निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता यात मी विनोदी काय बोलले?<<<

अहो विनोदी नव्हे! त्या राणेची झालेली मनोवस्था नजरेसमोर आल्यामुळे फस्सकन् हसू आले इतकेच. ह्याला आसूरी आनंद असेही म्हणता येईल.

निलेश राणेने म्हणे आत्ता तासाभरापूर्वी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष सतीश सावंत याला भर रस्त्यावर कानफडात मारली.
सिंधुदुर्गात बरेच राडे होणारसं दिसतंय.>> केसरकरचं काय होणारेय कोणास ठाऊक!!

नारायण राणे राजीनामा देणार!

भाजप आणि काँग्रेस असे राष्ट्रीय पातळीवरील दोन पक्ष...त्याशिवाय राज्यपातळीवरील अण्णाडीएमके, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना हे तीन मोठे पक्ष मानले जातील....या लोकसभेच्या सदस्य संख्येत असे चित्र समोर येत आहे... अण्णाडीएमके ३५, तृणमूल कॉंग्रेस ३४, शिवसेना १९.

महादेव जानकर राष्ट्रवादीत कधीच नव्हते. ते सुरुवातीपासून कट्टर पवार विरोधी होते. मागच्या निवडणूकित जानकरानी पवाराना माढ्यातून टफ फाईट देत १ लाख मत घेतले होते.

महादेव जानकर हे भाजपा व महायुतीचे उमेदवार होते...

महेश,
अधिकृत रित्या सरकारदरबारी निवडल्याची नोंद. उमेदवाराला जिंकण्याचे प्रमाणपत्र इ. सोपस्कार झाल्यानंतर NIC अपडेट होईल. टेन्शन घेऊ नका.

सुरेश प्रभूंसारखा उमेदवार निवडून आला असता तर चालला असता... राऊत अगदीच ठोकळा आहे. कोकणचं एकंदरीतच कठीण आहे Sad

निकाल जाहीर झाल्यावर, जिंकलेल्या उमेदवाराला तो/ती जिंकल्याचं प्रमाणपत्र मिळतं, निवडणूक अधिकार्‍याच्या सही-शिक्क्याचं. (नक्की आठवत नाहीये यासंदर्भातला नियम. कुणाला माहित असल्यास सांगा) त्यानंतरच तो निकाल वेबसाइट वर येईल त्यांच्या.

स्वप्नसुंदरी, या शुभ वर्तमानाबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला एक दिडशे रुपयाचे इंपोर्टेड चॉकलेट भेट!

आज तुम्ही विकत घ्या, आपण भेटलो तर पैसे देऊन टाकेनच.

नीधप, जर मोदी, गडकरी, आडवानी, स्वराज, एवढे लोक निवडून आले असे सगळे म्हणत आहेत,
तर एनआयसीच्या साईटवर भाजप केवळ २ जागांवर वोन (जिंकले) असे का दाखवत आहेत.
की त्यांना माहिती अपडेट करायला वेळ लागत आहे ? जसे मारामारी संपत आल्यावर पोलिस येतात Happy

>>स्वप्नसुंदरी, या शुभ वर्तमानाबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला एक दिडशे रुपयाचे इंपोर्टेड चॉकलेट भेट!
Lol

महेश, इलेक्शन कमिशन वर खाजगी वाहिन्यांसारखे "सर्वात आधी" बातमी देण्याचे प्रेशर नाही. मात्र खात्रीशीर बातमी देण्याचे आहे. त्यामुळे वेळ लागला तरी त्यांना प्रॉब्लेम नाही. काहीतरी "नोटिफिकेशन" देण्याची प्रोसेस असेल मते मोजून झाली की. त्याशिवाय ते 'जिंकले' म्हणून म्हणणार नाहीत. याउलट खाजगी वाहिन्यांना प्रेक्षकांनी इतर कोठेही पाहण्याआधी आपल्या वाहिनीवर पाहावे म्हणून घाई असते.

नाशिक ... भुजबळ पडले... मनसे deposit जप्त.... लोक वेडे नाहित... हे खरे .... मनसे आता नवीन blue print बनवनार.... Happy

इब्लिस, अहो एवढा वेळ कसा लागेल माहिती अपडेट करायला ?
एखाद्या जागेची मतमोजणी पुर्ण झाली की निकाल लगेच जाहिर होतो ना ? की वेगळी प्रोसेस आहे काही ?
आता वर एवढे लोक सांगत आहेत हे जिंकले ते जिंकले, ते कोणत्या माहितीच्या आधारे सांगत आहेत ?

@फारेण्डा - आपल्या पोस्टस क्रॉस झाल्या काही वेळाच्या फरकाने. तुझा मुद्दा बरोबर आहे.

मी हेडर मधे काय स्वरूपात अपडेटस द्यावेत त्याचा विचार करतो आहे.
राज्यनिहाय किती जागा कोणी जिंकल्या असे दाखवावे का ?
तसेच हेडरमधे टेबल आखता येते का माहिती देण्यासाठी ?

स्वप्नसुंदरी, या शुभ वर्तमानाबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला एक दिडशे रुपयाचे इंपोर्टेड चॉकलेट भेट!>> Sad मला आनंद नाही झाला. नाही, राणे पडला म्हणून नाही तर ठोकळा निवडून आलाय!! देवा हा काय विकास आणणार कोकणात. त्याला कोकणाबद्दल काय माहीतच नाहीये... सुरेश प्रभूंना का नाही परत दिलेलें तिकीट कोणास ठाऊक! तो माणूस निदान सेंसीबल होता. हा ठोकळा निवडून येतोय तर प्रभू नक्कीच आले असते. मोदींच्या मंदीरात शेंदूर फासलेले दगडही पुजले गेलेत.

महेश, इब्लिस आणि माझा प्रतिसाद वाचा. वृत्तवाहिन्यांवर जिंकले म्हणून सांगतात याचा अर्थ मतमोजणीच्या सगळ्या फेर्‍या पार पडल्या आणि त्या उमेदवाराला बहूमत मिळालं. (म्हणजेच तो जिंकला). पण निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उमेदवाराला जिंकल्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतरच अपडेट केलं जाईल. Happy

महेश.. मतमोजणी अधिकार्‍यानी पूर्तता केल्यावरच सरकारी वेब साईटवर अपलोड होईल.. तोपर्यंत नक्कीच नाही. न्यूज चॅनल वाले प्रत्येक काउंटींग बूथ च्या बाहेर फिल्डींग लावूनच बसलेले असतात.. आणि इकडे निकाल अपडेड होण्याच्या आतच टीव्हीवर दाखवतात.

मी हेडर मधे काय स्वरूपात अपडेटस द्यावेत त्याचा विचार करतो आहे.
राज्यनिहाय किती जागा कोणी जिंकल्या असे दाखवावे का ?
तसेच हेडरमधे टेबल आखता येते का माहिती देण्यासाठी ?

ज्या भाजपच्या म्हातार्यांना दहा वर्षात संस्कृतप्रचुर हिंदी व तर्खडकरी इंग्रजीतून पोपटपंची करुन जे जमले नाही ते मोदींनी करुन दाखवले

महेश, तुम्हीही घाईपेक्षा खरी अधिकृत वेबसाईटवर निकाल आल्यावर अपडेट करा वर. बाकीचे अपडेट्स कमेंटमध्ये येत राहतीलच.

शिवसेना भाजप चा दगड जरी उभा राहीला असता तरी निवडून आला असता... मोदी विकास मॉडेल आणि सोशल मिडीया मार्केटिंग टेक्निक रॉक्ड!!

Pages