानशी संबंध सुधारणार बहुतेक!

tumhee ragawoon bolat ahat he health la changale nahee. tyamule BP vadhu shakato. >>>> दुर्योधन तुम्ही एका डॉक्टरला त्याचेच बीपी तपासायला लावताय काय्?:हाहा:

Rofl

वंदनीय आणि प्रातःस्मरणीय व्यक्तींचे भजन करावेच सगळ्यांनी. Happy
इतक्या मोठ्या माणसाची स्ट्रॅटेजी तुम्हाला समजेल ही आशा नाहीच Wink

It is indeed very shrewd on Modi's part to invite all SAARC heads of state, including Pakistan's. बेफिकीर, विचारवंत and some others are bang on target in saying that PM level and international politics is a totally different league altogether, and many Indians have failed to understand the masterstroke on Mr Modi's part to send such invitations.

भजन चालू आहे हे मान्य केल्या बद्दल अभिनंदन. >>>>>>>>.

malaa kaahIch problem naahi, bhajan karaNyaat aani aikanyaat. namo namo karun paristhiti sudharat asel tar kaay harakat aahe? jyana aavadat naahi tyaani karu nakaa.

साधना, काँग्रेस भूईसपाट झाल्याच्या शॉ़कमधून नुकतेच बाहेर आले आहेत ते. त्यात माणिकचाचा सपाटून हरलेत नंदुरबारात. Proud

जाऊद्या, आपण फार लक्ष देऊ नये. आपल्यासारख्या लोकांनी धाग्याशी संबंधित पोष्टी टाकाव्यात हेच योग्य. Happy

Lol

Pages