निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

इडली - कृपया या धाग्यावर कोणत्याही प्रकारे जळजळीत कमेन्टस करून वाद चालू होईल असे करू नका.
अ‍ॅडमिन यांनी पण आधीच सुचना दिलेली आहे.

Don't read then Happy

Dreamgirl sathi hoti ti comment Happy you chill please (bagha kiti rude watat as English madhun bolan)

राजन विचारे विजयी

राजन विचारे हे नावही ऐकले नव्हते पण मोदींचा टिळा लावुन उभा आहे म्हणुन मत देऊन आले. माझ्याइथला नेहमीचा उमेदवार यावेळी जोरात तोंडावर आपटावा ही माझीच नाही तर अनेकांची इच्छा होती. शेवटी मतपेटीतुन ती व्यक्त झालीच.

निलेश राणेने म्हणे आत्ता तासाभरापूर्वी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष सतीश सावंत याला भर रस्त्यावर कानफडात मारली.
सिंधुदुर्गात बरेच राडे होणारसं दिसतंय>> नी, कन्फर्म्ड न्यूज आहे का? वाचलं नाही कुठल्या चॅनेलवर :/

मला तिथे रहाणार्‍या मैत्रिणीने कळवलं. बाहेर न्यूज आली की नाही माहित नाही. म्हणूनच मी म्हणे असं लिहिलंय.

राजन विचारे हे नावही ऐकले नव्हते पण मोदींचा टिळा लावुन उभा आहे म्हणुन मत देऊन आले.>>>> साधना, राजन विचारे जुने आहेत Happy

माढा आणि रायगडमध्ये अत्यंत अटितटीच्या लढती चालू आहेत.
सारखं पारडं फिरतय..
आत्ता मोहिते पाटील आणि सुनील तटकरे दोघेही साधारण २००० मतांनी पिछाडीवर पडले आहेत..

नी अच्छा!! हो पण राडा नक्की होणार!!
राणे गप्प बसतील असं वाटत नाही.

अवांतर : रिया अगं अ‍ॅडमिन ना विचार देवनागरी का टाईप करता येत नाहीये ते!! मोबाईल वर की लॅपी वापरतेस अ‍ॅक्सेस करायला?

आत्ता राणेंनी आयबीएन लोकमतवर स्टेटमेंट दिलंय की मी(म्हणजे ते) तासाभरात राजिनामा पाठवणार आणि जी काही कामे करतोय ती थांबवणार.

नीधप | 16 May, 2014 - 14:15 नवीन

आत्ता राणेंनी आयबीएन लोकमतवर स्टेटमेंट दिलंय की मी(म्हणजे ते) तासाभरात राजिनामा पाठवणार आणि जी काही कामे करतोय ती थांबवणार.

अन्जू | 16 May, 2014 - 14:15 नवीन

नारायण राणे यांनी राजीनामा पाठवला.
<<<

तुम्हालाही दोघींना दिडदिडशे रुपयांची चॉकलेट्स गिफ्ट! (प्रत्येकी)

Pages