निवडणूक २०१४ - मतमोजणी - निकाल

Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31

१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.

भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२

भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.

नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय

जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशक्य निकाल लागलाय.
माझ्या अपेक्षेपेक्षा अति अति शय जास्तं सीटस मिळाल्यात एन्डीएला.
माझी अपेक्षा २१०+ होती , यांनी तर ३२० हून जास्तं मिळवल्या.

माबोवरच्या एन्डीए समर्थकांचं अभिनंदन!
Wink

सातार्‍याची १२.४० ची स्थिती

उदयनराजे भोसले.....३,९२,१९०
अडीच लाखापेक्षाही अधिकची मतांची आघाडी....मला वाटते देशातील हा एक विक्रमच होईल....जेतेपदाचा

आहेत आहेत. काळजी करू नका.
अजून जितं मया सुरू झालेलं दिसलं नाही. अ‍ॅडमिन काकांनी भरलेला दम कामी येतोय वाटते/

खानदेशातल्या सगळ्या सीट भाजपा.
हीना गावित आश्चर्यकारकरित्या विजयी झाल्या असे ऐकतो. Wink

साती,

>> माझ्या अपेक्षेपेक्षा अति अति शय जास्तं सीटस मिळाल्यात एन्डीएला.

यालाच लाटेची निवडणूक म्हणतात. निकालांवरून दिसतं की मोदी लाट खरी आहे. Happy ज्या दगडाला मोदी नामक शेंदूर लागला त्याला लोकांनी निवडून दिलं आहे.

यापूर्वी लाट १९८४ ला आलेली होती.

आ.न.,
-गा.पै.

काँग्रेस समर्थक ना ही १९९९ ला गायब झालेले नाही २०१४ ला गायब होणार

हा २००४ आणि २००९ साली भाजप समर्थक मात्र गायब झालेले Biggrin

सुसु पडतील असे वाटत नाही. पण जानकरांनी ज्या प्रकारे मते खाल्ली आहेत त्यावरुन हा विजय केवळ कागदी विजय असेल, इतकी नाचक्की कधीच झालेली नसेल यापूर्वी. अर्थात, जानकर हे पूर्वाश्रमीचे राकाँ चेच असल्याने हा विजय काय किंवा पराभव काय दोन्ही सारखेच. इथे भाजपचा उमेदवार असता तरच विजय किंवा पराभवाला अर्थ होता.

४५ टक्केहून जास्त मते बीजेपीला याचा अर्थं धर्म जात वर्ग निरपेक्ष मते मोदीकाकांना मिळालीत.

अरे हो, आमचे शेजारचे काँग्रेस आजोबा हरले. जवळपास ४०००० मतांनी.

Raigad
32
ANANT GEETE Shivsena
TATKARE SUNIL DATTATREY Nationalist Congress Party
1182 Counting In Progress

काटें की टक्कर..

छगन भुजबळ पराभुत.................. राष्ट्रवादीला सर्वात मोठ्ठा धक्का ...........

SUPRIYA SULE Nationalist Congress Party 201209
MAHADEV JAGANNATH JANKAR Rashtriya Samaj Paksha 186362

Pages